यात्रेकरूंचा देश अनुवाद खटकलेल्या गोष्टी

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

यात्रेकरूं चा देश हे मी अनुवादित के लेलं देवदत्त पट्टनायक यांचे पुस्तक मिळाले.

मंजुलच्या नेहमीच्या प्रथेनुसार पुस्तक


चांगलेच काढले आहे. फक्त मला या पुस्तकात
म्हणजे खरं तर अनुवादिका म्हणून छापून आलेल्या माझ्या मनोगतात खटकलेल्या दोन गोष्टी आपणास सांगाव्याशा
वाटतात म्हणून ही मेल लिहीत  आहे.
माझे मनोगत आपण लिहून मागितले ते मी आपणास पाठवले. त्या मनोगतात हे पुस्तक करायला दिल्याबद्दल मी काही
लोकांचे आभार मानले आहेत , त्यावर तुमचा फोन आला की त्यात आम्ही डॉ. देगलूरकर यांचे नाव घालतो कारण त्यांनी
या पुस्तकांतील संस्कृ त नावांच्या उच्चारांविषयी मार्गदर्शन के लं होतं. ते तर तुम्ही योग्यच के लंत , पण त्यानंतर पुढे एक
नवा परिच्छेद तुम्ही घातला आहे. जो मी लिहून पाठवला नव्हता. तो मी वाचला. तो मला पुढील कारणांमुळे पटलेला
नाही. तो कसा ते मी पुढे लिहिले आहे.
 त्यात लिहिले आहे की १) इंग्रजी साहित्य भारतीय भाषेत अनुवादित करताना अनेकदा एखाद्या इंग्रजी शब्दासाठी तंतोतंत
जुळणारा शब्द भारतीय भाषेत मिळणं कठीण होऊन जातं.
(या ठिकाणी माझे मत असे की म्हणूनच तर आपण आशयाला धक्का न लावता भावानुवाद करत असतो ना. तिथल्या एका
शब्दासाठी आपल्याला आपल्या भाषेतील चार पाच शब्द लिहायला अथवा अगदीच गरज लागली तर खाली तळटीप
लिहायला कु णी बंदी के ली आहे? शिवाय हा विचार या पुस्तकाच्या बाबतीत अप्रस्तुत आहे कारण इंग्रजीत असले तरी हे
पुस्तक आपल्याच संस्कृ तीबद्दल आहे. तुर्की किं वा जुन्या अमेरिकन संस्कृ तीबद्दल नाही, पण त्यांचेही काही अनुवाद मी
के ले आहेत तेव्हा ती संस्कृ ती समजून घेऊन गरज लागेल तिथे तळटीपांचा वापर के ला आहे.  )
२) त्या परिच्छेदात पुढे असे लिहिले आहे की त्यातही आजकाल इंग्रजी अधिक वाचले आणि बोलले जाते,  अर्थातच
बरेचदा विचार प्रक्रियाही इंग्रजीतून होत असते.
(या ठिकाणी माझे मत असे की इंग्रजी जास्त वाचले जाते आणि बरेचदा विचार प्रक्रियाही इंग्रजीत होत असते हे मान्यच
आहे पण त्याचा संबंध इथे कु ठे आला ते मला समजले नाही. हे सगळे ज्या वाचकाचे असते तो वाचक थेट इंग्रजीतून मूळ
पुस्तक वाचेल की. ज्या अर्थी आपला वाचक मराठी वाचायला येत आहे त्या अर्थी त्याला मराठी अनुवादात मूळ पुस्तकाचा
आशय समजला पाहिजे, तो समजतो म्हणून तर तो मंजुलने काढलेले पुस्तक वाचायला येतो ना ?.
३) तिसरे आणि शेवटचे वाक्य- त्यामुळे वाचकांनी पुस्तक वाचताना त्यात व्यक्त के लेले विचार आणि संदर्भ समजून घेत
वाचन करावे
(म्हणजे काय? तेही समजले नाही. त्यात व्यक्त के लेले विचार पट्टनायक यांचे आहेत, ते त्यांनी इंग्रजीत व्यवस्थितपणे
समजावून दिले आहेत, ते विचार अनुवादक म्हणून आपण मराठीत आणले आहेत तर ते वाचकांना समजणार नाहीत, असं
आपणच का म्हणतोय? आपल्यासारखीच अन्य वाचकांचीही कु ठलंही पुस्तक वाचताना विचारप्रक्रिया नकळत चालू असते
आणि जो तो स्वतःच्या अनुभवांशी प्रत्येक गोष्ट जोडू न पाहत असतो.)
तरी आपणास विनंती अशी की या पुढल्या पुस्तकातील माझ्या मनोगतात आपणास काही भर घालायची असल्यास मला ती
अगोदर दाखवावी. कारण ते माझे मनोगत म्हणून माझ्या नावाने येणार ना? ते मलाच पटत नसेल तर काय उपयोग?
पुस्तक बघताना मनात जे आले ते मोकळेपणाने लिहिले आहे, तरी राग मानू नये आणि गैरसमज करून घेऊ नये अशी
विनंती.
धन्यवाद,
आपली
सविता दामले.

You might also like