Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

शुक्ल यजुर्वेदाचा शेवटचा म्हणजे ४० वा अध्याय म्हणजे ईशोपनिषद किं वा ईशावास्य उपनिषद

होय. आधीचे ३९ अध्याय हे कर्मकांडाविषयी आहेत आणि हा शेवटचा अध्याय मात्र ईश तत्वाविषयी आहे.

संहितेचा भाग असलेले हे एकमेव उपनिषद आहे. ईश उपनिषदा मध्ये फक्त १८ मंत्र आहेत, पण या १८

मंत्रात जगण्या विषयी मार्गदर्शन आणि परिपूर्ण तत्व विचार दोन्ही आहे. अस म्हणतात की या लहानश्या

उपनिषदात वेदांचे सार आहे, गीतेचे बीज आहे. याची सुरवात ‘ईशावास्यमिदं सर्वम् ‘ अशी होते म्हणून

याला ईश किं वा ईशावास्य उपनिषद असे म्हणतात.

या उपनिषदाचा शांतिमंत्र :

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।


पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

हा माझा खूप आवडता शांतिमंत्र आहे. ते जे दूर आहे, माझ्या दृष्टीपलीकडचे आहे ते परिपूर्ण
आहे. हे जे माझ्या जवळ आहे, जे माझे जग आहे ते पूर्ण आहे. त्या पूर्णातूनच हे पूर्ण व्यक्त झाले आहे. जे
अथांग आहे, परिपूर्ण आहे त्यातून पूर्ण काढू न घेतले तरीही पूर्णच शेष राहते. गणितात इन्फिनिटी ची
कल्पना हीच तर आहे. इन्फिनिटी मधून काहीही काढू न घेतले तरीही इन्फिनिटी च शिल्लक राहते.

ॐ ई॒शा वा॒स्य॑मि॒ द सर्वं॒ यत्किं च॒ जग॑त्यां॒ जग॑त् ।


तेन॑ त्य॒ क्तेन॑ भुञ्जीथा॒ मा गृ॑धः॒ कस्य॑ स्वि॒द्धन॑म् ॥१॥

हे आपल्या आजूबाजूचे गतिमान जग , हे जे अविरत उत्पत्ती-स्थिती-लय या मधून फिरणारे कालचक्र


आहे, हे सर्व एका ईश तत्वाने व्यापले आहे. सर्वत्र त्याचाच वास आहे.
या जगाचा उपभोग घे पण त्याचा त्यागाने उपभोग घे. त्यक्तेन भुञ्जीथा॒.
आयुष्य एन्जॉय करा, मनापासून करा पण हे माझे आहे, मी के ले या भावनेने नाही. जसे वाट्याला आले
आहे तसे आनंदाने स्वीकारत , इतरांच्या वाट्याला जे आले आहे त्यावर डोळा ठे वता, न ओरबाडता
आपल्या जीवनाचा उपभोग घ्या. आपल्या वाट्याला आलेले नाही त्याची हाव कशाला? जे जीवन माझ्या
वाट्याला आलेले आहे ते मात्र मी पूर्णपणे जगायला हवं.

कु॒ र्वन्ने॒वेह कर्मा॑णि जिजीवि॒षेच्छ॒ त समाः॑ ।


ए॒वं त्वयि॒ नान्यथे॒ तो॑ऽस्ति॒ न कर्म॑ लिप्यते॒ नरे॑ ॥२॥

या जगात कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा के ली पाहिजे. याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त
होण्याचा मार्ग नाही. या प्रकारे कर्म के ल्यास तुला कर्म बंधनकारक होत नाही. असा याचा अर्थ.
पण आपले कर्म कोणते हे कसे कळावे? असा प्रश्न मनात आला आणि नेमका आजच तुकारामांचा एक
अभंग वाचला, तो असा आहे:

आला भागासी तो करी वेवसाव । परी राहो भाव तुझ्यापायी ।।१।।


काय चाले तुम्ही बांधले दातारा । वाहिलीया भार उसंतीतो ।।२।।
शरीर ते करी शरीराचे धर्म । नको देऊ वर्म चुको मना ।।३।।
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ।।४।।
इंद्रिये करोत आपला व्यापार । आवडीसी थार देई पाई ।।५।।
तुका म्हणे नको देऊ काळाहातीं । येतो काकु ळती म्हणऊनि ।।६।।

आणि मग मला आपोआप उत्तर मिळाले.

क्रमशः

You might also like