Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

एनर्जी व्याम्पायर,/Enargy Vampayer

कदाचित हा शब्द तुम्हांपैकी अनेकांना नवीन असेल पण अशी अनेक लोकं तुमच्या आसपास
आढळतील.एनर्जी व्याम्पायर म्हणजे शब्दशः अर्थ ऊर्जा पिशाच्च होय.

"पाश्चिमात्य दे शांमध्ये माणसाचं रक्त शोषून आपली भूक भागवणारे काल्पनिक भूतांना पिशाच्च/व्याम्पायर हे
दिले लं नाव आहे ". हि दुसरे -तिसरे कोणी नसून स्वतःच्या हिताचा विचार करताना तु मच्या मनातील निष्पाप आणि
सं वेदनशील भावनांचा,स्वभावातील चां गुलपणाचा गै रफायदा घे णारी लोकं होय.

एनर्जी व्याम्पायर लोकं बोलण्यात प्रचंड चतुर असतात.समोरच्या व्यक्तीचा भावनिक ठाव हि मंडळी
लगेचच घेतात.ह्यांच्या संपर्कात जास्तीत-जास्त लोकं हि भावनिकरित्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील
असणारी असतात आणि ज्या लोकांकडून भावनिक,आर्थिक,सामाजिक,कौटुंबिक किं वा इतर कोणत्याहि
प्रकारचा फायदा करून घेता येईल अशा लोकांना हे पटकन जवळ करतात,कारण त्यांची मानसिकताच तशा
प्रकारची झालेली असते.हि व्यक्ती तम
ु ची अत्यन्त जवळची किं वा सख्खे नातेवाईक सद्ध
ु ा असू शकतात.

अगदी आई-बहीण-भाऊ-वडील-पति-पत्नी-मित्र कोणीहि एनर्जी व्याम्पायर,/Enargy Vampayer असू


शकतात,फक्त तम्
ु हांला त्यांचं भावनिकतेच्या पलिकडे जाऊन निरीक्षण करावं लागेल.

अशा लोकांना समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीशी,भावनेशी मनातून काहिही दे णं घेणं नसतं, फक्त आपलं
काम कसं काढावं? ह्यामध्येच त्यांचं डोकं चालतं.त्यांचं व्यक्तीमत्वच असं बनत की त्यांना तुम्हि कितीही
समजावून सांगितलं तरी ते त्यांच्या चुका मान्य करत नाहीच पण स्वतः किती गरीब,असह्य आणि
निष्पाप असून समोरचा व्यक्ती किती अन्याय करतो आणि मी कसं सहन करतो हे जगाला सांगत
फिरतात.

त्यांची अजून काहि लक्षणे सांगतो.


१)ते नेहमी बोलण्यातून छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यावर अन्याय कसा झाला आणि मी किती
समजुतीने तो सहन करतोय हे सतत सांगणार.

२)पूर्ण सत्य कधीच सांगणार नाहि. नेहमी समोरच्या व्यक्तीची चूक किं वा परिस्थितीला दोष दे त असतात.

३)तुमची ईच्छा असो किं वा नसो ते सतत आपलं रडगाणं ऐकवायला तयार असतात.पण जेंव्हा तुम्हांला
भावनिक गरज असते तें व्हा अचानक गायब होतात.

४)तुमच्याकडे काहि काम असेल तर सतत भुंग्यासारखं मागे लागणार.

५)एखादे वेळी त्यांना कोणी मदत नाकारली तर पाठीमागे दस


ु र्यासमोर निंदानालस्ति करणार.

६)त्यांच्या हातून एखादं काम होणार नाहि हे माहिती असलं तरी ते त्यांच्या बोलण्यातून जाणवू दे णार
नाहि, तुम्हांला फक्त अपेक्षेवर ठे वून तुमचा अपेक्षाभंग करतात ह्याचा अनुभव तुम्हांला सतत येतो.

७)त्यांना तुमची काळजी आहे असं दाखवतात आणि अचानक तुमच्या भावना दख
ु वले असं काहीतरी
बोलतात किं वा वागतात.

८)समोरचा व्यक्ती त्यांच्यावर भावनिकरित्या अवलंबून रहावा ह्यासाठी ते गोड बोलणे,अडवणूक होईल
अशी परिस्थिती निर्माण करून त्यातून तुम्हांला बाहे र काढण्यास किं वा सल्ला दे ण्यास फक्त तेच होते असं
दाखवणे.त्यामळ
ु े तम्हि
ु कळत नकळतपणे त्यांच्यावर अवलंबन
ू रहायला सरु वात करता.

९)चार चौघात तम्


ु हांला नकळतपणे कमीपणा दाखवणे,प्रमाणच्या बाहे र चेष्टा-मस्करी करणे.

१०)त्या व्यक्तीच्या संपर्कात येताच तुम्हांला एकप्रकारे भावनिक कोंडमारा झाल्यासारखं वाटे ल.

११)त्यांच्या समोर तुम्हि पूर्णपणे तुमचं मन मोकळं केलंत तरी त्याचं गांभीर्य न ओळखता उलट ते
तुम्हांला वेड्यात काढतील चेष्टे त घालवतील किं वा पूर्णपणे दर्ल
ु क्ष्य करतील.

१२)हि माणसे आतून पोकळ व भित्री असतात पण वागताना नेमकं ह्याच्या उलट अतिआत्मविश्वासी
असल्या सारखं वाटतं.

१३)ह्यांच्या संपर्कात येताच तुम्हि भावनिकरित्या अशक्त वाटायला सुरवात होते.

१४)ह्यांच सगळं बोलणं ऐकलं की आपणाला काय खरं काय खोटं हे लवकर समजत नसतं.

१५)त्यांना कृतज्ञता म्हणजे काय असतं हे माहितीच नसतं.


ह्यातील ५-६ पेक्षा अधिक गोष्टी जुळणारी कोणती व्यक्ती तुमच्या संपर्कात असतील तर ओळखून जा की
ती व्यक्ती एनर्जी व्याम्पायर आहे .

ह्याचा सर्वाधिक त्रास हा मानसिकरित्या अतिसंवेदनशील व्यक्तीवर होतो.त्यामळ


ु े काहि काळाने ते स्वतःला
व स्वतःच्या संवेदनशीलतेला मनातल्या मनात दोष द्यायला सुरवात करतात.त्यांनी मनाशी एक खूणगाठ
बांधावी की,"संवेदनशीलता हे व्यक्तिमत्वाला मिळालेलं वरदान आहे ,त्याचं पालनपोषण करताना मनाच्या
खंबीरपणाच कंु पण लावलं की तम
ु च्या इतकं प्रभावशाली कोणीहि होऊ शकत नाही."कारण संवेदनशीलते
मुळे समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे .हे व्यक्त व्हायच्या अगोदरच तुम्हांला ते जाणवत. पण तुम्हि तिथे
भावनिकरित्या न्यूट्रल राहायला हवं.एखादी घटना घडण्यागोदर तुम्हाला त्याची जाणीव लगेच होते,म्हणजे
तम
ु ची इंटुशन पॉवर जास्त असते.फक्त तम्हि
ु नको तिथे अतिसंवेदशील झालात की त्याचा नकारात्मक
प्रभाव तुमच्या भौतिक-अभौतिक व्यक्तिमत्वावर पडायला सुरुवात होते.त्यामुळे संवेदनशील लोकांनी मनाचा
खंबीरपणा जोपासायला हवा.

आता ह्यापासन
ू स्वतःला वाचवायचं कसं?

1)ह्यांना तु म्हि तु मच्या आयु ष्यापासून लांब ठे वा.

2)ह्यां च्याशी भावनिकरित्या जु ळू नका,कने क्ट होऊ नका.

3)ह्यां च्याकडू न कोणतीही अपे क्षा नका ठे वू.

4)स्वतः भोवती आणि ईतरां भोवती एक सकारात्मक सीमारे षा आखून घ्या.

5)तु म्हां ला जे वाटतं ते स्पष्टपणे बोलायला,व्यक्त व्हायला सु रुवात करा.

6)एखाद्यला तु म्हि मदत केली तर तशीच मदत माघारी घे णे हा तु मचा दे खील हक्क बनतो हे ही लक्षात घ्या.ते
समोरच्या व्यक्तीला दे खील जाणवून द्या.

7)समोरचा व्यक्ती जबरदस्तीने तु मची मानसिक ईच्छा नसताना दे खील त्याचं रडगाणं ऐकवत असे ल तर Body
ू क्ष करत आहात.उदा-ते बोलत असताना आपण अधून
language ने त्यांना जाणवून द्यावं की तु म्हि त्यां च्याकडे दर्ल
मधून दुसरीकडे पाहणे .ते थोडे लांबनू बोलत असे ल तर त्यां च्या डोक्याच्या वर पाहणे .

8)जर न टाळता ये णारी व्यक्ती असे ल तर दुसरी पद्धत ते बोलत असताना मनातल्या मनात आपण त्यां च्या समोर
आरसा धरला आहे आणि त्यांना तु मच्याविषयी जी जाणीव आहे ,ती जाणीव त्या आरश्यामध्ये ते स्वतःला पाहत
आहे त.असं मानसिकचित्र रं गवा..!
काहि दिवसांनी हे लोकं हळूहळू तम
ु च्यापासन
ू नकळतपणे दरू झाल्याचे किं वा पर्वी
ू इतके जास्त
भावनिकरित्या तुमच्याशी एवढे कनेक्ट होणार नाहीत.अनुभव घेऊन पहा.

Urja group

Sagar shinde.

Urja

You might also like