Professional Documents
Culture Documents
संभाजी भोसले - विकिपीडिया
संभाजी भोसले - विकिपीडिया
या लेखातील मजकू र मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत
करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन Learn more
राजधानी रायगड
जन्म १४ मे १६५७
आई राणी सईबाई
संतती भवानीबाई
शाहू पहिले
राजघराणे भोसले
बालपण
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी
किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे
रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच
यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
तारुण्य
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान
बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले
होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी
रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे के ले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२
दिवसात जिजाऊं चे निधन झाले. त्यानंतर
संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही.
शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि
रणांगणावर गुंतले होते.
मुद्रा व दानपत्र
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
धार्मिक धोरण
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी
महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या
पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे
वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे
जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...
युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक
आणि अद्भुत अशा कार्याचा जर कु णी आढावा घेतला
तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे
राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व
बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा
आदर्श डोळ्यासमोर ठे वलेला दिसतो. या प्रमाणेच
त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी
महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
संतजनांस राजाश्रयः
शारीरिक छळ व मृत्यू
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे
सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड,
आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने
संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून
इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास
जीवनदान देण्याचे मान्य के ले. पण संभाजी महाराजांनी
त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी
महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे
घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात
आली. तरीही संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि
शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने
त्यांना क्रू रपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा
आदेश दिला. तरीसुद्धा संभाजी महाराजांनी
धर्मपरिवर्तन के ले नाही.
साहित्य
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने
लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृ त
भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी
वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृ त
ग्रंथ लिहिला.
ललित साहित्य
(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि
कादंबऱ्या)
नाटके
संभाजी महाराजांवरील नाटके
इथे ओशाळला मृत्यू (लेखक : वसंत कानेटकर)
चैतन्यगाथा तेजपुत्राची (लेखक : ?)
संगीत छत्रपती संभाजी (लेखक : आत्माराम मोरेश्वर
पाठारे)
बेबंदशाही (लेखक : वि.ह. औंधकर)
मृत्युंजय
मृत्युंजय अमावस्या (महा-नाट्य : लेखक/दिग्दर्शक :
नीलेश भिसे)
राजसंन्यास (लेखक : राम गणेश गडकरी)
रायगडाला जेव्हा जाग येते (लेखक : वसंत
कानेटकर); एप्रिल २०१३पर्यंत २४२५ प्रयोग
शंभुराजे (महानाट्य) : (लेखक : नितीन बानुगडे
पाटील)
शूर संभाजी (लेखक : ?)
शिवपुत्र शंभुराजे (महानाट्य) (दिग्दर्शन/संवादः महेंद्र
महाडीक)
नरशार्दुल राजा संभाजी (लेखक - इंद्रजित सावंत)
हे सुद्धा पहा
संभाजी महाराज यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची
यादी
संदर्भ
1. शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले .
2. पाटील, विश्वास (February 2018 16th edition).
संभाजी. Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस. pp. Whole
book. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
बाह्यदुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
खालील विषयाशी संबंधित
संचिका आहेत:
संभाजी भोसले
"https://mr.wikipedia.org/w/index.php?
title=संभाजी_भोसले&oldid=2293499" पासून हुडकले