लेख (पालकनीती)

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 10

Tiny Tales: गोष्टी आणि नाटकाचा प्रवास Or प्रवास Or बालसाहित्य आणि नाटक Or गोष्टींची गोष्ट

आम्ही गे ली ३ वर्ष सातत्याने Tiny Tales या आमच्या प्रकल्पाच्या अं तर्गत लहान मु लांसाठी लिहीली गे लेली
पु स्तकं, गोष्टी/बालसाहित्य नाटकाच्या माध्यमातून मु लांपर्यं त पोहोचवण्याचं काम करतो. साधारणपणे १ली ते
७वी पर्यंतच्या मुलांसोबत आम्ही काम करतो.

त्यांचा वयोगट, त्यांची आकलनक्षमता, त्या-त्या वयोगटानुसार त्यांना पडणारे प्रश्न या सगळ्याचा अभ्यास
करून ही पुस्तकं आम्ही निवडतो आणि नाटकाच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवतो.

यामार्फ त गोष्टी, पु स्तकं, शब्द, चित्र यांची दुनिया मु लांपर्यं त पोहोचतात.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग


ु , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, वर्धा, नागपरू , अहमदनगर, औरं गाबाद,
अहमदनगर, मुंबई उपनगर, पालघर या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आम्ही आत्तापर्यंत काम केलंय, करत
आहोत. या सगळ्या प्रयोगांमधून आम्ही जवळपास ५४,००० मु लांपर्यं त पोहोचलोय.

आम्ही मु लांसमोर, त्यां च्या जागे त, गावागावात फिरून नाटक करतो.

आमच्या या नाटकाला आम्हाला स्टे ज, लाईट्स, मोठ्या जागा असं काही लागतच असं नाही एखाद्या
झाडाखाली, अंगणात, शाळे च्या वर्गात असं कुठे ही हे नाटक उभं राहू शकतं.

आधी काही खेळ, मग गोष्टीचं सादरीकरण आणि त्यानंतर गोष्टीवरची ऍक्टिव्हिटी असा कार्यक्रम
झाल्यावर आम्ही मुलांना ज्या गोष्टीवर नाटक सादर केलं त्याचं पुस्तक दाखवतो.

आत्तापर्यंत नाटक बघताना आपण जी मजा केली, हसलो, त्यातल्या पात्रांची गंमत अनुभवली ती सगळी
गोष्ट, पात्र या पुस्तकातली होती हे मुलांना समजू लागतं.

गोष्टीदरम्यानचा मिळालेला आनंद आणि पुस्तक याचं नातं जोडण्याचा, सांगड घालण्याचा या
प्रयोगादरम्यान प्रयत्न करतो आणि मग मल
ु ं धावत पस्
ु तकांकडे जातात. चित्र, नवे शब्द, नाटकात
बघितलेली पात्र त्यांना पुस्तकात शोधायची असतात.

यातन
ू च मल
ु ांसाठी शब्दांचं, चित्रांचं नवं जग खल
ु ं होण्याचा नवा प्रवास सरू
ु होतो.

या सगळ्याची सरू
ु वात झाली ललित कला केंद्रातन
ू नाट्यशास्राची पदवी घेतल्यानंतर.

ललित कला केंद्रात शेवटच्या वर्षाला असताना क्वे स्ट सं स्थे तर्फे दिल्या जाणाऱ्या “गोष्टरं ग” फेलोशिपबद्दल
कळालं . वर्षभर नाटकाच्या माध्यमातन
ू लहान मल
ु ांसोबत काम करायचं असं साधारण त्याचं स्वरूप होतं. आम्ही
अगदी याआधी कधीच लहान मुलांसोबत काम केलं नव्हतं. यांच्यासोबत काम करायचं म्हणजे नेमकं काय, हे सुध्दा
तसं माहिती नव्हतं. पण ही फेलोशिप मिळाली आणि लहान मुलांसोबतचा एक नवीनच प्रवास सुरू झाला.

'बालसाहित्य' नावाचं काहीतरी असतं याची अगदी पहिली जाणीव क्वेस्टमुळे झाली. हे बालसाहित्य इतकं महत्वाचं
असन
ू ही आपल्या समजात इतकं दर्ल
ु क्षित का? या प्रश्नाकडे आम्ही वळालो.

लहान मुलं, त्यांच्यासाठीच्या गोष्टी, शिक्षण आणि इतके वर्ष शिकलेलं नाटक या सगळ्यांकडे अगदी नव्याने
बघण्याचा दृष्टीकोन निलेश निमकर आणि क्वेस्टमळ
ु े मिळत होता, आम्ही घडत होतो, बदलत होतो.

सरू
ु वातीला आम्हाला मल
ु ांसोबत बोलणं, समजन
ू घेणं जमतच नव्हतं पण निलेश निमकर या कमाल माणसाने
गणितच्या माध्यमातून मुलांसोबत कसं काम करायचं हे शिकवलं. गणित अनेक जणांसारखा आमचाही
नावडताच विषय होता. 'जो विषय आवडत नाही त्यापासूनच आपण भरपरू शिकूया' असा सरांनी फतवा
काढला आणि दस
ु ऱ्या दिवशीपासून वही घेऊन आम्हाला बोलावलं.

सुरूवातीला आम्हाला काही कळत नव्हतं पण हळूहळू निलेश सरांनी आमची गाडी रूळावर आणली.

एखादं गणित सुटल्यामुळे झालेला आनंद, सरांच्या भाषेत 'आहा मोव्हमें ट' मुलांच्या आयुष्यात किती
गरजेचा असतो हे सरांनी काही कोडी टाकून आम्हाला समजावलं. बऱ्याचदा आपण सगळं रे डीमेड मुलांसमोर
आणन
ू ठे वतो, त्यापेक्षा त्यांना प्रयत्न करूदे , चक
ु ू दे मग त्यांनाही आहा मोव्हमें ट सापडेल आणि त्यासाठी
सरांनी दिलेलं प्रोत्साहन, आपल्या उत्तरावर ठाम होण्यासाठी कधी कधी मुद्दाम तयार केलेलं confusion हे
सगळं भरपूर शिकवणारं होतं. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दे णं, त्यांच्यावर विश्वास ठे वणं, त्यांना
वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याची मभ
ु ा दे णं अशा कितीतरी गोष्टी चक्क गणिताच्या माध्यमातन
ू आम्ही
शिकलो.

पुर्वग्रह बाजूला पडून नव्या वाटा सरांनी तयार केल्या आणि खरं तर तिथून आमच्या कामाला, विचारांना एक
वेगळं वळण मिळालं.

या फेलोशिप दरम्यान आम्ही वर्षभर आदिवासी पाड्यात राहन


ू लहान मु लांसोबत गोष्टी आणि पु स्तकां च्या
माध्यमातून त्यांची भाषा, शिक्षण यासाठी काम केलं . यादरम्यान काम करत असताना या लहान मु लांसाठी तयार
केले ल्या गोष्टीतून त्यांना मिळणारा आनं द, मु लांमधले बदल, त्यांचे कुतूहलाने भरले ले विचार अगदी जवळू न जाणून
घे ता आले .

फेलोशिप संपता-संपता आता पुढे काय? हा प्रश्न डोकावू लागला. ललित कला केंद्रात शिकल्यामुळे पुन्हा मुंबईला
जाणं, सिरीयल करणं अगदीच शक्य होतं, पण या एक वर्षातला नाटक, मुलांचा अनुभव सतत डोकं वर काढून येत
होता. भरपरू विचार करून, खरं तर मोठं धाडस करून आपण हे काम पुढे चालू ठे वावं असा निर्णय घेतला. आम्ही
अजिबात तेव्हा या निर्णयावर ठाम नव्हतो पण, क्वेस्टमध्ये या सगळ्या मु लांसोबत काम करताना आले ला अनु भव
एका भागापूरता मर्यादित न राहता सगळ्या मु लांपर्यं त पोहोचावावा असं खूप मनापासून वाटत होतं.

त्यातूनच Tiny Tales ची सु रुवात झाली.

या सगळ्यात Tiny Tales का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हळूहळू प्रवासात मिळत गेलं. आपल्या महाराष्ट्रात
एकूण ३६ जिल्हे आहे त. यात बरे चसे आदिवासी पाडे, दर्ग
ु म विभाग, नक्षलवादी भाग आहे त.

बऱ्याचदा असं दिसून येतं की, आदिवासी किं वा इतर दर्ग


ु म भागातली मुलांची 'बोलीभाषा' आणि शाळांमध्ये
'प्रमाण समजली जाणारी भाषा' यांमध्ये खूप फरक असतो. कित्येक घरातली मुले म्हणजे त्या घरातली
लिहायला, वाचायला शिकणारी पहिलीच पिढी असते. बऱ्याच गावांमध्ये अजूनही एखादी नाव लिहीलेली
पाटी, पेपर असं काहीच दिसत नाही.

अशा वे ळेस लहान मु लांचा विचार करून, खास त्यां च्याचसाठी लिहीली गे लेली पु स्तकं, गोष्टी त्यां च्यापर्यं त
पोहोचवल्या तर त्यातली गं मत त्यांना कळते आणि नाटकातून त्यांना भाषे चा, चित्रांचा जिवं त अनु भव मिळतो.
असा जिवंत अनुभव मुलांच्या मनात भाषेबद्दल, पुस्तकांबद्दल प्रेम निर्माण करतोच पण त्याचबरोबर
आकलनक्षमतेचाही विकास करतो.

कुठलीही गोष्ट वाचण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा ती बघितल्यावर मल


ु ांच्या जास्त लक्षात राहते. लक्षात
राहण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाची गरज असते आणि हा अनुभव आम्ही आमच्या गोष्टींमार्फ त दे ण्याचा
प्रयत्न करतो.

यात नाटक बघून आनं द, मनोरं जन तर होतं च पण सोबत ऐकणं , बघणं आणि अनु भवणं या क्रियासु ध्दा घडत
असतात. गोष्टीदरम्यान मु लांना आपोआप शब्द दृष्यरूपात दिसतात.

मुलांना जर त्यांच्या वयाचं, त्यांच्या भावविश्वाचं साहित्य वाचायला दिलं तर त्यातून मनोरं जनासोबतच
त्यांच्या भाषेचा आपोआप विकास होईल असं आम्हाला वाटतं.

मुले अगदी लहान असल्यापासून गोष्टी ऐकतच मोठी होत असतात. कुणीतरी सांगितलेली ही गोष्ट मुलांना
ऐकून माहित असते. पण, पस्
ु तकात ही गोष्ट लिहलेली असते. ती पढ
ु े स्वत:ला एकटयाने वाचन
ू त्यातला
आनंद घेता येतो हे मुलांना हळूहळू समजत जातं.

या सगळ्या नाटकानंतर मुलं जेव्हा पुस्तकं पाहतात तेव्हा लिहलेली गोष्ट टिकून राहते.ती पुन्हा पुन्हा, हवे
त्यावेळी वाचता येते , कुणीतरी जशीच्या तशी वाचून दाखवू शकते ही गोष्ट मुलांना समजते आणि त्यांना
लेखी भाषेचा उपयोग कळतो. तोंडी भाषा आणि लेखी भाषा यांच्यातला संबंध लक्षात यायला मदत होते.
पस्
ु तके वाचन
ू दाखवल्याने लेखी भाषेची काही वैशिष्टये समजतात. जसे की आपण मराठीतील मजकूर
वाचत असतातना डावीकडून उजवीकडे वाचत जातो. दोन शब्दांमध्ये अंतर असते. वरची ओळ संपली
की,खाली पुन्हा डावीकडून उजवीकडे (Z आकारासारखे) जायचे इत्यादि.

हा अनु भव आपोआप त्यांना पु स्तकाकडे आणि मु ख्य म्हणजे भाषाशिक्षणाकडे वळवतो.

Tiny Tales सुरू केल्यानंतर सुरूवातीला लोकांना, शाळांना, शिक्षकांना आम्ही नेमकं काय करतो हे समजावून
सांगण्यात खूप वेळ गेला. या सगळ्यात पुन्हा एकदा लहान मुलांसाठीचं असं काही आपल्याइथे नाहीये, ते पोहोचलं
नाहीये याची प्रकर्षाने जाणीव झाली. या सगळ्यात आम्ही खचत होतो. पहिले २-३ महिने आम्ही अक्षरशः भटकत
होतो. काही लोक ऐकून घेत होते, तर काही नाही. 'आपण असंच फिरत राहीलो, कोणीतरी काम दे ईल असा विचार
करत राहीलो, तर कदाचित काम मिळणार नाही' असं आम्हाला वाटलं आणि आम्ही आमचा पहिला दौरा करायचं
ठरवलं.

पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातला काही भाग असा गोष्टी पोहोचवण्याचा दौरा आखला होता. निघताना हातात
अगदी मोजके प्रयोग आणि पैसे होते पण या दौऱ्यावरून परत येताना आम्ही २० पेक्षा जास्त प्रयोगातन
ू जवळपास
५००० मुलांपर्यंत पुस्तकं, गोष्टी पोहोचवल्या इथून आमची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

आजकाल लहान मुलांसाठी नाटकं होतात पण प्रत्येकालाच नाट्यगह


ृ ात जाऊन बघणं शक्य नसतं.

आम्ही गोष्टी घे ऊन जे व्हा गावागावात फिरतो ते व्हा ही गावं खूप आतमध्ये असतात, तिथे पर्यं त पोहोचणं जवळपास
अशक्य असतं . या प्रवासात आम्ही काही गावं अशी पाहिली जिथे अजूनही रस्ते नाहीत, लाईट नाहीत अगदी
बे सिक गरजांचासु ध्दा अभाव आहे . या अशा परिस्थितीत आम्ही कित्ये कदा चालत, डोंगर पार करत, ट् रॅक्टर,
बै लगाडी अगदी मिळे ल त्या वाहनांनी गावापर्यं त पोहोचावं लागतं .

हे सगळं करताना खप
ू वेगवेगळे अनभ
ु व आले. Tiny Tales चा प्रवास सु रू झाल्यावर आमच्यासाठी सादरीकरण ही
सहज करण्याची गोष्ट असली तरी अशा पद्धतीनं करणं हे नवीन होतं . आतापर्यं तच्या प्रेक्षकांपेक्षा हा छोटा प्रेक्षक
अधिक आव्हान दे णारा होता, कारण इथे फक्त नाटक करुन आमचं काम सं पणार नव्हतं , तर खरं काम तिथु न पु ढे सु रु
होणार होतं .

जसे प्रयोग होत होते , तसे सहजपणे सादरीकरण करण्याची कला आम्हाला गवसत होती. प्रत्ये क ठिकाणची मु लं
वे गळी, त्यांचा स्वभाव वे गळा. अगदी सु रूवातीला काही शाळांना जे व्हा भे ट दिली ते व्हा असं वाटलं की यांना काय
कळणार आपलं नाटक? पण जे व्हा प्रत्यक्ष प्रयोग आम्ही शाळे त केला ते व्हा धक्काच बसला. मु लांनी दिले ला
प्रतिसाद हा अनपे क्षित होता. असं ख्य प्रश्नांची उत्तर त्या प्रयोगाने मिळाली. गोष्ट का महत्वाची आहे हे कळालं .
माधुरी परु ं दरे म्हणतात त्याप्रमाणे, "पुस्तकं केवळ आपण न पाहिलेलं जग दाखवतात असं नव्हे , तर
आपण पाहत असलेलं ,ज्या जगामध्ये आपण असतो, ते जगही पाहायला आणि समजून घ्यायला
शिकवात"
हे अगदी ठासून सांगणारे अनेक अनुभव आम्हाला आले.

साधारणपणे ५वी ते ७वी च्या वयोगटासाठीची 'कपिलेने घेतला झोका' ही गोष्ट आम्ही सादर करतो.

युज्जा आणि टॉमस विसलँ ण्डर यांनी लिहीलेली ही गोष्ट, अगदी मार्मिकपणे, कुठे ही 'सल्ले किं वा बोजड
शब्द न वापरता', 'लिंगभेद' यावर भाष्य करते.

या गोष्टीत कावळा (यातील पुरूषाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र) आणि गाय (यातील स्रीचं प्रतिनिधित्व
करणारं पात्र) ही पात्र आहे त.

ही गोष्ट संपल्यानंतरच्या ऍक्टिव्हिटीत आम्ही मुलांना जेव्हा 'गायीसारखी किं वा कावळ्यासारखी वागणारी
पात्र तुम्हाला आजूबाजूला दिसतात का?' असा प्रश्न विचारतो, तेव्हा 'आई मला गायीसारखी वाटते, किं वा
मलापण गायीसारखं वेगळं काही करायला आवडेल' असे बरे च रिस्पॉन्स येतात. छोटी वाटत असली तरी
मुलं अशा पध्दतीने, त्यांच्या-त्यांच्या पातळीवर आजूबाजूला बघतात, त्याबद्दल विचार करतात ही फार मोठी
गोष्ट आहे यासारखी अजून बरीच उदाहरणं दे ता येतील.

जे अनुभव आपल्याला प्रत्यक्ष मिळत नाहीत ते गोष्टीतील पात्रादवारे आपण मिळवू शकतो. मुलांना
पुस्तकामुळे त्यांच्या भौगोलिक वर्तुळाबाहे रच्या अनेक गोष्टी समजतात. त्यांचा दृष्टीकोना व्यापक होते.
पस्
ु तकांचा आशय जर रोचक असेल तर मल
ु ांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो, पढ
ु े जावन
ू मल
ु ांचा
भावनिक विकास व्हायला मदत होते. मुलांना आपला संकुचीत दृष्टीकोन बाजुला ठे वून इतरांचा दृष्टीकोन
समजून घ्यायची प्रेरणा मिळते या गोष्टीही आम्हाला समजत गेल्या.

मजकूराप्रमाणे पुस्तकात चित्रदे खील असतात. लहान मुलांच्या पुस्तकांत मोठी, ठसठसीत, रं गीबेरंगी वेगवेळया
शैलीतील चित्र असतात, ती मुलांचे लक्ष वेधून घेतात आणि धरून ठे वतात. त्यांना चित्रांची भाषा समजते.
पुस्तकातली चित्रं पाहताना मुलं अगदी रं गन
ू जातात. अजून वाचताही न येणारी मुलं या चित्राच्या आधारानं
खेाटी खोटी पुस्तक वाचू लागतात, 'मला पुस्तक वाचता येतं' ही भावना त्यांना खूप आत्मविश्वास दे वून
जाते. चित्रांना स्वत:चा अर्थ दे ण्यातन
ू मुलाची चित्राबरोबर ओळख होते. चित्रं पाहून मुलं स्वत:चीच गोष्ट
तयार करतात. स्वत:च्या कल्पना या चित्राच्या मदतीने पढ
ु े घेवन
ू जातात, त्यातले तपशिल पाहण्यात हरवन

जातात. या चित्रांशी गप्पा मारायला मुलांना खूपच आवडतं, हे एक प्रकारचेच वाचनच आहे .

हे सगळं साध्य करायला नाटक हा एक प्राथमिक मार्ग आहे असं वाटतं. नाटकामुळे मिळणारा अनुभव,
पाहताना निर्माण होणाऱ्या भावभावना, पात्रांबद्दलची उत्सुकता, आकर्षक या सगळ्या गोष्टी हळूहळू मुलांना
पुस्तकाकडे वळवतात.
अगदी छोट्या गावांमधल्या शाळे तला अनु भव जरासा वे गळा असतो. त्यां च्या इतक्या जवळ, खास त्यां च्यासाठी
कोणी गे लेलं नसतं , त्यामु ळे सु रूवातीला मु लं बोलतच नाहीत आमच्याशी. आमच्या गोष्टींच्या विश्वात
आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, खे ळ घे तो. आम्ही कोण आहोत, काय करणार आहोत हे त्यांना हळू हळू माहीत
होतं . गोष्टी बघताना ती मोकळी होत होतात, हसतात. गोष्ट सं पल्यावर वर्गात जाताना काहीतरी वे गळं पाहिल्याचा
आनं द मात्र दिसत राहतो.

एकदा एका शाळे त वे गळाच अनु भव आला. सु ट्टया सं पवून मु लं शाळे त ये त होती. मु लं शाळे त आले की त्यांना
तिथे च रहावं लागतं . मग कधीतरी सु ट्टी मिळाली तरच घरी जायला मिळतं . एक आई तिच्या सात वर्षाच्या मु लाला
शाळे त सोडण्यासाठी आली होती. तो मु लगा रडत होता त्याला नको वाटत होतं शाळे त रहायला.त्याचं रडणं वाढलं
होतं . आई समजावत होती पण फायदा शु न्य. आईलाही मु लाला दुर ठे वणं आवडत नसावं पण तिच्या समोर पर्याय
नव्हता. आईच्याही डोळ्यात पाणी होतं . आम्ही गोष्टीची तयारी करत होतो तिथे ती आई मु लाला घे ऊन आली.
मु लगा जरावे ळ शांत झाला खरा पण आईचा पदर सोडायला तो काही तयार नव्हता. गोष्टी सु रु झाल्या. मु लं
ओरडत होती,हसत होती. या सगळ्यात तो मु लगाही सामिल झाला आणि गोष्टी ऐकण्यात गुं तला. रडणं थांबलच
होत पण आता तो खळखळू न हसत होता. सत्तु च्या उड्यांमध्ये त्याला गं मत वाटत होती. सगळं सं पल्यावर आई
जायला निघाली ते व्हा तो रडला नाही. आईनं दिले ली दहाची नोट मु ठित घे ऊन तो गोष्टींची पोष्टर बघण्यासाठी
पळत गे ला. आधीचा त्याचा घरी जाण्याचा हट् ट आणि गोष्ट पाहिल्यानं तर त्याचं अचानक समजदार होणं यात काय
घडलं माहिती नाही पण आई आणि मु लगा दोघे ही समाधानी झाले होते एवढं नक्की.

रोहा शहराजवळ, कोकणात, आणि विदर्भात तर अशी अने क गावं आढळतात जिथे शाळा खूप दरू आहे त, मु लं
शाळे त जात नाहीत. अशा वे ळेस या मु लांचं काय? असा ने हमी प्रश्न पडतो.

पण ही मु लं प्रयोग बघताना रमु न जातात, हसतात, नाचतात कधीकधी गोष्टी ऐकायला अख्खं गावच्या गाव ये ऊन
बसतं . मग शे तात काम करून थकले ल्या ताया, खे ळणारी पोरं , आज्ज्या, लाकडं घे ऊन जाणारे दादा, उच्चं -निचं ,
लहान-मोठे , सगळे एकत्र बसतात, काही वे ळासाठी सगळं सोडू न सगळं गाव एकत्र हसतं हे सगळं आमच्यासाठी
खूप महत्वाचं आहे .

या लहान मु लांसोबत मोठे ही आमच्याशी जोडले जातात, प्रयोगानं तर गप्पा मारतात, आशिर्वाद दे तात या सगळ्या
रोजच्या त्रासात आम्ही यांना प्रेम, आनं द दे ऊ शकलो हे फार मोठ् ठं आहे .

या प्रवासात अशी कित्ये क गावं आमच्याशी जोडली गे ली. तिथली लोकं अजूनही अगदी घट् टं जोडली गे ली
आहे त.

लहान मु लांसाठी तर आपण celebrity बनतो. गोष्टीनं तरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये कित्ये क मु लं मोकळे पणाने त्यां च्या
तोडक्या मोडक्या भाषे त त्यांची गु पितं सां गतात.

अशा कित्ये क ठिकाणी मु लांनी अगदी घरच्या प्रॉब्ले म पासून ते गावातले प्रश्न, मु लगी म्हणून मला अशी वागणूक
का? इथपासून ते मला त्रास दे णाऱ्यांना मला बॉम्ब टाकू न मारावसं वाटतं इथपर्यं त लिहीलं य.

मग या सगळ्या मु लांना शोधून त्याच्याशी बोलून प्रश्न समजून त्याला जे वाटतं य ते कागदावर लिहीत रहा
म्हणून आम्ही प्रोत्साहित करतो. खरतर यातूनच त्याला त्याचे विचार मांडायचं साधन मिळे ल, तो लिहू शकेल. हे
करत करत भाषा तर नक्कीच सु धारे ल.

कित्ये क वे गवे गळे अनु भव या प्रवासात मिळाले .


कधी प्रयोगादरम्यान खूप पाऊस आला, सगळे कॉस्च्यु म, प्रॉपर्टी भिजतील म्हणून ठे वावे लागले , पण तरीही
काहीही सामान नसताना एका छोट्याशा व्हरांड्यात अगदी दाटीवाटीत बसून मु लांनी गोष्ट ऐकली, समजून घे तली.

काही प्रयोगां च्या ठिकाणी तर कमी जागा होती, ग्राऊंडवर उन्हात प्रयोग करावा लागायचा, दगड पायाला
लागायचे , पण गोष्टी ऐकायच्या म्हणून मु लं अगदी उत्साहात आमच्यासोबत कामाला लागायची, झाडू , खिळे
सगळं घे ऊन मदत करायची.

आज अने क प्रयोग होऊनही "तु म्ही परत लवकर या, किंवा आम्हाला अजु न गोष्ट दाखवा" हे म्हणणं थांबतच नाही.
नाटक इथपर्यं त पोहचलं च नाही, त्यामु ळे मु लांना प्रत्यक्ष अनु भव काय असतो हे ही माहिती नाही. आम्ही
शिकले ल्या नाटकाचा इतका चां गला वापर होऊ शकेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं , नाटक नव्या पध्दतीने
आम्हाला सापडत गे लं.

अशा या इतक्या प्रयोगां च्या अनु भवांचा प्रचं ड मोठ् ठा साठा आमच्याजवळ आहे , ज्यातून आम्ही घडत गे लो,
बदलत गे लो.

पण आत्ताच्या या परिस्थितीत, करोनामुळे अगदी सगळं च थांबलं. आता सध्या मुलांपर्यंत जाता येत
नाही, काम करता येत नाही.

आपल्याला माहितीच आहे कितीतरी मु लांचं शिक्षणच सध्या थांबलं य, मोबाईल आणि त्यासाठी लागणारं ने टवर्क
कित्ये क गावात, मु लांकडे नाहीये .

या सगळ्या काळात आम्ही मु लांपर्यं त तर पोहोचू शकत नाही, पण शिक्षकांपर्यं त पोहोचू शकतो. हे शिक्षकच हे
सगळं काम मग पु ढे जाऊन मु लांपर्यं त घे ऊन जाऊ शकतात आणि सध्या शाळा बं द असल्याने पालकच मु लांचे
शिक्षक बनले त, कधी नव्हे ते मु लांसोबत राहणं , शिक्षणाकडे लक्ष दे णं शक्य झालं य म्हणून पालकांनाही सामिल
करून घ्यायचं ठरलं .

लुल्ला फाऊंडेशनच्या वतीने 'रियाज' या कार्यशाळे ची सुरूवात झाली. बाळासाहे ब लिंबिकाई (गेले अनेक वर्ष
मुलांचं शिक्षण, भाषा यावर संशोधन करणारे शिक्षक, अभ्यासक), मिनाक्षी कोळी, किशोर लुल्ला, महें द्र
वाळंू ज, कल्पेश समेळ, प्रतिक्षा खासनीस यांनी हा उपक्रम सरू
ु केला.

आपल्या समाजात लहान मु लं, त्यां च्यासाठीचं साहित्य हे अत्यं त दुर्लक्षित समजलं जातं . पण या गोष्टीच त्यां च्या
भाषाशिक्षणाचा पाया असतो हे च आपण विसरून जातो.

तर ही कार्यशाळा याच धर्तीवर होती. शिक्षणशास्त्र, गोष्टी आणि नाटकाकडे बघणारी कार्यशाळा.

Virtual काम करावं का? आपल्याला हे जमे ल का? असे अने क प्रश्न मनात ठे वून सु रू केले ल्या या कार्यशाळे त
हळू हळू शिक्षकांकडू न आम्हालाच अने क गोष्टी समजायला लागल्या, शिक्षकांचे प्रश्न, पु स्तकांची उपलब्धता अशा
अने क गोष्टीवर चर्चा होत गे ली आणि हळू हळू आमचं काम आम्हाला नव्याने सापडू लागलं .

या ऑनलाईन कामाच्या फायदे आणि तोट्यांमध्ये आम्हाला आत्ता पडायचं नाही पण, खप
ू वेगवेगळ्या
ठिकाणची तज्ञ मंडळी आम्हाला या ऑनलाईन कामामुळे भेटली. सगळे शिक्षक, पालकांनाही वेगवेगळ्या
पध्दतीने काम करायचं असतं पण मार्ग मिळत नाही, दरवेळेस कार्यशाळा जिथे असते तिथे जाणं होतंच
असं नाही पण यातून दरवेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी लोकं, त्यांचे विचार
जोडले गेले.

फक्त ऐकणं, लिहून घेणं एवढ्यापुरतीच ही कार्यशाळा मर्यादित न राहता चर्चा करणं, वेगवेगळ्या गोष्टी
करून बघणं, लेख/पस्
ु तकं वाचणं अशा अनेक गोष्टी या कार्यशाळे दरम्यान घडल्या.

गोष्टी सगळ्यांना आवडतात हे तर आपल्याला माहितच असतं, पण गोष्ट सांगणं खरं च महत्त्वाचं आहे
का?, गोष्ट का सांगायची?, लहान मल
ु ांसाठी गोष्ट का महत्वाची असते?, या गोष्टींबद्दलचं ताराबाई
मोडक, कृष्णकुमार यांसारख्या तज्ञांचं काय म्हणणं आहे ? अशा बेसिक गोष्टींपासून कार्यशाळे ला सुरूवात
झाली.

ताराबाई, कृष्णकुमार यांनी दिले ल्या चष्म्यातून आम्ही गोष्टींकडे पाहू लागलो. बाळासाहे ब लिं बिकाई सर, फारूक
काझी सर आणि बरे चसे तज्ञ अगदी उत्साहाने दरवे ळेस आम्हाला आणि इतर सगळ्यांनाच मार्गदर्शन करत होते .

नाटकाचा गोष्ट सांगतांनाच वापर, गोष्टी सांगण्याच्या पध्दती, गोष्टीची रचना हे सगळं हळूहळू समजून
घेत असताना प्रत्येकजण आप-आपल्या शैलीत गोष्ट सांगू लागले, गोष्टीतली पात्र रं गवू लागले.

मग हळू हळू पु स्तकांकडे जात असताना त्यातली चित्र, illustrations चं महत्त्व, पु स्तक आणि चित्रांचं connection
समजून घे ताना जगभरातल्या विविध पु स्तकं आणि चित्रां वर चर्चा घडल्या.

पु स्तकं पोहोचवण्याच्या पध्दती, कोणतं पु स्तक मु लांपर्यं त पोहोचवायचं , पु स्तक कसं निवडायचं अशा अने क गोष्टी
आम्हाला सगळ्यांनाच हळू हळू समजत गे ल्या. नेहमीची ठराविक साच्यातली चित्र, गोष्टींचे विषय याच्यापुढे
जाऊन गोष्टींबद्दल यामध्ये बरीच चर्चा झाली.

पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचायला हवीत, आणि आपणच पुस्तकं पोहोचवायला कमी पडतोय का? त्याची
कारणं अशा अनेक विषय कार्यशाळे दरम्यान समोर आले.

धुळे, वर्धा, बीड, नागपूर इथंपासून कोल्हापरू , सातारा, कोकणपर्यंतचे २५० शिक्षक आत्तापर्यंतच्या
कार्यशाळे त सहभागी झाले आहे त.

इथे फक्त बोलणं आणि ऐकणं होत नाही, तर प्रत्येकजण आपापल्या परिने कार्यशाळे त भर घालतं. नाटक
हे तर सोबत आहे च पण, शिक्षक, भाषेवर काम करणारी लोकं, बालसाहित्यावर काम करणारी लोकं
एकत्रित असल्यामुळे पुस्तकं, गोष्टींकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन नव्याने आपल्यालाच सापडत जातो.

"जे व्हा आपण मोठी माणसं एखादी गोष्ट वाचतो, एखादी सुं दर कविता ऐकतो, चित्र, सिने मा बघतो ते व्हा ते
आपल्याला त्याच्या आनं दात, दुःखात सामिल करून घे तं आणि आपल्याला त्याचा आनं द मिळतो. जसा
आपल्याला आनंद मिळतो तसा आनंद आपण खास लहान मुलांसाठी म्हणून तयार केलेल्या गोष्टी,
पुस्तकं, चित्रातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो का?", "फक्त लिपी न शिकवता, चित्र आणि लिपीची सां गड
घालत, पु स्तकातून लिपी पोहोचवू शकतो का?", "गाण्यातून, कविते तन ू सु ध्दा गोष्ट कशी पोहोचवता ये ईल?",
"शिक्षणात गोष्टींचा उपयोग, महत्त्व", "बोलीभाषे तन
ू ले खी भाषे कडे वळण्याचा मार्ग या पु स्तकातून सापडे ल"

असे अनेक मद्द


ु े अनेकांना कार्यशाळे दरम्यान सच
ु ायला लागले, प्रश्न पडायला सरू
ु वात झाली. आता या
प्रश्नांवर विचार, त्याचा शोध या कार्यशाळे तून आम्हा सगळ्यांचाच सुरू आहे . जेव्हा आपण या करोनामधून
बाहे र पडू तेव्हा लहान मुलं, शिक्षण, पुस्तकं यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळावा असा आमचा
विचार आहे .

बाळासाहे ब लिंबिकाई एका लेखात म्हणतात त्याप्रमाणे, 'आजही अनेकजण, 'हल्ली मुले पाठयपुस्तकाखेरीज
इतर साहित्य फारसे काही वाचतच नाहीत, मल
ु ांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली आहे ' असे
म्हणतात, वेगवेगळ्या सर्वेक्षणातून असं आढळून आलं, की मुले जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्या
वाचनाची आवड कमी होत जाताना दिसते. खरं तर बालवाडीत शिकणाऱ्या सर्वच मुलांना वाचनाची इच्छा
असते, आवड असते, मग पढ
ु े जावन
ू असे काय घडतं? काही कारणांपैकी एक कारण मल
ु ांना वाचायला
शिकवण्याच्या पदधतीमध्ये दडलेले असावं का? मुलांना जर मुलभूत वाचनकौशल्ये निरर्थक, कंटाळवाण्या व
वेदनादायक पदधतीने शिकवली जात असतील तर मुले वाचनाचा तिरस्कारच करणार ना! बऱ्याच मुलांना
अर्थापर्यंतच पोहचण्यातच अडचणी आहे त, आधी म्हणल्याप्रमाणे ते अजूनही विसांकेतीकरणात अडकले
आहे त असं दिसतं, असं जर असेल तर मग त्यांच्या लेखी वाचनातून आनंद मिळवणे,रसास्वाद घेणे या
गोष्टी फार दरू वरच्या आहे त. मुलांना वाचन शिकवण्याचे आपले उदिदष्ट जर ‘पुस्तक वाचणे’ हे जर असेल
तर मुलांना वाचायला शिकवण्याची सुरूवात पुस्तकांच्या वापरापासूनच म्हणजेच पुस्तके वाचून
दाखवण्यापासन
ू करायला हवी. '

या सगळ्यावरच आपण सर्वांनी विचार करूयात.

या लॉकडाऊनमुळे त्रास भरपरू झाला, पण कामाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोनही मिळाला आहे आणि आम्ही
आमच्या कामावर अजन
ू च ठाम झालोय. या अशा वेगवेगळ्या पध्दतीने मल
ु ांपर्यंत पोहोचत काम नक्की करत राहू.

प्रतीक्षा खासनीस | pratiksha.khasnis@gmail.com

टायनी टे ल्सच्या सहसंस्थापिका. ललित कला केंद्र इथन


ू नाटक या विषयात पदवी प्राप्त. 'Child &
Adolescent Psychology' याचे शिक्षण. 'क्वेस्ट' या शिक्षणक्षेत्रातील अग्रगण्य संस्थेची 'गोष्टरं ग' ही फेलोशिप
प्राप्त. लहान मुलांच्या वयोगटाचा विचार करून मुलांसाठीचं साहित्य शोधणं, तयार करणं, भाषांतरित
करण्याचं काम.
<photographs of the authors>

You might also like