Professional Documents
Culture Documents
ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास
ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास
ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास
2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच
अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. आता त्याचा वाढलेला वापर भाषांच्या विकासात
निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे.
तंत्रज्ञानामुळे भारतीय स्थानिक भाषा मागे पडतील की काय अशी भिती व्यक्त के ली जात होती. पण गेल्या काही वर्षात नवतंत्रज्ञानात भारतीय भाषेचा होत
असलेला वापर विचारात घेता आणि भारतीय काही स्थानिक भाषांनी यात घेतलेली आघाडी पाहाता. नव्या तंत्रज्ञानातही भारतीय भाषा टिकू ण तर राहणारच पण
जागतीक पातळीवर त्यांचा विस्तार होणार हे आता स्पष्ट जाणवत आहे. ट्विटरमध्येही आज भारतीय सात भाषांचा समावेश आहे. या भाषामध्ये इतर भाषेत
के लेले ट्विट भाषांतरीत करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे या भाषांच्या विकासाबरोबरच विस्तारालाही मोठा वाव निर्माण झाला आहे. हिंदी, गुजराती,
मराठी, उर्दु, तामिळ, बंगाली आणि कन्नड या भाषेत आज ट्विटर उपलब्ध आहे. यातून असेही म्हणता येईल की नवे तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित
करायचे झाल्यास ते तंत्र विविध भाषांत उपलब्ध करून दिल्यास त्या तंत्राचा विकास झपाट्याने होतो. त्यामुळेच आज जगात ट्विटर वापरात भारताचा तिसरा
क्रमांक लागतो. जानेवारी 2021 च्या आकडेवारीनुसार अमेरिके त 69.3 दशलक्ष ट्विटरचे वापरकर्ते आहेत. जपानमध्ये 50.9 तर भारतात 17.5 दशलक्ष
ट्विटरचे वापरकर्ते आहेत.
2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच
अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. आता त्याचा वाढलेला वापर भाषांच्या विकासात
निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे.
ट्विटरची व्याख्या –
२००६ मध्ये जॅक डॉर्सी यांनी ट्विटर विकसित के ले. तेव्हा ट्विटर हे उथळ आणि अगदी भाषेचा क्षोम करणारे आहे, असे जुन्या पिढीतील व्यक्तींना वाटले.
काहींनी ट्विटरची व्याख्या विसंगत माहितीचा एक छोटासा स्फोट अशी के ली.
सर्वाधिक ट्विट इंग्रजीत के ले जातात. त्या खालोखाल जापनिज, पोर्तुगिज, इंडोनेशियन, स्पॅनिश, डच, कोरियन, फ्रें च, जर्मन आणि मालये या भाषात ट्विट
के ले जाते. ट्विटरमध्ये भारत वापरकर्त्यांत तिसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी ट्विटरच्या टॉप १० मध्ये एकही भारतीय भाषा नाही. यासाठी भारतीय भाषामध्ये
ट्विट्सची संख्या वाढणे गरजेचे आहे. भारतीय भाषांचा ट्विटरवर वापर वाढल्यास साहजिकच भारतीय भाषांचे महत्त्व वाढेल. या भाषांचा विस्तार होणे सहज शक्य
होईल. यासाठी आकर्षक शब्द संवाद आणि प्रोत्साहित करणारे ट्विट वाढल्यास भारतीय भाषा जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण करू शकतील.
२०१७ मध्ये ट्विटरने शब्द मर्यादा वाढवून २८० अक्षरे इतकी के ली. याचा भाषेच्या वापरात मोठा फरक पडल्याचे दिसून आले. सुरुवातीस शब्दांची लघुरुपे
वापरली जात होती. त्याचे प्रमाण घटले. १४० शब्दांचे ट्विट करण्याचे प्रमाण आता एक टक्के इतके राहीले आहे. इंग्रजीत ur, u8, b4, gr8,
sry अशी लघुरुपे ट्विटमध्ये वापरली जात होती. शब्दमर्यादा २८० के ल्यानंतर अशा लघुरुपांच्या वापराचे प्रमाण कमी झाले. Gr8 चे प्रमाण ३६
ट्क्क्यांनी, b4 चे प्रमाण १३ टक्क्यांनी, sry चे प्रमाण ५ टक्क्यांनी घटले. तर शब्द मर्यादा वाढवल्यानंतर great (३२ टक्के ), before
(७० टक्के ), sorry (३१ टक्के ), please ( ५४ ट्कके ), Thank you (२२ टक्के ) लघुरुपात न वापरता पूर्ण शब्दात वापरण्याचे
प्रमाण वाढले.
ट्विटरप्रमाणे हे जागतिक स्तरावर विकसित होण्यास बऱ्याच अडचणी येणार आहेत. कारण अन्य परकिय भाषा यावर उपलब्ध नाहीत. यासाठी ट्विटरवर मराठी
भाषिकांनी जोर दिल्यास ‘कु ’ प्रमाणे यावर मराठीत अधिक ट्विट के ल्यास मराठीचा बोलबाला जगभर होऊ शके ल. मराठी भाषेतून मराठी संस्कृ ती, विचार,
मराठी बाणा जगभर पाहीला जाईल व साहजिकच ही भाषा शिकण्याची परकियांची ओढ लागेल. मराठीतील वाचनिय साहित्य, विचार यातूनच आपण मराठीचा
विस्तार जगभर करू शकतो. यासाठी ट्विटरच्या माध्यमातून तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
भारतीय भाषा ट्विटरवर येणे हे भाषेचे महत्त्व वाढवणारे आहे. पण भाषांच्या विकासासाठी तितकाच प्रयत्न होणे गरजेचे आहे. या भाषांमध्ये ट्विट्स वाढल्यास या
भाषांचे महत्त्व जागतिक पातळीवर निश्चितच वाढेल. या भाषा जागतिक पातळीवर विकसित होण्यास मदत होऊ शके ल. ट्विटरचे भारतीय वापरकर्त्ये साहजिकच
अधिक असल्याने हे शक्य होणारे आहे. चायनिय आणि इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ट्विटरचा वापर के ला गेला. तसा वापर भारतीय भाषा शिकण्यासाठी झाल्यास
या भाषांचा विकास आणि विस्तार जगभरात होऊ शके ल. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संदर्भ
इंटरनॅशनल जर्नल ऑफ एज्युके शनल टेकनॉलॉजी इन हायर एज्युके शन,
https://www.theatlantic.com/ REBECCA GREENFIELD OCTOBER 31, 2011
Impact on Lengh of tweet, Sarah Perez, techcrunch.com Octomber 30, 2018
Twitter as a formal and informal language learning tool: from potential to evidence
– Fernando Rosell-Aguilar1
What the Tweets say: A critical analysis of Twitter research in language learning
from 2009 to 2016.
David Hattem, United Nations, USA And Lara Lomicka, The University of South
Carolina, USA
‘LET’S TWEET TO LEARN ENGLISH’: USING TWITTER AS A LANGUAGE TOOL IN THE ESL/EFL
CLASSROOM PRAMOD KUMAR SAH University of Central Lancashire, UK LangLit An
International Peer-Reviewed Open Access Journal
The Language of Twitter Dr. Bethan Davies, UNIVERSITY OF LEEDS UNDERGRADUATE
DISSERTATION, DEPARTMENT OF LINGUISTICS AND PHONETICS.