Temple

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 5

ऐहोळे :

 कर्नाटक राज्यातील चालक्


ु यकालीन मंदिरांचे प्रसिद्ध स्थळ. विजापरू जिल्ह्यात बदामीच्या ईशान्येस
स.ु २४ किमी. वर आहे ह्याचे आर्यावर्त, अय्यापोलिल, आय्याओले, एवल्ली यांसारखे उल्लेख प्राचीन
साहित्यात आढळतात. दस
ु ऱ्या पल
ु केशीच्या शिलालेखात (६३४) त्याचा ‘ऐय्याओले’ असा उल्लेख
आला आहे . त्यावरूनच पढ
ु े एवल्लि-ऐहोळे असे नामांतर झाले असावे, असे म्हटले जाते.
येथे पाचव्या ते सातव्या शतकाच्या दरम्यान ७० मंदिरे होती. त्यांपैकी अवशिष्ट मंदिरांत लाडखान,
दर्गा
ु , हुच्चिमल्लीगड
ु ी, कोंतकुडी, गलगनाथ, मेगत ु ी वगैरे काही आणि शैव न जैन गंफु ा सस्थि
ु तीत
आहे त. बहुतेक मंदिरे हिंदध
ु र्माची असून मेगुती हे मंदिर जैनधर्मीय आहे . येथील वास्तुशिल्पकला
द्राविड व नागरशैली यांच्या मिश्रणातून निर्माण झाली असून मंदिरांची छते गुप्तशैली दर्शवितीत, तर
स्तंभयुक्त सभामंडप पूर्णत: चालुक्यशैलीचे निदर्शक दिसतात. लाडखान हे सर्वात प्राचीन मंदिर
(पाचवे शतक) असून त्यातील सपाट छप्पर, नक्षीदार दगडी जाळ्या आणि गर्भगह
ृ ाभोवतीचा
प्रदक्षिणापथ वैशिष्ट्यपूर्ण आहे . मंदिराच्या प्रवेशस्तंभावर सातवाहन शिल्पशैलीतील आणि गुप्त
आकृतिबंधातील नदीदे वतांची आणि यक्ष-गंधर्व मिथुनांची शिल्पे आढळतात. दर्गा
ु मंदिर आयताकृती
असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुलाकृती आहे . क्वचित काही ठिकाणी बौद्ध
चैत्यगह
ृ ाचे अनुकरण दिसते. हुच्चिमल्लीगुडी मंदिराचे विधान काटकोन-चौकोनी असून गर्भगह
ृ ासमोर
अंतराल आहे . ह्यातही बौद्धचैत्यगह
ृ ाचे अनुकरण दिसते. मेगुती मंदिराच्या बांधणीस गुप्त व
द्राविडशैलीची छाप दिसते. दस
ु ऱ्या पुलकेशीने पल्लवांबरोबर सुरू केलेला संघर्ष पुढे कित्येक वर्षे चालू
राहिला. त्यामुळे पल्लवांची छाप येथील वास्तशि
ु ल्पावर पडली. एवढे च नव्हे तर येथील शैव गुंफा
पल्लवांनीच खोदली. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे
येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात.

संदर्भ : 1. Cousens Henry, The Chalukyan Architecture of the Kanerese Districts,


Calcutta, 1926.
     2. Govt. of India, Temples of South India, Delhi, 1960

तेर (Ter)
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात
उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे . त्याचे प्राचीन नाव
तगर, तगरपरू वा तगरनगर असन
ू तगरचे परु ावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या
टे काडांवर सांप्रत आढळतात. रामलिंगप्पा खंडप्पा लामतरु े यांना येथे सापडलेल्या प्राचीन कलात्मक
वस्तंच्
ू या संग्रहामळ
ु े च महाराष्ट्र शासनाने येथे संग्रहालय उभारले आहे .
प्राचीन स्त्रीमूर्ती, तेर.
  पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीअन सी (इ. स. ५० – १०३) या ग्रंथात तेरचा उल्लेख आहे . त्या वेळी
तगरनगरातून विविध प्रकारचे उत्कृष्ट कापड बॅरगेझ (भरूकच्छ = भडोच, गुजरात राज्य) येथे निर्यात
केले जाई. त्याचप्रमाणे तगरमध्ये किनारपट्टीवरून विविध वस्तू आयात केल्या जात, असे पेरिप्लसचा
ग्रंथकर्ता म्हणतो. पेरिप्लसव्यतिरिक्त प्राचीन तगरनगर हे इ. स. पहिल्या शतकातील एक व्यापारी
पेठ असल्याचा उल्लेख अलेक्झांड्रियाचा भूगोलतज्ज्ञ टॉलेमी (इ. स. सु. ९०–१६९) याच्या
प्रवासवर्णनात येतो. बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट आणि विशेषतः शिलाहार या राजवंशांच्या कोरीव
लेखांत तगरनगरीचा उल्लेख येतो. सुमारे सतराव्या शतकात या प्राचीन नगरीचे महत्त्व लोप पावले.
पेरिप्लसच्या माहितीनुसार तगर हे पैठणच्या पूर्वेस दहा दिवसांच्या प्रवासाइतके दरू आहे , असे लिहिले
आहे , तर टॉलेमी याने लिहिलेल्या पुस्तकात तगर हे पैठणच्या ईशान्येस असल्याचा उल्लेख केलेला
आहे . या मतमतांतरांमुळे तगर हे स्थळ कोणते व कोठे असावे, याबद्दल अनेक विद्वानांत मतैक्य
नाही. वस्तुत: तेर, पैठणच्या आग्नेयेस, पण काहीसे पूर्वेस, १५४ किमी. अंतरावर वसले आहे . पुराणांत
याचा उल्लेख सत्यपुरी या नावाने येतो. मात्र प्राचीन काळी तेर हे पैठण, नेवासे, जन्
ु नर इ. नागरी
केंद्रांशी व्यापारी मार्गांनी जोडलेले होते, यात शंका नाही.
इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी तेरपरिसरात सापडलेल्या विविध परु ाभिलेखांच्या आधारे असे
अनम
ु ान काढले आहे की, हे नगर इ. स. सातवे शतक ते इ. स. अकराव्या शतकापर्यंत ‘तगर’ या
नावाने परिचित होते, तर सोळाव्या शतकातील अभिलेखात तसेच फार्सी ताम्रपटानस
ु ार (इ. स. १६५९)
ू ओळखली जात होती, असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे तेर माहात्म्यासह इतर
ही नगरी ‘तेर’ म्हणन
विविध परु ावे इसवी सनाच्या आरं भापासन
ू येथे सलग वसाहत झाली असल्याची साक्ष दे तात.
१९०१ पासन
ू येथील परु ावशेष तसेच प्राचीन वास्त-ू मंदिरे संशोधकांना तसेच प्राचीन वस्तस
ु ंग्राहकांना
सतत आकर्षित करीत राहिल्याचे दिसून येते. हे न्री कझिन्स यांनी तेरणा नदीच्या दोन्ही तीरांवर
आढळणाऱ्या विपुल पुरावशेषांची नोंद घेतली (१९०२-०३). त्यांनी येथील त्रिविक्रममंदिरासह इतर
प्राचीन वास्तच्
ूं या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. है दराबाद संस्थानच्या पुरातत्त्व खात्याने तेर
येथील पुरावशेष जतन करण्याच्या दृष्टीने पाहणी केली होती (१९२९-३०), तर डग्लस बॅरेट (१९६०)
यांनी तेर येथे सापडलेल्या काही महत्त्वपूर्ण कलात्मक वस्तू व मंदिरांचे वर्णन एका पुस्तिकेद्वारे
प्रकाशित केले. या कलात्मक वस्तंत
ू न
ू इसवी सनाच्या सरु
ु वातीच्या काळातील तेरचे वैभव प्रतीत होते.
यातील हस्तिदं ताची १२ सेमी. उं च मनमोहक कोरीव स्त्रीमर्ती
ू विशेष लक्ष वेधन
ू घेते. अशाच तऱ्हे च्या
हस्तिदं ती स्त्रीमर्ती
ू इटलीतील ज्वालामख
ु ीत (इ. स. ७९) नष्ट झालेल्या पाँपेई या प्राचीन शहराच्या
उत्खननात मिळालेल्या आहे त (१९३८). यावरून तेर हे एक कलाकेंद्र होते व त्याचा रोमन नगराशी
व्यापारी संपर्क होता, हे सिद्ध झाले आहे .

तेर येथील पांढरीच्या टे काडाचे उत्खनन प्रथम पुणे येथील डेक्कन कॉलेजचे बी. एन. चापेकर आणि के.
डी. बॅनर्जी यांनी पी. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले (१९५८). त्यानंतर अनेक वेळा (१९६६-६७, 
१९६७-६८, १९६८-६९, १९७४-७५, १९८७-८८, १९८८-८९ आणि २०१५) येथे निरनिराळ्या संस्थांनी,
विद्यापीठांनी महाराष्ट्र शासनातर्फे उत्खनने केली. या उत्खननांमळ
ु े तेरचा सांस्कृतिक इतिहास,
मौर्यपर्व
ू कालखंडापासन
ू ते मध्ययग
ु ीन कालखंडापर्यंत, एकूण पांच खंडांमध्ये विभागता आला; मात्र
तेरचा सस
ु ंगत इतिहास मांडणे फारसे शक्य झाले नाही. चापेकर व बॅनर्जी यांनी केलेल्या उत्खननात
सातवाहनकालीन वस्तीचा परु ावा उपलब्ध झाला. विटांनी बांधलेली घरे , सांडपाण्याची शोषणकंु डे,
सातवाहन राजांची नाणी, पक्वमद
ृ ा आणि केओलिनच्या उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-परु
ु षांच्या प्रतिमा,
रं गीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी येथे सापडल्याने सातवाहनकालीन तेरच्या लोकजीवनाची
कल्पना करता आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे मोरे श्वर दीक्षित यांच्या
मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘महार’ नामक पांढरीच्या टे काडावरील उत्खननात (१९६६-६७) तेरच्या
पहिल्या वस्तीचा कालखंड इ. स. पू. सु. ४०० ते २०० म्हणजे मौर्यपूर्व ते मौर्यकाल असा ठरविता आला.
हे उत्खनन स्तरनिबद्ध वस्तीचा शोध घेण्यासाठी केले गेले. याच विभागाने पुन्हा दोन वेळा उत्खनन
केले (१९६७-६८; १९६८-६९). यांत घरांचे अवशेष सखोलपणे अभ्यासता आले. त्याचप्रमाणे येथील
सांस्कृतिक क्रमही पुनश्च सिद्ध झाले. याव्यतिरिक्त प्राचीन बौद्ध स्तूपांचे अवशेष सापडले. या स्तप
ू ांचा
व्यास २६ मी. होता. त्यामुळे सातवाहन काळात तेर हे बौद्धधर्माचे मोठे केंद्र होते, असे सिद्ध झाले.
उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तूपांच्या कठड्यांचे खांब व इतर शिल्पे तेथील वस्तुसंग्रहालयात
ठे वलेली आहे त. याशिवाय सातवाहन काळातील नाणी, मत्ति
ृ कामूर्ती, मत्ृ पात्रे, मणी आणि विशेषतः
रोमन मत्ृ पात्रे व पुतळ्या उपलब्ध झाल्या आहे त.

डेक्कन कॉलेज, पुणे येथील शां. भा. दे व व डॉ. बाबासाहे ब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे टी. व्ही.
पथी यांनी ‘लामतुरे टे काड’ (टे काड क्र.१) येथे प्रामुख्याने सातवाहनपूर्व काळातील सांस्कृतिक
अवशेषांची सखोल माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने उत्खनन केले (१९७४-७५). या उत्खननामध्ये
मण्ृ मूर्तींप्रमाणेच सातवाहन राजांची नाणी, मणी तसेच तेरभोवती केलेल्या लाकडी तटबंदीचे अवशेष
निदर्शनास आले. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असा प्लिनी या रोमन
लेखकाने (इ. स. पहिले शतक) केलेला उल्लेख या संदर्भात महत्त्वाचा ठरतो, असे उत्खनकांचे
निरीक्षण आहे . त्याचप्रमाणे उत्खननातील संपूर्ण पुराव्यांवरून सातवाहनांच्या प्रारं भीच्या काळात तेर
तटबंदीयुक्त नगर होते; तर उत्तरकाळात या नगरात सुखसमद्ध
ृ ी नांदत होती, तसेच पाश्चात्त्य दे शांशी
व्यापारविषयक संबंध होते, असे दिसन
ू येते.

तेर येथे विटांचे बांधकाम असलेल्या कंु डांचे अवशेष अनपेक्षित रीत्या उजेडात आले (१९८७). या कंु डांचे
स्वरूप स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अरविंद जामखेडकर व के. डी. कावडकर यांच्या
मार्गदर्शनाखाली उत्खनने केली (१९८७-८८, १९८८-१९८९). ही कंु डे सातवाहन काळातील (इ. स. पहिले
शतक) असल्याचा निष्कर्ष उत्खनकांनी काढला आहे . या कंु डसंकुलात चापाकृती बांधकामाचे अवशेष,
अग्निकंु डसदृश जागेचे अवशेष इ. निदर्शनास आले. या उत्खननात सातवाहनकालीन मद्भ
ृ ांडी व इतर
अवशेष तसेच कंु डांशी निगडित वस्तू तेरणा नदीच्या उत्तर किनाऱ्यापासन
ू २५० मी. अंतरावर
सापडल्या. तसेच एक अभिलेख असलेला स्तंभ व बांधकामांचे अवशेष हाती लागले. याशिवाय ३४ सेंमी
उं ची असलेले परु
ु षाचे शिल्प तसेच कमळाचे नक्षीकाम असलेला स्तंभही सापडला. शिल्प व स्तंभ
चन
ु खडीच्या दगडांवर कोरलेले आहे त.

महाराष्ट्र शासनातर्फे येथे जे उत्खनन करण्यात आले (२०१५). त्यात सातवाहन काळातील विविध
वस्तू व वास्तूंव्यतिरिक्त प्राचीन तगर नगरीभोवती असणाऱ्या लाकडी तटबंदीचे अवशेष पुनश्च
मिळाले.

तेर येथे उपलब्ध झालेल्या असंख्य वस्तू-वास्तूंतून इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील तेरचे वैभव
आणि कलाप्रियता प्रतीत होते. सातवाहनांच्या नंतर तेरला थोडीशी अवकळा आली; तथापि राष्ट्रकूट-
शिलाहार काळांतही हे शहर अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. त्यातील त्रिविक्रम मंदिराची
बांधणी चैत्यासारखी आहे . त्याचा काळ इ. स. दस
ु रे ते पाचवे शतक या दरम्यानचा आहे . ही वास्तू
महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन वास्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते. याशिवाय उत्तरे श्वर आणि
काळे श्वर ही राष्ट्रकूट काळातील मंदिरे महत्त्वपूर्ण आहे त. यातील उत्तरे श्वराच्या गर्भगह
ृ ाच्या
दरवाजाची लाकडी चौकट उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल व नक्षीदार विटांबद्दल प्रख्यात आहे . वेलबुट्टय
् ा,
विविध प्राणी व मानवी आकृत्या यांनी ती अलंकृत केली आहे .

याशिवाय येथे ज्ञानेश्वरकालीन संत गोरा कंु भार यांचे समाधिस्थळ आहे . तसेच गावात हे माडपंती
बांधणीची सिद्धेश्वर, काळे श्वर, गोरा कंु भार अशी मंदिरे आहे त.

संदर्भ :

 Barrett, Douglas Ter, Bombay, 1960.


 Chapekar, B. N. Report on the Excavation at Ter, Pune, 1958.
 Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure C. N. Glimpses of Ancient Maharashtra Through
Archaeological Excavations, Pune, 2013.
 Fleet, J. F. ‘Tagar-Terʼ, The Journal of the Royal Asiatic Society of Britain and Ireland,
pp. 537-552, July, 1902.
 दीक्षित, मो. ग. ‘तेर वस्तुसग्र
ं हालयातील पुरातन वस्तूंचा परिचय ʼ, भारतीय इतिहास आणि
संस्कृती, वर्ष ९ वे, प.ृ ८०–९४ व १५–३८, मंब
ु ई, एप्रिल व जल
ु ै, १९७२.
 दे व, शां. भा. तेर, मंब
ु ई, १९८७.
 दे व, शां. भा. ‘तेर म्हणजेच मराठवाड्यातील तेर ʼ, दै . केसरी, १९८३.
 खरे , ग. ह. ‘तेर येथील चार शिलालेख ʼ, भारत इतिहास संशोधन मंडळ, वर्ष-१४, अंक ४, पष्ृ ठ ७४-
८४, पण
ु े, १९३४.
 कुळकर्णी, ज. बा. ‘सत्यपरु ी अथवा तेर माहात्म्य ʼ, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ११वे, प.ृ
१२–३२, जानेवारी, १९७५.
 पाठक, अरुणचंद्र, महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारं परिक जलव्यवस्थापन, पुणे, २०१७.
समीक्षक – अरुणचंद्र पाठक

You might also like