केळशी चेन्नमा संशोधन पेपर

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 8

छत्रपतींना अभय दे णार्‍या राणी चन्नम्मा

प्रा. डॉ. सतीश कदम

अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, 9422650044

विजयनगर साम्राज्याच्या पतनामुळे दक्षिण कर्नाटकातील समुद्रतटावर अनेक नायकांचे राज्य

निर्माण झाले होते. नायक म्हणजे सामंत किं वा जहागीरदार ज्यांना कर्नाटकात पाळीगार असेही

म्हटले जायचे. बेळगावापासून ते जिंजीपर्यंत उदयगिरी, पेनुकोंडा, चंद्रगुत्ती, मदरु ाई, तंजावर, जिंजी,
1
इक्केरी किं वा केळदी, म्है सूर यासारखी अनेक नायक घराणी असून त्यात केळदी ( ता. सागर जि.

शिमोगा ) या नायक घराण्याचा संबंध मराठ्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण असून केळदी नायक

घराण्यात होवन
ू गेलेल्या 17 राज्यकर्त्यापैकी राणी चन्नम्माचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगा

आहे . आपणाला माहित असले पाहिजे की, केळदीच्या राणी चन्नम्मा आणि कित्तूरच्या चन्नम्मा या

दोन वेगवेगळ्या राजकीय व्यक्तिरे खा आहे त.

केळदी नायक घराण्याचा पूर्वइतिहास :

इंग्रजीत नायक या शब्दाची व्याख्या, ‘ Nayak means title or he should be a mediator to the

king and people.’ दक्षिणेत जहागिरदाराला नायक हा पर्यायी शब्द असून कन्नडमध्ये त्याला Nayaka,
2
तेलगूत Nayakas तर तमिळमध्ये Nayakattan म्हटले जाते. विजयनगर साम्राज्याचा नायक राहिलेला

चदप्पा ( Chaddappa ) हा केळदी येथील नायक घराण्याचा संस्थापक असून तो पल्लीयावालू

गावचा रहिवाशी होता. इ. स. 1499 – 1500 मध्ये चदप्पाने केळदी याठिकाणी आपली कारकिर्द सरू

केली, त्यानंतर इ. स. 1512 साली आपली राजधानी इक्केरीला हलविली. पढ


ु े या घराण्याची राजधानी

बेदनरू म्हणजे सध्याचे नगर ( ता. नगर जि. शिमोगा ) येथे राहिलीतरी या घराण्याला केळदीचे

नायक म्हणूनच ओळखले जाते. तरी काही ठिकाणी केळदीचे, इक्केरीचे तर काहीजण याला बेदनूरचे

नायक म्हणूनही संबोधतात. इ.स. 1500 ते 1763 असा 263 वर्षे स्वतं:त्रपणे राज्यकारभार करणार्‍या

या नायक घराण्यात पुढीलप्रमाणे 17 नायक होऊन गेले. चद्दाप्पा नायक ( 1500 ते 1530 ),

1
सदाशिव आणि डोद्दा नायक ( 1530 ते 1570 ), चिक्क संकन्ना नायक ( 1570 ते 1580 ),

रामराजा नायक ( 1580 ते 85 ), व्यंकटप्पा नायक ( 1585 ते 1629), विरभद्र नायक ( 1629 ते

1644 ), शिवप्पा नायक ( 1644 ते 60 ) व्यंकटप्पा नायक दस


ु रा ( 1660 ते 61), भद्रप्पा नायक

( 1661 ते 64 ), सोमशेखर नायक ( 1664 ते 72 ), राणी चन्नाम्मा ( 1672 ते 1697 ), बसप्पा

नायक ( 1697 ते 1713 ), सोमशेखर दस


ु रा नायक ( 1713 ते 39 ), बस्साप्पा दस
ु रा नायक

( 1739 ते 1754 ), चन्नबसप्पा नायक ( 1754 – 57 ) व राणी वीरमाजी ( 1757 ते 1763 )

3
शेवटी 1763 साली म्है सूरच्या है दरअलीने केळदीचे राज्य बुडवून टाकले.

त्यानुसार केळदी किं वा बेदनुरचे नायक घराणे हे वीरशैव लिंगायत असून चन्नम्मा या तेथून

जवळच असलेल्या कंु दापरू ( ता. कंु दापूर जि. उडप्पी ) या गावचा रहिवासी असलेल्या व्यापारी

सिद्दप्पा शेट्टीची मुलगी असून त्यांचा विवाह केळदी नायक सोमशेखर नायकासोबत झाला होता.

राणी चन्नम्मा

मुळचा राजकीय पिंड नसलेल्या राणी चन्नम्मा यांनी लग्नानंतर सोमशेखर नायकाच्या

4
राज्यकारभारात सहाय्यक म्हणून लक्ष घालण्यास सुरुवात केली. पुढे 1671 साली सोमशेखर

नायकाचा खन
ू झाल्यानंतर राणी चन्नम्माने भुवनगिरीदर्ग
ु याठिकाणी आपला राज्यारोहण समारं भ

पार पाडून प्रत्यक्षपणे राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. अशारितीने 1671 ते 1697 याप्रमाणे

जवळपास 26 वर्षे राणीने राज्यकारभार केला. या राणीची ओळख केळदीच्या राणी चन्नम्मा याप्रमाणे

असलीतरी त्यांची राजधानी ही बेदनरू याठिकाणी राहिल्याने मराठ्यांच्या इतिहासात त्यांना बेदनरू ची

राणी म्हटले जाते.

केळदीचे साम्राज्य हे आदिलशाही, कुतुबशाही, डच, पोर्तुगीज तसेच शेजारील पाळे गारासोबत

नेहमीच संघर्ष करत आलेले होते. शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहीकडे जहागीरदार म्हणून रहात

असलेतरी अंतर्गतपणे त्या परिसरातील पाळे गारांबाबत एक हिंद ू म्हणून त्यांनी नेहमीच सामंजशाची

भूमिका घेतल्याचे दिसून येते. तरीपण आदिलशाहाला हे पाळीकर नको होते . म्हणून 1663 साली

2
4
आदिलशाही फौजेने जेव्हा केळदीच्या नायकावर आक्रमण केले, तेव्हा भद्राप्पा नायकाचा पराभव

झालेला असतानाही नायकाचे राज्य बुडू न दे ता बहलोल खान सोबत असतांनाही शहाजीराजांनी

मध्यस्ती करून तडजोड करायला लावून केळदीच्या नायकाला अभयदान दे ण्याचे काम केले होते.

याशिवाय फेब्रुवारी 1665 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातील सर्वात

5
मोठी नाविक कारवाई म्हणजे बसरूर स्वारी हाती घेतली. यावेळी महाराजांनी 85 गलबतांचा वापर

केला होता. महाराजांचा दरारा एवढा भयानक होता की, डच, पोर्तुगीजासह त्या भागातील पाळे गार

पुर्णपणे दहशतीत होते. यावेळेला केळदीचा शिवप्पा नायकही घाबरून महाराजांना शरण गेला. त्यावेळी

राजेंना त्यांनी भरजरी पोशाख, जडजवाहीर, लाख रुपये नगद नजराणा आणि वार्षिक 3 लाख रुपये

6
खंडणी दे ण्याचे कबुल केले. त्यामुळे मराठ्यांचा वकील उमाजीपंत बेदानुरात ठे वला. अशाप्रकारचा

उल्लेख आपणास चिटणीस बखरीत सापडतो. ( वास्तविक पाहता केळदीचा नायक म्हणून यावेळी

राणी चन्नम्माचे पती सोमशेखर नायक हे काम पहात असल्याने बखरीत आलेले नाव चुकीचे आहे . )

एवढे च नाहीतर ज्यावेळी राणीचे पती सोमशेखर नायकाचा खन


ू झाल्यानंतर राणी चन्नम्माने

केळदीचा कारभार हाती घेतला तेव्हा म्है सूरच्या वडियर नायकाने केळदीवर आक्रमण केले. त्याचवेळी

राणीचा दिवाण तिम्मय्याने बंडखोरी करून राज्य उलथून टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या,तेव्हा

7
छत्रपती शिवरायांनी राणी चन्नम्माला उघडपणे मदत केल्याने पुन्हा एकदा केळदीचे साम्राज्य वाचले.

साहजिकच शहाजीराजापासूनच भोसले घराण्याचा केळदी नायकावर स्नेह होता असे दिसून येते.

याबाबत शिवरायांच्या मनात केळदीचा स्नेहभाव वर्णन करताना डच डायरीचा संदर्भ दे वून शिवरायांचे
8
भाव याप्रमाणे व्यक्त केलेले आहे त, “ Siwaji ( Shivaji ) is very loved and honored here.”

साहजिकच छत्रपतींनी केळदीच्या नायकांना डच, पोर्तुगीज, आदिलशाही यासारख्या शत्रप


ू ासून संरक्षण

दे त आपल्या हिंदवी स्वराज्य संकल्पनेला एकप्रकारचे बळकटी दिली होती. त्यामुळेच राणी चन्नम्माचे

साम्राज्य कर्नाटकातील दक्षिण कनडा, शिमोगा. चिकमंगलोर, हसन आणि धारवाड या जिल्ह्यात
9
पसरलेले होते.

3
राणी चन्नम्माचे छत्रपती राजारामाला अभयदान

राणी चन्नम्माच्या आयष्ु यातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी शिवरायांचे

धाकटे पत्र
ु छत्रपती राजाराम महाराजांना औरं गजेबाच्या विरोधात उघडपणे केलेली मदत होय. 11

मार्च 1689 ला औरं गजेबाने छत्रपती संभाजीराजांची हत्या केली आणि रायगड ताब्यात घेतला.

मराठ्यांचे साम्राज्य बुडविण्यासाठी मोगली फौजांनी सर्वत्र थैमान घातले होते. अशावेळी स्वराज्याची

राजधानी दरू हलविणे गरजेचे मानून छत्रपती राजारामांनी जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्यासोबत संताजी आणि बहिर्जी घोरपडे, कान्होजी नाईक पानसंबळ, प्रल्हाद निराजी, निलखंठ
10
मोरे श्वर, कृष्णाजी अनंत सभासद, बाजी खंडोजी कदम , मानाजी मोरे , रूपाजी भोसले, संताजी

जगताप, खंडो बल्लाळसह 300 लोकांचा जमाव होता.

राजारामांनी पन्हाळ्यावर नवरात्रीची पज


ु ाअर्चा केली आणि सप्टें बर 1689 ला गोकाक, सौदं ती,

गदग, लक्ष्मीश्वर असा जिंजीचा रस्ता धरला. यावेळी महाराजांनी लिंगायताचा पोशाख ( पांढरा शर्ट,
11
धोतर आणि पांढरा फेटा )परिधान करून आपण रामेश्वराच्या यात्रेला जात असल्याचे सांगत होते.

प्रवास करत करत राजाराम महाराज बेदनूरच्या हद्दीतील तुंगभद्रा नदीच्या हिरा बेटावर पोहोचले . काही

इतिहासकाराच्या मते महाराज होन्नाली जि. शिमोगा याठिकाणी थांबले. धर्मशाळा, मठ अशाठिकाणी

थांबत महाराज पुढे जात होते. राणीच्या गुप्तहे रांनी बातमी आणली की, आपल्या धर्मशाळे त काही

यात्रेकरू थांबलेले असून ते सकाळी आपल्यातील एकाची हातपाय धुवून पूजा करतात.

तिकडे रायगडापासन
ू च औरं गजेबाची फौज राजेंच्या पाठलागावर होती. मासिरे आलमगिरीतील

नोंदीनस
ु ार बादशहाने राजारामाला पकडण्यासाठी अब्दल्
ु लाखानाची नियक्
ु ती केली होती. त्यानस
ु ार तीन

दिवस आणि तीन रात्रीची दौड करत तो बेदनरू हद्दीत पोहोचला. आणि त्याने जरा किं वा हिरा नामक

बेटावर हल्ला चढविला. संताजी आणि बहिर्जी घोरपडे, रूपाजी भोसले आदिनी खानाचा जोरदार

मुकाबला केला. ती संधी साधून राजाराम महाराजांनी राणी चन्नम्माशी संधान साधून आपली शस्त्रे,

वस्त्रे, पागोटे , पादत्राणे तेथेच टाकून तेथून पलायन केले . राणीची इकडे आड, तिकडे विहीर अशी

4
अवस्था असताना मोठ्या धाडसाने त्यांनी राजारामाला अभय दे वून एका गुप्त जागेत लपवन
ू ठे वले .
12
बादशहाने याचे खापर खानावर फोडले.

त्यानस
ु ार राजाराम महाराजांची ओळख पटल्यानंतर राणीने सन्मानपर्व
ू क त्यांचे स्वागत करून

त्यांची गप्ु तपणे राहण्याची व्यवस्था “ आरमाने कोप्पा ” येथील अतिशय भक्कम आणि सरु क्षित

असणार्‍या वाड्यात केली. तो परिसर अतिशय घनदाट जंगलाचा आणि वाडा म्हणजे अनेक तळघरे व

चोरवाटांमुळे शत्रल
ू ा गोंधळात टाकणारा होता. काहीकाळ महाराज बेदनरू येथील “ शिवप्पा नायकाच्या

महालात” ही थांबले होते.

औरं गजेबाने खानाची फजिती करत दस


ु र्‍या बाजन
ू े खान मतलबखान आणि सर्जाखान यांची

नियक्
ु ती केलेली होती. संताजीने त्यांना जंगलातील एका आडवळणात गाठून त्यांचा धव्ु वा उडविला.

बादशहाने गोव्याचा व्हॉईसरॉय दों रुद्रिगो द कॉरत याला तंबी दिल्याने तो शांत राहिला तर

ताराबाईकालीन कागदपत्रात “ राजारामाला आश्रय दिल्याबद्दल मोगलांनी खद्द


ु शाहजादा कामबक्षने

केळदीवर स्वारी केली. त्यावेळी राणीने तह करून 3 किल्ले आणि 18 लक्ष पगोडा दे ण्याचे कबूल

13
करत मोगालाशी तह घडवन
ू आणला.” अशारितीने बेदंनुरच्या राणी चन्नम्माने राजरामाला अभय

दे वून स्वराज्य टिकविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच ते पुढे जिंजीला सुखरूपपणे पोहोचून

तेथूनच त्यांनी स्वराज्याचा गाडा चालविला. छत्रपतींना मदत केल्याची फार मोठी किं मत राणीला

चुकवावी लागलीतरी अखंड हिंदस्


ु थानात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या शिवरायांच्या छाव्याला

आपण काही मदत करू शकलो याचेच राणीला मोठे समाधान होते. राणीच्या शौर्याची दखल

औरं गजेबनामाच्या एका वत्ृ तानेही घेतली असून त्यातील उल्लेख याप्रमाणे “ राणी बहुतसा जुर्मांना

अपने जिम्मे लेकर बादशाही लश्कर की मारधाडसे बच गई, क्योंकी उसका नाम दनि
ु या में कुछ
14
अरसेतक बाकी रहनेवाला था”

थोडे स्थिरस्थावर झाल्यावर राणीने या पराक्रमाची नोंद कायम राहावी म्हणून केलदी येथील

5
विरभद्र मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपतीं शिवरायांचे घोड्यावर बसलेले एक शिल्प कोरून मंदिरात

प्रवेश करताना शिल्पाखालून जावे अशी योजना केली, ज्यायोगे त्यांना ‘महाराज आपण आहात म्हणून

हिंदच
ू े दे वधर्म शिल्लक आहे त हे च सूचित करावयाचे आहे .’

सोबतच मंदिराबाहे र राणीने एक भला मोठा विजयस्तंभ उभा करून त्यावर वरच्या बाजूला

गणपतीचे शिल्प कोरून त्याखालच्या शिल्पात राणी चन्नम्मा उभा असून त्यांच्या डाव्या हाताला

छत्रपती राजाराम महाराज मराठी पोषाखात उभे आहे त. राजेंच्या शेजारी धर्मदं ड घेऊन त्यांचा सेवक

उभा आहे , तर राणीच्या उजव्या बाजूला दोन स्त्री सेवक कोरलेल्या आहे त. यातून राणी चन्नम्माच्या

मनातील मराठा साम्राज्याप्रती असणार्‍या भावना ध्यानात येतात. यासोबतच बेदनरू येथील

नीलकंठे श्वर मंदीराशेजारी पार्वती मंदिर असून त्याचे बांधकाम राजाराम महाराजांच्या विंनंतीवरूनच

पूर्ण करण्यात आलेले आहे . याकरिता राजरामांनी काही दानपत्रेही दिलेली होती. राणी चन्नम्माला

पार्वतीच्या ठिकाणी पाहून महाराजांनी त्यांच्याप्रती केलेली ही उतराई आहे . खुद्द चन्नम्मा या
15
धार्मिकवत्ृ तीच्या असून त्यांनी शंग
ृ ेरीमठ, तिरूपती, रामेश्वर, श्रीशैल इत्यादि ठिकाणी मठ उभे

करून यात्रेकरूंची सेवा केली.

आजचा चन्नगिरी तालुका आणि तेथील चन्नगिरी किल्ला याच राणीच्या नावाने प्रचलित

झाला आहे . तर केळदीच्या राणी चन्नम्मा सोमशेखर नायक या मराठ्यांच्या इतिहासात वेगळे स्थान

निर्माण करून गेल्या. राणीला मुलबाळ नसल्याने त्यांनी नात्यातील बसप्पा नायकाला दत्तक घेऊन

केळदीच्या गादीवर बसविले. अतिशय कष्टमय परं तु दै दीप्यमान कारकिर्द गाजविणार्‍या या राणीने

जुलै 1698 साली आपला दे ह ठे वला.

कर्नाटक सरकारने दरवर्षी राणी चन्नम्मा शौर्य परु स्कार दे वन


ू आणि ठिकठिकाणी त्यांचे

पुतळे उभे करून राणी चन्नम्माचा गौरव केला आहे . महाराष्ट्राचा इतिहास आज त्यांना काहींसा

विसरला असलातरी त्यांनी कोरलेल्या छत्रपतींच्या शिल्पामुळे त्या इतिहास अभ्यासकाच्या मनावर

कायम राज्य करतात.

6
संदर्भग्रंथ सूची

1. जोशी लक्ष्मणशास्त्री संपा. विश्वकोश खंड 8, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक

मंडळ, मुंबई, 1965.

2. Yogeshwarappa, Minor Research project, UGC New Delhi, Shri


Sidhganga College, Tumkur, Karnataka

3. Lennart Pieter Jacques Bes ( Netherland), The Heirs of Vijayanagar


Court politics in early – modern south India, Doctoral Thesis, Radboud
University, Nijmegen, Netherland, 2018 P. 94

4. The Chief Editor, Karnataka State Gazetteer Department, Uttar


Kannada dist, Government of Karnataka, 1982, P. 143

5. बेंद्रे वा. सी. श्री छत्रपती शिवाजीमहाराज, पर्वा


ू र्ध, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, 2013,

प.ृ 430

6. केळूसकर कृष्णराव, क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, मनोरं जन

छापखाना, मुंबई, 1920, प.ृ 245

7. हे रवाडकर र. वि. संपा. श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरात्मक चरित्र ( सभासद बखर )

व्हिनस प्रकाशन, पुणे, 2002, प.ृ 92

8. बेंद्रे वा. सी. उपरोक्त, प.ृ 432

9. Proceeding of the Indian History congress, Volume 59 ( 1998), P.P.


1021

7
10. बेंद्रे वा. सी. संपा. केशव पंडीतकृत छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र, भा. ई. सं.

मंडळ, स्वीय ग्रंथमाला, पुणे, शके 1853, प.ृ 19

11. kale V. C. Jinjias or Chhatrapati Rajaram Maharaj, V. C. Kale,


Belagaum, 1933, P. 54

12. पगडी सेतुमाधवराव संपा. ( मासिरे आलमगिरी ) मराठे व औरं गजेब, ज्ञानराज प्रकाशन,

पुणे, 1963, प.ृ 44.

13. पवार आप्पासाहे ब संपा. ताराबाईकालीन कागदपत्रे, खंड पहिला, कुलसचिव, शिवाजी

विद्यापीठ, कोल्हापरू , 1969, प.ृ 59

14. खेतराम श्रीकृष्णदास संपा. औरं गजेबनामा भाग तिसरा, श्री वेंकटे श्वर मुद्रणालय, मुंबई,

शके 1835, प.ृ 70

15. जोशी लक्ष्मणशास्त्री संपा. विश्वकोश खंड 5, उपरोक्त

XXX

You might also like