Professional Documents
Culture Documents
अंकातील प्रसिद्ध (7) 05 December 2021 तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
अंकातील प्रसिद्ध (7) 05 December 2021 तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
समर्थक बनणे
तत्त्वज्ञानात्मक चिंतन
श्रीनिवास हेमाडे
0
December 5, 2021 12:58 am
Share this:
बर्ट्रंड रसेल दर्शन भाग ७ - 'तत्त्वज्ञानात्मक चिंतन' (Philosophical Contemplation) कसे के ले जाते, हे
स्पष्ट करणे खरे तर अतिशय अवघड असते. रसेलच्या मते, " 'तत्त्ववेत्ता काम करीत आहे' म्हणजे नेमके
काय करीत आहे?" हा एक अतिशय विचित्र प्रश्न आहे. त्यासाठी "तत्त्ववेत्ते काय करीत नसतात", हे सांगावे
लागते आणि ती खूप मोठी यादी आहे. आपल्या भोवतालच्या जगाचे स्वरूप समजावून घ्यायचे तर ते
अगणित, अनंत गोष्टीनी भरलेले आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाची किं वा तत्त्वचिंतनाची व्याख्या करणे हे
कर्मकठीण बनते. तत्त्वज्ञानाची कोणतीही व्याख्या के ली तरी ती वादग्रस्तच बनते. पण ती करण्यात एक
तात्त्विक अभिवृत्ती दिसून येते, यात मात्र शंका नसते. तत्त्वचिंतन काय आहे? हे जाणून घ्यायचे तर एकच
उपाय आहे, तो म्हणजे '(आपण स्वतः च) तत्त्वज्ञान निर्माण करणे."
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 1/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
‘माणूस विचारशील प्राणी आहे’ (Man is rational animal), या अतिप्रसिद्ध पण तेवढ्याच वादग्रस्त
विधानातून ‘विचार करणे’ (Thinking) हे के वळ मानवाचेच वैशिष्ट्य आहे, हे अधोरे खित होते. मूलतः
‘विचार करणे’ ही प्रक्रिया मानसशास्त्रीय, तार्कि क, आणि वैचारिक आहे. मेंदू हे जीव-शरीरशास्त्रीय
द्रव्य; मन, आत्मा ही तत्त्वे, बुद्धि, विवेकशक्ति इत्यादी मानवी क्षमता आणि भौतिक जगापेक्षा स्वतंत्र
मानले गेलेले (ज्यावर लोकांची अतिश्रद्धाळूं चा भावनिक विषय असतो) ईश्वर, के वल विचारांचेच
(Absolute Ideas) स्वतंत्र विश्व अशीही तत्त्वे, या सर्वांशी ‘विचार करणे‘ ही प्रक्रिया जोडली गेलेली
आ
हे
या विविध द्रव्ये, तत्त्वे, क्षमतांमधील नेमका कोणता घटक ‘विचार करतो‘ हा तात्त्विक प्रश्न असून त्याला
दिल्या गेलेल्या उत्तरांमधून वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांची आणि वेगवेगळ्या तात्त्विक परं परांची विविध मते,
सिद्धांत विकसित झाली आहेत. काही उत्तरे विज्ञानांनी दिली आहेत, त्यातून वेगवेगळ्या विज्ञानांचा
जन्म व विकास झाला आहे.
विचारांचे प्रकार
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 2/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
विसाव्या शतकात शिक्षणाचे जागतिक पेव फु टले. साहजिकच ‘विचार करणे’ या कृ तीचे विविध प्रकार
अस्तित्वात आले. शैक्षणिक व वैचारिक बाजारपेठे त असे एकू ण नऊ विचार प्रकार चलनात आले:
(१) विश्लेषक विचार (Analytical Thinking), (२) बहुआयामी विचार (Divergent Thinking), (३)
अभिसरण विचार (Convergent Thinking), (५) सर्जक विचार (Creative thinking), (५)
चिकित्सक विचार (Critical thinking), (६) अमूर्त विचार (Abstract Thinking), (७) मूर्त किं वा
ठोस विचार (Concrete thinking), (८) क्रमवार विचार (Sequential Thinking), सर्वव्यापक
विचार (Holistic Thinking).
यातील ‘सर्जक विचार’ (Creative thinking) आणि चिकित्सक विचार (Critical thinking) व
त्यानुसार होणारे लेखनही ‘सर्जक’ आणि ‘चिकित्सक‘ असते. तत्त्वचिंतन या दोन्ही प्रकारात येणारे
आहेच, पण खुद्द तत्त्वज्ञानात सृजन म्हणजे पूर्णपणे नवेच काहीएक आणि चिकित्सा म्हणजे प्रथम
आत्मचिकित्सा किं वा आत्मपरीक्षण’ असा अर्थ होतो. साहित्य कला, संगीत इत्यादीत हे अर्थ प्रतिबिंबित
होतात. सर्वव्यापक विचार (Holistic Thinking) ही स्वरूपाने तात्त्विक आहे. तत्त्वज्ञान हा समग्र
जगाचे एकात्मिक दर्शन समजले जाते.
Reflective Thinking – ‘प्रतिबिंबात्मक विचार’ हा प्रकार तत्त्वज्ञानात समावेश होणारा प्रकार आहे.
तथापि काही विचारवंतानी व शिक्षणतज्ज्ञांनी त्याचा समावेश बाजारपेठीय यादीत के ला. तेथे त्याचा
अर्थही बदलला गेला, शैक्षणिक अर्थ दिला गेला. प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात जिथे ‘घासुगिरी
शिक्षण’ (Tertiary education किं वा post-secondary education) पद्धती असते, तिथे
प्रतिबिंबात्मक विचारपद्धतीची आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या लेखनावर भर दिला जातो.
प्रतिबिंबात्मक लेखन‘ (Reflective writing) कसे करावे, How to Write a Reflection Paper
याचाही बाजार विकसित झाला आहे.
ब्रिटानिका ज्ञानकोशातून
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 3/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
‘चिकित्सक विचार’ (Critical thinking) आणि ‘सर्जक विचार’ (Creative thinking) या विचार
प्रकारांचे स्वरूप तत्त्वचिंतनाशी निगडीत आहेत. हे दोन्ही प्रकार स्वरूपाने तात्त्विक आहेत. तथापि या
साऱ्या प्रकारांचे किं वा कोणत्याही एकदोन संकल्पनाचे स्वरूप पाहाणे, किं वा त्यांच्या व्याख्या तपासणे
इत्यादींच्या खोलात जाण्यात अर्थ नाही. कारण त्या तत्त्वज्ञानाच्या दिशेने जाणाऱ्या नसून शिक्षण
प्रक्रियेच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. फारतर त्या ‘शिक्षणाचे तत्त्वज्ञान’ या विषयाच्या दिशेने जाणाऱ्या
आहेत. उदाहरणार्थ, ‘चिकित्सक विचार’ म्हणजे अशा तऱ्हेची विचार करण्याची पद्धती की जिच्यात
‘इच्छित हेतूपूर्तीच्या दिशेने विचार करण्याच्या प्रशिक्षण मिळालेल्या प्रत्येक कौशल्याच्या पुरे पूर वापर
के ला जातो.’ यात व्यक्तीने किं वा विद्यार्थ्याने के वळ जे शिकवले गेले आहे, तेच उपयोगात आणावयाचे
आहे. त्याने इतर कोणत्याही स्वतः च्या वैचारिक सद्गुणांचा वापर करणे अपेक्षित नाही!
त्या उलट ‘प्रतिबिंबात्मक विचार’ (Reflective Thinking) प्रक्रिया, जे काही घडले आहे त्याबाबत
निर्णय व धोरणे यावर भर देते. ही प्रक्रिया व्यक्तीच्या, म्हणजे विद्यार्थ्याच्या इच्छा, धारणा, समजुती,
श्रद्धा, विश्वास व ज्ञान यांना महत्व देते. या साऱ्यांचे ‘प्रतिबिंब’ अभ्यासविषयात उमटावे, यावर भर देते.
विचार करण्यासोबतच लेखनाचेही प्रकार के ले जातात. जसे की, ‘सर्जक विचार’ (Creative
thinking) कृ तीत उतरवला की त्याचे रुपांतर ‘सर्जक लेखन’ (Creative writing) मध्ये होते. भाषा
आणि साहित्य क्षेत्रात या दोन्ही प्रकारांना अतिशय, वाजवीपेक्षा जास्तच महत्व आले आहे.
साहित्यक्षेत्रात ते जास्तच फोफावल्याच्या काळजीतूनच की काय कोण जाणे, पण नाशिक येथे
भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनात “साहित्य निर्मितीच्या कायर्शाळा: गरज की थोतांड?” या विषयावर एक परिसंवाद
आयोजित के ला गेला आहे. ( आजच ०५ डिसेंबर रोजी होत आहे). गेल्या काही दशकात साहित्य
निर्मिती ही जणू यांत्रिक आणि तांत्रिक पद्धती असावी, अशा पद्धतीने निर्माण के ले जात आहे, त्यातील
सर्जनशीलता मृत झाली आहे, असे समजून होणाऱ्या साहित्याच्या चिकित्सेसाठी हा परिसंवाद होत
आहे, ही स्वागतार्ह बाब म्हंटली पाहिजे.
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 4/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
तीन संकल्पना
‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेशी तीन संकल्पना निगडीत आहेत. (१) ‘तर्क मुक्त स्वैरकल्पना’
(Speculation), (२) ‘तत्त्वचिंतन’ (Contemplation) आणि (३)’विमर्श’ (Reflection). त्यांच्यातील
फरक अधोरे खित करण्यातून ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ ही संकल्पना स्पष्ट करता येईल.
तर्क मुक्त स्वैरचिंतनाने विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान अशा तीन प्रश्नांना जन्म दिला आहे. परं तु या प्रश्नांना
जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा ते प्रश्न व उत्तरे निश्चित झाली, त्यातून विज्ञान निर्माण झाले. रसेलच्या मते,
विज्ञानाच्या अनेक प्रांताची मुहूर्तमेढ याच तर्क मुक्त स्वैरचिंतनाने झाली आहे. विज्ञानाचे स्वरूप निश्चित
झाले की ते तर्क मुक्ततेकडू न तर्क युक्ततेकडे जाते, मग ते तत्त्वज्ञानापासून स्वतंत्र होते. तर्क मुक्त
स्वैरकल्पना सुचण्याचा दुसरा प्रांत म्हणजे धर्म.
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 5/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
धर्म व धर्मसंस्थेची रचनाही तर्क मुक्त स्वैरकल्पना विहारातूनच होते. माणूस त्यातूनही मुक्त झाला की
त्याचा तत्त्वचिंतनाकडे प्रवास सुरु होतो. प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते मांडतात तसे प्राचीन ग्रीक ‘तत्त्वचिंतन’
म्हणजे निव्वळ आत्मसुखासाठी के लेले दुर्गम, अतिकठीण प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत हिंडण्याचे
धाडसी काम आहे. अर्थात आजही तत्त्वज्ञान हे धाडसी काम आहे, हे खरे आहे.
‘चिंतन करणे’ (Contemplation) ही मात्र तत्त्वज्ञानात्मक प्रक्रिया आहे. पण तिचेही दोन प्रकार करता
येतात. ‘तत्त्वज्ञानात्मक विमर्श’ (Philosophical Reflection) आणि ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’
(Philosophical Contemplation).
तत्त्वज्ञानात्मक विमर्श
Reflection या संज्ञेला संदर्भानुसार वेगवेगळा अर्थ मिळतो. भौतिकीविज्ञान, गणित किं वा साहित्य,
भाषा क्षेत्रात त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपण चिंतनक्षेत्रातील अर्थ पाहू. मराठीत त्याचा तात्त्विक
अनुवाद ‘विमर्श’ (Reflection) असा के ला जातो.
‘विमर्श’ असा सुटा शब्द फारसा प्रचलित नाही, तो ‘विचारविमर्श’ असा जोडशब्दप्रयोग उपयोगात
आणला जातो. Reflection म्हणजे प्रतिबिंब. कशाचे? कोणाचे प्रतिबिंब दिसते? आपले, व्यक्तीचे-
वस्तूचे, पाहणाऱ्याचे किं वा प्रथमपुरुषी ‘माझे‘, ‘आपले‘ प्रतिबिंब दिसते. कशात दिसते? तर आरशात
दिसते. आरशासारख्याच चकाकणाऱ्या इतर वस्तूत-पाण्यात, धातूच्या चकचकीत पत्र्यात दिसते. ‘मी‘ ,
‘आपण‘ “जसे आहोत तसे दिसणे” हे प्रतिबिंब.
“स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी” (गायक: सुधीर फडके ,
गीतकार: जगदीश खेबुडकर, चित्रपट: “आम्ही जातो आमुच्या गावा”) हे गीत आपली प्रतिमा दर्शविते.
ऑस्कर वाईल्डची (Oscar Fingal O’Flahertie Wills Wilde (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४, मृत्यू:
३० नोव्हेंबर १९००) ‘डोरियन ग्रे‘ (The Picture of Dorian Gray) कथा अशाच एका खऱ्या
आत्मप्रतिमा दर्शनाची कथा आहे. उलट “तुम्हारे हुस्न की तारीफ आईना भी करे , तो मैं तुम्हारी कसम
है तोड दूं उसको” (गायक: महेंद्र कपूर-आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी, चित्रपट: कही दिन
कही रात १९६८, कलाकार: विश्वजित, सपना) हे गीत प्रेमपत्रावरील स्वामित्वहक्क बजावते. तिसराही
प्रकार म्हणजे आत्मप्रतिमेच्या प्रेमात पडणे. नार्सिसीस (Narcissus) हा ग्रीक मिथककथेतील नायक
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 6/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
पाण्यात प्रथम आपली प्रतिमा पाहातो. आपण इतके अमर्याद सुंदर आहोत, याची जाणिव होऊन तो
त्या प्रतिमेच्या प्रेमात पडतो. (आणि मरतो!)
हाच मूलार्थ गृहीत धरून ‘विचारविमर्श’ करताना संबंधित व्यक्तिची मते तिच्या विचारात व्यक्त
होताना दिसून येतात. व्यक्तीने विचार करून स्वतः ची मते मांडणे म्हणजे ‘विचारविमर्श’ करणे, असे
मानले जाते. काहीशा प्रौढ भाषेत मांडायचे तर ती व्यक्ति स्वतः चे तत्त्वज्ञान मांडत असते. हे तत्त्वज्ञान
म्हणजे विमर्शात्मक चिंतन किं वा तत्त्वज्ञानात्मक विमर्श होय.
तत्त्वज्ञानात्मक विमर्शमध्ये व्यक्ति तिला हवा तसा बदलही करू शकते. ते तिचे ‘स्वतः चे तत्त्वज्ञान’
असते. साहजिकच ते खासगी असते. ते सर्वांसाठी असेल, सार्वत्रिक होईलच; याची शाश्वती नसते.
उदाहरणार्थ, “आपलं आपण कमवायचं, जगायचं, जीवनाला येईल तसे सामोरं जायचं, तक्रार करायची
नाही-शांतपणे जगायचं” किं वा “मला नाही असं जगायचं. मला माझ्या पद्धतीने जगायचंय. माझ्या
पद्धतीने मी माझ्या जीवनाला आकार देणार!” हे मत म्हणजे खासगी विचारविमर्श. साधारणतः
अनुभवकथन, साहित्यातील आत्मचरित्रे किं वा चरित्रे विचारविमर्शात्मक असतात. त्यात समाजोपयोगी
अंश असेल तर आणि तरच ती भावतात, अन्यथा त्यांचा कालिक आणि वाचक संदर्भ कालबाह्य झाला
की असे साहित्य बिनकामाचे ठरते. त्याउलट तत्त्वज्ञान नेहमीच कालोचित ठरते, कारण ते स्थलकाल,
व्यक्ति, नेते, समाज इत्यादींचा संदर्भ ओलांडू न चिरस्थायी विचार मांडते. तेच अस्सल तत्त्वज्ञानात्मक
चिंतन या पदाला पोहोचते.
तत्त्वज्ञानात्मक चिंतन
‘चिंतन’ (Contemplation) मात्र ‘विचारविमर्श’ च्या नेमके उलट असते. किं वा ‘अधिक व्यापक व
विस्तारित असते’ असे म्हणणे योग्य राहील. ‘चिंतन’ व्यक्त करण्यात व्यक्ति तिचे मत मांडतेच पण
तिच्या पूर्वसुरींचे मत विचारार्थ घेते, त्यांचे खंडन-मंडन करते, मग स्वतः चे नवे मत मांडते, त्या मताच्या
समर्थनार्थ पुरावे देते. ती त्या ज्ञानाच्या विकासाचा पुढील टप्पा गाठू पाहाते, किं बहुना ती व्यक्ति
संपूर्णपणे नवेच ज्ञान निर्माण करते. कदाचित ते पूर्वसुरींच्या ज्ञानाशी जुळणारे असेल किं वा नसेलही;
नसेल तर ते ज्ञान निखळपणे ‘नवे ज्ञान’ या अभिधानाला पात्र ठरते. हे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’
(Philosophical Contemplation) ज्ञान असते.
ज्ञानाचा भाग होण्याचा दर्जा तिला लाभतो. ते विज्ञान बनले तरी मूलतः तत्त्वज्ञान बनते. कारण ते ‘ज्ञान’
असते, ते संबंधित विषयाची ‘तत्त्वे’ बनते. जसे की न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत, आईनस्टाईनचा
सापेक्षता सिद्धांत, कणाद ऋषीचा अणुवाद इत्यादी.
ध्यान
मानवी इतिहास तीन प्रमुख तत्त्वज्ञानांनी आकाराला आला. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान
आणि चिनी तत्त्वज्ञान. एका व्यापक प्राचीन कालखंडात या तीनही ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेची
बीजे रोवली गेली. पण त्यांच्यात गतिमान, प्रवाही व कमाल मर्यादेपर्यंत समकालिन राहाण्याची क्षमता
होती ती ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात. किं बहुना ती ‘क्षमता म्हणजेच ग्रीक- पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ असेही
समीकरण के ले गेले.
भारतीय तत्त्वज्ञान आणि चिनी तत्त्वज्ञान तात्त्विक विचारसरणीच्या संदर्भात अतिशय समृद्ध आहे, पण
ते त्यांच्या सांस्कृ तिक अन धार्मिक दबावाच्या चौकटीत बंदिस्त राहिले. तत्त्वज्ञान म्हणजे धर्म, असेच
समीकरण झाल्याने भारतीय तत्त्वज्ञानात आणि चिनी तत्त्वज्ञानात फारशी प्रगती झाली नाही. चिनी
तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानातील वैदिक तत्त्वज्ञाने , विशेषतः अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञान हे जणूकाही
‘शासनव्यवस्थेची तत्त्वज्ञाने’ (State Philosophies) किं वा राजकीय तत्त्वज्ञाने बनली. ती सर्व
प्रकारच्या शोषणव्यवस्था टिकवून व पोषण करणाऱ्या समाजव्यवस्था, राज्यव्यवस्थापूरक तत्त्वज्ञाने
झाली. परिणामी ही दोन्ही तत्त्वज्ञाने जागतिक तात्त्विक पटलावर फारसे स्थान मिळवू शकली नव्हती.
जेव्हा दोन्ही तत्त्वज्ञानांची काटेकोर चिकित्सा, परीक्षणे सुरु झाली, आणि ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान
परं परांशी तुलना सुरु झाली तेव्हा त्यांच्यात बदल होण्याची प्रक्रिया उशीराने, एकोणिसाव्या शतकाच्या
मध्यावर आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात सुरु झाली.
अर्थात आजही एकविसावे शतक सुरु झाले असले तरी भारतासारखा देश मात्र धर्माच्या विळख्यात
सापडलेला आहेच. उलट भारताची वाटचाल ‘हिंदू राष्ट्र ’ होण्याकडे सुरु झाल्याने भारतीय तत्त्वज्ञान
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 9/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
अवरुद्ध होण्याचीच लक्षणे दिसत आहेत. नेमके तेच चिनी तत्त्वज्ञानाबाबतही घडत आहे, असे दिसते.
चीन फार धार्मिक नसला तरी सत्तास्पर्धेत तो बलाढ्य होऊ पाहात आहे, जे लाओ-त्झूच्या
तत्त्वदर्शनाविरुद्ध आहे आणि कन्फ्युशियसच्या विचारांशी प्रतारणा करणारे , त्याच्या तत्त्वज्ञानाचा
विपरीत अर्थ लावणारे आहे.
बाराव्या शतकात भारतीय तत्त्वज्ञान परं परा वारकरी, भक्ति इत्यादी संप्रदायांनी तिची लोकभाषेत
मांडणी के ली. ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्या बंडखोरीमार्फ त गाडगेबाबा-तुकडोजी महाराजांच्या पर्यंत
वैदिक दर्शने जनसामान्यांना परिचित झाली खरी, पण के वळ संताच्या मार्फ त. सार्वजनिक शिक्षण
पद्धती नसल्याने भारत तत्त्वचिंतनात किती समृद्ध व संपृक्त आहे, याचा शोध सामान्य भारतीय
जनतेला मुदलात नव्हता, होती ती के वळ निर्घृण वर्ण-जाती-लिंगभेद व्यवस्था आणि कर्मकांडग्रस्त
समाजव्यवस्था. त्यामुळे च तर तुकोबांनी वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां
॥१॥ ( अभंग क्रमांक २२५६) असा बंडघोष के ला होता.
(‘मुक्त–संवाद’, ०१ ऑक्टोबर २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि
संपादित लेख.)
Share this:
Related
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 10/11
12/5/21, 2:09 PM तत्त्वज्ञानात्मक चिंतन - द वायर मराठी
बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार
लेखनशैली झाले त्याची गोष्ट
आमचे नेटवर्क
https://marathi.thewire.in/philosophical-thinking-bertrand-russell#more 11/11