Notice Cum Objection To Eviction Notice

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

दिनांक - १७.०२.२०२४.

प्रति,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस स्टेशन, भोसरी,
पुणे ४१२१०५.
विषय - अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि, दापोडी शाखा यांची दिनांक
२७.०२.२०२४ रोजीची ताबा कारवाई तात्काळ रद्द करणेकामी अर्ज.
संदर्भ - भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे जावक क्रमांक -
११३६/२०२४, दिनांक:१६.०२.२०२४ रोजीचे समजपत्र.
महोदय,
मी श्रीमती रेणुका अजय पोतदार, रा. श्री. गणेश रेसिडेन्सी, दुसरा मजला, सदनिका क्र. १२, स. नं.
२२४/२/१, सिटीएस नं. ४३९६, भोसरी, मो. नं. ७७५६९८५३४१, येथील रहिवासी, श्रीमती सुवर्णा
दत्तात्रय सत्रस व श्री. दत्तात्रय जयवंत सत्रस, सध्या रा. शिरपुर, मलथान रोड, बुरुं जवाडी, पुणे यांच्याविरुद्ध
अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. शाखा दापोडी, यांची दिनांक २७.०२.२०२४ रोजीची ताबा
कारवाई तात्काळ रद्द करणेकामी विनंती अर्ज दाखल करू इच्छिते. सदर विनंती अर्ज दाखल करण्यास
कारणीभूत तथ्य खालीलप्रमाणे आहेत -
दिनांक १६.०२.२०२४ रोजीचे समजपत्रव्दारे आपण कळविले की, प्राधिकृ त आधिकारी श्री.
किशोर शिवदास कदम, अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. यांनी कर्जदार नामे १) श्रीमती सुवर्णा
दत्तात्रय सत्रस २) श्री. दत्तात्रय जयवंत सत्रस सध्या रा. शिरपुर मलथान रोड, बुरुं जवाडी पुणे यांनी,
अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. यांचा येथुन गृहकर्ज घेतले असुन, सदर गृहकर्ज घेण्यासाठी
त्यांनी मी राहत असलेली सदनिका क्र.१२, श्री. गणेश रेसिडेन्सी, दुसरा मजला, स. नं. २२४/२/१, सिटीएस
नं. ४३९६, भोसरी ही त्यांची मालमत्ता, अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. यांचाकडे गहाण
ठेवल्याबद्दल माहिती दिली. त्यांनी बँके चे गृहकर्ज न फे डल्याने अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि.
यांनी मा. जिल्हाधिकारी, पुणे गृह शाखा क्र. सिक्यु/एसआर/१९४५/२०२२, दिनांक ०६.०३.२०२० यांचे
आदेशावर अपर तहसिलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड, ता. हवेली, पुणे यांचे जावक क्र.
फौज/ताबा/एसआर/५२७/२०२३ दिनांक १२.०१.२०२४ यांचे आदेशान्वये दिनांक २७.०२.२०२४ रोजी,
ताबा घेण्यासाठी ऑर्डर करण्यात आलेली माहिती दिली. सदर आदेशान्वये दिनांक २७.०२.२०२४ रोजीचे
सकाळी ०९.३० वा. मिळकतीचा ताबा कारवाई करीता, शासकीय अधिकारी व बँके चे अधिकारी येणार
असल्याची माहिती दिली. सदरचे फ्लॅटबाबत आर्थिक व्यवहार कर्जदार नामें १) श्रीमती सुवर्णा दत्तात्रय
सत्रस २) श्री. दत्तात्रय जयवंत सत्रस यांचाशी के ले असतील तर त्या कागदपत्रांची पुर्तता आपण पोलीस
स्टेशन व श्री. रोहीत कै लास गवळी, अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि., शाखा - दापोडी यांचाकडे
करण्याबाबत माहिती दिली.
सबब आपणास याव्दारे कळविण्यात येते की, मी आणि माझे पती श्री. अजय अरुण पोतदार यांनी
संयुक्तपणे १) श्रीमती सुवर्णा दत्तात्रय सत्रस, २) कु . शुभम दत्तात्रय सत्रस, ३) कु . सुहानी दत्तात्रय सत्रस
आणि ४) श्री. दत्तात्रय जयवंत सत्रस, सध्या रा. शिरपुर, मलथान रोड, बुरुं जवाडी, पुणे यांच्या विरुद्ध पिंपरी
येथील में. दिवाणी न्यायाधीश साहेब, कनिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयात, सदरचे मी राहत असलेली
सदनिका बाबत निरंतर ताकीद मिळण्यासाठी नियमित दिवाणी दावा क्र. १६४/२०२१ अन्वये दाखल के ले
आहे. सदरील दाव्यामध्ये प्रथम आदेश परित झाले असून, प्रतिवादी क्रं . १ ते ४ हे, पिंपरी न्यायालयात
हजर राहण्याकरिता पुढील तारीख २७.०२.२०२४ अशी ठेवण्यात आली आहे आणि त्याच दिवशी
आपण ताबा कारवाई करणार असल्याचे समजपत्र आपण मला दिले आहे. सदरील ताबा कारवाई संबंधी
माहिती ही मला नव्याने आणि पहिल्यांदाच प्राप्त झाली असून आपण मला नैसर्गिक न्यायतत्वाच्या
आधारावर मला कोणतीही संधी न देता सदरील ताबा कारवाई के ल्यास, माझे व माझ्या कु टुंबाचे कधीही न
भरून निघणारे नुकसान होणार आहे. त्यानंतर मला माझ्या पती आणि मुलांसह आत्महत्या करण्याखेरीज
पर्याय उरणार नसल्याची जाणीव आपण ठेवावी.
तरी आपणास नम्र विनंती की, दिनांक २७.०२.२०२४ रोजीची, मी राहत असलेली सदनिका ताबा
कारवाई तात्काळ रद्द करून, मला पिंपरी येथील मे. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर साहेब यांचे
न्यायालयातून त्यासंबंधी प्रतिबंधात्मक आदेश मिळवणेकामी संधी देण्यात यावी, ही आपणास विनम्र
विनंती आहे. सदर दिवाणी दावा क्रं .१६४/२०२१ संबंधी कागदपत्रे सदरील विनंती अर्जासोबत जोडले
आहे, त्याची दखल घ्यावी.
धन्यवाद.
पिंपरी-चिंचवड, पुणे.
दिनांक – १७.०२.२०२४. श्रीमती रेणुका अजय पोतदार
(अर्जदार)
दिनांक - २०.०२.२०२४.
प्रति,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस स्टेशन, भोसरी,
पुणे ४१२१०५.

विषय - निष्कासन आदेशांच्या प्रती प्रदान करण्यासाठी अर्ज.

संदर्भ - भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांचे जावक क्रमांक-
११३६/२०२४, दिनांक - १६.०२.२०२४ रोजीचे समजपत्र.
महोदय,
मी श्रीमती रेणुका अजय पोतदार, रा. श्री. गणेश रेसिडेन्सी, दुसरा मजला, सदनिका क्र.
१२, स. नं. २२४/२/१, सिटीएस नं. ४३९६, भोसरी, मो. नं. ७७५६९८५३४१, येथील रहिवासी,
श्रीमती सुवर्णा दत्तात्रय सत्रस व श्री. दत्तात्रय जयवंत सत्रस, सध्या रा. शिरपुर, मलथान रोड,
बुरुं जवाडी, पुणे यांच्याविरुद्ध अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. शाखा दापोडी, यांची दिनांक
२७.०२.२०२४ रोजीची ताबा कारवाई तात्काळ रद्द करणेकामी दिनांक १७.०२.२०२४ रोजी विनंती
अर्ज दाखल के लेला असुन त्यासाठी खालील कागदपत्रे माननीय न्यायालयासमोर दाखल करणे
आवश्यक आहेत:

1. अॅस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लि. यांनी मा. जिल्हाधिकारी, पुणे गृह शाखा क्र.
सिक्यु/एसआर/१९४५/२०२२, दिनांक ०६.०३.२०२० यांचे आदेश.

2. अपर तहसिलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड, ता. हवेली यांचे जा. क्र. फौज/ताबा/
एसआर/५२७/२०२३, दिनांक – १२.०१.२०२४ यांचे आदेशान्वये दिनांक
२७.०२.२०२४ रोजी करण्यात आलेली ताबा कारवाई आदेश.

तरी आपणास नम्र विनंती की, दिनांक २७.०२.२०२४ रोजीची मी राहत असलेली सदनिका
ताबा कारवाई प्रक्रियेला तात्काळ स्थगिती आदेश काढण्यासाठी पिंपरी येथील माननीय दिवाणी
न्यायाधीश कनिष्ठ स्तर साहेब यांचे न्यायालयासमोर दाखल करण्यासाठी वर नमूद के लेल्या
न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती मला देण्यात याव्यात.
धन्यवाद.

पिंपरी-चिंचवड, पुणे.
दिनांक - २०.०२.२०२४. श्रीमती रेणुका अजय पोतदार
(अर्जदार)

You might also like