Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

राज्यव्यापी व्याख्यानसत्र

नमस्कार
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही १५ ऑगस्ट २०२३ ते ३० जानेवारी २०२४ या
कालावधीमध्ये ‘वैचारिक घुसळण’ अशा प्रकल्पा अंतर्गत ७५ व्याख्यानांचे सत्र आयोजित करत आहोत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर एकू णच समाजामध्ये जीवनशैली पेक्षा जीवनाचा दर्जा याबद्दल विचार व्हावा,
असा प्रयत्न या उपक्रमात असेल. त्या दृष्टीने या सहा महिन्यांतील व्याख्यानसत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी वक्ते
यामध्ये सहभागी होणार आहेत. अन्य सद्यकाळातील आव्हानात्मक विषय यामध्ये असतील. ही व्याख्यानमाला
के वळ एक उपक्रम न ठरता त्यातून वैचारिक आंदोलन निर्माण व्हावे आणि खर्‍या अर्थाने नवतरुणांमध्ये वैचारिक
घुसळण व्हावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आधुनिक काळात तंत्रविज्ञानाने विविध ज्ञानशाखा समाजासमोर खुल्या करून ठेवल्या आहेत. त्या समजावून
सांगून विद्यार्थ्यांना नवीन काळास अभिमुख करणे हा या व्याख्यानांचा व त्यामधून निर्माण होणाऱ्या संभाव्य
ज्ञानचर्चांचा/वादविवादांचा हेतू आहे. व्याख्यान, गटचर्चा, शिबीर, संवाद, मुलाखत किं वा डिजिटल सादरीकरण
अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांशी गप्पा होतील.
वैचारिक घुसळणीचा हा प्रस्ताव घेऊन थिंक महाराष्ट्र डॉट कॉम- सद्‍भावनेचे व्यासपीठ (मुंबई), के रवाडीची
स्वप्नभूमी (परभणी), ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे) आणि आरोग्य भान (पुणे) या संस्था तुमच्यापर्यंत आल्या
आहेत.
आमची विनंती अशी, की आपल्या कॉलेजमध्ये या उपक्रमातील व्याख्याने, चर्चासत्र, व्याख्यानमाला किं वा
गटचर्चा योजून या मोहिमेत सहभागी व्हावे. हे व्याख्यान 15 ऑगस्ट 2023 ते 30 जानेवारी 2024 या दरम्यान
कोणत्याही सोयीच्या दिवशी योजलेत तरी चालू शके ल.
ग्रंथालये आणि महाविद्यालये हा या उपक्रमाचा आरंभबिंदू असणे महत्त्वाचे वाटते. हे काम आम्ही स्वयंप्रेरणा
आणि सामाजिक जबाबदारी या भावनेतून आणि स्व खर्चाने करत आहोत. आपण आपल्यास शक्य होईल तशी
आर्थिक मदत करावी.
या कामासाठी आपल्या प्राध्यापक वर्गापैकी कार्यतत्पर व इच्छु क प्राध्यापकांची नियुक्ती करावी आणि त्यांचा
संपर्क मला कळवावा. तारखा निश्चित करून कळवले म्हणजे पुढील कार्यवाही सुरू करणे मला शक्य होईल.
त्याप्रमाणे तज्ज्ञ व्याख्यात्याचे नाव व त्यांची उपलब्धता कळवता येईल. व्याख्यानासोबत ऑडिओ-व्हिज्युअल
प्रेझेंटेशन आवश्यक असेल तर त्याबाबतही संबंधित वक्त्यांशी विचारविनिमय करून ठरवता येईल.
सोबत विषयाची यादी जोडली आहे.
कळावे. पत्रोत्तराच्या अपेक्षेत.
धन्यवाद.

अपर्णा महाजन
समन्वयक
९८२२० ५९६७८
aparnavm@gmail.com

You might also like