Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 62

चंद्र

पृथ्वीचा उपग्रह

चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा
नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या
व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त
म्हणजे ३,४७६ कि.मी. आहे.[१] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे
तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला
पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व
पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण
होते.चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण के ले आहे.
हा लेख खगोलशास्त्रातील ग्रहांविषयी आहे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चंद्र (निःसंदिग्धीकरण).

चंद्राच्या कला
चांद्र मास, चांद्र वर्ष चंद्र

चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे


एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६०
दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे
सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान
असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी
साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक
चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर
करण्यासाठी (सुमारे) १९ किंवा १४१ वर्षांनी
क्षयमास येतो.

नीलचंद्र
जेव्हा एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात,
तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला मास-सीमित
नीलचंद्र (मंथली ब्लू मून) म्हणतात. असा कक्षीय गुणधर्म
नीलचंद्र यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी होता
आणि त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२०ला असेल. उपपृथ्वी: ३,६३,१०४
जेव्हा एका त्रैमासिक ऋतूमध्ये तीनच्या जागी कि.मी.
चार पौर्णिमा येतात तेव्हा त्यांच्यापैकी तिसऱ्या
पौर्णिमेच्या चंद्राला ऋतुसीमित
नीलचंद्र(सीझनल ब्लू मून) म्हणतात. २१ मार्च ते
अपपृथ्वी ४,०५,६९६
२१ जून या कालावधीतील सौर वसंत ऋतूत, १८ कि.मी.
मे २०१९ रोजी, वसंत ऋतूंतल्या चार
पौर्णिमांपैकी तिसरी पौर्णिमा होती, त्या
पौर्णिमेच्या चंद्राला नीलचंद्र (ब्लूमून) म्हटले गेले .
यापूर्वीचा (ऋतुसीमित) नीलचंद्र २१ मे २०१६ परिभ्रमण २७.३२१५८२
दिवशी होता, तर यानंतरचा २२ ऑगस्ट २०११ काळ: दिवस
रोजी असेल.

इसवी सनाच्या १५५० ते २६५० या ११०० सिनॉडिक २९.५३०५८८


वर्षांच्या काळात ४०८ ऋतुसीमित नीलचंद्र
आणि ४५६ मास-सीमित नीलचंद्र होते/
परिभ्रमण दिवस
असतील. याचा अर्थ कोणत्यातरी प्रकारचा काळ:
नीलचंद्र दर दोन किंवा तीन वर्षांनी येतो.

नीलचंद्र निळया रंगाचा नसतो. परंतु नीलचंद्राचा


सरासरी १,०२२ मी.
योग येणे हे जरासे दुर्मीळ असल्याने क्वचित कक्षीय वेग: प्रति सेकं द
घडणाऱ्या घटनेसाठी Once in a blue moon
हा वाक्प्रचार वापरतात. मराठी ह्याला 'कधीतरी, कक्षेचा ५.१४५ °
सठी-सामासी' असा समांतर वाक्प्रयोग आहे.
कल:
सुपरमून कोणाचा पृथ्वी
उपग्रह:
पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या
जवळात जवळ बिंदूवर (उपभू बिंदूवर - भौतिक गुणधर्म
Perigeeला) येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र
नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून सरासरी १,७३७.१०
म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा
लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून
त्रिज्या: कि.मी.
जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर
असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर (अपभू
विषुववृत्तीय १,७३८.१४
बिंदूवर)असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० त्रिज्या: कि.मी.
किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर (उपभू
बिंदूवर) असतो. तेव्हा पौर्णिमा असते.
जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५
किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, धृवीय १,७३५.९७
तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. सुपरमून त्रिज्या: कि.मी.
हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४% टक्के मोठा
आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान
भासतो.
फ्लॅटनिंग: ०.००१२५
वर्षाच्या १२-१३ महिन्यांत असा सुपरमून दोन परीघ: १०,९२१
किंवा तीनवेळा दिसतो. खरोखरीचा अतिविशाल
सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता;
कि.मी.
त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे (विषुववृत्तावर)
अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबरर २०३४
रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी पृष्ठभागाचे ३.७९३ x
दिसतील.
क्षेत्रफळ: १०७ वर्ग
सुपरमून आणि चंद्रग्रहण कधीकधी एकाच
दिवशी येते. असे महिने : जानेवारी २०१९ आणि कि.मी.
मे २०२१.
( पृथ्वीच्या
०.०७४ पट)
वर्षातून वारंवार
वस्तुमान: २.१९५८ x
(सुमारे २ ते ५ वेळा) १०१०
आलेले/येणारे काही घनमीटर
सुपरमून दिवस सरासरी ३,३४६.४
घनता: कि.ग्रॅ प्रति
३१ जुलै२०१५ घनमीटर
२९ ऑगस्ट २०१५ पृष्ठभागावरील १.६२
२८ सप्टेेंबर २०१५ गुरुत्वाकर्षण मी.
(विषुववृत्ताजवळ): प्रति
२७ ऑक्टोबर २०१५ वर्ग
२५ नोव्हेंबर २०१५ सेकं द
१६ सप्टेंबर २०१६ मुक्तिवेग: २.३८
१६ ऑक्टोबर २०१६ कि.मी./
सेकं द
१४ नोव्हेंबर २०१६
सिडेरियल २७.३२१५८२
१४ डिसेंबर २०१६
दिनमान: दिवस
१२ जानेवारी २०१७
विषुववृत्तावरील ४.६२७
४ नोव्हेंबर २०१७ परिवलनवेग: मी/
३ डिसेंबर २०१७ सेकं द
२ जानेवारी २०१८ आसाचा १.५४२४°
कल:
३१ जानेवारी २०१८
२२ डिसेेंबर २०१८
१९ फे ब्रुवारी २०१९
२१ मार्च २०१९ पृष्ठभागाचे
तापमान: किमान स
९ फे ब्रुवारी २०२०
विषुववृत्तीय १०० के २
९ मार्च २०२० ८५° उत्तर
८ एप्रिल २०२०
७० के १
७ मे २०२०
ऑगस्ट २०२३
विशेषणे: चांद्र
पाश्चात्त्यांची पौर्णिमा
पौर्णिमेला इंग्रजीत फु ल मून म्हणतात. वर्षातून येणाऱ्या अश्या मासिक पौर्णिमांना पाश्चात्त्य संस्कृ तीत
नावे आहेत, ती अशी :-

जानेवारी - Wolf Moon, Moon After Yule,


Old Moon, Ice Moon, and Snow Moon.
फे ब्रुवारी - Snow Moon, Hunger Moon,
Storm Moon and Chaste Moon.
मार्च - Worm Moon, Crow Moon, Crust
Moon, Sap Moon, Sugar Moon, and
Chaste Moon and Lenten Moon.
एप्रिल - Pink Moon, Sprouting Grass
Moon, Fish Moon, Hare Moon, Egg
Moon and Paschal Moon.
मे - Flower Moon, Corn Planting Moon,
and Milk Moon
जून - Strawberry Moon, Hot Moon, Mead
Moon, and Rose Moon.
जुलै - Buck Moon.
ऑगस्ट - Sturgeon Moon, Green Corn
Moon, Barley Moon, Fruit Moon, and
Grain Moon.
सप्टेंबर - Corn Moon, Full Corn Moon or
Barley Moon.
ऑक्टोबर - Hunter's Moon, Dying Grass
Moon, Blood Moon or Sanguine Moon.
नोव्हेंबर - Beaver Moon, Oak Moon, Frosty
Moon
डिसेंबर - Cold Moon, Oak Moon.
दर १९ वर्षांनंतर येणाऱ्या फे ब्रुवारी महिन्यात पौर्णिमा येत नाही, त्या न येणाऱ्या पौर्णिमेला Black
Moon म्हणतात.

ज्या कॅ लेंडर वर्षात १३ पौर्णिमा असतात, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला Blue Moon म्हणतात.

चंद्रावरील मानवी मोहिमा


ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठे वले आहे, अशी चंद्र ही ही एकमेव खगोलीय वस्तू आहे
सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून चंद्राच्या अतिशय जवळून
जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले . तसेच लूना
३ या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने
१९५९ साली सोडली.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान १९६६ साली सोडलेले लूना ९ होते; नंतरच्या लूना
१०ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या.[१] ज्याद्वारे मनुष्याने चंद्रावर पाऊल ठे वले , अशी
अमेरिके ची अपोलो मोहीम ही जगातील आजवरची एकमेव मोहीम आहे
चंद्राचा पृष्ठभाग

चंद्राच्या दोन बाजू


चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या
वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू (सन्मुख बाजू) पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या
दुसऱ्या बाजूची (विन्मुख बाजूची) छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली
घेतली.

पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकू ण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण
एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.

चंद्राची पृथ्वीसन्मुख बाजू चंद्राची पृथ्वीविन्मुख बाजू


चंद्राच्या दोन्ही बाजूंमधील लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर
दिसणारे डाग (मारिया) आणि विरुद्ध बाजूला अपवादानेच दिसणारे तसले डाग.
मारिया
चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असलेल्या डागांना ”मारिया” असे नाव आहे. हे नाव ”लॅटिन” भाषेतील
”मेअर” म्हणजे ”समुद्र” या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र
समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध
लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमके तू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे
खड्डे पडले . या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात.

चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूपैकी सुमारे ३१% भाग[१] हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर
पृथ्वीविन्मुख बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे.,[२] यामागील शास्त्रीय
कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणाऱ्या घटकांचे जास्त
प्रमाण होय.[३][४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या
पर्वतरांगा उल्का व धूमके तूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते.
पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत.

१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की
चंद्राच्या उत्तरध्रुवावरील ”पियरी विवराच्या” बाजूने असणाऱ्या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ
प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश
असतो. चंद्राच्या दक्षिणध्रुवाजवळ असणाऱ्या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश
असतो.
चंद्रावरील विवरे

पृथ्वीविन्मुख बाजूवर असणारे


डिडॅलस विवर

चंद्राच्या पृष्ठभागावर उल्का तसेच धूमके तूंच्या धडके ने तयार झालेली अनेक विवरे दिसतात. यांतील
जवळजवळ पाच लाख विवरांचा व्यास हा प्रत्येकी एका किलोमीटरपेक्षा जास्त आहे.[५] चंद्रावरील
वातावरणाचा अभाव, तिथले हवामान व इतर खगोलीय घटनांमुळे ही विवरे पृथ्वीवरील विवरांपेक्षा
सुस्थितीत आहेत.

चंद्रावरील सर्वांत मोठे विवर म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ असणारे एटके न विवर होय. हे विवर संपूब्रिण
सूर्यमालेतील सर्वांत मोठे ज्ञात विवर आहे. हे विवर चंद्राच्या पृथ्वीविन्मुख बाजूवर असून त्याचा व्यास
सुमारे २,२४९ कि.मी. तर खोली सुमारे १३ कि.मी. आहे.[६] पॄथ्वीकडील बाजूवरील मोठी विवरे
म्हणजे इब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम व नेक्टारिस.

रिगॉलिथ
चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ म्हणजे रिगॉलिथ. चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या विविध
आघातांमुळे ही धूळ तयार झालेली आहे. ही धूळ चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग एखाद्या चादरीप्रमाणे
व्यापते. हिची जाडी मारियामध्ये ३-५ मी. तर इतरत्र १०-२० मी. इतकी आहे.[७]
पाण्याचे अस्तित्व
असे मानले जाते की उल्का व धूमके तू जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा ते त्यांच्यातील पाण्याचा अंश
हा चंद्रावर सोडतात. असे पाणी नंतर सूर्यप्रकाशामुळे विघटित होऊन ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू
तयार होतात. चंद्राच्या अतिशय कमी गुरुत्वाकर्षणामुळे हे वायू कालांतराने अवकाशात विलीन
होतात. पण चंद्राचा अक्ष किंचित कललेला असल्याने चंद्राच्या ध्रुवप्रदेशावरील काही विवरे अशी
आहेत की ज्यांच्या तळाशी कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही. या ठिकाणी पाण्याचे रेणू आढळण्याची
शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.

क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील विवरांचा नकाशा बनविला असता[८] संगणकाच्या
साहाय्याने के लेल्या आकडेवारीनुसार सुमारे १४,००० चौरस कि.मी. इतक्या प्रदेशात कधीही
सूर्यप्रकाश पोचत नाही असे अनुमान काढण्यात आलेले आहे.[९] क्लेमेण्टाईन यानावरील रडारच्या
साहाय्याने नोन्दविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फापासून तयार
झालेल्या छोट्या छोट्या भागांचे अनुमान निघते. तसेच स्पेक्ट्रोमीटरने नोन्दविलेल्या निरीक्षणांनुसार
चंद्राच्या ध्रुवीय भागांमध्ये हायड्रोजन वायूचे जास्त प्रमाण असल्याचे दिसून येते.[१०] चंद्रावरील एकू ण
बर्फाचे प्रमाण हे सुमारे एक अब्ज घनमीटर (एक घन कि.मी.) असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी
काढलेले आहे.

हा पाण्याचा बर्फ खणून काढून आण्विक जनित्रे अथवा सौर उर्जेवर चालणाऱ्या विद्युत जनित्रांच्या
साहाय्याने ऑक्सिजन व हायड्रोजनमध्ये रूपांतर करणे शक्य झाल्यास भविष्यात चंद्रावर वसाहती
स्थापन करणे शक्य होईल. कारण पृथ्वीवरून पाण्याची वाहतूक करणे अतिशय किचकट व महागडे
काम आहे. तरीसुद्धा सध्याच्या काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे क्लेमेन्टाईनच्या रडारमध्ये
दिसणारे बर्फाचे भाग हे बर्फ नसून नवीन विवरांमधून निघालेले खडक असण्याची शक्यता आहे.[११]
त्यामुळेच चंद्रावर नक्की किती प्रमाणात पाणी आहे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.
भौतिक संरचना

अंतर्गत रचना
सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र निर्माण होताना लाव्हाच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या स्फटिकीकरण
क्रियेमुळे चंद्राचा अंतर्भाग तीन हिश्श्यांमध्ये विभागला गेला आहे.

सर्वांत बाहेरचा भाग (क्रस्ट) हा मुख्यत्वे ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, लोह, कॅ ल्शियम व
ॲल्युमिनियम यांच्या विविध संयुगांमुळे तयार झालेला आहे. या भागाची सरासरी जाडी ही ५०
कि.मी. आहे.[१२]

त्याखालील दुसरा भाग (मँटल) हा काही प्रमाणात वितळलेल्या लाव्हामुळे तयार झालेला असून
यातील काही भाग पृष्ठभागावर आल्यामुळे चंद्रावर मारिया (डाग) तयार झालेले आहेत. या बॅसॉल्ट
खडकांचे पृथ:करण के ले असता, मँटल हे मुख्यत्वे ऑलिविन, आर्थोपायरोक्सिन व
क्लिनोपायरोक्सिन यांपासून तयार झालेले असल्याचे आढळते. तसेच पृथ्वीच्या मॅंटलमध्ये
आढळणाऱ्या लोहापेक्षा चंद्राच्या.?

भौगोलिक संरचना

चंद्राची भौगोलिक संरचना


चंद्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास हा मुख्यत्वे क्लेमेण्टाईन मोहिमेत जमविलेल्या माहितीच्या
आधारे करण्यात आलेला आहे. चंद्रावरील सर्वांत खालच्या पातळीवर असलेली जागा म्हणजे दक्षिण
ध्रुवावर असणारे एटके न विवर होय. चंद्रावरील सर्वांत जास्त उंच ठिकाणे म्हणजे या विवराच्या
ईशान्येला असणारी पर्वत शिखरे आहेत. यामुळे असे अनुमान निघते की चंद्रावर धडकलेल्या उल्का
अथवा धूमके तूमुळे अवकाशात उत्सर्जित झालेल्या घटक पदार्थांमुळेच या पर्वतरांगा तयार झालेल्या
आहेत. इतर मोठी विवरे, उदा० इब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम, स्मिथी व ओरिएन्टलसुद्धा अशाच
प्रकारच्या भौगोलिक रचना दर्शवितात. चंद्राच्या आकारातील अजून एक वैविध्य म्हणजे पृथ्वीविन्मुख
बाजूवरील पर्वतरांगा या पृथ्वीसन्मुख पर्वतरांगांपेक्षा सुमारे १.९ कि.मी. अधिक उंच आहेत.[१२]

गुरुत्वाकर्षण क्षेत्र
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या अंतराळयानाने प्रक्षेपित के लेल्या
रेडियो तरंगांच्या मोजमापाने करण्यात आलेले आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये एक विशेष बाब
म्हणजे विवरांवर असणारे जास्तीचे गुरुत्वाकर्षण.[१३] या जास्तीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राभोवती
फिरणाऱ्या अतराळयानाच्या कक्षेवर बराच परिणाम झालेला आढळतो. त्यामुळेच यापुढील
चांद्रमोहिमांपूर्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरणार आहे.[१४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण क्षेत्र

असे मानण्यात आलेले आहे की चंद्रावर असलेल्या विवरांमध्ये गोठलेला लाव्हा हा त्या विशिष्ट
ठिकाणी जास्तीचे गुरुत्वाकर्षण असण्याला कारणीभूत आहे. पण जास्तीच्या गुरुत्वाकर्षणाचे अस्तित्व
हे फक्त लाव्हाच्या प्रवाहाने होत नसून क्रस्टची जाडी कमी होण्यानेपण दिसून आले आहे. लुनार
प्रोस्पेक्टर गुरुत्वाकर्षण अभ्यासामध्ये काही ठिकाणी विवरे नसतानासुद्धा जास्तीचे गुरुत्वाकर्षण
आढळून आले आहे.[१५]

चुंबकीय क्षेत्र

चंद्राचे चुंबकीय क्षेत्र

चंद्राचे बाह्य चुबकीय क्षेत्र हे सुमारे १ ते १०० नॅनोटेस्ला इतक्या ताकदीचे आहे. हे पृथ्वीच्या चुंबकीय
क्षेत्रच्या सुमारे १०० पटीनी कमी ताकदवर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पृथ्वीप्रमाणे चंद्र हा
दोन ध्रुवांचा चुंबक नाही, तर जे काही चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आहे ते पूर्णतः क्रस्टमध्ये असणाऱ्या
घटकांमुळे तयार झालेले आहे.[१६] शास्त्रज्ञांचे असे अनुमान आहे की चंद्रावर येऊन धडकलेल्या उल्का
तसेच धूमके तूंमुळे हे चुंबकीय क्षेत्र तयार झाले असावे कारण विवरांजवळ हे क्षेत्र जास्त प्रभावी
आहे.[१७]

वातावरण
चंद्रावर अतिशय विरळ वातावरण आहे. चंद्रावर असलेल्या वातावरणाचे एकू ण घनमान फक्त १०४
कि.ग्रॅ. आहे.[१८] चंद्रावर असणाऱ्या वातावरणाचे प्रमुख स्रोत म्हणजे एक - क्रस्ट आणि मॅँटलमध्ये
होणाऱ्या प्रक्रियांमुळे रेडॉन सारख्या वायूंचे उत्सर्जन. दुसरे म्हणजे छोट्या उल्का, सौरवात तसेच
सूर्यप्रकाशामुळे होणारे विविध पदार्थांचे विघटन. आत्तापर्यंत के ल्या गेलेल्या विविध चाचण्यांमधून
विविध प्रकारे चद्राचे वातावरण हे मुख्यत: सोडियम, पोटॅशियम, रेडॉन, पोलोनियम, आरगॉन, हेलियम,
ऑक्सिजन तसेच मिथेन, नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईड व कार्बन डायाक्साईड या वायूंचे बनले
असल्याचे सिद्ध झाले आहे.[१९]

पृष्ठभागावरील तापमान
चंद्रावरचे दिवसाचे सरासरी तापमान हे १०७ अंश सेल्शियस तर रात्रीचे सरासरी तापमान हे उणे १५३
अंश सेल्शियस असते.[२०]

उत्पत्ती

चंद्राची निर्मिती : विविध तर्क


चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती ही सूर्यमालेच्या
उत्पत्तीनंतर सुमारे ३-५ कोटी वर्षांंनंतर म्हणजेच सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ
मानतात.[२१] चंद्राच्या उत्पत्तीबद्दल जी अनेक मते आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :

फिशन थिअरी - जुन्या संशोधनानुसार चंद्र हा


पृथ्वीपासून तुटून वेगळा झालेला तुकडा असल्याचे
मानण्यात आले . या तुकड्यामुळे पृथ्वीच्या
पृष्ठभागावर खूप मोठी दरी तयार झाली ती म्हणजेच
प्रशांत महासागर.[२२] पण अशा प्रकारे तुकडे
होण्यासाठी पृथ्वीची सुरुवातीची फिरण्याची गती ही
खूप जास्त असायला हवी होती. तसेच जर असा
तुकडा पडलेला असेल तर तो तुकडा पृथ्वीच्या
विषुववृत्ताच्या अक्षातच पृथ्वी भोवती फिरत राहिला
असता असे शास्त्रज्ञ मानतात.
कॅ प्चर थिअरी - काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्राची
निर्मिती ही इतरत्र कोठे तरी झाली व तो पॄथ्वीच्या
गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यामुळे कायमचा
पृथ्वीभोवती फिरत राहिला.[२३] पण अशा तऱ्हेने
एखाद्या वस्तूला पृथ्वीभोवती फिरत ठे वण्यासाठी
लागणाऱ्या काही गोष्टी (जसे की जास्तीची उर्जा
वापरण्यासाठी जास्तीचे वातावरण) अस्तित्वात
नाहीत.
को-फॉर्मेशन थिअरी - या थियरीप्रमाणे शास्त्रज्ञांना
असे वाटते की सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वी व
चंद्राची एकाच ठिकाणी उत्पत्ती झाल्याचे शास्त्रज्ञ
मानतात. चंद्राची निर्मिती ही पृथ्वीच्या भोवती
फिरणाऱ्या व सूर्यमालेतील उरलेल्या पदार्थांपासून
झाली असावी. पण काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर
आढळणाऱ्या लोहाचे प्रमाण ही थिअरी सिद्ध करू
शकत नाही.
ही सर्व अनुमाने चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याने आढळणाऱ्या कोनीय बलाचे स्पष्टीकरण देऊ शकत
नाहीत.[२४]

जायन्ट इम्पॅक्ट थिअरी - ही थियरी आजकालच्या


शास्त्रज्ञांमध्ये लोकप्रिय आहे. या थिअरीप्रमाणे
साधारण मंगळाच्या आकाराची एक वस्तू (थिया) ही
पृथ्वीवर धडकल्याने पृथ्वीवरील पुरेसे पदार्थ
पृथ्वीच्या भोवती विखुरले गेले .[१] या पदार्थांपासूनच
नंतर चंद्राची निर्मिती झाली. संगणकावर बनविलेली
ह्या घटनेची संचिका चंद्र व पृथ्वी यांच्यामधील
कोनीय बलाचे तसेच चंद्राच्या छोट्या कोअरचे
यथोचित स्पष्टीकरण देते.[२५] तरीही या अनुमानात
अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसे की पृथ्वीवर
धडकणाऱ्या वस्तूचा आकार तसेच चंद्राच्या
निर्मितीमध्ये पृथ्वीचे घटक कोणते व त्या वस्तूवरील
घटक कोणते?
लाव्हाचा समुद्र

चंद्राची अंतर्गत रचना

राक्षसी धडके च्या वेळी तयार झालेल्या अति उष्णतेमुळे असे मानण्यात येते की चंद्राचा बराचसा भाग
हा सुरुवातीला वितळलेल्या अवस्थेत होता. हा विरघळलेला बाह्य पृष्ठभाग जवळ जवळ ५०० कि.मी.
ते चंद्राच्या गाभ्यापर्यंत खोल होता.[३] यालाच लाव्हाचा समुद्र असे म्हणले जाते.

हा समुद्र जेव्हा थंड होऊन गोठू लागला, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या स्फटिकीकरणामुळे क्रस्ट
व मॅँटल वेगवेगळे तयार झाले .[३] यातील कमी घनतेचे पदार्थ पृष्ठभागावर जमा झाले तर जास्त
घनतेचे पदार्थ चंद्राच्या गाभ्यामध्ये (कोअर) जमा झाले .

चंद्रावरील खडक
चंद्रावर मुख्यत्वे दोन प्रकारचे खडक आढळतात. पर्वतरांगांमध्ये सापडणारे अनॉर्थाईट युक्त खडक व
मारिया मध्ये सापडणारे बॅसॉल्ट खडक.[२६][२७] पृथ्वीवरील बॅसाल्ट खडक व चंद्रावरील बॅसॉल्ट
खडक यातील मुख्य फरक म्हणजे चंद्रावरील खडकांमध्ये आढळणारे जास्तीचे लोहाचे प्रमाण.[२८][२९]
चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रारावरील धुळीचे वर्णन बर्फासारखी मऊ व बंदुकीच्या दारूसारखा
वास असणारी असे के ले आहे.[३०] ही धूळ मुख्यत: चंद्रावर धडकलेल्या उल्का व धूमके तूंमुळे तयार
झालेली आहे. या धुळीमध्ये मुख्य घटक म्हणजे सिलिकॉन डायॉक्साईड (SiO2) हा आहे. तसेच
तीमध्ये कॅ ल्शियम व मॅग्नेशियमसुद्धा आढळले .

फिरण्याची कक्षा व पृथ्वीशी संबंध

अपोलो ८ मोहिमेच्या वेळी चंद्रावरून घेतलेले


पृथ्वीचे छायाचित्र

चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती
फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस
लागतात.[१] इतर ग्रहांचे उपग्रह त्या त्या ग्रहांच्या विषुववृत्तावरून फिरतात. पण चंद्रर मात्र थोडासा
तिरका फिरतो. चंद्र हा ग्रहाच्या प्रमाणात बघितल्यास सूर्यमालेतील सर्वांत मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.
याचमुळे मराठीत कोणत्याही नैसर्गिक उपग्रहाला चंद्र हाच शब्द वापरतात. उदा. मंगळाला दोन चंद्र
आहेत.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर भरती - ओहोटीचे चक्र चालू असते. समुद्रान्तर्गत होणाऱ्या या
घडामोडींमुळे चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर दरवर्षी ३.८ सेंटिमीटर या प्रमाणात वाढते
आहे.[३१] कोनीय बलामुळे तसेच या वाढणाऱ्या अंतरामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती
०.००२ सेकं द प्रति दिवस प्रति शतक या प्रमाणात कमी होत आहे.[३२]
चंद्र व पृथ्वी यांच्या जोडीला बरेच जण जोडग्रह मानतात. या मानण्याला चंद्राचा पृथ्वीच्या प्रमाणात
असलेला आकार कारणीभूत आहे. चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे व त्याचे
वस्तुमान पृथ्वीच्या १/८१ पट आहे. तरीसुद्धा काहीजण ही बाब मानत नाहीत कारण चंद्राचा पृष्ठभाग
हा पृथ्वीच्या एक दशांशापेक्षा कमी आहे.

१९९७ मध्ये ३७५३ क्रु ईथने (Cruithne) नावाचा एक लघुग्रह सापडला. या लघुग्रहाची कक्षा ही
पृथ्वीच्या भोवती घोड्याच्या नालाच्या आकारातील होती. तरीसुद्धा खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहाला
पृथ्वीचा दुसरा चंद्र मानत नाहीत कारण या लघुग्रहाची कक्षा स्थिर नाही.[३३] या लघुग्रहाप्रमाणेच
फिरणारे (५४५०९) २००० पीएच ५, (८५७७०) १९९८ यूपी१ व २००२ ए‍ए२९ हे तीन लघुग्रह
आजपर्यंत शोधण्यात आलेले आहेत.[३४]

चंद्र व पृथ्वी यांचे आकार व त्यांमधील अंतर हे प्रकाशाच्या वेगाच्या हिशोबात इथे दाखविलेले आहे. पृथ्वी व चंद्र यांच्यातील सरासरी
अंतर कापायला प्रकाशाला १.२५५ सेकं द लागतात तर सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर कापण्यास प्रकाशाला ८.२८ मिनिटे
लागतात.

भरती व ओहोटी
पृथ्वीवरील समुद्रांमध्ये होणारे भरती - ओहोटीचे चक्र हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. चंद्राच्या
गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या चंद्राडील बाजूवरील पाणी हे इतर भागांपेक्षा चंद्राकडे जास्त ओढले जाते.
पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे पाणी किनाऱ्यावर येते. एका ठिकाणी भरती आलेली असताना पृथ्वीच्या
चंद्राविरुद्ध बाजूवर ओहोटी आलेली असते.

भरती - ओहोटीच्या चक्राचा चंद्राच्या कक्षेवर सूक्ष्मसा परिणाम होतो. या चक्राच्या परिणामाने चंद्र
हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. ही गती वर्षाला ३.८ सेमी इतकी सूक्ष्म आहे.[३१] जोपर्यन्त चंद्राच्या
गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवरील समुद्रांवर होत राहील तोपर्यंत चंद्र पृथ्वीपासून दूर जात राहील.
त्यानन्तर चंद्राची कक्षा स्थिर होईल.
ग्रहणे
[[चित्र:Solar_eclipse_1999_4_NR.jpg|thumb|right|१९९९ साली दिसलेले
खग्रास सूर्यग्रहण
[[चित्र:LunarEclipse20070303CRH.JPG|thumb|मार्च ३ २००७ रोजी दिसलेले चंद्रग्रहण]]

जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात, तेव्हा एकाची छाया दुसऱ्यावर पडते. यालाच ग्रहण असे
म्हणतात. सूर्यग्रहण अमावास्येच्या आसपास होते जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. याउलट
चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही
पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला
ग्रहण होत नाही. ग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी व चंद्राच्या कक्षा जिथे एकमेकांना छेदतात तिथे
असावा लागतो. या छेदनबिन्दूंना भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू आणि के तू असे म्हणतात. त्यामुळेच
चंद्र किंवा सूर्याला राहू वा के तूने गिळले की ग्रहण होते, अशी कविकल्पना के ली गेली आहे. सामान्य
लोकांना किचकट गणित समजत नाही, त्यांना ही ’गिळण्या’ची कल्पना पटते. [३५]

खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळी गणिते करून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण
हे दर ६,५८५.३ दिवसांनी (१८ वर्षे, ११ दिवस व ८ तास) त्या एकाच तारखेला होते. या कालावधीला
सारोस चक्र असे म्हणतात.[३६]

चंद्र व सूर्याच्या कक्षा (पृथ्वीवरून पाहताना) बऱ्याच ठिकाणी एकमेकांना छेदतात, त्यामुळेच खग्रास
अथवा खंडग्रास सूर्यग्रहणे पहायला मिळतात. खग्रास सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला
जातो व सूर्याभोवती असणारे तेजोवलय (Corona) दृष्टिपथास येते. चंद्र व पृथ्वीमधील अंतर हे सूक्ष्म
गतीने बदलत असल्यामुळे चंद्राचा कोनीय व्यास कमी होत आहे. याचाच अर्थ असा की काही कोटी
वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्रामागे झाकला जात होता. तसेच साधारण ६० कोटी
वर्षांनंतर चंद्र कधीही पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही व फक्त खंडग्रास सूर्यग्रहण पहायला
मिळेल.

ग्रहणा सन्दर्भात घडणारी घटना म्हणजे अधिक्रमण.


भारतीय संस्कृ तीतील चंद्र
भारतीय संस्कृ तीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही भारतातील बहुतेक सण व उत्सव हे
चान्द्र दिनदर्शिके प्रमाणेच साजरे के ले जातात. उदा० गणेशोत्सव, दिवाळी, नारळी पौर्णिमा, इत्यादी.
आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते. लख्ख चंद्रप्रकाशाच्या या रात्री जाग्रण
करून के शरी दूध पिण्याचा समारंभ असतो. दम्याकरिता खास औषध कोजागरीच्या चांदण्यात बनते.

इस्लामी पंचांगात अधिक महिना नसतो व वर्ष चान्द्रमासानुसार चालते, त्यामुळे मुसलमानी सण इसवी
सनाच्या तारखेनुसार पाहिले तर थोडथोडे दिवस अलीकडेअलीकडे येतात.

मुसलमानी महिन्यांची सुरुवात चंद्रदर्शनानंतर होते. प्रतिपदेला किंवा त्यानन्तरच्या दिवशी चंद्रदर्शन
झाले की ईद साजरी होते.

चंद्रावरच्या डागांना त्यांच्या तशा दिसण्यामुळे भारतीय संस्कृ तीत चंद्रावर असलेला ससा किंवा हरीण
असे म्हटले आहे. हे डाग म्हणजे चंद्राला लागलेला कलंक आहे, अशीही कविकल्पना आहे.

असे म्हणतात की श्रीरामाने लहानपणी चंद्रासाठी हट्ट के ला होता. तेव्हा सुमन्तांनी आरशात चंद्राचे
प्रतिबिब दाखवून रामाला खुश के ले होते.

फार पूर्वीपासूनच चंद्र हा कविजनांना खुणावत आलेला आहे. अनेक प्रेमगीतांमधून चंद्राचे उल्लेख
आढळतात. कु ठे चंद्राला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिलेली आढळते तर कु ठे चंद्राच्या साक्षीने
प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दिसतात. लहान मुलांच्या गाण्यांमध्येही चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्र
म्हणजे लहान मुलांचा मामा. त्यांच्या आईचा हा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता
आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात. कडवा चौथ या उत्तर भारतीय व्रतात तिथल्या स्त्रिया
नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी चंद्राला पीठ चाळायच्या चाळणीमधून पाहतात.

पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्राची कला म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र
दर रात्री कलेकलेने वाढत असलेला दिसतो, आणि पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार होऊन, पुढे
अमावास्येपर्यन्त क्रमाक्रमाने लहान होतो. अमावास्येला चंद्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे
आल्याने चंद्र दिसत नाही.
चंद्राला संस्कृ तमध्ये इन्दु, कु मुदबान्धव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकान्त,
शशांक, शशिन्‌, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत. आकाशातल्या रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या
जितक्या जवळ येतो, तितका कोणताच येत नाही, त्यामुळे रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते.

चंद्राच्या प्रकाशाला चान्दणे किंवा कौमुदी म्हणतात.चंद्रप्रकाशात जी कमळे फु लतात त्या कमळाच्या
जातींना चंद्रविकासी कमळे किंवा कु मुदिनी म्हणतात.

संस्कृ त वाङ्मयातील नवग्रह स्तोत्रात चंद्राचा एक श्लोक आहे. तो असा -

दधिशङ् खतुषाराभं क्षीरोदार्णव संभवं । नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकु ट भूषणं ।।

या श्लोकाप्रमाणे, दही व शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, समुद्रातून उत्पन्न झालेल्या,
भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या अशा ससा धारण के लेल्या सोमाला (
चंद्राला) मी नमस्कार करतो. यानुसार चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल.

भारतीयांच्या नावात किंवा आडनावात चंद्र


असलेली नावे
इंदुमती, ईश्वरचंद्र, करमचंद्र, के वलचंद्र, कृ ष्णचंद्र, गुलाबचंद्र, घेलाचंद, चंदाराणी, चंदू, चंद्रकात, चंद्रन्,
चंद्रमुखी, चंद्रमोहन, चंद्रवदन, चंद्रशेखर, चंद्रहास, चंद्रा (नाव आणि आडनाव), चंदात्रेय, चंद्रानना,
चंद्रावळ (गडकऱ्यांच्या राजसंन्यासमधील एक पात्र), चांदणी, चांदबाली (गावाचे नाव), चांदबिबी,
जगदीशचंद्र, दूतीचंद, देवचंद, ध्यानचंद, नवीनचंद्र, पिराचंद, पूर्णचंद्र, प्रेमंचंद, फतेचंद, बंकिमचंद्र,
बालचंद्र, भालचंद्र. मूलचंद, मूळचंद, मूलचंदानी, रामचंद्र, लक्ष्मीचंद्र, वालचंद, शशी, शशिकांत,
शशिशेखर, शशिनाथ, शशीश्वर, शरच्चंद्र, सरस्वतीचंद्र, सुभाषचंद्र, सोमनाथ, सोमेश्वर, सोमशखर,
हरिश्चंद्र, हिराचंद, हुकू मंद, हेमचंद्र, वगैरे.
इतर शब्दांतील चंद्र
ईद का चाँद, चंद्रदर्शन, चंद्रमौळी (घर), चेटीचण्ड, मधुचंद्र,

समुद्र मंथन
असे मानण्यात येते की अमृतप्राप्तीसाठी देवांनी व दानवांनी के लेल्या समुद्र मंथनातून चंद्राची निर्मिती
झाली. भगवान शंकराने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या घशात निर्माण झालेल्या दाहाला शांत
करण्यासाठी चंद्राचा उपयोग करण्यात आला.

कु सुमाग्रजांची चंद्रावरची एक अमर कविता


हा चंद्र : या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसूनी माकड, मानव कु त्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हाही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगृहातून भटकत राही
नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
भग्न मंदिरावरी के धवा बृहस्पतीसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून
तट घुमटावर के व्हा चढतो
कधी विदूषक पाणवठ्यावर घसरून पडतो
कु ठे घराच्या कौलारावरूनी उतरून खाली शेजेवरती
तिथे कु णाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कु ठे कु णाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी
द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो
अशा बिलंदर अनंतफं दी या चंद्राचे
त्या चंद्राशी कु ठले नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसूनी
शास्त्रज्ञांना जाता येते
रसिक मनांना या चंद्राला
पळ्भर के व्हा डोळ्यात वा जळात के वळ धरता येते.

चंद्र किंवा चांदणे यावि़षयावरच्या भारतीय


साहित्यातील ओव्या, कविता आणि इतर
गीते

अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे (भावगीत : मधुबाला


जव्हेरी; संगीत : यशवंत देव. कवयित्री : संजीवनी
मराठे )
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाएं तेरी मेरी बात
आधी, मुलाकात आधी (चित्रपट - नवरंग, गीतकार -
भरत व्यास; संगीतकार - सी. रामचंद्र; गायक/
गायिका - महेंद्र कपूर, आशा भोसले )
उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया! उसळला
प्रीतिचा! (नाट्यगीत: नाटक : पाणिग्रहण; गायिका :
बकु ळ पण्डित; संगीतकार : श्रीनिवास खळे ; कवी :
प्र.के . अत्रे; राग : मालकं स))
उडें जब जब झुल्फें तेरी ... तुझे चाँद के बहाने देखूं, तू
छत पर आजा गोरिये (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट -
नया दौर; संगीतकार - ओ.पी. नय्यर; गायक -
मोहम्मद रफी, आशा भोसले )
ऐ चाँद बता मुझको, क्या इसी का नाम है प्यार (कवी
-कमर जलालाबादी; हिंदी चित्रपट - चाँद; संगीतकार
- हुस्नलाल भगतराम; गायक - जी.एम दुरानी, झीनत
बेगम, सितारादेवी)
ओ रात के मुसाफिर चन्दा ज़रा बता दें , मेरा कसूर
क्या है, यह फ़ै सला सुना दें (गीतकार : राजेन्द्र कृ ष्ण,
गायक : लता - रफी, संगीतकार : हेमंत कु मार,
चित्रपट : मिस मेरी)
कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी
चवथीच्या चंद्राची कोर (चित्रपट - मोलकरीण;
गीतकार - ग.दि. माडगुळकर; संगीतकार - वसन्त
देसाई; गायिका - आशा भोसले )
कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा (भावगीत;
गायक/संगीतकार : गजानन वाटवे, कवी : गु.ह.
देशपांडे)
चंदा की चाँदनी में झूमे झूमे दिल मेरा (हिंदी चित्रगीत;
चित्रपट : पूनम (१९५२); गायिका : लता मंगेशकर;
संगीतकार : शंकर जयकिशन; गीतकार : हसरत
जयपुरी)
चन्दा मामा दूर के पुए पकाए गुड़ के . (पारंपरिक हिंदी
बालगीत)
चंदाराणी चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी.
(बालगीत/चित्रगीत; चित्रपट : जिव्हाळा; गायिका :
आशा भोसले ; संगीत : श्रीनिवास खळे ; गीतकार :
ग.दि. माडगुळकर)
चन्दा रे जारे जारे, पिया से सन्देसा मोरा कहियो जा.
(हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : जिद्दी (१९४८);
गायिका : लता मंगेशकर; संगीतकार : खेमचंद
प्रकाश; गीतकार : प्रेम धवन)
चन्दा रे मोरी पतिया ले जा, सजनी को पहुॅंचा दे रे
(हिंदी चित्रपटगीत, चितरपत - बनजारिन; गीतकार -
पण्डित मधुर, संगीतकार - परदेसी; गायिका - लता
मंगेशकर)
चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली. (भावगीत;
गायिका कृ ष्णा कल्ले ; संगीत : यशवन्त देव;
गीतकार : मधुकर जोशी)
चंद्र चवथिचा, रामाच्या गं बागेमध्यें चांफा नवतिचा
('एकच प्याला' मधील नाट्यगीत
चंद्र दोन उगवले , जादू काय ही तरी? एक चंद्र अंबरी
एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट : भाग्यलक्ष्मी,
गायक : सुधीर फडके ; संगीत : राम कदम ; कवयित्री
शांता शेळके ; राग : यमन)
चंद्र पहा उगवे मनोहर, आकाशाचा उत्सव
म्हणुनी,गगनाचा हा मांडव घालुनी, लहान मोठे
गोलक आणुनी, कु णी विजेचे लावी दिवे
(पाठ्यपुस्तकातील कविता)
चंद्र व्हा हो पांडुरंग, मन करा थोर ('संत गोरा कुं भार'
नाटकातील पद; गायक/संगीतकार - जितेंद्र
अभिषेकी; गीतकार - अशोकजी परांजपे)
चंद्रावरती दोन गुलाब (भावगीत; गायक/संगीतकार :
गजानन वाटवे; गीतकार : ग.दि. माडगुळकर)
चमकते चाँद को टूटा हुआ तारा बना डाला । मेरी
आवारगी ने मुझको आवारा बना डाला (हिंदी
चित्रपटगीत; चित्रपट : आवारगी; गायक : गुलाम
अली; संगीतकार : अनु मलिक; गीतकार : आनंद
बक्षी
चल चल चंद्रा पसर चाँदणे. (भावगीत; गायिका :
कु मुदिनी पेडणेकर; संगीत : गजानन वाटवे;
गीतकार : श्रीनिवास खारकर)
चांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फु ले
प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट :
वैभव; गायिका : आशा भोसले , संगीत : राम कदम,
कवी : ग.दि. माडगूळकर. राग : यमन)
चाँद फिर निकला, मगर तुम न आये, जला फिर मेरा
दिल (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : पेईंग गेस्ट;
गायिका : लता मंगेशकर; संगीतकार : सचिनदेव
बर्मन; गीतकार : मजरूह सुलतानपुरी)
चाँद बन के तुम गगन से मेरी गली में आता करो
(हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : प्यार भरा दिल; गायक/
गायिका : कु मार सानू+अनुराधा पौडवाल; गीतकार :
योगेश गौर; संगीतकार : निखिल-विनय)
चांद माझा हा हासरा. (नाट्यगीत; नाटक : देवमाणूस;
गायक/संगीतकार : सौदागर नागनाथ गोरे (छोटा
गंधर्व); गीतकार : नागेश जोशी; राग - ?)
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले . (भावगीत;
गायिका : आशा भोसले ; संगीत : हृदयनाथ मंगेशकर;
गीतकार : राजा बढे ; राग : हंसध्वनी)
सितारों हमें न निहारो, हमरी ये प्रीत नई, चाँदसा
मुखडा क्यूॅं शर्माया, आँख मिली और दिल घबराया
(हिंदी चित्रपटगीत, चित्रपट इन्सान जाग उठा; कवी -
शैलेन्द्र; संगीतकार - एस.डी. बर्मन; गायिका -आशा
भोसले )
चाँद सितारे करते इशारे, हम हैं तुम्हारे, तुम हो हमारे
(गीतकार : कमर जलालाबादी; हिंदी चित्रपट :
आदिल-ए-जहांगीर, १९५६; संगीतकार : हुस्नलाल
भगतराम; गायक : तलत महमूद)
चाँद से परदा कीजिये । हॉं चाँद से पर्दा कीजिये.
(हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : आओं प्यार करें
(१९९४); गायक : कु मार साहू; संगीतकार : आदेश
श्रीवास्तव; गीतकार : श्यामराज)
चांदोबा चांदोबा भागलास का. (पारंपरिक बालगीत)
चारुचंद्र की चंचल किरणें, खेल रहीं हैं जल थल में
(मैथिलीशरण गुप्त यांच्या 'पंचवटी' खंडकाव्याच्या
चौथ्या कडव्यातील लोकप्रिय ओळी)
चौदहवीं का चाँद हो, या आफताब हो. (हिंदी
चित्रपटगीत; चित्रपट : चौदहवीं का चाँद; गायक :
मोहम्मद रफी; संगीतकार : रवी; गीतकार : शकील
बदायुनी)
जा रे चंद्रा, क्षणभर जा ना, मेघांच्या पडद्यात.
(भावगीत; गायक/संगीत दिग्दर्शक : बबनराव
नावडीकर)
जैसे शारदीचिये चंद्रकळें - । माजि अमृतकण कोवळें
। ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे ॥ ज्ञानेश्वरी
१.५६ ॥
ठं डी हवाएँ, लहराके आये, ऋतु है जवाँ ... चाँद और
तारें, हॅंसते नज़ारें, मिलके सभी दिल में सखी, जादू
जगाएँ (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : नौजवान
(१९५१); गायिका : लता मंगेशकर; संगीतकार :
एस.डी. बर्मन; गीतकार : साहिर लुधियानवी)
तुम आये तो आज, मुझे याद, गली में आज चाँद
निकला (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : जख़्म;
गायिका : अलका याज्ञिक; गीतकार : आनंद बक्षी;
संगीत दिग्दर्शक : एम.एम. कीरवाणी/एम.एम. क्रीम)
तू कौन सी बदली में मेरे चाँद है आजा. (हिंदी
चित्रपटगीत; चित्रपट : खानदान (१९४२); गायिका :
नूरजहान, शमशाद बेगम; संगीतकार : गुलाम हैदर)
तू मेरा चाँद, मैं तेरी चाँदनी, मैं तेरा राग तू मेरी रागिनी,
नही दिल का लगाना कोई दिल्लगी, कोई दिल्लगी
(हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - दिल्लगी, गीतकार -
शकील बदायुनी, संगीतकार - नौशाद; गायक - श्याम,
सुरैया)
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी. (भावगीत;
गायक/संगीतकार : सुधीर फडके ; कवयित्री : शांता
शेळके ; राग : यमन)
देखो वो चाँद छु पके करता है क्या इशारे (हिंदी
चित्रपटगीत; चित्रपट : शर्त (१९५४); गायक :
हेमंतकु मार, लता मंगेशकर; संगीतकार : हेमंतकु मार;
गीतकार : एस.एच. बिहारी)
देवा तुझे कीती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो
... सुंदर हे चांदणे, सुंदर हा चंद्र (पाठ्यपुस्तकातील
कविता, कवी - ग.ह. पाटील)
नको रे कृ ष्णा रंग फे कूं चुनडी भिजते, मध्यरात्री
चांदण्यात थंडी वाजते (कवी. - जी.एन. पुरोहित;
गायिका - सुशिला टेंबे)
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.
(अंगाईगीत/चित्रपटगीत; चित्रपट : बाळा गाऊं कशी
अंगाई (१९७७); गायिका : सुमन कल्याणपूर; संगीत :
एन. दत्ता; गीतकार : मधुसूदन कालेलकर)
पान जागे फू ल जागे, भाव नयनी जागला । चंद्र आहे
साक्षिला, चंद्र आहे साक्षिला. (चित्रपटगीत. चित्रपट :
चंद्र आहे साक्षीला; गायक : सुधीर फडके , आशा
भोसले ; गीतकार : जगदीश खेबूडकर)
पुनवेचा चंद्रम आला घरी, चंदाची किरणे दर्यावरी
(चित्रपटगीत, चित्रपट - मंगळसूत्र, गीतकार - शांता
शेळके ; संगीतकार - बाळ पार्टे ; गायिका - कृ ष्णा
कल्ले )
प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे ... का रोहिणीस
वाटे चंद्रासवे असावे, हे भावस्वप्न अपुरे साकार तू
करावे (भावगीत; गायिका : लता मंगेशकर;
संगीतकार : वसंत प्रभू; गीतकार : द.वि. के सकर;
राग : पटदीप, भीमपलास)
बादलों की पालकी में, चाँद की आयी बारात (हिंदी
चित्रपटगीत, चित्रपट : जलती निशानी; गायिका लता
मंगेशकर; संगीतकार : अनिल विश्वास; कवी : कमर
जलालाबादी)
भाग्यवती मी भाग्यवती । गं भाग्यवती मी भाग्यवती
... चंद्र नभीचा खाली आला, खाली आला । तिलक
कपाळी माझ्या झाला. (चित्रपटगीत, चित्रपट :
वहिनींच्या बांगड्या; गायिका : मोहनतारा अजिंक्य ;
कवी : शांताराम आठवले ; संगीतकार : सुधीर फडके )
मेरे भैय्या, मेरे चन्दा, मेरे अनमोल रतन (हिंदी
चित्रपटगीत, चित्रपट - काजल; गीतकार - साहिर
लुधियानवी; संगीतकार - रवी; गायिका - आशा
भोसले )
मैंने चाँद और सितारों की तमन्ना की थी (हिंदी
चित्रपटगीत, चित्रपट - चंद्रकांता; कवी - साहिर
लुधियानवी; संगीतकार - एन. दत्ता; गायक - मोहम्मद
रफी)
मोरा गोरा अंग लईले , मोहे श्याम रंग दईदे ... बदरी
हटा के चंदा, चुपके से झाँके चंदा, तोहे राहू लागे बैरी,
मुस्काए जी जलाईके . (कवी - गुलजार; संगीतकार -
सचिन देव बर्मन; गायिका - लता; चित्रपट - बंदिनी)
ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा । चांदोबा
खाली आला, हौदामध्ये बघ बुडला । (बालकविता,
कवी : हरी सखाराम गोखले )
येये रात भीगी-भीगी, ये मस्त फ़िज़ायें, उठा धीरे-धीरे,
वो चाँद प्यारा प्यारा (हिंदी चित्रपट गीत; चित्रपट :
चोरी चोरी; गीतकार : शैलेंद्र; संगीतकार : शंकर-
जयकिशन; गायक/गायिका : लता मंगेशकर + मन्ना
डे
येह रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दासताँ
(हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - जाल; गीतकार - साहिर
लुधियानवी, संगीतकार एस, डी बर्मन, गायक -
हेमंतकु मार)
रागिणी मुखचंद्रमा, उजळि उजळि पूर्णिमा
(नाट्यगीत, नाटक - सुवर्णतुला; कवी - विद्याधर
गोखले ; संगीतकार - छोटा गंधर्व; गायक - प्रसाद
सावकार; राग - नारायणी; ताल - रूपक)
ऐकलात का हट्ट नवा हट्ट नवा, रामाला बाई चंद्र हवा
(भावगीत; कवी - श्रीनिवास खारकर; गायक/
संगीतकार : गजानन वाटवे)
रुत रंगीली आई चाँदनी छाई, चाँद मेरे आजा, चाँद
मेरे आजा हो (कवी -कमर जलालाबादी; हिंदी
चित्रपट - मिर्झा साहिबाँ; संगीतकार - अमरनाथ-
हुस्नलाल भगतराम; समूहगीत, गायक-नूरजहान,
शमशाद बेगम, जोहरा
वो चाँद खिला वो तारे हॅंसे (हिंदी चित्रपटगीत;
चित्रपट : अनाडी; गायिका : लता मंगेशकर;
संगीतकार : शंकर जयकिशन; गीतकार : शैलेंद्र)
हमसे पूॅंछो कि कै सी थी वो रात, जब चाँद था पर तुम
नहीं आये थे (हिंदी गीत, गायक - नुसरत फतेह अली
खान)
हाय चन्दा गये परदेश, चकोरी यहाँ रो रो मरे (हिंदी
चित्रपटगीत, चित्रपट - चकोरी; गीतकार - मुल्कराज
बखरी, संगीतकार - हंसराज बेहेल; गायिका - लता
मंगेशकर)
हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला
पोचवा (नाट्यगीत; कवी - कु सुमाग्रज; गायक - जितेंद्र
अभिषेकी; नाटक - ययाती आणि देवयानी)
चंद्र कलांनी वाढताना दिसतो

संदर्भ

1. स्पूडिज, पी.डी. "चंद्र" (https://web.archive.org/


web/20070417004137/https://www.nasa.g
ov/worldbook/moon_worldbook.html) .
Archived from the original (http://www.nas
a.gov/worldbook/moon_worldbook.html)
on 2007-04-17.
2. गिलिज, जे.जे. (१९९६). "चंद्राच्या पृथ्वीविन्मुख
बाजूवरील मारियाची भौगोलिक संरचना" (http://ads
abs.harvard.edu/abs/1996LPI.27.413G) .
लुनार व प्लॅनेटरी सायन्स. २७: ४१३–४०४.
Unknown parameter |coauthors=
ignored (|author= suggested) (सहाय्य)
3. शियरर, सी. (२००६). "थर्मल व मॅग्मॅटिक इव्हॉल्यूशन
ऑफ द मून". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी व जियोके मिस्ट्री.
६०: ३६५–५१८.
4. टेलर, जी.जे. "अ न्यू मून फॉर द ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरी" (ht
tp://www.psrd.hawaii.edu/Aug00/newMoo
n.html) .
5. मेलोश, एच.जे. इम्पॅक्ट क्रे टरींग: अ जियोलॉजीक
प्रोसेस.
6. टेलर, जी.जे. "द बिगेस्ट होल इन सोलर सिस्टिम" (htt
p://www.psrd.hawaii.edu/July98/spa.htm
l) .
7. हेके न, जी. लुनार सोर्सबुक, अ यूजर्स गाईड टू द मून. न्यू
यॉर्क . pp. ७३६.
8. "लुनार पोलर कॉम्पोसाईट्स" (http://www.lpi.usra.
edu/publications/slidesets/clem2nd/slide_
32.html) .
9. मार्टल, एल. "द मून्स डार्क , आईसी पोल्स" (http://ww
w.psrd.hawaii.edu/June03/lunarShadows.h
tml) .
10. "युरेका! आईस फाऊं ड ऑन लुनार पोल्स" (https://w
eb.archive.org/web/20130806085050/htt
p://lunar.arc.nasa.gov/results//ice/eureka.h
tm) . Archived from the original (http://luna
r.arc.nasa.gov/results/ice/eureka.htm) on
2013-08-06.
11. स्पूडिज, पी. "आईस ऑन द मून" (http://www.thes
pacereview.com/article/740/1) .
12. विक्झोरेक, एम. (२००६). "द कॉन्स्टिट्यूशन ॲन्ड
स्ट्रक्चर ऑफ लुनार इंटीरियर". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी
ॲन्ड जियोके मिस्ट्री. ६०: २२१–३६४.
13. म्यूलर, पी. (१९६८). "मॅसन्स : लुनार मास
कॉन्सेंट्रेशन्स". सायन्स. १६१: ६८०–६८४. Unknown
parameter |coauthors= ignored
(|author= suggested) (सहाय्य)
14. "डॉपलर ग्रॅव्हिटी एक्सपेरिमेंट रिझल्ट्स" (https://we
b.archive.org/web/20130806084827/http://
lunar.arc.nasa.gov/results//dopres.htm) .
Archived from the original (http://lunar.arc.n
asa.gov/results/dopres.htm) on 2013-08-
06.
15. कोनोप्लीव, ए. (२००१). "रिसेंट ग्रॅव्हिटी मॉडेल्स ॲज
अ रिझल्ट ऑफ द लुनार प्रॉस्पेक्टस मिशन". इकारस.
५०: १–१८. Unknown parameter
|coauthors= ignored (|author=
suggested) (सहाय्य)
16. "मॅग्नेटोमीटर / इलेक्ट्रॉन रिफ्लेक्टोमीटर रिझल्ट्स" (htt
ps://web.archive.org/web/2010052712133
0/http://lunar.arc.nasa.gov/results/magelre
s.htm) . Archived from the original (http://lu
nar.arc.nasa.gov/results/magelres.htm)
on 2010-05-27. एप्रिल १२ २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
17. हूड, एल.एल. (१९९१). "फॉर्मेशन ऑफ मॅग्नेटिक
ॲनॉमलीज ॲन्टिपोडल टु लुनार इम्पॅक्ट बेसिन्स: टू -
डायमेन्शनल मॉडेल कॅ लक्युलेशन्स". जे.
जियोफिजिक्स रिसर्च. ९६: ९८३७–९८४६.
Unknown parameter |coauthors=
ignored (|author= suggested) (सहाय्य)
18. ग्लोबस, रूथ. "इम्पॅक्ट अपॉन लुनार ॲटमॉस्फियर" (ht
tps://web.archive.org/web/2009101321541
0/http://www.nas.nasa.gov/About/Educatio
n/SpaceSettlement/75SummerStudy/5app
endJ.html) . Archived from the original (htt
p://www.nas.nasa.gov/About/Education/Sp
aceSettlement/75SummerStudy/5appendJ.
html) on 2009-10-13. ऑगस्ट २९ २००७ रोजी
पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
19. स्टर्न, एस.ए. (१९९९). "द लुनार ॲटमॉस्फियर :
हिस्टरी, स्टेटस, करंट प्रॉब्लेम्स, ॲन्ड कॉन्टेक्स्ट". रिव्ह.
जियोफिज. ३७: ४५३–४९१.
20. "सरासरी तापमान" (https://web.archive.org/we
b/20140729085725/http://www.asi.org/ad
b/m/03/05/average-temperatures.html) .
Archived from the original (http://www.asi.o
rg/adb/m/03/05/average-temperatures.ht
ml) on 2014-07-29. 2008-02-12 रोजी पाहिले .
21. क्लीन, टी. (२००५). "एचएफ–डब्ल्यू क्रोनोमेट्री ऑफ
लुनार मेटल्स ॲन्ड द एज ॲन्ड अर्ली डिफरन्शियेशन
ऑफ द मून" (http://www.sciencemag.org/cg
i/content/abstract/310/5754/1671) .
सायन्स. ३१० (५७५४): १६७१–१६७४.
१२/०४/२००७ रोजी पाहिले . Unknown
parameter |coauthors= ignored
(|author= suggested) (सहाय्य);
|accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
22. बिंदर, ए.बी. (१९७४). "ऑन द ओरिजिन ऑफ द मून
बाय रोटेशनल फिशन" (http://adsabs.harvard.ed
u/abs/1974Moon...11...53B) . द मून. ११ (२):
५३–७६. १२/०४/२००७ रोजी पाहिले .
|accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
23. मिट्लर, एच.ई. (१९७५). "फॉर्मेशन ऑफ ॲन आयर्न-
पुअर मून बाय पार्शल कॅ प्चर, किंवा : येट अनादर
एक्झॉटिक थिअरी ऑफ लुनार ओरिजिन" (http://ad
sabs.harvard.edu/abs/1975Icar...24..256
M) . इकारस. २४: २५६–२६८. १२/०४/२००७ रोजी
पाहिले . |accessdate= मधील दिनांक मूल्ये
तपासा (सहाय्य)
24. स्टीव्हन्सन, डी.जे. (१९८७). "ओरिजिन ऑफ द मून –
द कोलाईजन हायपॉथिसिस" (http://adsabs.harva
rd.edu/abs/1987AREPS..15..271S) .
ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ अर्थ ॲन्ड प्लॅनेटरी सायन्सेस.
१५: २७१–३१५. १२/०४/२००७ रोजी पाहिले .
|accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
25. कॅ नप, आर. (२००१). "ओरिजिन ऑफ द मून इन अ
जायंट इम्पॅक्ट नियर द एन्ड ऑफ द अर्थ्‌स फॉर्मेशन".
नेचर. ४१२: ७०८–७१२. Unknown parameter
|coauthors= ignored (|author=
suggested) (सहाय्य)
26. पॅपिके , जे. (१९९८). "लुनार अँप्यूल्स". रिव्ह्यूज इन
मिनरॉलॉजी ॲन्ड जियोके मिस्ट्री. ३६: ५.१–५.२३४.
Unknown parameter |coauthors=
ignored (|author= suggested) (सहाय्य)
27. हायसिंगर, एच. (२००३). "एजेस ॲन्ड स्ट्रॅटिग्राफी ऑफ
मेअर बॅसॉल्ट्स इन ओशनस प्रोसेलॅरम, मेअर नंबियम,
मेअर कॉग्निटम, ॲन्ड मेअर इन्सुलॅरम". जे. जियोफिज.
रिस. १०८: १०२९. Unknown parameter
|coauthors= ignored (|author=
suggested) (सहाय्य)
28. नॉर्मन, एम. "द ओल्डेस्ट मून रॉक्स" (http://www.psr
d.hawaii.edu/April04/lunarAnorthosites.ht
ml) . १२/०४/२००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
29. वारिचियो, एल. इनकॉन्स्टंट मून.
30. द स्मेल ऑफ मूनडस्ट (http://science.nasa.gov/
headlines/y2006/30jan_smellofmoondust.h
tm) Archived (https://web.archive.org/we
b/20100308112332/http://science.nasa.go
v/headlines/y2006/30jan_smellofmoondus
t.htm) 2010-03-08 at the Wayback
Machine. फ्रॉम नासा
31. "अपोलो लेझर रेंजिंग एक्सपेरिमेंट्स यील्ड रिझल्ट्स"
(https://web.archive.org/web/2008030906
1941/http://sunearth.gsfc.nasa.gov/eclips
e/SEhelp/ApolloLaser.html) . Archived from
the original (http://sunearth.gsfc.nasa.gov/
eclipse/SEhelp/ApolloLaser.html) on 2008-
03-09. ३०/०५/२००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
32. रे, आर. "ओशन टाईड्स ॲन्ड द अर्थ्‌स रोटेशन" (http
s://web.archive.org/web/2010032708412
5/http://bowie.gsfc.nasa.gov/ggfc/tides/int
ro.html) . Archived from the original (http://
bowie.gsfc.nasa.gov/ggfc/tides/intro.htm
l) on 2010-03-27. १२/०४/२००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
33. व्हेंप्यू, ए. "नो, इट्स नॉट अवर "सेकं ड" मून!!!" (http
s://web.archive.org/web/2009011904520
3/http://www.captaincosmos.clara.co.uk/cr
uithne.html) . Archived from the original (ht
tp://www.captaincosmos.clara.co.uk/cruith
ne.html) on 2009-01-19. १२/०४/२००७ रोजी
पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (ht
tp://web.archive.org/20070928170012/%7
B%7B%7Burl%7D%7D%7D) सप्टेंबर २८, २००७
(वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन
ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
34. मोरेस, एम.एच.एम. (२००२). "द पॉप्युलेशन ऑफ
नियर-अर्थ ॲस्टेरॉईड्स इन कोऑर्बायटल मोशन विथ द
अर्थ" (http://adsabs.harvard.edu/abs/2002Ic
ar..160....1M) . इकारस. १६०: १–९.
१२/०४/२००७ रोजी पाहिले . Unknown
parameter |coauthors= ignored
(|author= suggested) (सहाय्य);
|accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
35. थिमन, जे. "एक्लिप्स ९९, फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स"
(https://web.archive.org/web/2007021112
0127/http://eclipse99.nasa.gov/pages/faq.
html) . Archived from the original (http://ecl
ipse99.nasa.gov/pages/faq.html) on 2007-
02-11. १२/०४/२००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
36. एस्पेनाक, एफ. "सारोस सायकल" (https://archive.
today/20120524183445/http://eclipse.gsf
c.nasa.gov/SEsaros/SEsaros.html) .
Archived from the original (http://sunearth.
gsfc.nasa.gov/eclipse/SEsaros/SEsaros.ht
ml) on 2012-05-24. १२/०४/२००७ रोजी पाहिले .
|अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)

बाह्य दुवे

सूर्यमाला दालन

चित्र व नकाशे
चंद्र पूर्ण झूम व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=03-
PHrpJ5lg
कॉन्स्टन्टाइन, एम. "अपोलो पॅनोरामाज" (http://m
oonpans.com/missions.htm) . एप्रिल
१२,२००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील
दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
"क्लेमेन्टाइन ल्यूनर इमेज ब्राउजर १.५" (https://w
eb.archive.org/web/20070407000411/h
ttp://www.cmf.nrl.navy.mil/clementine/c
lib/) . Archived from the original (http://
www.cmf.nrl.navy.mil/clementine/clib/)
on 2007-04-07. एप्रिल १२,२००७ रोजी पाहिले .
|अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
"डिजिटल ल्यूनर ऑर्बायटर फोटोग्राफिक अ‍ॅटलास
ऑफ द मून" (http://www.lpi.usra.edu/reso
urces/lunar_orbiter/) . एप्रिल १२ ,२००७
रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये
तपासा (सहाय्य)
"गूगल मून" (http://moon.google.com) .
एप्रिल १२,२००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
"ल्यूनर अ‍ॅटलासेस" (http://www.lpi.usra.edu/
resources/lunar_atlases/) . एप्रिल
१२,२००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील
दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (http://w
eb.archive.org/20070508231342/%7B%
7B%7Burl%7D%7D%7D) मे ८, २००७ (वरील
दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही
आवृत्ती मिळवलेली आहे.)
ॲश्लिमन, आर. "ल्यूनर मॅप्स" (https://web.arch
ive.org/web/20040206052233/http://ral
phaeschliman.com/id26.htm) . प्लॅनेटरी
कार्टोग्राफी ॲन्ड ग्राफिक्स. Archived from the
original (http://ralphaeschliman.com/id2
6.htm) on 2004-02-06. एप्रिल १२ , २००७
रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये
तपासा (सहाय्य)
"ल्यूनर फोटो ऑफ द डे" (http://www.lpod.or
g/) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (http://w
eb.archive.org/20070509150642/%7B%
7B%7Burl%7D%7D%7D) मे ९, २००७ (वरील
दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही
आवृत्ती मिळवलेली आहे.)
"मून" (http://www.worldwindcentral.com/
wiki/Moon) . वर्ल्ड वाइन्ड सेंटर. एप्रिल १२ ,
२००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील
दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
"द मून : फिफ्टी फॅ न्टॅस्टिक फीचर्स" (http://moo
n.skymania.com/) . सप्टेंबर २९ , २००७ रोजी
पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये
तपासा (सहाय्य)
चांद्र मोहिमा
जोन्स, ई.एम. "अपोलो ल्यूनर सरफे स जर्नल" (http
s://web.archive.org/web/201505181129
06/http://www.hq.nasa.gov/office/pao/
History/alsj/) . Archived from the
original (http://www.hq.nasa.gov/office/
pao/History/alsj/) on 2015-05-18. एप्रिल
१२ , २००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील
दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
"एक्स्प्लोरिंग द मून" (http://www.lpi.usra.ed
u/expmoon/) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले .
|अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
टीग, के . "द प्रोजेक्ट अपोलो आर्चिव्ह" (http://ww
w.apolloarchive.com/apollo_archive.htm
l) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
चंद्राच्या कला
"करंट मून फे ज" (http://www.moonphaseinf
o.com/) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
"नासा'ज स्कायकॅ ल - स्काय इव्हेंट्स कॅ लेंडर" (http
s://web.archive.org/web/200708200751
42/http://sunearth.gsfc.nasa.gov/eclips
e/SKYCAL/SKYCAL.html) . Archived
from the original (http://sunearth.gsfc.n
asa.gov/eclipse/SKYCAL/SKYCAL.htm
l) on 2007-08-20. ऑगस्ट २७ , २००७ रोजी
पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये
तपासा (सहाय्य)
"व्हर्चुअल रियॅलिटी मून फे ज पिक्चर्स" (http://tyc
ho.usno.navy.mil/vphase.html) . एप्रिल १२
, २००७ रोजी पाहिले . |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील
दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
इतर
"अवकाशवेध - चंद्र" (https://web.archive.or
g/web/20080222062708/http://www.av
akashvedh.com/suryamala/chandra.ht
m) . Archived from the original (http://w
ww.avakashvedh.com/suryamala/chand
ra.htm) on 2008-02-22. फे ब्रुवारी १८, २००८
रोजी पाहिले .
"ऑल अबाउट द मून" (http://www.space.co
m/moon/) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
अर्थ्स मून प्रोफाईल (http://solarsystem.nasa.
gov/planets/profile.cfm?Object=Moon)
Archived (https://web.archive.org/web/2
0090909061625/http://solarsystem.nas
a.gov/planets/profile.cfm?Object=Moo
n) 2009-09-09 at the Wayback Machine.
नासा’ज सोलर सिस्टिम एक्स्प्लोरेशन (http://sola
rsystem.nasa.gov)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (http://w
eb.archive.org/20070210130337/%7B%
7B%7Burl%7D%7D%7D) फे ब्रुवारी १०, २००७
(वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन
ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
"आर्चिव्ह ऑफ मून आर्टिकल्स" (http://www.psr
d.hawaii.edu/Archive/Archive-Moon.htm
l) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
विल्यम्स, डी.आर. "मून फॅ क्ट शीट" (http://nssd
c.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/m
oonfact.html) . एप्रिल १२ , २००७ रोजी पाहिले .
|अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)
"मून विकी" (https://web.archive.org/web/2
0190912104554/https://the-moon.wikis
paces.com/) . Archived from the original
(http://the-moon.wikispaces.com/) on
2019-09-12. सप्टेंबर ६ , २००७ रोजी पाहिले . |
अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा
(सहाय्य)

"https://mr.wikipedia.org/w/index.php?
title=चंद्र&oldid=2397580" पासून हुडकले

या पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२४ रोजी १८:२८ वाजता


के ला गेला. •
इतर काही नोंद के ली नसल्यास,येथील मजकू र CC BY-SA
4.0 च्या अंतर्गत उपलब्ध आहे.

You might also like