Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

कु ठं तुमी गेला व्हता

शेजबाज के ली, ऊसा समई ठे वली


गुजबोल्यासाठी वाट राघूची पाहिली

कु ठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी?


कशी व्हती छबी तिची?
माझ्याहून प्यारी, माझ्याहून न्यारी !

राती चांद डोईवर आला


हिचा जीव कासावीस झाला

गळाभर मोती माझे अंग बाजूबंद


तरी कु ण्या कोकिळेचा जडलाय छंद
ऐकते मी डोळे तिचे, पान-इडा भारी !

कशासाठी येता आता? लाविते मी कडी


अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी
नको आता लाडीगोडी, नको शिरजोरी

गीत - ना. धों. महानोर


संगीत - आनंद मोडक
स्वर - आशा भोसले
चित्रपट - एक होता विदूषक
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी

Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

This page is printed from www.aathavanitli-gani.com

A Non-profit Non-commercial Public Service Initiative by Alka Vibhas

You might also like