बांगर वाडी

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

// श्री विठ्ठल रुख्मिणी प्रसन्न //

आपणास कळविण्यात आनंद होतो कि,

सालाबादप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री गुप्त विठोबा दे वस्थान बांगरवाडी बेल्हे येथे शुक्रवार
दि. १५ जुलै २०१६ रोजी आषाढी एकादशी यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. सकाळी ५.३० वा. महापूजा
सकाळी ८.०० ते संध्याकाळपर्यंत खिचडी महाप्रसाद, दुपारी १२.०० ते २.०० पर्यंत दिंड्यांचे आगमन, तसेच दिवसभर पुणे,
नगर, नाशिक , मुंबई ठाणे या भागातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

तरी आपणास श्री. गुप्त विठोबा दे वस्थान बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री. गुप्त विठोबा दर्शनासाठी निमंत्रित
करण्यात येत आहे.

आपले नम्र

श्री. गुप्त विठोबा दे वस्थान बांगरवाडी बेल्हे

जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर

बांगरवाडी स्वयंभू गुप्त विठोबा मंदिर

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागामध्ये सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम रांगांमध्ये वसलेले बांगरवाडी हे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले
छोटे से खेडेगाव बांगरवाडी तालुक्यातील सीताफळाच्या

उत्पन्नामध्ये अग्रेसर आहे. रानातील सिताफळे असलेली गोड फळे लाखो रुपयाची उलाढाल गावामध्ये करून दे तात.

बांगरवाडी हे गाव बांधुदा, कुरुं दा, दुधवडी व बाळे श्वर डोंगराच्यामध्ये वसलेले निसर्गरम्य आहे. गावामध्ये पाच दे वतांच्या
यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात .श्रावण महिन्यात मुक्ताई व दावालशीबाबा यात्रा, माघ महिन्यात कुलस्वामिनी
रानदे वी मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह गणेश उत्सवामध्ये थडगेश्वर गणेशमंदिर येथे वैष्णव मेळावा, विजया दशमीला श्री
येमाईदे वी यात्रा आणि आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जुन्नर तालुक्यातील प्रती पंढरपूर असलेले श्री स्वयंभू गुप्त विठोबा
भव्य दिव्य अशी यात्रा विठ्ठल रुख्मिणी सेवा मंडळ व बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने साजरी होते.

सन १९१७ साली एक गुराखी भाविकाला पांडुरंगाने दृष्टांत दिला. त्यावेळी बांगरवाडी आणि गुळुंचवाडी ग्रामस्थांनी त्या
ठिकाणी उत्खणन करण्याचे ठरविले. मुहूर्त ठरला गुफेच्या आजूबाजूला पूर्ण खडक होता गुफेच्या तोंडाजवळ फक्त माती होती.
खणल्यानंतर खाली १० बाय १५ फुट रुं दीची गुफा दिसून आली तिला ९ पायऱ्या दगडी खांब आढळले. आतमध्ये ४ बाय ४
ची छोटी गुफा आढळली त्यामध्ये विठ्ठल रुख्मिणी स्वयंभू बुक्क्याच्या मूर्ती आढळल्या पण त्या मूर्ती वातावरणाने खराब
झाल्या. १९२१ साली प्रसिद्ध मूर्तिकार कै. कृष्णा भागवत यांनी ग्रामस्थ भाविकांच्या सहकार्यातून मूर्तीची स्थापना केली.

या भुयारी मंदिराच्या वर पण मंदिर असावे म्हणून दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एक येऊन मंदिर बांधण्याच्या निर्णय घेतला
१९५२ साली मंदिराचे काम चालू केले पण काही कारणास्तव काम अपूर्ण राहिले. अर्धवट काम १९६४ साली प्रसिद्ध मूर्तिकार
व शिल्पकार श्री.शामकांत भागवत यांच्या सहकार्याने पूर्ण केले आणि वरच्या मंदिरात दे खील मूर्तीची स्थापना केली सध्या
भुयारी मंदिर व वरचे मंदिर अशा दोन्ही ठिकाणी मूर्ती आहे असा हा बांगरवाडी स्वयंभू गुप्त विठोबा तालुक्यात जागृत
दे वस्थान म्हणून ओळखले जाते. दे वाची दररोज पूजा अर्चा विठ्ठल रुख्मिणी मंडळाच्या व ग्रामस्थांच्या वतीने केली जाते. मंदीर
बेल्हे गावापासून उत्तरेला सहा कि.मी. वर आहे. बांगरवाडी गाव व मंदिर परिसर धार्मिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ म्हणून
उदयास येत आहे. गुप्त विठोबा मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. हे दऱ्याखोऱ्यातील खडकामध्ये गुहम
े ध्ये वसलेले
आहे.

💐💐💐 *प्रतिपंढरपूर* 💐💐💐

निसर्गाने नटलेले गाव

तिथे वाहतो *विठु रायाचा* भक्तिभाव

जशी जशी जवळ येती *आषाढी एकादशी*

तशी भक्तांना ओढ लागते प्रत्येक दिवशी

*बांगरवाडी* आमुचे सुंदर असे गाव

नित्यनियमाने जपती *विठु रायाचे* नाव

विठू भगवंतालाही लागला ह्या गावचा लळा

आख्खा *जुन्नरही* येई पाहाया हा सोहळा

विठ्ठल विठ्ठल नामाचा होई येथे गजर

अशी *बांगरवाडी* आमची ना लागो तिस नजर

काय घडले या गावी जो तो विचारी

अरे प्रकटला येथे आमुचा *सावळा श्रीहरी*

सांगतो तुम्हा का लागला *विठ्ठला* लळा

का होतो येथे असा भव्य सोहळा ..

जसे *पुड
ं लिक* निमित्त अवघ्या जगाचा वारकरी..

तसे *गुराख्यास* स्वप्नी दिसे *सावळा श्रीहरी*


जाग येती गुराख्यास त्याने जागे केले गाव

झाला असा महिमा की *प्रतिपंढरपूर* पडले नाव

उधळला चौफेर भक्तीचा *अभिर रंग*

गाभाऱ्यात अवतरले *रुक्मिणी पांडुरंग*

दर्शन झाले *विठ्ठला* तुझे आता

घे सांभाळू न भोळ्या भक्तांना पायी ठे वतो माथा ..

पांडुरंगा तुझ्या भक्ताचा झरा असाच वाहूदे

माझ्या *बांगरवाडी* गावच्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहूदे ....

✒✒ *सतीश अनंता रोकडे*✒✒

*🌼सस्नेह निमंत्रण🌼*

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि,सालाबाद प्रमाणे *सोमवार* दिनांक *२३/०७/२०१८* रोजी

*श्री क्षेत्र गुप्त विठोबा दे वस्थान बांगरवाडी* येथील *आषाढी एकादशी सोहळा* मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे तरी आपली
उपस्थिती मोलाची आहे...🙏🏻🙏🏻

🌸आपले नम्र🌸

*💥विठ्ठल-रुख्मिणी सेवा मंडळ, बांगरवाडी💥*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2096094007312033&id=1525924277662345
तळे

You might also like