एआय', पाणी आणि तुम्ही-आम्ही

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

12/12/2023, 23:44 ‘एआय’, पाणी आणि तुम्ही-आम्ही samrat phadnis writes artificial intelligence water you and we

ताज्या देश शहर साप्ताहिक क्रीडा ग्लोबल व्यासपीठ मनोरंजन निवडणूक महाराष्ट्र वेब स्टोरीज आणखी Epaper प्रीमियम ॲग्रोवन

हा टॉप-10 यादी ''जेव्हा भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालू न सभागृहात आले होते...'' शरद पवारांनी सांगितला तेरा वर्षांपूर्वीचा किस्सा कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता; आमदारांच्या गटासह एक मो

सप्तरंग

‘एआय’, पाणी आणि तुम्ही-आम्ही


उरुग्वेची राजधानी माँटेविडिओ इथं मेमध्ये पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर निदर्शनं झाली. सुमारे १८ लाख लोकवस्तीच्या
या राजधानीच्या शहरात लोकांची मागणी होती : ‘पाणीबाणी’ जाहीर करावी.

Water Sakal

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

Updated on: 10 December 2023, 6:05 am

उरुग्वेची राजधानी माँटेविडिओ इथं मेमध्ये पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर निदर्शनं झाली. सुमारे १८ लाख लोकवस्तीच्या
या राजधानीच्या शहरात लोकांची मागणी होती : ‘पाणीबाणी’ जाहीर करावी. पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवत असल्यानं या
क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी आणि खासगी हस्तक्षेप कमी करावा.’ एरवी, पाण्याच्या मागणीसाठी जगभरात हजारो
निदर्शनं होत असतात.

त्यामुळे, या निदर्शनांकडे कु णाचं स्वतंत्रपणे लक्ष जाण्याचं काही कारण नाही. तथापि, या आंदोलनाची एक घोषणा
लक्षवेधी ठरली. ती होती : ‘पाण्याचं संरक्षण’ (डिफे न्स ऑफ वॉटर). ‘पाणी वाचवा’च्या घोषणा याआधी झाल्या होत्या.
‘पाण्याचं संरक्षण’ या घोषणेत नावीन्य होतं.

‘एआय’ची तहान

त्याआधीच्या महिन्यात, एप्रिलमध्ये पाणीवापराबद्दल नावीन्यपूर्ण संशोधन प्रसिद्ध झालं. ‘आर्टिफिशिअल


इंटेलिजन्सवर (एआय) आधारित चॅटजीपीटी-३ सॉफ्टवेअर चालवण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरला सात
लाख लिटर स्वच्छ पाणी लागतं,’ असं कॅ लिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी दाखवून दिलं. ‘एआय’ची मागणी
येत्या काळात वाढत जाणार आहे.

येत्या चार वर्षांत, २०२७ पर्यंत ‘एआय’साठी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता साधारण ४.२ ते ६.६ अब्ज घनमीटर
इतकी प्रचंड असणार आहे, असं सशोधकांनी मांडलं. सुमारे तीन ते चार कोटी लोकसंख्येला लागणारं पाणी
‘एआय’च्या डेटा सेंटरना आवश्यक असेल असं या संशोधकांचं म्हणणं होतं. हे सारं पाणी पिण्याच्या दर्जाचं असणार
आहे.

डेटा सेंटर्सचा पाणीवापर

आता, अगदी ताजी घडामोड. तीही अमेरिके तल्या व्हर्जिनिया प्रांतातली. जगातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं व्हर्जिनिया
म्हणजे हृदय. व्हर्जिनियातल्या वायव्य सरहद्दीवर जगातली सर्वाधिक डेटा सेंटर्स आहेत. जगाच्या इंटरनेटचे ७० टक्के
व्यवहार या भागातून चालतात. अॅमेझॉन, गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट इथं काम करतात. या भागातल्या
पर्यावरणवाद्यांनी डेटा सेंटर्सना ऊर्जा आणि स्वच्छ पाण्याच्या वाढत्या गरजेबद्दल काळजी व्यक्त के लीय.

सन १९९० ते २००० या काळात इथं डेटा सेंटर्स निर्माण व्हायला लागली. मुबलक जमीन, सातत्यपूर्ण वीजपुरवठा
आणि संगणक थंड ठे वण्यासाठी मुबलक पाणी या तीन गरजा व्हर्जिनियात पूर्ण होत होत्या. दोन दशकांत या

https://www.esakal.com/saptarang/samrat-phadnis-writes-artificial-intelligence-water-you-and-we-pjp78 1/4
12/12/2023, 23:44 ‘एआय’, पाणी आणि तुम्ही-आम्ही samrat phadnis writes artificial intelligence water you and we
भागातलं हवा-पाणी बिघडल्याची तक्रार सुरू झाली आहे. डेटा सेंटर्सच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणाची मागणी
पहिल्यांदाच स्थानिकांमधून व्हायला सुरुवात झालीय.

डेटा सेंटर की सुसह्य वातावरण या पर्यायांमध्ये नागरिक वातावरणाला प्राधान्याकडे झुकत आहेत. भविष्यकाळात
येऊ घातलेल्या नव्या संघर्षाची नांदी म्हणून मावळत्या वर्षातल्या या घडामोडींकडे पाहायला हवं.

हा संघर्ष पाणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्यातला असणार आहे. तंत्रज्ञान अपरिहार्यही बनत जाणार आहे आणि
ते वापरण्यासाठी लागणाऱ्या स्वच्छ पाण्याचं दुर्भिक्ष्यही वाढत जाणार आहे. एकविसाव्या शतकात पाण्यासाठी युद्धं
होतील, अशी चर्चा विसाव्या शतकात व्हायची. एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकात तंत्रज्ञान आणि पाणी
यांच्यातल्या संघर्षाचा नवा पदर या चर्चेला जोडला गेला आहे. दोन अथवा अधिक देशांमध्ये पाण्यासाठी होणाऱ्या
संघर्षांपेक्षा हा पदर अत्यंत निराळा आणि क्लिष्ट असणार आहे.

वाढत्या पाणीवापराकडे वाटचाल

गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून पाण्याचा वापर वाढत गेला आहे. उदाहरणार्थ : सन १९०१ मध्ये जगाला पाचशे
अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी पुरेसं होतं. तेव्हा जगाची लोकसंख्या १६० कोटी होती. आज भारताचीच लोकसंख्या
१४० कोटींवर पोहोचली आहे. जगाचा आजचा पाणीवापर गेल्या १२० वर्षांच्या तुलनेत सुमारे आठ पटींनी वाढला
आहे. आज चार हजार अब्ज घनमीटर इतकं पाणी जगाला लागतं. भारताची पाण्याची गरज जगात पहिल्या
क्रमांकावर आहे.

पाणीवापर वाढण्यामागं लोकसंख्या हे एकच कारण पुरेसं मानता येत नाही. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता
पूर्वापार आहे. त्यामध्ये भर पडलीय ती औद्योगिकीकरणाची. एकविसाव्या शतकात औद्योगिकीकरणाला जोड
मिळालीय ती माहिती तंत्रज्ञान उद्योगाची. पाण्याचा वाढता वापर करणाऱ्या व्यवस्थेकडे जगानं गेल्या शतकभरात
वाटचाल के लेली आहे.

पाणीवापरातले विरोधाभास

या १२० वर्षांच्या कालखंडातला एक विरोधाभासही ठळकपणे समोर येतो. पाण्याची उपलब्धता तितकीच राहिली
असली तरी ते उपसण्याच्या, वाहून नेण्याच्या आणि वापराच्या तंत्रज्ञानात या शतकात झपाट्यानं प्रगती झाली.
परिणामी, पाण्याची गरज भागवणं सोपं झालं. लोकांना पिण्यासाठी पाणी पुरवणं असो किं वा डेटा सेंटरमधले
संगणक थंड ठे वण्यासाठी पाणी वापरणं असो, अभियांत्रिकी तंत्रज्ञानानं या प्रक्रिया सोप्या झाल्या.

परिणामी, पाणीवापर वाढला. पाण्याच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित होण्याचाही हाच १२०
वर्षांचा कालखंड आहे. नद्या-विहिरींमधून हातानं पाणी उपसून काढणाऱ्या माणसांनी आधी मोटारी बसवल्या, मग नळ
बसवले आणि पाणी थेट घरात आणलं. वाहत्या पाण्याला बांध घालू न ते अडवून हवं तेव्हा वापरता येईल असे मार्ग
शोधून काढले. पाण्यापासून वीज तयार के ली.

पाणी वापरून औष्णिक ऊर्जाप्रकल्प निर्माण के ले. आण्विक ऊर्जाप्रकल्पातही पाणी हा अपरिहार्य घटक आहे.
पाण्याचं ऊर्जेत रूपांतर तंत्रज्ञानानं या कालखंडात जोमानं के लं. पाणी शुद्ध करण्यातही तंत्रज्ञान आलं आणि
पाण्यातून पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठीही ते वापरलं गेलं.

तंत्रज्ञानानं पाणीवापर वाढवला हे स्पष्ट दिसतं आणि आता तंत्रज्ञानासाठीही पाणीवापर वाढतो आहे, हेही दिसू लागलं
आहे. भविष्यकाळ अशा एका विचित्र कात्रीच्या दिशेनं जात असल्याचं हे चिन्ह मानता येतं. येत्या काळात ‘एआय’चा
वापर विलक्षण गतीनं वाढेल यात शंका नाही.

या वापराबरोबरच खासगी कं पन्यांना डेटा सेंटर्सही वाढवावी लागतील. क्षणोक्षणी माहितीवर प्रक्रिया करणारे हजारो
संगणक थंड ठे वणं, त्या संगणकांच्या आसपासचं वातावरण थंड ठे वणं यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज
लागणार आहे. ले खाच्या सुरुवातीला उल्ले ख के लेल्या कॅ लिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी असं सिद्ध के लं
आहे की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या कं पन्या पाण्याच्या गरजेबाबत नागरिकांना अंधारात ठे वतात. निम्म्या
ब्रिटनला पुरेल इतकं पिण्याचं पाणी जगातल्या डेटा सेंटर्ससाठी वापरावं लागेल, याची बहुसंख्य नागरिकांना कल्पना
नाही. अशा परिस्थितीत पाण्याच्या वापरासाठीही तंत्रज्ञानाचा विकास होत राहणार आहे.

सावध होण्याचा सांगावा

यात आणखी एक गुंतागुंत आहे. ‘एआय’ वापरण्यासाठी प्रचंड पाणी लागणार आहे आणि पाणीवापर कसा के ला
पाहिजे हेदेखील ‘एआय’ वापरूनच कळणार आहे. पाणीवापराची वेगवेगळी प्रतिमानं तयार करण्यासाठी मोठ्या
प्रमाणात मशिन लर्निंगचं तंत्रज्ञान वापरायला गेल्या दोन वर्षांत सुरुवातही झाली आहे. उद्याच्या शहरांना-गावांना
किती पाणी, किती वेळ दिलं पाहिजे हे ठरवण्यासाठी ‘एआय’ वापरलं जाईल. हे ‘एआय’ स्वतःही पाणीच वापरेल.

पाण्यावर अधिकार कु णाचा, हा संघर्ष आतापर्यंत देश, प्रांत अशा प्रामुख्यानं मानवी व्यवहारांमध्ये होता. हा संघर्ष,
पाण्यावर अधिकार तंत्रज्ञानाचा की माणसांचा, या दिशेनं जाण्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पाणी निर्माण करणं
न जमलेल्या माणसानं सावध व्हायला हवं, हा या खुणांचा सांगावा आहे.

https://www.esakal.com/saptarang/samrat-phadnis-writes-artificial-intelligence-water-you-and-we-pjp78 2/4
12/12/2023, 23:44 ‘एआय’, पाणी आणि तुम्ही-आम्ही samrat phadnis writes artificial intelligence water you and we

water artificial intelligence saptarang

Show Comments

Related Stories
Nagpur Water Pollution: अर्ध्या नागपूरचे आरोग्य धोक्यात !
कन्हान नदी सर्वाधिक प्रदूषित, पाणी पिणे अपायकारक
सकाळ डिजिटल टीम 04 December 2023

तरडोलीत पाण्याची तीव्र पाणी टंचाई


CD 23 November 2023

दुष्काळावर उतारा ‘नदीजोड’चा


सकाळ वृत्तसेवा 21 November 2023

Nashik News: नांदगावला रेल्वेच्या सबवेत पाण्याचे तळे! एकीकडे


दुर्भिक्ष्य; दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी
सकाळ वृत्तसेवा 13 November 2023

Life cover of ₹1Cr at Affordable Price with this Term Plan


Give your family the gift of life like ₹1Cr Term Insurance at just ₹702 per month* today! (*T&C Apply)
MaxLife Term Plan | Sponsored Get Quote

Get Your MBA Online, Anytime [Enroll Now]


Take the next step in your career with an online MBA degree. Experience the flexibility of learning anytime, anywhere.
Easy MBA Online | Search Ads | Sponsored Learn More

Maratha Aarakshan : अंतरवाली सराटीत झाले ल्या दगडफे कीतील प्रमुख आरोपी ऋषिके श
बेदरे ची क्राईम हिस्ट्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु के लं होतं. पण त्यावेळी
मोठी हिंसाचाराची घटना घडली होती. १ सप्टेंबर २०२३ रोजी उपोषणादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. …
पो ली
Sakal लो ठी र्ज ध्ये दो मी रो

₹2Cr Term Insurance at just ₹1099 per month*


₹2Cr Term Plan that secures your family and gives you complete coverage @₹1099/month*! (*T&C Apply)
MaxLife Term Plan | Sponsored Get Quote

Pune: Online MBA Degree [Free Courses]


Take the next step in your career with an online MBA degree. Experience the flexibility of learning anytime, anywhere.
Easy MBA Online | Search Ads | Sponsored Learn More

https://www.esakal.com/saptarang/samrat-phadnis-writes-artificial-intelligence-water-you-and-we-pjp78 3/4
12/12/2023, 23:44 ‘एआय’, पाणी आणि तुम्ही-आम्ही samrat phadnis writes artificial intelligence water you and we

Belly Fat Removal Without Surgery in Pune: The Price Might Surprise You
Belly Fat Removal IN | Sponsored Click Here

Ajit Pawar यांच्या बंडामागची इनसाईड स्टोरी, काय होती कारणं?


राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडानंतर दू सरा मोठा भूकं प झाला तो राष्ट्र वादीत, राष्ट्र वादीत काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते
अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारला पाठिं बा दिला. एवढं च नाही आपल्यासोबत ४० आमदार …
णि
Sakal ही घे जि हे ले त्री ची

Angel One Demat Account


Angel Broking One | Sponsored Sign Up

Careers

Ads Rate Card

Terms of services

Follow Us

About Us | Contact Us | Advertise with Us | Terms and Conditions | Privacy Policy | Refund and Cancellation

Sakal Media Pvt Ltd


Powered by Quintype

https://www.esakal.com/saptarang/samrat-phadnis-writes-artificial-intelligence-water-you-and-we-pjp78 4/4

You might also like