Download as rtf, pdf, or txt
Download as rtf, pdf, or txt
You are on page 1of 17

पूजेच्या प्रारंभ

1 कुं कु मतिलक लावणे


पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वतःला कुं कु मतिलक लावावा.
2 आचमन करणे
उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि
श्रीविष्णूच्या प्रत्येक नावाच्या शेवटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे –
१. श्री के शवाय नमः ।
२. श्री नारायणाय नमः ।
३. श्री माधवाय नमः ।
चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविन्दाय नमः ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत अन् शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नमः ।
६. श्री मधुसूदनाय नमः ।
७. श्री त्रिविक्रमाय नमः ।
८. श्री वामनाय नमः ।
९. श्री श्रीधराय नमः ।
१०. श्री हृषीके शाय नमः ।
११. श्री पद्मनाभाय नमः ।
१२. श्री दामोदराय नमः ।
१३. श्री सङ्कर्षणाय नमः ।
१४. श्री वासुदेवाय नमः ।
१५. श्री प्रद्मुम्नाय नमः ।
१६. श्री अनिरुद्धाय नमः ।
१७. श्री पुरुषोत्तमाय नमः ।
१८. श्री अधोक्षजाय नमः ।
१९. श्री नारसिंहाय नमः ।
२०. श्री अच्युताय नमः ।
२१. श्री जनार्दनाय नमः ।
२२. श्री उपेन्द्राय नमः ।
२३. श्री हरये नमः ।
२४. श्री श्रीकृ ष्णाय नमः ।।
पुन्हा आचमनाची कृ ती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत
हात जोडावेत.
*देवतास्मरण*
श्रीमन्महागणाधिपतये नमः ।
इष्टदेवताभ्यो नमः ।
कु लदेवताभ्यो नमः ।
ग्रामदेवताभ्यो नमः ।
स्थानदेवताभ्यो नमः ।
वास्तुदेवताभ्यो नमः ।
आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
अविघ्नमस्तु ।
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।
धूम्रके तुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृ णुयादपि ।।
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।


प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।
अर्थ : सर्व संकटांच्या नाशासाठी शुभ्र वस्त्र नेसलेल्या, शुभ्र रंग असलेल्या, ४ हात असलेल्या आणि प्रसन्न मुख असलेल्या अशा देवाचे (भगवान
श्रीविष्णूचे) मी ध्यान करतो.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।


शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् ।


येषां हृदिस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिः ।।

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।


विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ।।

लाभस्तेषां जयस्तेषां कु तस्तेषां पराजयः ।


येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ।

यत्र योगेश्वरः कृ ष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।


तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् ।
सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ।।

अभीप्सितार्थसिध्द्यर्थं पूजितो यः सुरासुरैः ।


सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।।.

सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः ।
देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ।

देशकाल’ आणि ‘संकल्प’


‘देशकाल’ उच्चारून झाल्यानंतर ‘संकल्प’ उच्चारायचा असतो.
देशकाल (वर्ष २०२०)
पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील ‘देशकाल’ म्हणावा.
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे
युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरेे शालिवाहन शके
अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके शार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ मंद वासरे हस्त दिवस नक्षत्रे (सायं.
७.१० नंतर चित्रा दिवस नक्षत्रे) साध्य योगे (स. १०.१९ नंतर शुभ योगे) वणिज करणे (स. ९.२८ नंतर भद्र योगे) कन्या स्थिते वर्तमाने
श्रीचंद्रे सिंह स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये धनु स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ मकर स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ्
ग्रह-गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…
४ उ १ अ. ‘देशकाला’च्या संदर्भातील सूचना

पंचांग
१. पंचांग पाहून वरील संस्कृ त लिखाणातील ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.
२. ज्या प्रदेशाला ‘दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे’ हे वर्णन लागू नसेल किं वा प्रदेशाचा ‘देशकाल’ पूजकाला ठाऊक
नसेल, त्या वेळी वर उल्लेखिलेल्या शब्दांच्या ठिकाणी ‘आर्यावर्त देशे’ असे म्हणावे.

ज्यांना वरील ‘देशकाल’ म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर ‘संकल्प’ उच्चारावा.

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च ।


योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।

संकल्प
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘संकल्प’ उच्चारावा.
मम आत्मनः परमेश्वराज्ञारूपसकलशास्त्रश्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम श्रीसिद्धिविनायक- प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं
सर्वकर्मनिर्विघ्नत्वपुत्रपौत्राभिवृद्धिमहैश्वर्यविद्याविजयसंपदादिकल्पोक्तफलसिध्द्यर्थम् श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थं ध्यानावाहनादि
षोडशोपचारैः पूजनमहं करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिध्द्यर्थं श्री महागणपतिपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणं करिष्ये । कलशशङ्खघण्टादीपपूजनं
च करिष्ये ।।
श्री महागणपतिपूजन
प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किं वा उपलब्ध स्थानानुसार ताम्हण अथवा के ळीचे पान ठेवावे. त्यावर तांदळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ ठेवतांना
त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
ध्यान
नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावेत आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटू न मनात आठवावे अन् पुढील श्लोक म्हणावा.

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।


निर्विघ्नं कु रु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

श्री महागणपतये नमः । ध्यायामि


आवाहन
उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना त्या श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी
वहाव्यात.
श्रीमहागणपतये नमः । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।।

आसन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना त्या श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

चंदनादी उपचार
उजव्या हाताच्या अनामिके ने गंध (चंदन) देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ हा शब्द उच्चारत कं सात दिल्याप्रमाणे उपचार
देवाच्या चरणी अर्पण करावेत.

श्री महागणपतये नमः । चन्दनं समर्पयामि ।। (गंध लावावे.)


ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.)
ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कु ङ्कु मं समर्पयामि ।। (कुं कू वहावे.)
श्री महागणपतये नमः । ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.)
श्री महागणपतये नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.)
श्री महागणपतये नमः । पुष्पं समर्पयामि ।। (फू ल वहावे.)
श्री महागणपतये नमः । दूर्वाङ्कु रान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.)
श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.)
श्री महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

उजव्या हातात २ दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडू न) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि
आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावेत.

प्राणाय नमः ।
अपानाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।।

टीप – वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात. हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि दुसरी
दूर्वा श्री गणपतीच्या चरणी वहावी. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.

श्रीमहागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि ।


उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फू ल वहावे.)
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।

नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.

कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।


अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने.

यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि ‘प्रीयताम्’ हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.
अनेन कृ तपूजनेन श्री महागणपतिः प्रीयताम् ।

श्रीविष्णुस्मरण
दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावेत. नंतर ९ वेळा ‘विष्णवे नमो’ म्हणावे अन् शेवटी ‘विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

पूजेशी संबंधित उपकरणांचे पूजन


१. कलशपूजन

कलश पूजा
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कु रु ।।

कलशे गङ्गादितीर्थान्यावाहयामि ।।
कलशदेवताभ्यो नमः ।
सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

कलशामध्ये गंध, अक्षता अन् फू ल एकत्रित वहावे.

२. शंखपूजा
शंखपूजा
शङ्खदेवताभ्यो नमः ।
सर्वोपचारार्थे गन्धपुष्पं समर्पयामि ।।
३. घंटापूजा
घंटापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।
कु र्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
घण्टायै नमः । सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

४. दीपपूजा
दीपपूजा
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शान्तिं प्रयच्छ मे ।।
दीपदेवताभ्यो नमः ।
सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
५. मंडपपूजन
पुढील मंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ या शब्दाच्या वेळी मंडपावर गंध, अक्षता आणि फू ल वहावे.

मण्डपदेवताभ्यो नमः ।
गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची, तसेच स्वतःची (पूजकाची) शुद्धी


कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. पूजकाने पुढील मंत्र म्हणत तुळशीपत्राच्या साहाय्याने ते पाणी पूजासाहित्य, स्वतःच्या
सभोवती (भूमीवर) अन् स्वतःवर (स्वतःच्या डोक्यावर) प्रोक्षण करावे (शिंपडावे).

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।


यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।

सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा


१. श्री गणेशमूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा
अ. श्री गणेशमूर्तीची स्थापना पूर्व दिशेला करावी. तसे करणे शक्य नसल्यास पूजकाचे मुख दक्षिण दिशेकडे होणार नाही, अशा रीतीने श्री
गणेशमूर्तीची स्थापना करावी.
आ. ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे, त्या पाटाच्या मध्यभागी १ मूठ अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) ठेवाव्यात. त्यावर पिंजरीने
स्वस्तिक काढावे.
इ. नंतर त्या तांदळावर पुढीलप्रमाणे मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठा’ करावी. ‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणणे. यासाठी पूजकाने स्वतःचा उजवा
हात मूर्तीच्या हृदयाला लावून ‘या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृ ष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.

अस्यश्रीप्राणप्रतिष्ठामन्त्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वराय-ऋषयः ऋग्यजुःसामानिछन्दांसि पराप्राण-शक्तिर्देवता आं बीजं ह्रीं


शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मुर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य प्राणाइहप्राणाः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य जीव इह स्थितः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य वाङ्मनःचक्षुःश्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखंसुचिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।

टीप – प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्त आहेत.

अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।


अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर ‘ॐ’ किं वा ‘परमात्मने नमः ।’ असे १५ वेळा म्हणावे.

२. षोडशोपचार पूजा ध्यान

षोडशोपचार पूजा

हात जोडू न नमस्काराची मुद्रा करावी.

ॐ गणानांत्वागणपतिंहवामहेकविंकवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजंब्रह्मणांब्रह्मणस्पतआनःशृण्वन्नूतिभिःसीदसादनम् ।।

टीप – हा मंत्र वेदोक्त आहे.

एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ।


पाशाङ्कु शधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुं द आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत आणि हातांमध्ये अंकु श अन्
पाश धारण के ला आहे, अशा श्री सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।।


१. पहिला उपचार – आवाहन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका
आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)

आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ।


अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पुजलेल्या, अनाथांच्या नाथा आणि सर्वज्ञ गणनायका, मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ।।


२. दुसरा उपचार – आसन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् ।
स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित ।।
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।
आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
३. तिसरा उपचार – पाद्य
उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

सर्वतीर्थसमुद् भूतं पाद्यं गन्धादिभिर्युतम् ।


विघ्नराज गृहाणेदं भगवन्भक्तवत्सल ।।
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि ।।
४. चौथा उपचार – अर्घ्य
डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फू ल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव,
गौरी नि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर शिंपडा.

अर्घ्यं च फलसंयुक्तं गन्धपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।।


श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि ।।
५. पाचवा उपचार – आचमन
डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि श्री गणपति यांच्या चरणांवर
प्रोक्षण करा.

विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् ।


गङ्गोदके न देवेश शीघ्रमाचमनं कु रु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन के लेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ।।


६. सहावा उपचार – स्नान
पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी नि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर शिंपडा.

गङ्गासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलैः ।
स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कु रुष्व मे ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ।।


६ अ. पंचामृतस्नान
दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या
चरणांवर दूध, तद्नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । पयस्नानं समर्पयामि ।


तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।।

पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । दधिस्नानं समर्पयामि ।।


श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । घृतस्नानं समर्पयामि ।।
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । मधुस्नानं समर्पयामि ।।
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । शर्क रास्नानं समर्पयामि ।।
६ आ. गंधोदकस्नान
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।
गन्धोदकस्नानं समर्पयामि ।। तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। (देवांच्या चरणी पाण्यात गंध अन् कापूर घालून ते प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक
प्रोक्षण करावे. )
६ इ. अभिषेक
पंचपात्रीमध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्यात. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’ किं वा
‘संकटनाशन गणपतिस्तोत्र’ म्हणावे.
७. सातवा उपचार – वस्त्र

कापसाची दोन तांबडी वस्त्रे घ्या अन् ‘समर्पयामि’ म्हणतांना त्यांतील एक वस्त्र मूर्तीच्या गळ्यात अलंकारासारखे घाला, तर दुसरे मूर्तीच्या चरणांवर
ठेवा.

रक्तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् ।


सर्वप्रद गृहाणेदं लम्बोदर हरात्मज ।।

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।


कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।
८. आठवा उपचार – यज्ञोपवीत
महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्योत्तरीयकम् ।
विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।


श्री उमायै नमः । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

यज्ञोपवीत हे श्री गणेशाच्या गळ्यात घालावे आणि नंतर ते मूर्तीच्या उजव्या हाताखाली घ्यावे. पूजेत महादेवाची मूर्ती नसल्याने ज्या ठिकाणी
महादेवाचे आवाहन के ले असेल, त्या ठिकाणी यज्ञोपवीत अर्पण करावे.
९. नववा उपचार – चंदन
श्री गणपतीला अनामिके ने गंध लावावे.

श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ।


विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ।

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।


श्री उमायै नमः । हरिद्रां कु ङ्कु मं समर्पयामि ।। (हळद-कुं कू वहावे.)
श्री उमायै नमः । श्रीसिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)
१०. दहावा उपचार – फु ले-पत्री
उपलब्ध असलेली विविध प्रकारची फु ले आणि पत्री अर्पण करावीत.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो ।


मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ।।
सेवन्तिकाबकु लम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः ।
बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ।।

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।

महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे.

श्री उमामहेश्वराभ्यां नमः । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।

अंगपूजा
पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किं वा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून)
अक्षता वहाव्यात.

श्री गणेशाय नमः । पादौ पूजयामि ।। (चरणांवर)


श्री विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर)
श्री आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर)
श्री हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि ।। (कमरेवर)
श्री कामारिसूनवे नमः । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर)
श्री लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि ।। (पोटावर)
श्री गौरीसुताय नमः । हृदयं पूजयामि ।। (छातीवर)
श्री स्थूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयामि ।। (गळ्यावर)
श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि ।। (खांद्यांवर)
श्री पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नमः । नेत्रे पूजयामि ।। (डोळ्यांवर)
श्री सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि ।। (मस्तकावर)
श्री गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि ।। (सर्वांगावर)

पत्रीपूजा
पुढील नावांनी देठ देवाकडे करून ‘समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. (सर्व ठिकाणी प्रत्येक प्रकारची पत्री उपलब्ध असेलच,
असे नाही. त्यामुळे जी पत्री उपलब्ध झाली नसेल, त्या पत्रीच्या ठिकाणी देवाला २ दूर्वा किं वा अक्षता वहाव्यात.)

श्री सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान)


श्री गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ।। (माका)
श्री उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल)
श्री गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा)
श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा)
श्री गजकर्णाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस)
श्री गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा)
श्री वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी)
श्री एकदन्ताय नमः । के तकीपत्रं समर्पयामि ।। (के वडा)
श्री विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर)
श्री विनायकाय नमः । अश्मन्तकपत्रं समर्पयामि ।। (आपटा)
श्री कपिलाय नमः । अर्क पत्रं समर्पयामि ।। (रुई)
श्री भिन्नदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा)
श्री पत्नीयुताय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण)
श्री बटवेनमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब)
श्री सुरेशाय नमः । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार)
श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्रं समर्पयामि ।।(मरवा)
श्री हेरम्बाय नमः । सिन्दुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड)
श्री शूर्पकर्णाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई)
श्री सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)

यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे उच्चारून एके क दूर्वा अर्पण करतात.
११. अकरावा उपचार – धूप
उदबत्ती ओवाळावी किं वा धूप दाखवावा.

वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।


आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला आणि सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत
आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।।


१२. बारावा उपचार – दीप
आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्त के लेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, भक्तीपूर्वक अर्पण
के लेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)


१३. तेरावा उपचार – नैवेद्य
उजव्या हातात २ दूर्वा (दूर्वा नसल्यास तुळशीपत्र किं वा बेलाचे पान चालेल.) घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडू न दूर्वा
हातातच धराव्यात. दुर्वांसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे
दोन्ही डोळ्यांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कु रु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।
शर्क राखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती अचल करावी. या लोकात माझे अभीष्ट आणि ईप्सित पूर्ण करावे. तसेच
परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ; दही, दूध, तूप आदी भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण
स्वीकार करावा.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।


पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नमः ।
अपानाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।।

टीप – वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात.

पूजकाने हातातील १ दूर्वा नैवेद्यावर ठेवावी आणि दुसरी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहावी. उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून
ते पाणी ताम्हणात सोडावे.

नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।


हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।

फु लाला गंध लावून देवाला वहावे.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।


अ. आरती
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी. तत्पूर्वी तीन वेळा शंखनाद करावा. आरती करतांना ‘श्री गणेश प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची
आळवणी करत आहे’, या भावाने आरती करावी. आरतीचे तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृ ती फिरवावे. आरती
ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत (छातीपासून कपाळापर्यंत) ओवाळावी. आरतीला
उपस्थित असलेल्यांनी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती म्हणावी. आरती म्हणतांना ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या
जोडीला वाद्ये हळुवार वाजवावीत. घंटा मंजुळ नादात वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
आ. कापूर-आरती
आरती झाल्यावर ‘कर्पूरगौरं करुणावतारं०’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
इ. आरती ग्रहण करणे
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढू न पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही
कारणास्तव कापूर-आरती के ली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.) सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर
‘मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार’ या क्रमाने उपचार के ले जातात. परंतु शास्त्रात आरतीनंतर ‘नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प’ हा क्रम
सांगितला आहे. यासाठी येथे याच क्रमाने उपचार दिले आहेत.
१४. चौदावा उपचार – नमस्कार
पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.

नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृ तः ।।

नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।


सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीयुगधारिणे नमः ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या अन् सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्रशरिरे, पाद (पाय), नेत्र,
शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या; सहस्र नावे असलेल्या; सहस्र कोटी युगांना धारण करणार्‍या; शाश्वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा
नमस्कार असो.

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ।।


१५. पंधरावा उपचार – प्रदक्षिणा
नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावेत आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःच्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना
प्रदक्षिणा घालावी.

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृ तानि च ।


तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्वर ।।

श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।।


दूर्वायुग्मसमर्पण (पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावाने दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नमः ।
दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर ‘दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.

श्री गणाधिपाय नमः ।


श्री उमापुत्राय नमः ।
श्री अघनाशनाय नमः ।
श्री एकदन्ताय नमः ।
श्री इभवक्त्राय नमः ।
श्री मूषकवाहनाय नमः ।
श्री विनायकाय नमः ।
श्री ईशपुत्राय नमः ।
श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ।
श्री कु मारगुरवे नमः ।।

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ।।


विनायके शपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कु मारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।
श्री सिद्धिविनायकाय नमः । दूर्वामेकां समर्पयामि ।।
१६. सोळावा उपचार – मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि । (देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.)

नंतर पुढील प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।


मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृ तिस्वभावात् ।


करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।

अनेन देशकालाद्यनुसारतः कृ तपूजनेन ।


श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयतां ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।

जयघोष
देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
पूजेच्या शेवटी व्यक्त करावयाची कृ तज्ञता
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या कृ पेने माझ्याकडू न भावपूर्ण पूजा झाली. तुझ्या कृ पेने पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन
राहिले. पूजेतील चैतन्याचा मला लाभ झाला. यासाठी मी तुझ्या चरणी कृ तज्ञ आहे.’

या वेळी डोळे मिटू न ‘मूर्तीतील चैतन्य आपल्या हृदयात येत आहे’, असा भाव ठेवावा.

तीर्थप्राशन आणि प्रसादग्रहण


उजव्या हातावर तीर्थ घेऊन पुढील मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । देवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।।

मोदक वायनदान मंत्र


एका के ळीच्या पानावर किं वा ताटामध्ये १० किं वा २१ मोदक ठेवावेत. त्यावर के ळीचे पान किं वा ताट उपडे ठेवावे. त्यावर गंध-फू ल वहावे. नंतर
पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.

विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कु रु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।


दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
यानंतर आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची उत्तरपूजा


कु लाचाराप्रमाणे मूर्तीचे विसर्जन योग्य दिवशी करावे. त्या वेळी गंध, फु ले, धूप, दीप आणि नैवेद्यासाठी दही, भात, मोदक असे पदार्थ पूजेत
असावेत. प्रारंभी स्वतःला कुं कु मतिलक लावावा. नंतर आचमन करावे आणि हातांत अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा.

श्री उमामहेश्वरसहितसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम् उत्तराराधनं करिष्ये ।


तदङ्गत्वेन ध्यानगन्धादिपञ्चोपचारपूजनमहं करिष्ये ।
श्री उमामहेश्वरसहितसिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।
(आता मी उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवतेला नमस्कार करून त्याचे ध्यान करत आहे.)

१. गंध (चंदन) लावणे


श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
(लेपनासाठी चंदन अर्पण करत आहे.)
श्री उमायै नमः । हरिद्रां कु ङ्कु मं समर्पयामि ।।
(श्री उमादेवीला नमस्कार करून हळदी-कुं कू वहात आहे.)

२. पत्री आणि फु ले वहाणे


श्रीसिद्धिविनायकाय नमः । नानाविधपत्राणि समर्पयामि ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।
(श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करून या ऋतूमध्ये उत्पन्न झालेली नानाविध पत्री आणि फु ले अर्पण करत आहे.)

३. धूप (उदबत्ती) दाखवणे


श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।। (धूप दाखवत आहे.)

४. दीप ओवाळणे
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (दीप ओवाळत आहे.)

५. नैवेद्य दाखवणे
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।। (नैवेद्य अर्पण करत आहे.)

(वरील उपचार करतांना करावयाच्या कृ ती यापूर्वी सांगितल्या आहेत.)

अनेन कृ तपूजनेन श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् ।


अर्थ : या पूजेने उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवता प्रसन्न होवो. (‘प्रीयताम्’ म्हणतांना उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)

नंतर पुढील मंत्र म्हणावा.

प्रीतो भवतु । तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।


अर्थ : देव माझ्यावर प्रसन्न होवो. या पूजेचे फळ मी ब्रह्माला अर्पण करतो.

उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा.


यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।
इष्टकामप्रसिध्द्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत के लेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी
आता प्रस्थान करावे. नंतर त्या अभिमंत्रित अक्षता श्री महागणपतिपूजन के लेल्या नारळावर, तसेच श्री उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर
वहाव्यात. नंतर मूर्ती स्थानापासून थोडी हालवावी आणि कु लाचारांनुसार वहात्या पाण्यात तिचे विसर्जन करावे. (पूजेविषयीचे सविस्तर शास्त्रीय
विवेचन सनातन-निर्मित ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ यात दिले आहे.)

You might also like