STD 5 TH Science Bridge Course

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 77

श्रेयनामावली

● प्रवर्तक - शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

● प्रकाशक - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
● प्रेरणा - मा. वंदना कृ ष्णा (भा.प्र.से.)
अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
● मार्गदर्शक - मा. विशाल सोळं की (भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे
मा. राहुल द्विवेदी (भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
● संपादक - मा. दिनकर टेमकर,
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
● सहसंपादक - डॉ. विलास पाटील,
सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
● कार्यकारी विकास गरड,
संपादक - प्र प्राचार्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
तेजस्विनी आळवेकर,
वरिष्ठ अधिव्याख्याता, विज्ञान विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
मनिषा ताठे,
अधिव्याख्याता, विज्ञान विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
● संपादन सहाय्य - श्वेता दिलीप ठाकू र,
पर्यवेक्षिका/BOS, अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर,गोपचर पाडा, विरार पूर्व,
तालुका वसई, जिल्हा पालघर
रुपेश दिनकर ठाकू र,
सहाय्यक शिक्षक/BOS, अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर,
गोपचर पाडा, विरार पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर
● निर्मि ती सहाय्य - संजीवकु मार खाडे, अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा अमरावती
नम्रता वैभव परब, विषय सहाय्यक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा मुंबई
राजेंद्र दत्तात्रेय अंबिके , सहाय्यक शिक्षक, रायगड जिल्हा परिषद शाळा, नेणवली,
कें द्र आतोणे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
शितल विकास जाधव, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, घोलवड मराठी ता.डहाणू,
जि.पालघर
रती रोहन पिं पळे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, मनवेलपाडा, विरार पूर्व
तालुका वसई, जिल्हा पालघर
अभिजित विष्णू जोशी, माध्यमिक विद्यालय कु रबुडे, लाजूळ, तालुका व जिल्हा रत्नागिरी
विद्यार्थ्‍यांसाठी / पालकांसाठी सूचना
नमस्‍कार विद्यार्थी मित्रांनो !
आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्‍ये आपल्‍याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, पण आपले शिक्षक
तुमच्‍यापर्यंत विविध माध्‍यमातून शिक्षण पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न करीत होते. आपली नियमित शाळा भरत नव्‍हती तरी
शिक्षण सुरूच होते. आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्‍ज होत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी
तसेच मागील वर्षीच्‍या अभ्‍यासक्रमाची उजळणी व्‍हावी, या उद्देशाने हा सेतू अभ्‍यासक्रम तयार के ला आहे.
1. मागील इयत्‍तेतील महत्त्वाच्या संकल्‍पनांवर या वर्षीचा पाठ्यक्रम आधारित आहे, अशाच संकल्‍पनांचा समावेश
या सेतू अभ्‍यासक्रमात करण्‍यात आला आहे.
2. सेतू अभ्‍यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्‍यात आला असून त्‍यात तीन चाचण्‍यांचा समावेश आहे.
या चाचण्‍या सेतू अभ्‍यासक्रमातील कृ तिपत्रिकांवर आधारित आहेत.
3. सेतू अभ्‍यासक्रमातील प्रत्‍येक कृ तिपत्रिका महत्त्वाच्या संकल्‍पना स्‍पष्‍ट करण्‍याच्‍या हेतूने तयार के ली आहे.
4. कृ तिपत्रिके ची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे :
● समजून घेऊ या : कृ तिपत्रिके त समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या संकल्‍पना येथे दिल्‍या आहेत.
● संदर्भ : मागील वर्षीच्‍या पाठाचा संदर्भ देण्‍यात आला आहे.
● अध्‍ययन निष्‍पत्‍ती / क्षमता विधाने : दिलेल्‍या कृ तिपत्रिके तून साध्‍य होणारी अध्‍ययन निष्‍पत्‍ती व
विकसित होणा-या क्षमता.
● लक्षात घेऊ या : संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होण्‍यासाठी थोडक्‍यात स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आले आहे.
यामध्‍ये तक्‍ते, संकल्‍पना चित्रे, ओघतक्ता, आकृ त्‍या, इ. चा वापर करण्‍यात आला आहे.
● सराव करू या : समजून घेतलेल्‍या संकल्‍पना व पाठ्यांशाचा अधिक सराव होण्‍यासाठी ज्ञान,
आकलन, उपयोजन आणि कौशल्‍य यांचा समतोल राखून प्रश्‍नांची रचना करण्‍यात आली आहे.
● अधिक अभ्‍यासासाठी दिक्षा लिं क्‍स : कृ तिपत्रिके तील संकल्‍पनांचे दृढीकरण होण्‍यासाठी दिक्षा
पोर्टलवरील संबंधित संकल्‍पनांच्‍या व्हिडिओ लिं क्‍स दिल्‍या आहेत.
5. शिक्षकांच्‍या मार्गदर्शनाने कृ तिपत्रिका सोडवाव्‍यात. अभ्‍यासात सातत्‍य राहण्‍यासाठी पालक व विद्यार्थ्‍यांनी
शिक्षकांच्‍या संपर्कात राहावे.
6. प्रत्‍येक कृ तिपत्रिके साठी नेमून दिलेल्‍या कालावधीतच ती पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करावा.
7. कृ तिपत्रिके तील प्रश्‍नांची उत्‍तरे एका स्‍वतंत्र वहीमध्‍ये सोडवून ती वही अंतर्गत मूल्‍यमापनासाठी जपून
ठेवावी.
8. छोट्या कृ ती तसेच प्रयोगांची मांडणी करण्‍यात आली आहे. त्‍या विद्यार्थ्‍यांनी पालक किं वा शिक्षकांच्‍या
उपस्थितीत कराव्‍यात.
9. कृ तिपत्रिके च्‍या शेवटी दिलेल्‍या लिं क्‍सचा वापर करून विद्यार्थ्‍यांनी संबंधित व्हिडिओ पाहून संकल्‍पना अधिक
चांगल्‍या प्रकारे समजावून घ्‍याव्‍यात.
10. कृ तिपत्रिका सोडविताना काही अडचण आल्‍यास आपल्या पालक किं वा शिक्षकांची मदत घ्‍या. आम्‍हाला खात्री
आहे की तुम्‍ही हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी
आत्‍मविश्‍वासाने तयार व्‍हाल.
प्रामाणिकपणे आणि स्‍वप्रयत्‍नाने सेतू अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
शिक्षकांसाठी सूचना
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्‍ये उद्भवलेल्‍या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्‍या जागतिक संकटामुळे प्रत्‍यक्ष वर्ग
अध्यापनामध्‍ये अनेक अडचणी आल्‍या. आपण सर्वांनी विविध माध्‍यमांचा वापर करून विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍याचा
प्रयत्‍न के ला. त्‍यात आपल्‍याला उत्‍तम यशही मिळाले. परंतु प्रत्‍यक्ष अध्‍यापन होत नसल्‍याने त्‍या प्रयत्‍नांनाही अनेक
मर्यादा येत होत्‍या. अद्यापही संकट पूर्णपणे टळलेले नाही. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्‍ये शाळा सुरू होण्‍याबाबत
प्रश्‍नचिन्‍ह आहे. आपल्‍या विद्यार्थ्‍यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्‍ये के लेल्या अध्ययनाची उजळणी होणे आवश्‍यक
आहे, तसेच वर्तमान शैक्षणिक वर्षाच्‍या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी होण्‍याच्‍या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात
आला आहे.
1. सेतू अभ्यासक्रम 45 दिवसांच्‍या कालावधीत पूर्ण करून घ्‍यायचा आहे.
2. या सेतू अभ्‍यासक्रमात मागील वर्षाच्‍या अत्‍यंत महत्‍त्‍वाच्‍या संकल्‍पनांचा समावेश करून कृ तिपत्रिका स्‍वरूपात
मांडण्‍यात आल्‍या आहेत.
3. प्रत्‍येक कृ तिपत्रिका तयार करताना सहज उपलब्‍ध होणाऱ्या साहित्‍याचा वापर करून विद्यार्थ्‍यांना सहज करता
येतील अशा कृ ती, छोटे प्रयोग यांची मांडणी करण्‍यात आली आहे.
4. कृ तिपत्रिके ची रचना व्‍यवस्थित समजावून घ्‍या, म्‍हणजे त्‍या सोडवून घेणे सुलभ होईल.
● समजून घेऊ या : मागील वर्षीच्‍या पाठाशी संबंधित कृ तिपत्रिके त समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या
महत्‍त्‍वाच्‍या संकल्‍पना येथे दिल्‍या आहेत. या वर्षी ज्या संकल्पना विस्तारित झाल्या आहेत, अशा गेल्या
वर्षीच्या संकल्पनांवर जास्त भर देण्यात आलेला आहे.
● संदर्भ : मागील वर्षीच्‍या पाठाचा संदर्भ देण्‍यात आला आहे. विद्यार्थ्‍यांना संदर्भासाठी मागील वर्षीचे
पाठ्यपुस्‍तक वापरण्‍यासंबंधी सूचना द्याव्‍यात.
● अध्‍ययन निष्‍पत्‍ती / क्षमता विधाने : दिलेल्‍या कृ तिपत्रिके तून साध्‍य होणारी अध्‍ययन निष्‍पत्‍ती व
विकसित होणा-या क्षमता यांचा समावेश करण्‍यात आलेला आहे. कृ तिपत्रिका सोडवून घेताना
अध्‍ययन निष्‍पत्‍ती साध्‍य होण्‍याकडे, तसेच संबंधित क्षमता विकसित होण्‍याकडे लक्ष द्यावे.
● लक्षात घेऊ या : संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होण्‍यासाठी थोडक्‍यात स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आले आहे.
यामध्‍ये तक्‍ते, संकल्‍पना चित्रे, ओघतक्ते , आकृ त्‍या, इ. चा वापर करण्‍यात आला आहे. येथे आपण
इतरही विविध अध्‍ययन अनुभवांची रचना करू शकता. महत्‍त्वा
‍ चे मुद्दे आणि संक्षिप्‍त माहिती आपले
अध्‍यापन सुलभ होण्‍यासाठी देण्‍यात आली आहे. आपण आपल्‍या उपलब्‍ध वेळनुसार त्‍या
संकल्‍पनांच्‍या स्‍पष्‍टीकरणात भर घालू शकता.
● सराव करू या : समजून घेतलेल्‍या संकल्‍पनाचा, पाठ्यांशाचा अधिक सराव होण्‍यासाठी ज्ञान,
आकलन, उपयोजन आणि कौशल्‍य यांचा समतोल राखून प्रश्‍नांची रचना करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक
कृ तिपत्रिके तील सराव प्रश्‍न स्‍वतंत्र वहीत विद्यार्थ्‍यांकडू न लिहून घ्‍यावेत. यामुळे उजळणीसोबतच
लेखनसरावही होईल. सेतू अभ्‍यासक्रम पूर्ण झाल्‍यानंतर या वह्या जमा करून ठेवाव्‍यात.
● अधिक अभ्‍यासासाठी दिक्षा लिं क्‍स : कृ तिपत्रिके तील संकल्‍पनांचे दृढीकरण होण्‍यासाठी दिक्षा
पोर्टलवरील संबंधित संकल्‍पनांच्‍या व्हिडिओ लिं क्‍स दिल्‍या आहेत. या लिं कवरील व्हिडिओ विद्यार्थ्‍यांना
घरी पाहण्‍यासंबंधीच्‍या सूचना द्याव्‍यात.
5. वर्तमान इयत्‍तेतील विविध संकल्‍पना समजून घेण्‍यासाठी, विद्यार्थ्‍यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी तसेच
विद्यार्थ्‍यांच्‍या अध्‍ययनाचा आढावा घेण्‍यासाठी हा सेतू अभ्‍यासक्रम उपयुक्‍त ठरणार आहे.
6. अनुक्रमणिके त दिलेल्‍या नियोजनानुसार कृ तिपत्रिका काटेकोरपणे सोडवून घ्‍याव्‍यात.
7. सेतू अभ्‍यासक्रमातील कृ तिपत्रिका विद्यार्थी प्रामाणिकपणे व स्‍वप्रयत्‍नाने सोडवतील याकडे शिक्षकांनी लक्ष
असावे, विद्यार्थ्यांच्‍या अडचणी समजून घेऊन योग्‍य ती मदत करावी.
8. ठराविक घटकांची उजळणी झाल्‍यानंतर देण्‍यात आलेल्‍या चाचण्‍या विद्यार्थ्‍यांकडू न सोडवून घ्‍याव्‍यात. चाचण्‍या
तपासून त्‍यांना योग्‍य निकषांचा अवलंब करून गुणदान करावे व गुणांची नोंद करून ठेवावी.
9. प्रत्‍येक चाचणीचे मूल्‍यमापन झाल्‍यानंतर ज्‍या विद्यार्थ्‍यांना उपचारात्‍मक अध्‍यापनाची आवश्‍यकता आहे, त्‍या
विद्यार्थ्‍यांना योग्‍य असे मार्गदर्शन करावे. याप्रमाणे तीनही चाचण्‍यांची अंमलबजावणी करावी.
10. हा 45 दिवसांचा सेतू अभ्‍यासक्रम पूर्ण झाल्‍यानंतर आपल्‍या नियमित अभ्‍यासक्रमाच्‍या अध्‍यापनास सुरुवात
करावी.
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी मनःपूर्वक शुभेच्‍छा !
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम
इयत्ता पाचवी
विषय - परिसर अभ्‍यास भाग 1
अनुक्रमणिका

कृ तिपत्रिका क्रमांक कृ तिपत्रिके तील घटकाचे नाव

दि. 15 जून ते 30 जून 2021

1 प्राण्यांचा जीवनक्रम

2 सजीवांचे परस्परांशी नाते

3 साठवण पाण्याची

4 पिण्याचे पाणी

5 घरोघरी पाणी

6 अन्नातील विविधता

7 आहाराची पौष्टिकता

8 मोलाचे अन्न

चाचणी 1 (कृ तिपत्रिका क्र. 1 ते 8 वर आधारित)

दि. 1 जुलै ते 15 जुलै 2021

9 हवा

10 वस्र

11 पाहूया तरी शरीराच्या आत

12 छोटे आजार आणि घरगुती उपचार

13 दिशा व नकाशा

14 नकाशा आणि खुणा

चाचणी 2 (कृ तिपत्रिका क्र. 9 ते 14 वर आधारित)

दि. 15 जुलै ते 30 जुलै 2021

15 माझा जिल्हा माझे राज्य

16 दिवस व रात्र
17 माझी जडणघडण

18 कु टुंब आणि शेजारात होत असलेले बदल

19 माझी आनंददायी शाळा

20 माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

21 समूहजीवनासाठी व्यवस्थापन

22 वाहतूक व संदेशवहन

23 नैसर्गि क आपत्ती

24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

चाचणी 3 (संपूर्ण सेतू अभ्‍यासक्रमावर आधारित)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम
इयत्ता : पाचवी कृ तिपत्रिका :01 विषय : परिसर अभ्यास भाग 1

समजून घेऊया : प्राण्यांचे प्रजनन.

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 1, प्राण्यांचा जीवनक्रम प्राण्यांचा
अध्ययन निष्पत्ती : प्राण्यांचे वर्तन (उदा. पक्षी, कीटक, प्राणी यांचे वर्तन, जीवनक्रम, प्रजनन क्रिया) समजून घेतात.
लक्षात घेऊया : प्राण्यांचा जीवनक्रम - प्रजनन.
खालील चित्र पहा. दोन्ही चित्रात काय दिसते ते वहीत नोंद करा.

वरील चित्र निरीक्षणातून लक्षात येते की, कु त्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यामध्ये साम्य दिसते.
फु लपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फु लपाखराची अळी ह्यात साम्य दिसत नाही तर खूप वेगळेपण असते. पिल्लू
आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांचा रूपांत लक्षात घेण्याजोगी तफावत असणे, याला रूपांतरण म्हणतात.

आता पुढील चित्रात पहा काय दिसते?

कोंबडी अंडी घालते, त्यातून पिल्लू बाहेर येते, तर मांजरीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नाही. यावरून काही
प्राणी अंडी घालतात, तर काही प्राणी आईच्या पोटातून जन्म घेतात, अन आपल्यासारखा दुसरा जीव जन्मास घालणे
म्हणजेच ‘प्रजनन’ होय.
मांजरीचे पिल्लू आईच्या पोटातून जन्म घेते. तर कावळा, कोळी, सरडा हे प्राणी अंडी घालतात, तसेच मुंग्या,
फु लपाखरे, मासे, बेडू क, साप हे प्राणीही अंडी घालतात, पण ही अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही
प्राणी खूप चिं टूकले असतात. त्यांची अंडी सहजासहजी दिसत नाहीत. पण ह्या अंड्यातून पिल्ले जन्मास येतात आणि
त्यांची वाढ होते, म्हणजे प्रजनन होते. उदाहरणार्थ : कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म (प्रजनन)
कोंबडीचे अंडे दिसू शके ल इतपत मोठे असते. ती अंडी घालते,
अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी ती अंडी उबवते. मग पिल्ले हळू हळू
वाढतात. वाढ पूर्ण होताच पिल्लू अंड्याचे कवच फोडू न बाहेर येते, हे झाले
कोंबडीचे प्रजनन.
सराव करू या :
प्र. 1) चित्र पहा, चित्रात कोणती कृ ती दिसते, तुमच्या शब्दात लिहा.

-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------

प्र.2) चित्रात पहा, मांजरीचे पिल्लू आणि मांजर यांच्यात सारखेपणा आहे, अशा सारखेपणा असलेल्या प्राणी-पिल्लू
यांच्या जोड्या लिहा. (उदा. मांजर-मांजरीचे पिल्लू)

----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------

प्र.3) वेगळा पर्याय ओळखा.

अ) कावळा, सरडा, कु त्रा, कोळी ---------------

ब) मासे, बेडू क, कोंबडी, साप --------------

प्र. 4) तुमच्या परिसरात आढळणार्‍या अंडी देणार्‍या प्राण्यांचे निरीक्षण करून यादी तयार करा.

--------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------

प्र. 5) अंड्यातून जन्म घेणारे व आईच्या पोटातून जन्म घेणारे प्राणी यांची यादी करा. पुढील तक्त्यात लिहा.

अंड्यातून जन्म घेणारे प्राणी आईच्या पोटातून जन्म घेणारे प्राणी

------------------------------------- -------------------------------------

अधिक अभ्‍यासासाठी लिं क:

प्राण्यांची वाढ
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292495982370816138746
कृ तिपत्रिका : 02
समजून घेऊया : सजीवांच्या गरजा, ऋतुमानातील बदलांचा सजीवांवर परिणाम
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-02, सजीवांचे परस्परांशी नाते
अध्ययन निष्पत्ती : 1. आरोग्य रक्षण करण्यासाठी विविध मार्ग सुचवितात.
2. निरीक्षणे/अनुभव/माहितीची विभिन्न प्रकारे नोंद ठेवतात आणि परिसरातील
विविध घटनांचे कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात.
लक्षात घेऊया : आपल्या गरजा- खालील चित्र अभ्यासा, तुम्हाला काय वाटते?

अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. वरील चित्रांच्या निरीक्षणातून तुम्ही त्या
ओळखल्या असतील. परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात. आपल्या अशा अनेक गरजा आहेत, आणि ह्या गरजा सर्वच
सजीवांच्या आहेत. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उदा. उंदीर आणि हत्तीला लागणारे
पाणी यात फरक असतोच. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील, तिथेच ते सजीव आढळतात. वाघाचेच
पहा ना ! वाघ गवतात दबा धरून, तर कधी घनदाट झाडी, उंच गवत, गुहा येथे आडोसा घेतो. तर तो पोट भरण्यासाठी
हरणे, नीलगाई, गवे ह्यांच्या शिकारी करतो.

दुसरीकडे माणूस आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी विविध प्राणी पाळतो. त्याचा उपयोग दूधदुभते, मांस, अंडी
यांसाठी करतो. तर काही प्राणी ओझी व कष्टाच्या कामासाठी उपयुक्त असतात. कु त्रा घराची राखण करतो, तर मेंढी
लोकर देते. अशीच माणसाला वनस्पतींची सुद्धा गरज लागते. उदा. अन्नधान्य, भाजी, फळफळावळ. त्यानुसार प्राणी
आणि वनस्पतींची काळजी मानव प्रेमाने घेत असतो, कारण प्राणी-वनस्पती आपणास भरभरून देतात.आपल्या गरजा
पूर्ण करतात.

ऋतुमानातील बदलांचा सजीवांवर परिणाम : मुलांनो, तुम्हास ऋतू माहिती आहेतच, ह्या ऋतूंचा सजीवांवर
परिणाम होत असतो! खालील चित्र पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल.
वरील चित्रात काय दिसते? तुम्हास काय वाटते? तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपले ऋतू आहेत. ह्या
ऋतुंच्या बदलाचा परिणाम सजीवांवर होतो. उन्हाळ्यात उकडते म्हणून सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, इरले, रेनकोट तर
हिवाळ्यात उबदार कपडे लागतात. माणसावर तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो, तसा इतर सजीवांवरही होतो. हिवाळ्यात
पाने गळू न पडतात, तर आंब्याला फु लोरा येतो, काही प्राण्यांच्या अंगावरील के स दाट होतात. मार्च महिन्यात उष्णता
लागते, अनेक झाडांना पालवी फु टते, कोकीळ मंजुळ आवाज करतो. आंबे, फणस, काजू यांचा हंगाम येतो. तर जूनमध्ये
काळे ढग आणि पावसाला सुरुवात होते, या पावसामुळे गवत आणि वनस्पती वाढतात. त्यात कधी संध्याकाळी
सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. आजूबाजूला बेडू क डराव-डराव करतात, शेती बहरते. परिसर हिरवा होतो. हे सर्व परिणाम
ऋतुमानातील बदलाने होतात.

सराव करू या:

प्र. 1) खालील वाक्यात आपली कोणती गरज लक्षात येते ते वाक्यासमोर लिहा.

अ) आपणास दोन वेळेस जेवायला लागते. -----------------------------

ब) थंडी,वारा लागू नये म्हणून घर हवे. ------------------------------

क) आपल्याला थंडीत उबदार कपडे लागतात. ------------------------------

ड) गाईला तहान लागते. ----------------------

प्र. 2) चित्रातील ऋतूंचा कालावधी असलेले महिने चित्रांसमोर लिहा.

---------------------------

---------------------------

---------------------------

---------------------------

---------------------------

---------------------------

प्र. 3) विचार करा आणि लिहा.

अ) मुंगी आणि हत्ती ह्यांच्या अन्न व पाण्याच्या गरजेत फरक आहे, असा फरक कोणकोणत्या सजीवांत असेल अशा तीन
जोड्या विचार करून लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
ब) ऋतुमानाप्रमाणे सजीवसृष्टीत काही बदल होतात. उदा. हिवाळा - झाडांची पाने गळू न पडतात. असे काही बदल तुम्ही
अनुभवले असतील, ते पुढील ऋतूसमोर लिहा.

1) पावसाळा -------------------------------------------------------

2) हिवाळा -------------------------------------------------------

3) उन्हाळा -------------------------------------------------------

प्र. 4) रीनाला हिवाळ्यात शिबिरासाठी जायचे आहे. तिला थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी तिला कोणत्या सूचना द्याल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 5) ओळखा पाहू .

ऐन दुपारी मिळे सावली ! तेथे थोडा थांब !!
झाड जुने, खोड मोठे ! दाढी त्याची लांब !!
----------------------------------
अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स:

ऋतुमानानुसार होत जाणारे बदल

1)https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm
_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312486441141
77228823951

सजीवांच्या गरजा

2)https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=d
o_313292496148471808138752
कृ तिपत्रिका : 03
समजून घेऊया : पाण्याचे पारंपारिक स्रोत व नवीन स्रोत
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 03, साठवण पाण्याची
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया :
तुम्हास माहीत असेल, पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते. काही जमिनीत मुरते.
वर्षभर हे पाणी सर्व सजीव वापरतात. पाणी साठवून ठेवले नाही तर सर्वाना पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यासाठी ते
साठवावे व काटकसरीने वापरावे. ह्यासाठी पाणी साठवण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यात पारंपरिक व नवीन स्त्रोत
(जलसाठे, व्यवस्था) आहेत. खालील चित्रांचे निरीक्षण के ल्यावर आपणास पारंपरिक जलसाठे लक्षात येतील. असे
साठे तुमच्या परिसरात असल्यास निरीक्षण करा. त्याबद्दल माहिती मिळवा.
पारंपरिक स्त्रोत (जुने जलसाठे) - खालील चित्राचे निरीक्षण के ल्यास आपल्याला पाण्याचे पारंपारिक/जुने जलसाठे
लक्षात येतील.

आपल्या राज्यात जुन्या काळी पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या, आता त्या वापरात नाहीत. त्याचे
अवशेष दिसतात. काही जलसाठ्यामधील पाणी कधीच आटत नाही. ह्यामध्ये विहीर, आड, नदी, तलाव इ. समावेश
होतो.

1) विहीर - पावसाचे पाणी जमिनीत मुरते, ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते.

2) किल्ल्यावरील तलाव व टाक्या - पूर्वी किल्ल्यावरील लोकांना पाण्यासाठी तलाव व दगडात खणलेली पाण्याची
टाकी असायची.

3) आड - पूर्वी पाणी मिळवण्यासाठी आड खणले जायचे, त्याचा घेर कमी असतो व त्यात दोरीला बांधलेले भांडे
(पोहरा) टाकू न पाणी काढले जायचे. सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते.

4) नदी व बंधारा - नदीचे पाणी अडवण्यासाठी दगड, मातीचे बांध/बंधारे बांधले जात.

5) जुने तलाव - कमी पाऊस/छोटी नदी क्षेत्रात तलाव बांधले जात.

6) जुने हौद - पाणी साठवण्यासाठी जुन्या काळात मोठ्या शहरांमध्ये हौद असायचे, असे हौद आजही वापरात आहेत.
नवीन स्त्रोत (नव्या व्यवस्था) - खालील चित्रात नवीन जलसाठे दिसत आहेत, तुम्ही तुमच्या परिसरात असे जलसाठे
पाहिले आहेत का? आपणास हे जलसाठे कसे उपयुक्त आहेत, ते लक्षात घ्या.
1) धरण - खूप जास्त पाणी साठवता येते. जास्त पाणी साठवल्यामुळे शेती पिकवता आली, शहरे वाढली, कारखाने उभे
झाले, वीजनिर्मि ती करणे शक्य झाले.

2) विं धन विहीर - विजेचा वापर सुरु झाल्याने पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसण्यासाठी विं धन विहिरी (बोअर वेल)
खणल्या गेल्या. या खूप खोल असून त्याचा घेर मात्र लहान असतो.

3) पाणपोई - घराबाहेर किं वा प्रवासात असलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी लागते, त्यासाठी रांजण/माठ पाण्याने
भरून पाणी पिण्याची सोय के ली जाते, ती पाणपोई होय. काही व्यक्ती किं वा संस्था अशा पाणपोई सुरु करतात. त्यामुळे
लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते. उन्हाळ्यात पाणपोईचा खूप वापर होतो.

पाणी ही नैसर्गि क संपत्ती आहे, तिचा वापर सर्वच सजीव करतात. पाणी हे जीवन आहे, याचे भान ठेऊन
पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करावा.

सराव करू या:

प्र. 1) पाणी व पाण्याचे जलसाठे वापराबाबत खालीलपैकी योग्य सवयीपुढे ✔ अशी खूण करा.

1) पाण्याचा वापर अमर्याद करावा.

2) आदर्शच्या घरी पाणी जपून वापरतात.

3) राजू नेहमी तलावात कचरा टाकतो.

4) आई रोज नदीजवळ कपडे धुते.

5) सरपंचानी गावात पाणपोईची सोय के ली.

प्र.2) गटातील वेगळा पर्याय ओळखा.

अ) धरण, बोअर वेल, हौद, पाणपोई --------------
ब) आड, विहीर, हौद, विं धन विहीर --------------

प्र.3) तुमच्या घरी पाणी कसे येते? त्या पाण्याचा घरापर्यंतचा प्रवास पालकांशी चर्चा करून लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र.4) पाण्याचा वापर काटकसरीने / जपून करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्याल?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.5) खालील चित्र पहा. असा पाण्याचा स्त्रोत आपणास कोठे पहायला मिळतो? त्याचा उपयोग तुमच्या शब्दात
लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स:

1) साठवण पाण्याची
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130639311658
598401497
2) पाणपोई
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496485892096138763
कृ तिपत्रिका : 04
समजून घेऊया : द्रावण, निर्धोक पाणी
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 4. पिण्याचे पाणी
अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे/अनुभव/माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतो आणि परिसरातील विविध घटनांच्या
आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (विरघळणे, गाळणे,
निवळणे, उकळणे)
लक्षात घेऊया:
चला आपण एक कृ ती करूया :
1] एक काचेच्या भांडयात पाणी घ्या व पाण्याची चव पहा. 2] पाण्याला कोणतीही चव नाही. आता, त्यात थोडी साखर
टाका आणि मिसळा आता चव पहा; भांड्यातले पाणी गोड लागले असेल. 3] आता एक लिं बू आईकडू न कापून घ्या
आणि त्या गोड पाण्यात पिळा यावेळी लिं बाच्या बियाही पाण्यात पडतील. 4] परत चव पहा आता पाणी आंबट गोड
लागले असेल. 5] त्यामध्ये बर्फाचे काही खडे टाका आणि बर्फासोबतच एक संपूर्ण लिं बू न कापता त्या पाण्यात टाका.
6] आता त्या पाण्यातील वस्तूंचे निरीक्षण करा.
निरीक्षण करताना तुम्हाला दिसेल की, न कापलेले लिं बू पाण्याच्या तळाशी जाऊन बसले, बर्फाचे खडे व
लिं बाचे बी पाण्यावर तरंगत राहिले; तर साखर पाण्यात विरघळली, म्हणून पाण्याची चव गोड झाली.
यावरून काय उलगडते? काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत.जड वस्तू
पाण्यात बुडतात तर हलक्या वस्तू तरंगतात आणि विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो.

द्रावण : पाण्यात एखादा पदार्थ विरघळला, की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण
म्हणतात.

निर्धोक पाणी : जे पाणी प्यायले असता, आपल्या प्रकृ तीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक
पाणी म्हणतात. पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे.

पावसाळ्यातील गढू ळ पाणी आपण निवळू न घेतो. गरज असेल तर त्यात तुरटी फिरवतो किं वा गाळू न घेतो.
यामुळे पाण्याचा गढू ळपणा कमी होतो. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसू लागते. म्हणजे ते निर्धोक झाले का? याविषयी
आपण अधिक माहिती घेऊ.

(1) गढू ळ पाणी (2) गाळणे (3) निवळणे (4) उकळणे

पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे. शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो किं वा वास नसतो. पाण्याला रंग
दिसू लागला किं वा दुर्गंधी येऊ लागली, तर ते पाणी पिऊ नये.

असे पाणी प्यायल्याने माणसे आजारी पडू शकतात. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात.
अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी डोळ्यांना दिसत नाहीत. असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक असले तरी
पिण्यायोग्य म्हणजेच निर्धोक असेल का ?
पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा हगवण किं वा गॅस्ट्रो सारख्या रोगांची साथ येते. अशा वेळी पाणी निर्धोक
करण्यासाठी निवळू न आणि गाळू न घेतलेले पाणी उकळू न घ्यावे लागते. पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात
आणि आजार होण्याचा धोका टळतो.

सराव करू या:

प्र. 1) पाणी पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यायोग्य असेलच असे नाही, याचे कारण काय?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 2) जरा डोके चालवा.

अ) पाण्यात साखर लवकर विरघळण्यासाठी काय करावे लागेल?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ) रवा आणि साबुदाणा एकत्र झाले आहेत ते वेगळे करायचे आहेत. कसे कराल?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) पावसाळ्यात नळाला पिण्याचे पाणी गढू ळ आले तर ते पिण्यायोग्य कसे कराल?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) खालील वस्तूंचे वर्गीकरण करा व तक्ता पूर्ण करा. (दगड, साखर, लाकू ड, पेन, खिळा, मीठ, तेल)

पाण्यात विरघळणाऱ्या वस्तू पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यात बुडणाऱ्या वस्तू

प्र. 5) तर काय होईल ते लिहा.

अ) राजू गढू ळ पाणी प्यायला.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ) सीमाने पाण्यात तेल व खडीसाखर टाकली.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स :

1) पदार्थाचे द्रावण
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496548265984138765

2) निर्धोक पाणी

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496608952320138767
कृ तिपत्रिका : 05
समजून घेऊया : पाण्याची साठवण, पाणी वितरण व्यवस्था
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 5, घरोघरी पाणी
अध्ययन निष्पत्ती: स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, निवारा)
लक्षात घेऊया :
खालील चित्रात काही पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत, त्यांची नावे ओळखा पाहू.

आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे
लागते. स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकू न ठेवतो. यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. आपण पाणी
घेण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो. पाणी काढू न लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोटी लावणे ही पाणी
काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

पाणी शिळे होत नाही - आधीच्या दिवशी घरात भरुन ठेवलेले पिण्याचे पाणी काहीजण ओतून देतात आणि
दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते, पाणी शिळे होते. पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी
वाया घालवणे. पाणी खराब झाले असले तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा. मोठ्या प्रमाणात
पाण्याचे शुद्धीकरण आणि वितरण कसे होते ते पाहूया, यासाठी खालील आकृ तीचे निरीक्षण करा.

सर्वच स्रोतांमधील पाणी जसेच्या तसे पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणून
गावाजवळचा एखादा मोठा पाण्याचा स्रोत पाहतात. कालवा किं वा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने संपूर्ण गावासाठी
एका ठिकाणी पाणी आणतात. तेथे ते पिण्यासाठी निर्धोक करतात. याला जलशुद्धीकरण म्हणतात. जलशुध्दीकरण
कें द्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण म्हणतात. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरी मधून किं वा
कु पनलिकांमधून पाणी काढतात. पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसेल,
तर पिण्यासाठी पाणी उकळू न घ्यावे. आरोग्याला धोका राहणार नाही याची खात्री करुन घ्यावी. काही ठिकाणी
टँकरमधून वाहतूक करुन वस्त्यांना पाणी पुरवतात.

सराव करू या :

प्र. 1) योग्य की अयोग्य ते लिहा.

अ) सूरजने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. ---------------------

आ) निशा भांडी विसळलेले पाणी झाडांना घालते. ---------------------

इ) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. ----------------

ई) रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते. ----------------------

प्र. 2) माहिती मिळवा.

अ) तुमच्या गावाचा / शहराचा पाण्याचा मोठा स्रोत कोणता आहे? -------------------------

ब) तुमच्या गावात/ शहरात जलशुद्धीकरण कें द्र आहे का? -------------------------

क) तुमच्या शाळेत पिण्याचे पाणी कशात साठवले जाते? -------------------------

प्र.3) रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कु टुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना -

अ) कोणत्या अडचणी येत असतील ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ)कोणते फायदे मिळत असतील?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र.4) पाण्याची काटकसर कशी करावी तुमच्या शब्दात लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र.5) पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्ये लिहा. (उदा.बचत पाण्याची, गरज काळाची)

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.6) तुमच्या घरी पाणी ज्या स्रोतातून येते त्या स्रोताचे चित्र काढा .

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स:

1) पाण्याची साठवण

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496668418048138769

2) पिण्याच्या पाण्याची काळजी

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248644118458368023952

3) गावाचा पाणी पुरवठा

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496755007488138772
कृ तिपत्रिका : 06
समजून घेऊया : खाद्यान्न पिके व त्यातील प्रदेशानुसार विविधता
संदर्भ : इयत्ता- चौथी, प्रकरण 6, अन्नातील विविधता
अध्ययन निष्पत्ती: जिल्हे व राज्यानुसार खाद्यान्न पिके , प्रसिद्ध खाद्यपदार्थ व प्रदेशानुसार त्याची विविधता
असण्यामागील कारणे समजून घेऊन नकाशात दाखवितात.
लक्षात घेऊया :
आपल्या देशात शेती हा व्यवसाय के ला जातो. ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.पाऊस
सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी-जास्त पडतो. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ (भात), नारळ, नाचणी, वरई अशी
पिके घेतात. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी,
बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात. पिक चांगले यावे यासाठी चांगली बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश
आणि आवश्यक तेवढे पाणी याची गरज असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला, फळे यात विविधता
दिसून येते.
उदा-.खालील चित्रे पहा व पिकांची नावे ओळखा.

जास्त पाऊस मध्यम पाऊस कमी पाऊस

कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी के ला जातो.
उदा. महाराष्ट्राच्या पठारी भागात ज्वारी जास्त प्रमाणात होते; याभागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, पापड, धपाटे,
धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कोकणात किं वा समुद्रकिनाऱ्या लगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा
वापर मोठ्या प्रमाणात के ला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठया
प्रमाणावर करतात. मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या. या बदलांनुसार त्या प्रदेशातील
लोकांचा आहार ठरतो.

खालील चित्र पहा व तुम्ही पाहिलेल्या फळांविषयी चर्चा करा.

सराव करू या :

प्र.1) पुढील चित्रे पहा व महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात ते त्या चित्राच्या खाली
लिहा.

___________________ ___________________ __________________

प्र.2) खाली दिलेल्या पिकांपासून घरी बनविल्या जाणाऱ्या दोन पदार्थांची नावे लिहा.

अ) गहू -------------------------------------

आ) नारळ -------------------------------------

इ) मका -------------------------------------

ई) तांदूळ --------------------------------------

प्र. 3) डोसा बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात त्यांची नावे लिहा व आईच्या मदतीने घरी डोसा बनवून पहा.

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

प्र.4) नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक

घेतात?
---------------------------------------------
---------------------------------------------
आ) उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात?
---------------------------------------------
---------------------------------------------
इ) महाराष्ट्रात कोणकोणती पिके घेतली जातात?
---------------------------------------------
---------------------------------------------
ई) भारताच्या दक्षिण भागात कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते?

--------------------------------------------------------------------------

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स :

अन्नातील विविधता

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248628645400576023745

अन्नातील विविधता-2

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31309584837097062411041

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496984260608138780
कृ तिपत्रिका :07
समजून घेऊया : अन्नपदार्थातील विविधता, अन्नपदार्थाची पौष्टिकता
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण ७, आहाराची पौष्टिकता
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया :
अन्नपदार्थातील विविधता - खालील चित्र पहा आणि त्यात तुम्हाला काय दिसते त्याचे निरीक्षण करा, आणि
चित्रात जे अन्नपदार्थ आहेत त्यांची यादी करा.

आपल्या आहारात आपण काही अन्नपदार्थ कच्चेच खातो आणि काही अन्नपदार्थ प्रक्रिया करून खातो. म्हणजेच
काही पदार्थापासून विविध नवीन पदार्थ तयार के ले जातात. उदा. दुधापासून लोणी, दही, ताक, श्रीखंड, लस्सी तयार
के ले जातात. भाकरी तयार करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे पीठ वापरतो. गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी
साखर किं वा गूळ वापरतो. यावरून असे स्पष्ट होते की, आपण जे अन्न पदार्थ वापरतो त्यात खूप विविधता दिसून येते.
अन्नपदार्थाची पौष्टिकता - अन्नपदार्थांमध्ये जशी विविधता असते, तसे लोकांची आवडनिवड ही वेगळी असते. म्हणून
शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ थोड्या फार प्रमाणात असणे
आवश्यक असते. सर्वच अन्नपदार्थ आपल्या आहारात असल्याचे काही फायदे असतात, ते खालीलप्रमाणे,
1. काही अन्नघटकांपासून आपल्या शरीराला ताकद मिळते.
2. काही अन्नघटकांमुळे शरीराची वाढ होते.
3. काही अन्नघटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते.
4. काही अन्नघटकामुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते आणि हाडेही मजबूत होतात.
5. शरीराची सर्व कामे नीट होण्यासाठी शरीरात पाण्याचीही गरज असते.

यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला
हवे म्हणून सगळेच अन्नघटक आपल्या आहारात असायला हवेत. खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे
अन्नघटक नष्ट होऊ शकतात असे होऊ नये म्हणून अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवण्यासाठी आपण काही काळजी घेतली
पाहिजे.

जसे, अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. प्रेशर कु करचा वापर करावा. कडधान्याचे मोड
लहान असेपर्यंत आपल्या आहारात वापरावे. पीठातील कोंडा काढू न टाकू नये. फळे सालीसकट खावीत.
सराव करू या :

प्र. 1) आपल्या रोजच्या आहारात दुधापासून बनवलेले अन्नपदार्थांची यादी करा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 2) आपल्या आहारात जे अन्नपदार्थ आपण कच्चेच खातो त्यांची खाली दिलेल्या रिकाम्या जागेत चित्रे काढा.
(जसे, गाजर, मुळा, काकडी, सफरचंद, आंबा, टोमॅटो)

प्र. 3) खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि त्यातील आपल्या शरीराला पौष्टिक असलेल्या आणि पौष्टिक
नसलेल्या अन्नपदार्थाची यादी करा.

पौष्टिक अन्नपदार्थ पौष्टिक नसलेले अन्नपदार्थ

प्र. 4) प्रत्येकी दोन नावे लिहा .

अ. मोड आलेली कडधान्ये - 1. --------------------- 2. ---------------------

ब. सालासकट खाल्ली जाणारी फळे - 1. --------------------- 2. --------------------

क. आंबवून के ले जाणारे पदार्थ - 1. --------------------- 2. ---------------------

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स :

1) अन्नपदार्थाची पौष्टिकता
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248642063272345613873
2) आहारातील अन्नघटक
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497082048512138784
कृ तिपत्रिका : 08
समजून घेऊया : शेतीतील कामे, अन्नाची नासाडी टाळणे.   
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण ८, मोलाचे अन्न 
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया  :  
शेतीतील कामे  - खालील दोन चित्रे पाहिल्यावर असे लक्षात येईल की, ही भाकरी आपल्यापर्यंत कशी पोहचत असेल?
त्यासाठी शेतात किती कष्ट घ्यावे लागतात आणि खूप कामे करावी लागतात.  
 
धान्याचे पीक घेताना, शेतीच्या  मशागती
पासून ते पोत्यात भरून गोदामात साठवून
ठेवेपर्यंत अनेक कामे करावी लागतात.

ती कामे आपण पाहूया. 

नांगरणी -शेतकरी मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात, मातीची ढेकळे फोडतात, व जमीन सपाट करून पुढील 
कामासाठी शेत तयार करतात. नांगरणीसाठी पूर्वी बैलांचा वापर व्हायचा पण आता ट्रॅक्टरचा वापर करतात.

पेरणी -  मग मृगाचा पाऊस पडला, की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वाफसा होतो तेव्हा शेतात शेतकरी बियाण्याची
पेरणी करतात. मग काही कालावधी नंतर रोपांनी वर डोके काढल्यावर त्याबरोबर तणही वर येतात, तेव्हा शेतकरी ते तण
काढू न टाकतात.

कापणी -  धान्याची ताटे वाढल्यावर त्यांना कणसे लागतात. दाणे पूर्ण भरल्यावर त्याची कापणी करावी लागते.
कापणी  म्हणजे शेतात आलेली सर्व कणसे कापून गोळा करायची. आता पुढील दोन कामे समजून घेण्याकरिता आपण
एक कृ ती करूया. 
        आता हरभऱ्याच्या शेंगांचे दोन वाटे घ्या, त्यातला एक वाटा तुम्ही हाताने सोलून  त्याचे दाणे वेगळे करायचे आणि
दुसरा  कापडी पिशवीत भरून त्यावर वरवंटा फिरवून त्यांना धोपटून   काढू न टाका, कोणत्या कृ तीतील दाणे अगोदर
निघतात ते पहा.
   कृ ती के ल्यावर तुमच्या असे लक्षात आले की, पहिल्या कृ तीनुसार शेंगा
सोले पर्यंत दुसऱ्या कृ तीतील हरभरे वेगळे ही झाले होते. या कृ तीवरून शेतकरी
शेतातल्या पिकाचे कापणी झाल्यावर जे दोन कामे करतात ती आता पाहू या. 

मळणी आणि उफणणी - ही दोन्ही कामे यंत्राने सहजरीत्या होतात. पूर्वी यंत्रे
नव्हती  तेव्हा बैलांचा वापर करून ही कामे के ली जायची. यंत्रात कापणी के लेली
कणसे घालतात आणि यंत्राला बांधलेल्या पिशवीत  दाणे गोळा के ले जातात. कणसातील टरफले आणि इतर कचरा
लांब जाऊन पडतो.

साठवण - उफणणी नंतर मिळालेल्या धान्याला कीड लागू नये तसेच उंदीर आणि घुशींनी नासाडी करू नये यास विशेष
काळजी घेऊन ती पोत्यात भरली जातात.
अन्नाची नासाडी टाळणे – खालील  चित्राचे निरीक्षण के ल्यावर असे लक्षात येते की काही लोक ताटात अन्न घेतात परंतु
ते पूर्णतः संपवत नाहीत खरे तर ताटात पाहिजे तेवढेच घ्यायचे, अन्न  वाया जाऊ द्यायचे नाही. अन्नपदार्थांच्या
उत्पादनामागे अने लोकांचे कष्ट असतात. म्हणूनच अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून सर्वांनी अन्नाची काळजी घेतली
पाहिजे. आपल्या आहारात येणारे पदार्थ हे शेतमळे, तळी, समुद्र, जंगल, पशुपालनगृहे अशा निरनिराळ्या  ठिकाणांहून
येतात. यासाठी धान्याची वाहतूक, विक्री आणि  खाद्यपदार्थ  तयार करण्याची कामे करावी लागतात. तेव्हा अन्न आपल्या
ताटात येते. 

शेतकरी शेतात एवढी मेहनत करून आपल्या पर्यंत धान्य पोहचवतो. तसेच फक्त भाकरी नव्हे तर इतरही
अन्नपदार्थ मिळवण्यासाठी सर्व लोक आपापल्या व्यवसायात खूप कष्ट घेत असतात. धान्याचे पीक घेताना, शेतीच्या
मशागतीपासून धान्य पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत  खूप खर्च येतो. म्हणून सर्वांनी अन्नाची नासाडी होणार
नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

सराव करूया :
प्र. 1) खालील चौकटीत काही शेतीविषयक आधारित शब्द लपलेले आहेत ते शोधा आणि त्याला गोल करा. 

मा ज्वा री उ शिं इ

रे ग का री गा फ

ल हू ले व्हा डे मी

णे सा ना फ च ठ

का ग दे वं र क

म त क ण से ट

प्र. 2) खाली शेतीविषयक कामांची चित्रे दिली आहेत ती ओळखा व लिहा. 

            ---------------            ------------------         -----------
प्र. 3) साचीला अन्नाचे महत्त्व नसल्याने ती सतत अन्नपदार्थ वाया घालवीत असते, तर तुम्ही तिला अन्नपदार्थाचे महत्त्व
कशाप्रकारे समजावून सांगाल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) खाली काही शेतीविषयक कामे दिली आहेत ती योग्य क्रमाने लावा.

योग्य क्रम

1) जमिनीत बियाणे पेरले.

2) यंत्राच्या /बैलांच्या मदतीने

कणसापासून दाणे वेगळे करणे.

3) कणसे कापून गोळा करणे.

4) ट्रॅक्टर/नांगर च्या साहाय्याने जमीन

भुसभुशीत करणे

प्र. 5)  शिं गाडे आणि मकाणे हे दोन खाण्याचे पदार्थ काही जणांच्या खाण्यात येतात. पण हे दोन पदार्थ कोणत्या
वनस्पतीपासून मिळतात आणि ते आपल्यापर्यंत कसे पोहोचतात? याची  माहिती मिळवा.

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स:

मोलाचे अन्न 
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312486413934
60019223917
भाकरीची गोष्ट 1
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31329249723227340813878
भाकरीचीगोष्ट 2
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497265655808138789
भाकरीचीगोष्ट 3
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497295220736138790
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे - 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 01
इयत्ता : पाचवी विषय : परिसर अभ्यास भाग 1 गुण : 10
कृ तिपत्रिका क्रमांक : 01 ते 08 वेळ : 30 मिनिटे
प्र. 1) अ) आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यासमोर ✔ अशी खूण करा. (1 गुण)

शेळी कोंबडी सरडा मानव कोळी

ब) वेगळा पर्याय ओळखा. (1 गुण)

1. अन्न, वस्त्र, माती, हवा ---------- 2. धरण, बोअरवेल, हौद, पाणपोई ------------

क) सहसंबंध लिहा.

पावसाळा : रेनकोट, हिवाळा : ------------------

जास्त पाऊस : तांदूळ, मध्यम पाऊस : ------------------

प्र. 2) खालीलपैकी पाण्यात विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा. (2 गुण )

(बर्फ , लिं बाची बी, खडीसाखर, माचीस काडी)

विरघळणारे पदार्थ ---------------------------------------------------

तरंगणारे पदार्थ ---------------------------------------------------

प्र. 3)आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे, अशावेळी तुम्ही आईला काय सांगाल, ते लिहा. (1 गुण)

--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा. (1 गुण)

1) ज्वारी -----------------------------------------------------

2) तांदूळ ----------------------------------------------------

प्र. 5) खालील विधाने दुरुस्त करून लिहा. (2 गुण)

अ) पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात.

-------------------------------------------------------------------------------

आ) चपात्या करताना पीठातील कोंडा काढू न टाकावा.

--------------------------------------------------------------------------------

प्र. 6) शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा. (उफणणी, कापणी, नांगरणी, मळणी, पेरणी) (1 गुण)
1)------------→2)-------------→3)-------------→4)-------------→5)-----------------

कृ तिपत्रिका : 09
समजून घेऊया :  वातावरण, हवा हे अनेक वायूंचे मिश्रण  
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 9, हवा 
अध्ययन निष्पत्ती : निरीक्षण /अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध
घटनांच्या आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. हवा) 
लक्षात घेऊया  : हवा

वरील चित्राप्रमाणे, पालक/शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कृ ती करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांद्वारे चर्चा करा.
    1)  फु ग्याचा आकार बदलत गेला का?
    2)  फु ग्याचा आकार कशामुळे बदलला ?      
वरील कृ ती के ल्यास तुम्हास हे लक्षात आले असेल की, फु ग्यात भरलेली हवा ही आपल्याला जाणवते. परंतु ती
आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ रिकाम्या वाटणाऱ्या जागेमध्येही हवा असते. 
         वातावरण -  बाजूच्या चित्राचे नीट निरीक्षण करा. एक मुलगी डोंगरावर
चढत आहे. तिच्या पाठीवर एक बॅग आणि एक ऑक्सिजन सिलेंडर आहे
आणि नाकावर एक मास्क लावला आहे. आता विचार करा की, त्या मुलीने
ऑक्सिजन सिलेंडर का घेतला आहे? तुम्हाला काय वाटते? जसजशी ती
मुलगी डोंगरावर चढत जाईल तसतसा त्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होईल.
याचा अर्थ असा होतो की, जसजसे उंच जावे तसतसे हवा विरळ होत जाते.
त्यामुळे त्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून तिला आपल्या बरोबर ऑक्सिजन  सिलेंडर घ्यावा लागतो.
                                                                      
  आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आकाराने चेंडू सारखी गोल आहे. पृथ्वीपासून
उंच गेल्यास जवळजवळ 50 किमीपर्यंत हवा आहे. पृथ्वी भोवतालच्या ह्या हवेच्या
आवरणाला वातावरण म्हणतात.   
          पृथ्वीपासून आपण  जसजसे दूर जातो तसतसे वातावरणातील हवेचे थर विरळ
होत जातात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्टभागाजवळ हवेचे थर सर्वाधिक  दाटीवाटीने असतात,
तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजे उंचावरची हवा विरळ असते.

हवा हे अनेक वायूंचे मिश्रण : (पान क्र. 58 वरील करून पहा ही कृ ती शिक्षक / पालक यांच्या मदतीने  करा आणि
तुम्हाला त्या कृ तीतून काय उलगडते ते नोंदवा.)   या कृ तीत ज्वलनाला मदत करणारा हवेतील कोणता घटक असेल?
ऑक्सिजन :   जळण्यास मदत करणार्‍या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. श्वसन व ज्वलनासाठी
हवेतील ऑक्सिजन  वायू वापरला जातो. 
कार्बन डाय ऑक्साईड : बाजूच्या चित्राचे नीट निरीक्षण करा. आणि  या प्रकाश
संश्लेषण क्रियेत कोणता वायू वनस्पती घेत आहेत ? 
तो आहे कार्बन डाय ऑक्साईड वायू. अन्न तयार  करताना वनस्पती हवेतील
काबर्न डाय ऑक्साइडचा वापर करतात. उदा. सोडावॉटर मधून बाहेर पडणारा
वायू काबर्न डाय ऑक्साइड वायू असतो.   
नायट्रोजन : पिकांसाठी पाणी आणि चांगली माती असली तरी भरघोस पिके येत नाहीत. त्यासाठी उत्तम  दर्जाचे
खतही लागते. त्यामुळे पिकांची योग्य वाढ होते. हे खत तयार करण्यासाठी जो वायू वापरतात तो असतो नायट्रोजन
वायू.  हवेतील सर्वांत  मोठा भाग नायट्रोजन वायूचा असतो. 

बाष्प : बर्फ टाकू न थंड झालेल्या पेल्यावर बाहेरून पाण्याचे कण जमा होतात, म्हणजे हवेत पाणीही  वायुरूपात 
असते. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचे मिश्रण  आहे. 

सराव करूया : 
प्र. 1) कृ ती करा.

इंजेक्शनच्या सिरिं जमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरींजची दांडी आधी आत
दाबतात. ते कशासाठी ? ही कृ ती करून पहा आणि निरीक्षण करून वहीत
नोंदवा. 

प्र.2) बाजूला दिलेल्या आकृ तीचे नीट निरीक्षण करा. ती कृ ती तुम्ही स्वतः
करून पहा आणि नाकातून प्रामुख्याने कोणता वायू शरीराच्या आत घेतो ते
लिहा. तसेच कोणता वायू नाकाच्या बाहेर सोडतो ते ही नोंदवा. तसेच या
क्रियेला काय म्हणतात ते लिहा. 

प्र. 3)  खाली काही वायूंबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यावरून त्या वायूचे योग्य नाव ओळखून लिहा. 

       1) हवेतील सर्वात मोठा भाग या वायूने व्यापलेला आहे. -----------------------------

2) श्वसनासाठी या वायूचा उपयोग होतो. -----------------------------      

3) वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हा वायू वापरतात. -----------------------------

 प्र. 4) खाली एका वर्तुळाच्या मदतीने हवा दशर्वली आहे तर त्यात खाली कं सात दिलेल्या वायूंचे नाव त्यांच्या दिलेल्या
रंगासमोर लिहायचे आहे.        
 ( नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड, इतर वायू )

  1) आकाशी  रंग : ---------------------------------

  2) हिरवा रंग :     ---------------------------------

  3) निळा रंग  :     ---------------------------------

  4) नारिं गी रंग :    ---------------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

1)हवा
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497361838080138792
2)हवेतील वायू
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497444716544138795
3)करून पाहा
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497388576768138793
कृ तिपत्रिका : 10
समजून घेऊया : धागे प्रकार, वस्त्रातील विविधता
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण -10 वस्त्र
अध्ययन निष्पत्ती : 1) स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
2) भौगोलिक व सांस्कृ तिक कारणामुळे वस्त्रांमधील विविधता सांगतात.
लक्षात घेऊया :
तुमच्या घरात विविध प्रकारचे कपडे असतात. त्या प्रत्येक कपड्याचा प्रकार, त्यासाठी वापरण्यात आलेला
धागा याचे निरीक्षण करून नोंद करा .
धाग्यांचे प्रकार :

कापड हे अनेक घटकांपासून बनते. विविध स्त्रोतांपासून मिळणारे धागे एकमेकांत गुंफू न कापड किं वा वस्त्र
तयार होते. कापूस, लोकर, ताग, रेशमी किडे यांपासून नैसर्गि करित्या मिळवलेल्या धाग्यांना नैसर्गि क धागे तर
डांबरासारख्या पदार्थापासून मिळविलेल्या नायलॉन, रेयॉन सारख्या धाग्यांना कृ त्रिम धागे म्हणतात.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. त्यांच्या वस्त्रामध्ये विविधता का दिसून येते? याचा विचार करा.

चित्रांवरून असे लक्षात येते की, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान
करताना दिसतात. त्यांच्या कपड्यांमध्ये असणारी विविधता ही सांस्कृ तिक व भौगोलिक कारणांमुळे दिसून येते.
मनुष्य प्राणी वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळे कपडे वापरतो. उन्हाळ्यात सुती कपडे, हिवाळ्यात लोकरीचे
कपडे तर पावसाळ्यात कृ त्रिम धाग्यांचे कपडे वापरतो.
सराव करूया :
1) चित्र पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) चित्रातील स्त्री कोणत्या प्रकारच्या धाग्यांपासून वस्त्र विणत असेल ?

ब) तिने विणलेल्या वस्त्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या ऋतूत के ला जातो ?

2) महाराष्ट्रात वस्त्रांमधील विविधता कोणत्या कारणांमुळे दिसून येते ?

3) भारतातील काही ठिकाणे विशिष्ट प्रकारच्या कापडासाठी प्रसिद्ध आहेत, अशी कोणतीही दोन ठिकाणे व तेथील
प्रसिध्द कापड यांची नावे लिहा .
ठिकाण प्रसिद्ध कापड
अ) १)
ब) २)

4) पुढील प्रसंगी कोणत्या प्रकारचे कपडे वापरायला हवे असे तुम्हास वाटते ?
अ) सीमा थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जात आहे.

ब) उन्हाळ्याच्या सुट्टीत रोहन मामाच्या गावी निघाला आहे.

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :
1)वस्राचे प्रकार
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312486440762
08947223948
2)धाग्याचे प्रकार
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497507164160138797
3) पोषाखातील विविधता
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497632944128138801
कृ तिपत्रिका : 11
समजून घेऊया : आंतरेंद्रिये
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण -11, पाहूया तरी शरीराच्या आत
अध्ययन निष्पत्ती: 1) आरोग्य रक्षण व त्याचे महत्त्व जाणतात.
2)निरीक्षणे/अनुभव/माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात (आपले आंतरेंद्रिये व त्यांची कार्ये)
लक्षात घेऊया :
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपला तळहात छातीवर मध्यभागी, पण किं चित डावीकडे ठेवा, काय जाणवले ?

तुम्हाला छातीच्या आत सुरु असलेली हृदयाची धडधड जाणवली असेल. बाहेरून दिसणा-या बाह्येंद्रीयांप्रमाणे
(उदा. डोळे, कान, नाक इ.) शरीराच्या आतील भागात देखील इंद्रिये असतात. ही इंद्रिये बाहेरून दिसत नाहीत त्यांना
आंतरेंद्रिये म्हणतात.

आंतरेंद्रिय :

आंतरेंद्रिये ही शरीराच्या विविध भागात असलेल्या पोकळ्यांमध्ये असतात.

काही आंतरेंद्रिये
अ) तोंड आणि जठर ही आंतरेंद्रिये अन्न पचनाचे काम करतात. तोंडातील घास वक्षपोकळीतील जठरापर्यंत नेण्याचे काम
ग्रासनलिका किं वा ग्रासिका करते.
ब) हृदय वक्षपोकळीत मधोमध पण किं चित डाव्याबाजूला असून ते आपल्या हाताच्या मुठीएवढे असते. हृदयाच्या
आकुं चन आणि शिथिलीकरण यामुळे संपूर्ण शरीरभर पसरलेल्या रक्त वाहिन्यातून रक्त खेळते राहण्यास मदत होते.
क) फु प्फु स हे वक्षपोकळीत असतात. श्वासावाटे आत घेतलेली हवा श्वासनलिका मार्फ त फु प्फु सापर्यंत पोहचवली जाते.
श्वासनलिके च्या दोन शाखांना श्वसनी म्हणतात.
ड) मेंदू शिरोपोकळीत कवटीच्या आत संरक्षित असतो. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव इ.कामे मेंदू
करतो.
सराव करूया :

प्र.1) सांगा पाहू मी कोण ?

अ) माझे काम तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवणे .

ब) माझे काम संपूर्ण शरीरभर रक्त फिरते ठेवणे .

प्र.2) व्यायाम के ल्यावर आपल्याला थकल्यासारखे का वाटते?

प्र.3) काही वेळेस आपल्याला जेवताना ठसका का लागतो ?

प्र.4) दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे का? कारण लिहा .

5) पाठ्यपुस्तक पान क्र.71 मध्ये 'करून पहा' मधील कृ ती करा, काय घडले व असे का घडले ते लिहा .
अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

हृदय
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497749270528138805

आंतरेंद्रिये
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497691025408138803

ग्रासनलिका

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31329249772118016013880
कृ तिपत्रिका :12
समजून घेऊया : घरगुती उपचार, आरोग्य सेवा
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण -12, छोटे आजार आणि घरगुती उपचार
अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे/अनुभव/माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात, आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाय
समजून घेतात. आरोग्य सेवांची माहिती सांगतात.
लक्षात घेऊया:
खाली दिलेल्या चित्रांचे नीट निरीक्षण करा. चित्रांपैकी तुम्ही एखादा अनुभव घेतला आहे का ?

विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किरकोळ दुखापती होत असतात. कधी कापते, खरचटते, पाय मुरगळतो, सर्दी
होते किं वा डोके दुखायला लागते तर कधी घसा दुखायला लागतो. अशा वेळी तुम्ही कोणता उपाय करता? यावेळी
आपण बाम लावतो, गरम पाण्याचा वाफारा घेतो, आल्याचा चहा पितो, जरा विश्रांती घेतो.
आपल्या घरातील अनुभवी माणसे किरकोळ आजारांवर किं वा दुखापतींवर काही खालील घरगुती उपाय
सुचवतात.
1)घसा दुखत असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात.
2)सर्दी झाली असेल तर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. छाती शेकवावी.
3)उलट्या होत असतील तर लिं बाचे सरबत घ्यावे.
4)जखम झाल्यास पाण्याने धुवावी. नंतर कोरडी करून त्यावर आयोडीन लावावे.
5) ताप आल्यावर डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात. हात पाय ओल्या कापडाने पुसतात.
परंतु घरगुती उपचारांना काही मर्यादा असतात. दोन दिवसात बरे वाटले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आरोग्य सेवा : समाजाच्या आरोग्याची काळजी घेणा-या किं वा आजाऱ्यांना उपचार देणा-या सेवेला आरोग्य सेवा किं व
वैद्यकीय सेवा म्हणतात.
मोठ्या शहरांमध्ये अद्ययावत इस्पितळे, डॉक्टरांचे दवाखाने असतात. ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य कें द्र आणि
शासकीय रुग्णालये असतात. रुग्णांना येथे सवलतीच्या दरात औषधोपचार मिळतात.

सराव करूया :

प्र.1 ) पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल?

अ) रविवार सुट्टीचा दिवस होता. सर्व दवाखाने बंद होते. बबनच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता.

ब ) मैदानात खेळताना सोनम खाली पडली. तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

प्र.2) तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही आजाराचे व त्यावर के लेल्या उपायांचे थोडक्यात वर्णन करा.

प्र.3) तुमच्या शाळेत असलेल्या प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही चार साहित्याची नावे लिहा.

प्र.4) पावसाळ्यात पाणी उकळू न पिण्याचा सल्ला का दिला जातो ?

प्र.5) डोके दुखी, अपचन झाल्याने होणा-या उलट्या साठी कोणता घरगुती उपाय कराल ?

अ) गरम पाण्याचा वाफारा घ्यावा ब) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात

क) थंडगार लिं बाचे सरबत प्यावे ड) डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात

उत्तर :

अधिक अभ्यासासाठी लिं क:

घरगुती उपचार व अंधश्रद्धा

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312486441801
09721613905
आरोग्य सेवा
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497956052992138812
कृ तिपत्रिका : 13
समजून घेऊया : मुख्य दिशा, उपदिशा, दिशाचक्र, प्रमाणबद्धता
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 13, दिशा व नकाशा
अध्ययन निष्पत्ती: नकाशाचा वापर करून वस्तू /ठिकाणे यांच्या खुणा / स्थान ओळखतात व जवळच्या खुणेवरून
शाळा / शेजार यांच्या दिशांचे मार्गदर्शन करतात.
लक्षात घेऊया :
मुख्य दिशा- पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत. त्या कशा ओळखायच्या? सूर्य ज्या बाजूने उगवतो,
ती पूर्व दिशा. सूर्य ज्या बाजूला मावळतो, ती पश्चिम दिशा. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पश्चिम दिशा आपल्या
मागे असते. त्यावेळी आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा आणि उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते. तुमच्या परिसरात
सूर्योदयाच्या वेळी ही कृ ती तुम्ही करा. आणि मुख्य दिशा प्रत्यक्ष ओळखा.

उपदिशा- तुम्हांला मुख्य दिशा माहीत आहेत! चार मुख्य दिशा आहेत. ह्या मुख्य दिशा दरम्यान ज्या दिशा येतात त्या
उपदिशा. त्या चार आहेत.ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या उपदिशा आहेत. त्या कशा ओळखायच्या? तर उत्तर व पूर्व
मुख्य दिशामध्ये ईशान्य उपदिशा येते. पूर्व व दक्षिण मुख्य दिशामध्ये आग्नेय उपदिशा असते. दक्षिण व पश्चिम ह्या मुख्य
दिशामध्ये नैऋत्य उपदिशा असते तर पश्चिम व उत्तर मुख्य दिशामध्ये वायव्य ही उपदिशा असते. दोन मुख्य दिशांच्या
दरम्यान अनेक वस्तू असतात. या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर होतो.

दिशाचक्र :

मुख्य दिशा व त्या दरम्यान असणाऱ्या उपदिशा मिळू न तयार होते ते दिशाचक्र.सोबतच्या चित्रातून हे दिशाचक्र
चटकन लक्षात येते.
प्रमाणबद्धता - दिशेच्या माध्यमातून आपण आपले गाव, घर, शाळा, परिसरातील विविध वास्तू निश्चितपणे दाखवू
शकतो. ह्या सर्व गोष्टीतील अंतरासाठी(अंतर दाखवण्यासाठी) उपयोग होतो तो नकाशाचा! त्यामुळे दिशा व नकाशा
यांचा परस्परसंबंध येतो. परिसरातील ठिकाणे काही अंतरावर असतात, त्यांचा आकारही मोठा असतो, मात्र नकाशाचा
आकार लहान असतो त्यामुळे नकाशात अंतर दाखवताना ते कमी करावे लागते, त्यासाठी गरज असते प्रमाणाची !

चित्र काढताना जसा आपण कागदाचा आकार पाहून चित्र रेखाटतो, तसेच जमिनीवरील दोन ठिकाणांमधील
अंतर विचारात घेऊन, ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते. म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील
अंतर हे प्रमाणबद्ध असते. उदा. दोन ठिकाणामधील अंतर 10 किमी असल्यास नकाशात ते अंतर 1 किमी = 1 सेमी असे
घ्यावे.

सराव करू या :

प्र.1) चित्रात डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या दोन दिशांच्या
दरम्यान आहेत, ते निरीक्षण करा व खालील चित्राची उपदिशा रकान्यात लिहा.

चित्र उपदिशा

डोंगर

विहीर

दिव्याचा
खांब
किल्ला

प्र.2) ठिकाणाचे स्थान किं वा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो?

प्र.3) चित्रातील नकाशा पहा, प्रश्नांची उत्तरे शोधा.

अ) राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस
आहे?

ब) ऑफिस कोणत्या दिशेला दिसत आहे?

प्र.4) नेहा व रश्मी यांच्या घरातील अंतर 10 किलोमीटर (किमी) आहे. नकाशा काढण्यासाठी प्रमाण 1 सेमी = 1 किमी
असेल, तर नकाशामध्ये ह्या दोघींच्या घरांमधील अंतर किती असेल ते सांगा.

वहीच्या कागदावर फु टपट्टीच्या साहाय्याने अंतर काढू न पहा.

प्र.5) खालील चौकटीत मधोमध तुमचे घर आहे, आता बाजूला पिवळ्या चौकटीत दिशा व तुमच्या घराशेजारील इतर
ठिकाणे दाखवा. (झाड, रस्ता, शाळा, घरे)

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

दिशा व नकाशा

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3128956134698
9260815349

प्रमाणबद्धता

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498019680256138814
कृ तिपत्रिका : 14
समजून घेऊया : सूची व खुणा, नकाशाचा वापर/वाचन

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण-14, नकाशा आणि खुणा

अध्ययन निष्पत्ती : 1)नकाशाचा वापर करून वस्तू /ठिकाणे यांच्या खुणा / स्थान ओळखतात व जवळच्या खुणेवरून
शाळा / शेजार यांच्या दिशांचे मार्गदर्शन करतात.

2)नकाशातील चिन्हे, खुणा व सूची यांचा वापर करून नकाशाचे वाचन करतात.

लक्षात घेऊया :

सूची व खुणा-मुलांनो, नकाशा तुम्ही पहिला असेल! नकाशात द्यायची माहिती ही चिन्हे, चित्रे, खुणा, रंगाच्या
छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्याची यादी नकाशात दिली असते. तिला ‘सूची’ असे म्हणतात. सुचीमुळे आपल्याला
नकाशा समजून घ्यायला मदत होते. नकाशावाचन सुलभ होण्यास सूची व खुणा आपणास सहाय्यभूत ठरतात. मुलांनो,
शेजारील आराखड्याचे निरीक्षण के ल्यास यामध्ये घर, झाड, ऑफिस, रुग्णालय, बाजार इत्यादी बाबी विशिष्ट खुणांनी
दाखविले आहेत. त्याचे नीट निरीक्षण करा. कशासाठी कोणत्या खुणा, चिन्ह दर्शविले आहे ते पहा.

नकाशा वापर व वाचन

नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात. त्यासाठी नकाशात दिशाचक्र

असते. त्यावरून नकाशातील दिशा समजतात. नकाशा वाचनापूर्वी त्यातील
दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडू न घ्याव्या. उदा. नकाशातील पूर्व
दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडू न घ्यावी. असे के ल्यामुळे
नकाशातील ठिकाणे नेमकी कोणत्या दिशेला आहेत हे आपणास लगेच
कळते. पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा हीच पद्धत वापरा. तसेच
नकाशात शीर्षक, उपशीर्षक, सूची दर्शविली असते, ही सूची आपणास
नकाशा समजून गेण्यास मदत करते. सूची व दिशांच्या मदतीने नकाशा वापर व वाचन करणे तुम्हांला सोपे जाते.
सराव करू या:

प्र. 1) खुणांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा (नकाशा) एका कागदावर काढा.

प्र. 2) जॉनला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे.परिसरात त्याला पुढील गोष्टी दिसल्या, त्यापैकी
कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात? मदत करा.

घर, उडणारा कावळा, पोलीस स्टेशन, गाई, टपाल कार्यालय, म्हशी, शाळा, मोटारगाडी, चौक, रस्ता, टॉवर,
रेल्वेगाडी, रेल्वेस्टेशन व शेत

प्र.3) शेजारील आराखड्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) अमिरला आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल?

ब) रस्त्याची दिशा कोणती आहे?

प्र. 4) इ.4 थी प.अ.- 1 मधील पृष्ठ क्र. 90 वरील नकाशा निरीक्षण/वाचन करा.उत्तरे लिहा.

अ) किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे लिहा.

--------------------------------------------------------------------------------

ब)खूण काढा .

बंदर - लोहमार्ग –

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

नकाशा आणि खुणा 1
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312999576044
445696133

नकाशा आणि खुणा 2

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312600394195
57478423015
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे - 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 02
इयत्ता : पाचवी विषय : परिसर अभ्यास भाग 1 गुण : 10
कृ तिपत्रिका : 09 ते 14 वेळ : 30 मिनिटे

प्र.1) अ) पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. (2 गुण)

1)आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फु फ्फु स करते.

--------------------------------------------------------------------------------

2 ) पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो.

--------------------------------------------------------------------------------

ब) नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्रोतांची नावे लिहा. (1 गुण )

--------------------------------------------------------------------------------

क) फक्त नाव लिहा. (2 गुण )

1) पश्चिम व दक्षिण दिशेदरम्यान असणारी उपदिशा --------------------------

2) कृ त्रिम धागे -----------------------------------

प्र.2) “शिखर किं वा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलिं डर सोबत नेला जातो.” का? (1 गुण)

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र.3) पुढील इंद्रियांचे कार्य लिहा . (2 गुण)

अ) मेंदू : --------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
आ) हृदय : ------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.4) अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणता घरगुती उपाय करावा? (1 गुण)

---------------------------------------------------------------------

प्र.5 तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात 40सेमी दाखवली आहे.जर नकाशातील प्रमाण 1 सेमी = 1
मीटर दिले असेल, तर शाळेची लांबी किती असेल? (1 गुण)

--------------------------------------------------------------------------------
***
कृ तिपत्रिका : 15
समजून घेऊया : महाराष्ट्र प्राकृ तिक रचना, पिके व भाषा यातील विविधता
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 15, माझा जिल्हा माझे राज्य
अध्ययन निष्पत्ती :
1)आपला जिल्हा व राज्य यांची प्राकृ तिक व मानवनिर्मि त घटक या अनुसंधाने तुलना करतात.
2)नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवतात.
लक्षात घेऊया :
महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. या महाराष्ट्राचे प्राकृ तिक रचनेनुसार तीन प्रमुख विभाग पडतात. किनारपट्टीचा
प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी आहे. गोदावरी ही
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, तर राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा
पर्वतरांग असून त्यात अस्तंभा हे सर्वात उंच शिखर तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. यात कळसूबाई हे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.( ही प्राकृ तिक रचना तुम्ही प.अ.अभ्यास-1 मधील पृष्ठ क्रमांक-94 वरील महाराष्ट्र
राज्य प्राकृ तिक नकाशा आहे ती अभ्यासून पहा.)
पिके व भाषा यातील विविधता -
महाराष्ट्राच्या प्राकृ तिक रचनेमध्ये जशी विविधता आहे, तशी विविधता पिकांमध्ये व भाषेमध्ये सुद्धा दिसते.
महाराष्ट्र राज्य जास्त, मध्यम व कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानुसार येथे विविध पिके पिकतात.
शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, कमी-जास्त पावसामुळे येथे
पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे पावसाच्या प्रदेशानुसार पुढील
पिके घेतली जातात.(यासाठी पृष्ठ क्रमांक-95 महाराष्ट्र राज्य वार्षि क पर्जन्यमान हा नकाशा अभ्यासा.)
पावसाचे प्रदेश व मुख्य पिके :

जास्त मध्यम कमी

भात (धान) ज्वारी ज्वारी

तूर बाजरी

सोयाबीन मटकी

भाषेतील विविधता:
माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो, आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या
प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रदेशांनुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. त्यावर इतर भाषांचा
प्रभाव पडतो. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात. आणि त्यामुळेच भारतातील राज्यांची निर्मि ती भाषांच्या आधारे
झाली.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते.
वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो, त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता
दिसून येते. विविध प्रदेश व मराठीच्या काही बोली पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. त्या अभ्यासा. तुमच्या परिसरात कोणत्या
बोलीभाषा बोलल्या जातात या बाबत माहिती घ्या.
विविध प्रदेश मराठीच्या काही बोली
कोकण कोकणी, मालवणी
विदर्भ वऱ्हाडी
खानदेश अहिराणी(खानदेशी)

आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी, आपल्या राज्यात विविध भागात, प्रदेशात विविध
बोलीभाषा बोलल्या जातात. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागात आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांच्या
बोलीभाषेत पण विविधता आहे.

गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक बोलीभाषा आहेत.

सराव करू या :

प्र. 1) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते जिल्हे येतात, ते नकाशा पाहून लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

ब) तुमच्या परिसरातील बोलीभाषेतील काही शब्द/वाक्य लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 2) खालील विधाने दुरुस्त करून लिहा .

अ) नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

--------------------------------------------------------------------------------

ब) राज्याच्या उत्तरेस अरबी समुद्र आहे.

--------------------------------------------------------------------------------

प्र.3)दिलेल्या जिल्ह्यासमोर तेथील मराठी-बोलीभाषा लिहा.

अ) सिं दुधुर्ग ---------------

ब) नागपूर ---------------

क) पुणे ---------------

प्र.4) इ.4 थी प.अ.-1 मधील पृष्ठ 97 वरील नकाशा अभ्यासा व खालील पिके कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात
होतात ते लिहा.

पिके जिल्ह्याचे नाव

आंबा

कांदा

कापूस
प्र.5) चिन्हे व खुणा ओळखून त्यांची नावे लिहा.

-----------------------

-----------------------

------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

माझा जिल्हा माझे राज्य

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312600394203
365376230

नकाशाशी मैत्री

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498331967488138823
कृ तिपत्रिका : 16
समजून घेऊया : सूर्योदय व सूर्यास्त, लहान- मोठा दिवस
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण- 16, दिवस व रात्र
अध्ययन निष्पत्ती : निरीक्षणे /अनुभव/ माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या
आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. दिवस व रात्र)
लक्षात घेऊया :
खालील चित्रांचे निरीक्षण करा.

(1)

चित्राचे निरीक्षण के ल्यावर हे उलगडले की, ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे
म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही तेथे अंधार पडतो. तेथे रात्र आहे असे म्हणतात. सूर्य सकाळी पूर्वेकडे
उगवतो तेव्हा सूर्योदय होतो आणि सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती
फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो के वळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस
आणि रात्र होतात.

(2)

` चित्र पहा, निरीक्षण के ल्यावर आपल्याला ही जुलै 2021 ची दिनदर्शि का आहे हे समजले असेलच तर यामध्ये
तुम्हाला दिनांक, वार याशिवाय प्रत्येक दिनांकाच्या खाली एक लहान चित्र व काही फिकट निळ्या रंगाचे आकडे दिसले
असतील. यामध्ये सुरुवातीला सूर्याचे पिवळे-लाल चित्र दिसते आणि त्याच्यापुढे आकडा दिसतो ती सूर्योदयाची
घड्याळी वेळ आहे; त्याच्यापुढे अजून एक सूर्याचे चित्र आहे पण ते पहिल्या चित्रापेक्षा वेगळे आहे कारण ती आहे
सूर्यास्ताची घड्याळी वेळ. सर्व दिनांकाच्या खाली सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा पहा. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ
प्रत्येक दिनांकाप्रमाणे बदलताना दिसते. या निरीक्षणातून तुम्हाला आणखी एक खात्री झाली, की दररोज दिवस सुमारे
बारा तासांचा आणि रात्र बारा तासांची असे नसते.
21 मार्च रोजी अचूक 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यानंतर हळू हळू आपल्याकडे दिवस
मोठा होत जातो. रात्र लहान होत जाते. ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते, त्या काळात उन्हाळा येतो.
असे 21 जूनपर्यंत चालते.

21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वांत मोठा दिवस आणि सर्वांत लहान रात्र असते. 21 जूनपासून दिवस
लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबरपर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा
दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यापुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो. रात्र आणखी मोठी मोठी होत
राहते. असे 22 डिसेंबरपर्यंत चालते. ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते, त्या काळात हिवाळा येतो. 22
डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वांत लहान दिवस आणि सर्वांत मोठी रात्र असते. 22 डिसेंबरपासून दिवस मोठा होत
जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्चपर्यंत चालते. 21 मार्चपासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते.

वरील तारखांमध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्या.

सराव करू या :

प्र.1) 2021 या वर्षाची दिनदर्शि का पाहून खालील कोष्टक पूर्ण करा.

दिनांक 4 8 12 24

मे महिन्यातील सूर्योदय

मे महिन्यातील सूर्यास्त

नोव्हें महिन्यातील सूर्योदय

नोव्हें महिन्यातील सूर्यास्त

प्र. 2) तुमच्या शब्दांत लिहा.

अ) दिवस व रात्र कशामुळे होतात?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) जरा डोके चालवा.

अ) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही. त्याचे कारण काय असेल ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 4) दिवस व रात्र यांमधील लहान-मोठेपणा ठरवा. त्यासाठी >, <, = ही चिन्हे वापरा.

क्र. दिनांक व महिना दिवस चिन्ह रात्र

1 21 मार्च

2 21 जून

3 22 सप्टेंबर

4 22डिसेंबर

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

दिवस आणि रात्र

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498456756224138826

लहान -मोठा दिवस

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498527518720138828
कृ तिपत्रिका : 17
समजून घेऊया : जडणघडण
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-17, माझी जडणघडण
अध्ययन निष्पत्ती: कु टुंब/ शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण के लेल्या / अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत
मांडतात. (उदा. साचेबद्धपणा/ भेदभाव/ बालहक्क)
लक्षात घेऊया :
लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठया गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत
जातात. आपल्या आवडीनिवडी ठरत जातात. हळू हळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपली 'जडणघडण
होणे’ असे म्हणतात.

वरील चित्रांचे निरीक्षण करा.

हे प्रसंग सर्वांच्या घरात तसेच आजूबाजूला आपण बाहेर वावरताना होत असतात. यातूनच आपण चांगले
संस्कार शिकत जातो; यासाठी घरातील वातावरण व सभोवतालचे व्यक्ती जे करतात त्यांच्या अनुकरणातून आपण
संस्कार आणि खूप काही नवीन गोष्टी शिकत असतो. वरील तिन्ही चित्रांमध्ये कु टुंबातील व्यक्ती, नातेवाईक, शेजारी असे
अनेक लोक दिसत आहेत त्यांच्याकडू नही आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

अवतीभवती बघून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात? कोणते कपडे
घालतात? कोणते खेळ खेळतात? अभ्यास कसा करतात? हे अनेकदा आपण नकळतपणे शिकतो. बऱ्याचदा शेजाऱ्यांनी
आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा असतो. शेजाऱ्यांमुळे आपल्याला
चांगल्या सवयी लागू शकतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्वाचा असतो.
सराव करू या :

प्र. 1) तुम्हाला येणाऱ्या प्रार्थनेच्या चार ओळी लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 2) गटाने खेळल्या जाणाऱ्या खेळांची नावे लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) काय कराल ते लिहा.

अ) शाळेत जाताना तुमचा मित्र पाय घसरून चिखलात पडला.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

ब) बागेत दोन लहान मुलांचे भांडण सुरू आहे.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

क) मांजराचा पाय गटारावरील जाळीत अडकला आहे.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र.4) तुम्हाला माहीत असणाऱ्या तुमच्या एका शेजाऱ्यांची पुढील माहिती मिळवा व वहीत लिहा.

अ) शेजाऱ्यांचे आडनाव काय आहे? -----------------------------------------

ब) शेजारी बोलली जाणारी भाषा कोणती? -----------------------------------------

क)त्यांच्या कु टुंबात किती माणसे आहेत ? -----------------------------------------

ड) त्यांच्याकडे बनवला जाणारा तुमच्या आवडीचा एक पदार्थ कोणता? ----------------------------

इ)शेजाऱ्यांकडे कोणकोणती झाडे, रोपे आहेत त्यांची नावे लिहा.----------------------------------

प्र. 5) खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमचे कु टुंबवृक्ष तयार करा व त्यात कु टुंबीयांचे लहान आकाराचे फोटो
चिकटवून त्याखाली त्यांचे तुमच्याशी असणारे नाते लिहा.

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स :

माझी जडणघडण
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31257292265399910421693
आपला शेजार
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498737709056138835
कृ तिपत्रिका : 18

समजून घेऊया : स्थलांतर

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण- 18, कु टुंब आणि शेजारात होत असलेले बदल
अध्ययन निष्पत्ती: 1) विस्तारीत कु टुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध ओळखतात.
2) कु टुंबातील बदल (उदा. जन्म, लग्न, बदली इत्यादींमुळे होणारे बदल) स्पष्ट करतात.
लक्षात घेऊया :
कु टुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते. ही संख्या कायम तशीच राहत नाही. ती कमी-अधिक
होत असते. कु टुंबातील सदस्याच्या लग्नामुळे कु टुंबाच्या सदस्याच्या संख्येत वाढ किं वा घट होते. लग्नानंतर काकी किं वा
वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किं वा ताई दुसऱ्याच्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिलं असेल. पुढील चित्रे पहा.

काही वेळा शिक्षणासाठी मुले-मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा नोकरी-व्यवसायानिमित्त
घरातील व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला
'स्थलांतर करणे’ असे म्हणतात.

कु टुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे फ़क्त शेती करून कु टुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले.
व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटापाण्यासाठी माणसं जिथे कामधंदा
मिळेल तिथे जाऊन राहू लागली. मोठी कु टुंबे विखुरली गेली. त्यामुळे कु टुंबे छोटी झाली.

गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही
खूप वाढले आहे. काही वेळा कु टुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते, तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या
शहरात असते. त्यामुळे कु टुंबही बदलत आहे.

पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवारा यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी
व्ही (V) अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसांचा थवा तुम्ही पाहिला असेलच, काही पक्षी दरवर्षी ठरावीक वेळी
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी
जाऊन राहतात.
सराव करू या :

प्र. 1) तुमच्या माहितीतील स्थलांतर करून आलेल्या कु टुंबाची खालील मुद्द्यांनुसार माहिती मिळवा.

अ) त्या कु टूंबाचे मूळ गाव कोणते? --------------------------------------------------

आ) कु टुंबाचे स्थलांतर करण्याचे कारण ------------------------------------------------

इ) कु टुंबप्रमुखाचा व्यवसाय कोणता? ------------------------------------------------

ई) ते कु टुंब स्थलांतर करून कधी आले ते वर्ष कोणते? -------------------------------------

प्र. 2) स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्‍यांची माहिती मिळवा व लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) स्थलांतर म्हणजे काय?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
आ) तुमच्या मते पक्षी स्थलांतर का करत असतील?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
इ) कु टुंबे लहान का झाली? तुमच्या शब्दात लिहा?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

बदलती कु टुंबे
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130461062112
952321739
बदलते शेजारी
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498904621056138840
कृ तिपत्रिका : 19

समजून घेऊया : शिकण्याचा समान अधिकार

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण-19, माझी आनंददायी शाळा
अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये
पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक /
समकालीन उपक्रम आणि खेळ समजून घेतात, भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे /
भूमिका करतात.
लक्षात घेऊया :
तुम्ही सर्वजण शाळेत जाता, शाळेत आपण शिकण्यासाठी येतो. मित्रमैत्रिणी मिळवतो, एकमेकांच्या मदतीने
अभ्यास करतो, खेळ खेळतो, डबा खातो, सांस्कृ तिक कार्यक्रम साजरे करतो, सहलीला जातो. अशा अनेक गोष्टी आपण
एकत्र करत असतो. वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता आली पाहिजे.

शाळेत वेगवेगळी मुलेमुली भेटतात. आपल्यापैकी काहींना दिसत नाही, ऐकू येत नाही, काहींना सहजपणे
चालता येत नाही. या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात. त्यांच्या
सहवासातूनच आपल्याला त्या समजतात.

विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे. शासन या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
राबवते. आपण अशा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्यावे. खालील चित्राचे निरीक्षण के ल्यास तुम्हांला लक्षात येईल
की वर्गातील शिक्षण हे सर्वाना समान असते.

दुसरीकडे मुलींचे शिक्षण पण एक समस्या आहे. शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध
करते. मात्र घरी भावंडाना सांभाळणे, पाणी भरणे, घरकाम करणे ही कामे बहुतांश मुलींवर सोपवली जातात. त्यामुळे
त्यांचे शिक्षण रखडते, बंद पडते. त्यामुळे मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे.
सराव करू या :
प्र. 1) वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा.
अ)एकमेकांना मदत / वाद के ल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.
ब)शाळेत आपल्याला वेगवेगळी / एकसारखी मुले-मुली भेटतात.

प्र. 2) विशेष गरजा असलेली मुले-मुली तुम्हास भेटली, तर तुम्ही काय कराल, ते लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना/सुविधा शासन पुरवते? शिक्षकांशी चर्चा करून लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) मुलींचे शिक्षण कोण-कोणत्या कारणाने रखडते?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 5) ‘शिकण्याचा समान अधिकार’ ह्यावर घोषवाक्य बनवा. वर्गात ही घोषवाक्ये भिं तीवर चिकटवा.
--------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
प्र. 6) तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्याने प्रवेश घेतला आहे. त्याला त्याच्या आधीच्या
शाळेविषयी माहिती विचारा. शिक्षकांना लिहून पाठवा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

माझी आनंददायी शाळा

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498988400640138842
कृ तिपत्रिका : 20
समजून घेऊया : विशेष गरजा असलेल्या व्यक्ती, संवेदनशीलता
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण-20, माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता
अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये
पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक /
समकालीन उपक्रम आणि खेळ परस्पर सहकार्याने खेळतात, भोवतालच्या वस्तू / वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी
प्रकल्प करणे / भूमिका करतात.
लक्षात घेऊया :
विशेष गरजा असलेल्या व्यक्ती-जन्मत: आजारपण किं वा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना
शारीरिक अपंगत्व येते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी आणि गैरसोईंवर मात करावी लागते.
त्यामुळे त्यांना विशेष सेवा-सुविधा आणि मदतीची गरज असते.
मुलांनो, विशेष गरजा मध्ये अनेक प्रकार येत असतात. शारीरिक अपंग व्यक्तींना दिव्यांग म्हणतात. तुम्ही
तुमच्या शाळेत, परिसरात अशा व्यक्ती नेहमी पहात असाल. यामध्ये मुकबधीर, कर्णबधीर, दृष्टीहीन, पायाने अधू
इत्यादी… बरोबर नं!

चित्रात दिसतात त्याप्रमाणे, रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी व्यक्ती तुम्ही
गावात, शहरात पाहिली असेल, त्या पांढऱ्या काठीच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू
शकते. काही ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये लिहलेले असते, त्याचाही वापर ह्या व्यक्ती आपल्या सोईसाठी
करतात.(उदा.मतदान यंत्र, लिफ्टपाशी मजले क्रमांक). पायाने किं वा शरीराने अधू असणाऱ्या व्यक्तींसाठी
शाळा-महाविद्यालय, स्टेशन इ. ठिकाणी उताराचा / चढणीचा रस्ता असतो. तर कर्णबधीर व्यक्तींसाठी खुणांची भाषा
असते. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्या इतर कोणी नसून त्या सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच आहेत, त्यांच्यात
भेदभाव करू नये. आपल्या समाजात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पुढे गेल्या
आहेत. (उदा. नर्ति का - सुधा चंद्रन, संगीतकार - रविं द्र जैन, जलतरणपटू - शरद गायकवाड)
संवेदनशीलता

आपल्या कु टुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांना मदत करणे
म्हणजे संवेदनशील असणे होय.आपल्या कु टुंबात असणाऱ्या वृद्ध किं वा आजारी आजी-आजोबांना, मोठ्यांना आवश्यक
मदत करणे. त्यांनी सांगितलेले नम्रपणे ऐकणे. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तीना मदत करणे. उदा. रस्त्यात कोणी
दृष्टीहीन चालत असल्यास त्यांना रस्ता पार करण्यास मदत करणे, त्यांना आवडलेली गोष्ट वाचून दाखविणे,
कर्णबधिरांशी सावकाश आणि स्पष्टपणे बोलत संवाद साधणे. अशा प्रकारे ह्या सर्वच व्यक्तींशी आपण प्रेमाने व आदराने
वागले पाहिजे, त्यातूनच आपली संवेदनशीलता दिसते.

सराव करू या :

प्र. 1) मित्रांनो, घरात, शेजारी आजारी, वृद्ध, विशेष गरजा असणारी व्यक्ती असतील तर पुढीलपैकी तुम्ही काय कराल?
जे योग्य वाटते त्यासमोर ✔ अशी खूण करा. जे अयोग्य वाटते तेथे ✖ अशी खूण करा.

1) आजारी माणसाला वडापाव खायला द्यावा.

2) आजोबांना माळ्यावरील वस्तू काढायला मदत करणे.

3) दृष्टीहीन व्यक्ती दिसल्यास त्यांना त्रास देणे.

4) आजी-आजोबांसोबत गप्पा मारणे.

5) आजारी व्यक्तीच्या खोलीत मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे.

प्र.2) सहसंबंध लिहा.

अ) दृष्टीहीन : ब्रेल लिपी :: कर्णबधीर : ----------------------
ब) लिफ्ट : उद्वाहक :: चढण/उतरणी साठी रस्ता: -----------------------

प्र.3) चुकीचा शब्द खोडा.

अ) पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.
ब) सुधा चंद्रन गायिका / नर्ति का आहेत.

प्र. 4) घरात आजीला तहान लागली आहे, आजीला चालता येत नाही. तर अशावेळी तुम्ही काय कराल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 5) आपल्या समाजातील विशेष गरजांवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवा. वहीत नोंद करा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

1)माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता -1

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3125769228912
7219216367

2)माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता-2

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499230203904138849
कृ तिपत्रिका : 21
समजून घेऊया : व्यवस्थापनाचे महत्त्व व गरज
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-21, समूहजीवनासाठी व्यवस्थापन
अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये
पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक /
समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशू पक्ष्यांना खायला देणे. भोवतालच्या वस्तू /
वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.
लक्षात घेऊया :
व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन कधी करावे? व्यवस्थापनाची गरज कोठे लागते? त्याचे महत्व काय?
याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांशी चित्राद्वारे, प्रसंगाद्वारे चर्चा घडवून आणतील.
आता मुलांनो, पुढील चित्र पहा. चित्रावर आधारित पुढील प्रसंग वाचा. प्रसंगातून काय जाणवते हे शिक्षकांना
सांगा.

श्रद्धा, आयेशा आणि एमिली या तिघींच्या कु टुंबियांनी उन्हाळी सुट्टीत सहलीला जायचे ठरवले, त्यासाठी त्यांनी
खास गाडी ठरवली. सहलीच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पहात राहिले, पण गाडी काही आलीच
नाही, फोनवर चौकशी के ल्यावर कळले की, गाडी चालकाला सर्वजण कोठे थांबणार हे माहीतच नव्हते. हा गोंधळ
कशामुळे झाला? तर व्यवस्थापन नसल्याने!

कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते, म्हणजेच आपण काम कसे करणार? कधी
करणार? याचा आराखडा तयार करणे म्हणजे ‘व्यवस्थापन’.

व्यवस्थापन महत्त्व व गरज-वरील प्रसंगात काय घडले तर व्यवस्थापनाचा अभाव! व्यवस्थापन असते तर
कोणताही गोंधळ झाला नसता. म्हणजेच कोणतेही काम करताना व्यवस्थापन असेल तर काम सोपे होते! आपण जर
कोणतेही काम इतरांबरोबर करणार असू तर त्याबाबत आराखडा करावा लागतो. हा आराखडा अधिक काटेकोरपणे
करावा लागतो. कोणते काम कोणी करायचे, कसे करायचे हे प्रत्येकास समजावून सांगावे लागते. प्रत्येकजण काम नीट
करीत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते. कामासाठी किती खर्च येईल याचा अंदाज बांधावा लागतो. या सर्व
गोष्टी नेमके पणाने पार पडल्या तर काम पूर्ण होते, यात एकाने जरी चूक के ल्यास काम नीटपणे पूर्ण होत नाही.

मग, तुमच्या घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले तरीसुद्धा त्याचे व्यवस्थापन करावे लागते. उदा. जेवायला
कोणते पदार्थ बनवायचे? त्यासाठी कोणते सामान लागेल? ते घरात आहे की विकत आणावे लागेल? पाहुण्यांचे स्वागत
कसे करावे? ही आपली घरातील अशा छोट्या-छोट्या कार्यक्रमात जर व्यवस्थापन असेल, तर शाळा, गाव, जिल्हा,
राज्य व देश अशा सर्वच ठिकाणी व्यवस्थापन किती महत्वाचे व गरजेचे असेल ! मग असे व्यवस्थापन कोठे-कोठे करता
येईल? तर तुमचा अभ्यास, व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन इ. बाबतीत व्यवस्थापन नेहमी झाल्यास
काम व्यवस्थित पार पडते, कोणताही गोंधळ होत नाही.

सराव करू या :

प्र. 1) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ? ते पुढे लिहा.

1) उदा. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे.

2) -----------------------------------------------------------------------
3) -----------------------------------------------------------------------

प्र. 2) तुमच्या घरी, परिसरात कोणकोणते कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) तुमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी (मॉंनिटर) माध्यमातून वर्गात कोणती कामे होत असतात? त्याची यादी पूर्ण करा.

उदा. वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे ना ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमात व्यवस्थापन गरजेचे वाटते, योग्य ठिकाणी खूण करा.

अ.क्र. कार्यक्रमाचे नाव खुण करा.

1. लग्न

2. खाऊ खाणे

3. गावातील सप्ताह

4. अभ्यास व खेळ
प्र. 5) तुमच्या मागील वर्षातील शाळा बंद असताना तुम्ही अभ्यास व खेळाचे व्यवस्थापन कसे के ले,
वर्गशिक्षकांशी/पालक चर्चा करून तक्ता तयार करा.

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

समूहजीवनासाठी व्यवस्थापन

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312225306020
72473622918

कौटुंबिक/वैयक्तिक नियोजन

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499502555136138856
कृ तिपत्रिका : 22
समजून घेऊया : जुन्या व आधुनिक वाहतूक व संदेशवहनाची साधने, व त्यांचे फायदे
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-22, वाहतूक व संदेशवहन
अध्ययन निष्पत्ती : भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृ ती यामधील फरक सांगतात. (उदा. परिवहन, चलन,
घरे, साहित्य, साधने, कौशल्य इ.)
लक्षात घेऊया :
वाहतुकीची साधने (जुनी व आधुनिक)
वाहतूक म्हणजे काय आपल्याला माहीत आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किं वा प्रवास करणे
म्हणजे वाहतूक. मग ती वाहतूक वस्तूची असेल किं वा आपली! आता मुलांनो, चित्रातील साधनांचे निरीक्षण करा. ही
साधने कशाची आहेत? ती आपण वापरतो का? सर्वच साधने वापरतो का? ही साधने कोणत्या काळातील आहेत?
त्याबाबत शिक्षक मुलांशी चर्चा घडवून आणतील.

वरील चित्रातून तुम्हाला काय लक्षात येते, तर ही वाहतुकीची साधने असून, ती वेगवेगळया काळांत आपण
वाहतुकीसाठी आपण वापरली आहेत. यामध्ये जुनी आणि आधुनिक साधने येतात. मग बैलगाडी, घोडागाडी, पालखी /
डोली तर कधी माणूस व प्राणी यांचा वाहतुकीसाठी वापर पूर्वी होत असे हीच जुनी साधने ! तर आता आधुनिक काळात
वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली. उदा. आगगाडी, विमान, जहाज, रॉके ट, मेट्रो इ.

संदेशवहन साधने (जुनी व आधुनिक)

संदेशवहन म्हणजे काय? तुम्ही संदेश, निरोपासाठी कशाचा वापर करता? आता पुढील चित्रातील साधनांचे
निरीक्षण करा आणि सांगा ही साधने कशाची आहेत? ही साधने कोठे आणि कशासाठी वापरली जातात, तुमच्या घरी
ह्यातील कोणत्या साधनांचा वापर के ला जातो ?

तुम्ही ह्या चित्रांचे निरीक्षण के ले असता ही साधने आहेत संदेशवहनाची! हे लक्षात येते. तर विविध प्रकारची
माहिती मिळवणे किं वा माहिती पोहचविणे म्हणजे संदेशवहन ! काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश
पाठविले जायचे. नंतर निरोप्याला पाठवून संदेशवहन होत असे. त्यानंतर तार व टपालसेवा सुरु झाली. ही
संदेशवहनाची जुनी (पूर्वीची) साधने होत. अलीकडच्या काळात संदेशवहनासाठी जलद तंत्रांचा वापर होऊ लागला.
आणि तो सर्वच क्षेत्रांत होऊ लागला. रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल, फोन, इ. यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके ,
पुस्तके , दूरदर्शन, इंटरनेट ही सार्वजनिक संदेशवहनाची साधने आहेत.
वाहतूक व संदेशवहन साधनांचे महत्व -
पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत आधुनिक साधने जास्त वेगवान आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे
वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली. प्रवास (वाहतूक) जलद होणे सुलभ झाले.

संदेशवहनाची पूर्वीची साधने त्यावेळी जरी महत्वाची वाटत होती, ती आता संथ वाटू लागली. कारण आताच्या
आधुनिक साधनांमुळे संदेशवहन कमी वेळेत व जलद (एका क्षणात) होऊ लागले. जगात कोठेही निरोप पोहचविणे
सुलभ झाले, ते आधुनिक संदेशवहनाने! त्यामुळे वाहतूक आणि संदेशवहन साधनांमध्ये काळानुरूप बदल होत गेले
आणि त्याचे महत्त्व दैनंदिन जीवनात वाढू न ती आपली गरज झाली हे महत्वाचे. परंतु वाहतुकीची अथवा संदेशवहनाची
साधने गरजेनुसार वापरण्यासाठी असतात. त्यांचा अतिवापर, आपल्यासह सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी
हानिकारकच !

सराव करू या :

प्र. 1) गटातील वेगळा पर्याय ओळखा.

अ) दूरदर्शन, इंटरनेट, रेडिओ, पुस्तके -----------------------
ब) मानव, प्राणी, बैलगाडी, रॉके ट ----------------------
प्र. 2) परस्परसंबंध लिहा.
दुर्गम भाग : याक :: वाळवंट : --------------
प्र. 3) काय करावे ते लिहा.
अ) मधूला अतिशय महत्वाचा संदेश परगावी त्वरीत पाठवायचा आहे, त्यासाठी तिने कोणत्या साधनांचा वापर करावा?
--------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
ब) रॉके टचे चित्र रेखाटा, रंगवा आणि त्याचे दोन उपयोग लिहा.

---------------------------------------
---------------------------------------
---------------------------------------
---------------------------------------

क) इ.चौथी परिसर अभ्यास - १ मधील पृष्ठ - १३५ व १३६ वरील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा.
उताऱ्यातील वाहतुकीची व संदेशवहनाची साधने वर्गीकरण करा.
वाहतुकीची साधने संदेशवहनाची साधने
प्र. 4) खाली दिलेल्या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा.
बैलगाडी, मानव, मेट्रो, विमान, गाढव
-------------------------------------------------------------------------

प्र. 5) तुम्हाला संदेशवहनाची साधने महत्वाची वाटतात का? का ते लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

अधिक अभ्यासासाठी लिं क्स :

वाहतूक व संदेशवहन
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499711000576138861
संदेशवहन साधने
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499837247488138865
कृ तिपत्रिका : 23
समजून घेऊ या : नैसर्गि क आपत्ती-अवकाळी पाऊस, पूर, भूकं प, त्सुनामी
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 23 नैसर्गि क आपत्ती
अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे /अनुभव/ माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या
आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. भूकं प, पूर)
लक्षात घेऊ या :
नैसर्गि क आपत्ती :
बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कु ठे भूकं प होतो, तर कु ठे पूर येतो. कु ठे त्सुनामी येते, तर
कु ठे अवकाळी पाऊस होतो . या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात. काही माणसे मृत्युमुखी पडतात. लोकांची
घरे पडतात. पाळीव जनावरे मरतात. काही दुर्घटनांमध्ये शेतातल्या उभ्या पिकाचा नाश होतो. मालमत्तेचे प्रचंड नुकसान
होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. अशा घटनांनी
घाबरुन जाऊ नये. त्यापेक्षा या आपत्तींना तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायद्याचे ठरते.

अवकाळी पाऊस :
पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडू न इतर वेळीही पाऊस पडतो अशा पावसाला 'अवकाळी पाऊस'
म्हणतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण या काळात
पाऊस फार जोराचा झाला, तर शेतात पाणी साचते. आंब्याचा मोहोर पण या पावसामुळे गळू न किं वा कु जून जातो व
आंब्याचे उत्पन्न कमी होते.

पूर :

पावसाळ्यात कधी कधी तीन-चार दिवस सतत

जोराचा पाऊस पडू न नदीच्या पाण्याची पातळी वाढते.
त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला
नाही तर पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे नदीकाठची मातीची
घरे कोसळतात. गुरे आणि माणसे बुडू न मरण्याची शकयता
असते. पुराच्या पाण्याला ओढ फार असते. पुराच्या पाण्यात
पोहणे धोक्याचे ठरते.

भूकं प :

जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण
होतात. काही सेकं द जमीन हादरते. त्याला भूकं प म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकं प होतो,
तिथली घरे हादरतात. घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साफ कोसळतात.
त्यांचे ढिगारे होतात. त्या ढिगाऱ्याखाली अडकू न माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी होतात. भूकं पाच्या कें द्राजवळ
नुकसान जास्त होते.
भूकं पामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किं वा ती जखमी होतात. भूकं प झाला तर घाबरु नये. भूकं प
काही सेकं द होतो. भूकं प होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात
किं वा जखमी होतात. म्हणून भूकं प होत आहे असे लक्षात येताच खाटेखाली किं वा टेबलखाली बसावे किं वा दाराच्या
चौकटीत उभे राहावे. भूकं प थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडू न शाळेजवळ मैदानात किं वा मोकळ्या जागेत जमा व्हावे.

त्सुनामी :
ज्यावेळी भूकं पाचा उगम समुद्रात असतो,
त्या वेळी भूकं पामुळे समुद्रात खूप मोठया लाटा
निर्माण होतात. एक-एक लाट इमारतीइतकी उंच
असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन
धडकतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. किनाऱ्यावर
माणसांची वस्ती असली आणि तिथे त्सुनामी झाली
तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी
माणसे किं वा प्राणी सापडतात, ते त्या लाटेसमोर
अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडू न
मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करु शकत नाहीत.

सराव करू या:

प्र. 1) काय करावे बरे?

अ) तुमच्या गावात पूर येणार आहे.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ) शाळेत असताना भूकं पाचे धक्के बसत आहेत.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) अवकाळी पावसामुळे शेतीचे काय आणि कसे नुकसान होते ते तुमच्या शब्दात लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

आ) त्सुनामीचा किनाऱ्यावरील जनजीवनावर कोणते परिणाम होतो ?

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) एका नैसर्गि क आपत्तीविषयी वर्तमानपत्रात आलेली बातमी मिळवा व थोडक्यात लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) पुढे नैसर्गि क आपत्ती आणि मानवनिर्मि त आपत्ती असे कोष्टक दिले आहे ते खालील यादीच्या मदतीने पूर्ण करा.

1) चक्रीवादळ 2) मोडकळीला आलेले घर कोसळणे 3) वीज कोसळू न त्यात मरणे 4) दोन आगगाडयांची टक्कर
होणे 5) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडू न त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे 6) जोरदार बर्फ पडू न दैनंदिन
जीवन विस्कळीत होणे 7) स्वयंपाकाचा सिलिं डर फु टून आग लागणे 8) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडू न
येणे

क्रमांक नैसर्गि क आपत्ती क्रमांक मानवनिर्मि त आपत्ती

1 1

2 2

3 3

4 4

अधिक अभ्यासासाठी लिं क्स:

नैसर्गि क आपत्ती

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3122195917189
038081251

पूर

https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292500026179584138871

कृ तिपत्रिका : 24
समजून घेऊया :   लोकसंख्या वाढ, जमिनीतील पाण्याची पातळी  
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 24 ,आपण परिसर धोक्यात आणत आहोत का ? 
अध्ययन निष्पत्ती :   निरीक्षण /अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध
घटनांच्या आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (लोकसंख्या वाढ व
त्याची कारणे, परिणाम)
लक्षात घेऊया  :
लोकसंख्या  वाढ
खाली दिलेल्या दोन्ही चित्रावरून असे लक्षात येते की, पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात लोकसंख्या वाढ खूप
प्रमाणात झाली आहे.  

1951 साली जनगणना झाली. त्या वेळी आपल्या देशाची 36 कोटी  होती.  2011 साली जनगणना झाली. त्या
वेळी आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी होती. 
      गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली. अजूनही ती वाढत आहे. आपण ज्या वस्तू  
परिसरातून गरजेपोटी घेतो, त्यांची मागणी अतोनात वाढली. त्याचे नुकसान खालीलप्रमाणे झाले.
      1) खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले.
      2) शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली लोकांना रहायला जागा मिळेना. शहराभोवती शेती होती. मोकळ्या जागा 
होत्या. तिथे नवीन वसाहती आणि रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली. 
      3) शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात. म्हणून शहरातले लोक वाहने खरेदी करू
लागले. शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली. शहरातल्या हवेत हा धूर मिसळू  लागला. त्याचा परिणाम म्हणून
शहरांमधील लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले.  
     4) लोकसंख्या वाढल्यामुळे कधीकधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. त्यामुळे भर वस्तीत पाणी साचते.
त्यात डास वाढतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार होतो.
 शहरातल्या वस्तीवर लोकसंख्यावाढीचा  खूप वाईट परिणाम होतो.       
  
जमिनीतील पाण्याची पातळी- 

बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा आणि

खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. 
  1) चित्र ग्रामीण भागातील आहे की शहरी ?
2) नदीवर लोक कोणकोणते कामे करत आहेत ?        
            
बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
 
1) हे चित्र कसले आहे ते ओळखा आणि लिहा. 
2) ह्या चित्रातून काय निष्कर्ष मिळतो ?

पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे.  हळू हळू लोकसंख्या वाढू लागली. पाऊस मात्र तेवढाच
पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून
पाणी अडवू लागलो. काहीजण विहीरी खणण्याऐवजी कू पनलिका खोदू लागले. पाणी उपसण्यासाठी हातपंप वापरू
लागले. पंपांमध्ये सुधारणा झाली. डिझेल  वापरून चालवता येईल अशा यांत्रिक  पंपाचा शोध लागला. विजेवर
चालणार्‍या पंपाचाही शोध लागला.  पूर्वी  हे पाणी पारंपरिक  पद्धतीने दिले  जाई. पाणी उपसण्यासाठी रहाटगाडग्याचा
आणि मोटेचा वापर के ला जाई. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेल विजेचे पंप वापरतात. पूर्वी  मोटा
जितके   पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात.  याचा परिणाम म्हणून
जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.        
 
 सराव करूया :
प्र. 1) पुढील माहिती मिळवा व त्यापुढील प्रश्नाचे उत्तर लिहा.

1991 साली भारत देश प्रश्न: माहिती मिळविलेल्या लोकसंख्येत तुम्हाला फरक दिसला
लोकसंख्या का? असेल तर त्यामागचे कारण लिहा.

2001 साली भारत देश

लोकसंख्या

2011 साली भारत

देशाची लोकसंख्या

प्र. 2)  काय करावे बरे ? 
          मुंबई येथे राहणार्‍या तुमच्या भावाची जुनी गाडी आहे. ती सुरू के ली की गाडीमधून खूप धूर येत असतो . तर
त्याने काय के ले पाहिजे असे तुम्हाला वाटते ?
--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे आणि माणूस या पाण्याचा वापर खूप कामासाठी करत असतो,
तर त्यातील तुम्हाला वाटणारे महत्वाची कामाचे चित्र खालील दिलेल्या रिकाम्या जागेत काढा आणि छानरित्या रंगवा.

प्र. 4) लोकसंख्या वाढ आणि पाण्याची बचत लोकांनी करावी, यासाठी काही घोषवाक्ये तयार करा व लिहा. 
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 5) खालील चित्राचे निरीक्षण करून ते चित्र कसले आहे ? आणि तुम्हाला या चित्राबद्दल काय वाटते ते दिलेल्या
रिकाम्या जागेत लिहा.
 
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------

अधिक अभ्‍यासासाठी लिं क्स :

1) लोकसंख्या वाढ
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292500209614848138876
2) जमिनीतील पाण्याची पातळी
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292500252172288138877
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे - 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 03
इयत्ता : पाचवी विषय : परिसर अभ्यास भाग 1 गुण : 20
कृ तिपत्रिका : 01 ते 24 वेळ : 30 मिनिटे

प्र.1) अ) खालीलपैकी कापसाचे पीक घेणा-या जिल्ह्याभोवती वर्तुळ करा. (1 गुण)

1) सातारा 2) कोल्हापूर 3) जळगाव 4) पुणे

ब) खालील वाक्यातील नको असलेला शब्द खोडा . (2 गुण)

1) 22 सप्टेंबर रोजी दिवस व रात्रीचे तास समान / असमान असतात .

2) वाढत्या लोकसंख्येमुळे देशाचा फायदा / तोटा होतो.

क) सहसंबंध लिहा. (1 गुण)

ट्रक : रस्ते वाहतूक : : जहाज : ----------------

प्र. 2) हवेत पाणी वायुरूपात असते हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणती कृ ती कराल ? (2 गुण)
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

ब) चित्रातील आपत्तीचे नाव लिहा. (2 गुण)

तिचे परिणाम लिहा.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 3) अ) नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या त्याची यादी करा. (2 गुण)

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

ब) का ते लिहा. (2 गुण)

1) पावसाळ्यात पाणी उकळू न प्यावे .

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
2)पालेभाज्या आधी धुवून घ्‍याव्‍यात, मग चिराव्यात.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

प्र. 4) अ) पुढील विधान दुरुस्ती करून पुन्हा लिहा. (2 गुण)

1) हृदय हे आंतरेन्द्रीय उदरपोकळीत असते.
--------------------------------------------------------------------------------

2) धान्यावर रेडा / बैल लावून फिरवले जाते, शेतातील या कामाला उफणणी म्हणतात.

ब) वरील साधनांची ‘जलद ते संथ’ अशा क्रमाने नावे लिहा. (2 गुण)

--------------------------------------------------------------------------------

क) फक्त नाव लिहा. (2 गुण)

1) लवकर बरा होणारा आजार -----------------------

2) विविध प्रकारची माहिती मिळवणे किं वा पाठविणे म्हणजे -----------------------

प्र. 5) दिशाचक्राच्या आकृ तीमधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (2 गुण)

* * *

You might also like