Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

प्रति,

मा. संपादक सो.


दैनिक __________________

सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे हि नम्र विनंती.

क्रीडा प्रसिद्धीसाठी
साउथ मुंबई येथील बुद्धिबळ स्पर्धेत नंदुरबारच्या
७ वर्षा खालील बुद्धिबळ खेळाडूंची उत्कृ ष्ट कामगिरी

नंदुरबार – नुकत्याच मुंबई येथील वर्ड ट्रेड सेंटर येथे महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या मान्यतेने साउथ मुंबई जुनियर चेस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली
यात संपूर्ण महाराष्ट्रातील बाल गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतांना अश्वमेघराज चेस क्लब चे
खेळाडु नारायणी उमेश मराठे व भूमि जितेंद्र धगधगे यांनी उत्कृ ष्ट कामगिरी करत सात वर्षाखालील गटात बेस्ट अंडर ७ व बेस्ट अंडर ६ चे परितोषिक
पटकावले.

नारायणी उमेश मराठे हिने ह्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व के ले होते तर मागील महिन्यात मुंबई येथे झालेल्या
७ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश संपादन के ले होते हि कामगिरी करणारी बाल गटातील ती पहिली खेळाडू ठरली.
तसेच भूमि जितेंद्र धगधगे हिने ह्या वर्षी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले तर मागील महिन्यात मुंबई
येथे झालेल्या ७ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत देखील बेस्ट प्लेयर पारितोषिक पटकावले.

दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे नाव लौकिक के ले. खेळाडूंना अश्वमेघराज चेस क्लबचे राष्ट्रीय प्रशिक्षक शोभराज खोंडे, मेघा
खोंडे, अश्वमेघराज खोंडे, सागर महाजन, विनीत बागुल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खेळाडूंचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

You might also like