Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

२. ध्यान- ध्यान का करावे ?

ध्यान का करायचे ?असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.पण मळ


ु ात ध्यान करता येत नाही ती करायची गोष्ट नाही
.पण त्यासाठी बसता मात्र येते .तर ध्यानासाठी का बसायचे? याची अनेक उत्तरे आहेत.कुणाला मानससक शाांती
,कुणाला तणावापासून मुक्ती,कुणाला मनाची शक्ती वाढवणे,तर कुणाला इतराांना दाखवण्यासाठी ध्यान करायचे
असते
पण सवव धमव पांथ याांना ठामपणे माहहत आहे कक स्वरूप जाणायला ,दे व कळायला ,आत्म
साक्षात्कार व्हायला ध्यानासशवाय दस
ु रा मागव नाही.ककां बहुना यासाठीच ध्यान आहे.आपण कोण आहोत हे कळणे
ज्याला महत्वाचे वाटते तो मुमुक्षु, आणण अश्या व्यक्तीलाच ध्यानात गोडी वाटते .अन्यथा या मागाववर
उत्सुकतेने जाणारे हे त्या ववांडो शॉवपांग करणाऱ्या मुखावसारखे आहेत,केवळ वेळ वाया घालवणारे .अशी गोडी नसेल
तर उगाचच इथे येऊ नये .त्याने धन गोळा करावे .सुखाने सांसार करावा.त्यात काही पाप नाही, कमीपणा नाही .
मात्र जीवनात खरी शाांती,समाधान,आनांद याांच्या शोधत ननघालेला वाटसरू एक हदवस ध्यानाच्या
मुक्कामाला येणारच यात सांशय नाही.

You might also like