Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

चित्रकथा

हुशार कावळा

एकदा एका कावळ्याला खूप तहान लागली होती.

पाण्यासाठी तो इथे तिथे उडत होता. इतक्यात त्याला एक मडके

दिसले. तो उडत उडत त्या मडक्या जवळ आला. त्याने मडक्यात

पाहिले, पण त्या मडक्यात पाणी खूप कमी होते. त्याने प्रयत्न केला

, पण त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती.

कावळा इथे-तिथे पाहू लागला. त्याला तिथे काही दगड

पडलेले दिसले. त्याला एक युक्ती सुचली. एक-एक दगड चोचीत

घेऊन तो पाण्यात टाकू लागला. हळूहळू पाणी वर आले. त्याला

खूप आनंद झाला. त्याने पाणी पिले आणि उडू न गेला.

तात्पर्य - अडचणीच्या वेळी आपण योग्य विचार केला पाहिजे.


प्रश्न - खाली दिलेल्या चित्रावरून कथा लिहा. तिला योग्य शीर्षक दे ऊन तात्पर्य लिहा.

सिंह आणि उंदीर

एक होता सिंह. तो जंगलात राहायचा. एकदा तो झोपला होता. तिथे

उंदीर आला, उंदीर सिंहाच्या पोटावर उड्या मारू लागला. सिंह जागा

झाला. त्याने उंदराला पकडले, उंदीर घाबरला. तो म्हणाला, “मला सोडा,

मला सोडा. मी तुम्हाला कधीतरी मदत करेन.". सिंह हसला आणि

म्हणाला, "तू एवढा लहान, तू माझी मदत कशी करणार"? घाबरलेल्या

उंदराला पाहून सिंहाला त्याची दया आली. त्याने उंदराला सोडू न दिले.

काही दिवसांनी जंगलात एक शिकारी आला. शिकाऱ्याने सिंहाला

जाळ्यात पकडल
ं . सिंह जोरजोरात गर्जना करू लागला. सिंहाची गर्जना

उंदराने ऐकली, बिळातून बाहेर येऊन पाहतो, तर काय सिंह जाळ्यात

अडकलेला!

उंदराने सगळे जाळे कुरतडले. सिंहाची सुटका झाली. सिंह उंदराच्या

कामगिरीवर खुश झाला आणि त्याने उंदराचे आभार मानले.

तात्पर्य - कधीही कोणाला कमी समजू नये.


.

ससा आणि कासव

एक होता ससा आणि एक होता कासव. त्या दोघांची खूप छान मैत्री होती.

एके दिवशी सशाने कासवाला सांगितले, की आपण धावण्याची शर्यत

लावूया. कासव खूप हळू चालतो हे पाहून सशाला वाटले की, तो ही शर्यत

आरामात जिंकेल. सशाला खूप गर्व झाला होता.

शर्यत सुरू झाली. कासव हळूहळू चालू लागले. ससा टु णूक टु णूक उड्या

मारून त्याच्या पुढे गेले. कासव खूप लांब आहे, हे पाहिल्यावर सशाने ठरवले,

की थोडा आराम करावा. त्याने गाजर खाल्ले. तो झाडाखाली विश्रांती घेत

असताना त्याला गाढ झोप लागली.

बराच वेळ झाला, ससा अचानक जागा झाला. पाहतो तर काय! कासव

आधीच पोहोचले होते व शर्यत जिंकले होते. सश्याला फार वाईट वाटले.

तात्पर्य- अती आत्मविश्वास घातक असतो.

You might also like