Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

-: टायपिंग व स्टेनोचे विद्यार्थ्यांना परीक्षेचे सूचना व निरोप समारंभ:-

COMPUTER TYPING परीक्षा दिनांक २१ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर पर्यन्त राहणार आहेत व आपले निरोप समारंभ व अंतिम परीक्षेचे मार्गदर्शन दिनांक १९
नोव्हेंबर रविवार ला राहील. परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १८ नोव्हेंबर २०२३ पूर्वी घेऊन जावे, परीक्षा सुरु अस्तांनी प्रवेश पत्र मिळणार नाही कृ पया याची काळजी
घ्यावी, तसेच आपली उर्वरित पूर्ण फीस जमा करावी, त्याशिवाय कोणत्याही कारणास आपले प्रवेश पत्र मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. अपूर्ण फीस असल्यास
आपले प्रवेश पत्र मिळणार नाही व शैक्षाणिक नुकसान झाल्यास कें द्र जबाबदार राहणार नाही.
प्रवेश पत्र विषयी आणि परिक्षेचे मार्गदर्शन व निरोप समारंभ दि. १९ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ८:०० वा पासून ते ९:०० पर्यन्त राहील, तरी सर्व टायपिंग व
स्टेनोचे विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहणे बंधनकारक आहे. सदर तारखेनंतर विद्यार्थ्याना परीक्षेबद्दल कोणतेही मार्गदर्शन दिले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
यंदा मराठी व इंग्रजी परीक्षेत मधील कोणताही दिवस सूट नसून परीक्षा लागोपाठ होणार आहेत.

काही महत्वाच्या सूचना:-


१.परीक्षेचे वेळेस आपले प्रवेश पत्र व आधार कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे.
२.कोणत्याही कारणास्तव दुसऱ्या विद्यार्थांचे PASSWORD आपण वापरू नये,
३.परीक्षा हालमध्ये कं प्युटर मध्ये बिघाड आल्यास ताबडतोब आयटी टीचेर ला कळवावे. किं वा शेख सरांशी संपर्क करावा,“ मेलो रे बप्पा, आता माझा काय
होईल ‘’ असे ओरडू नये.
४. आपली कं प्युटर व्यवस्थित असल्याची आदी खात्री करावी.
५.प्रत्येक परिक्षाचे आदी एक PASSAGE वर्ड मध्ये टाईप करून खात्री करावी.
६.परीक्षा कें द्रवर किमान ३० मी. आदी पोहचावे.
७.कोणत्याही परीस्थीतीत आपले Batch Time बदलून मिळणार नाही मात्र आपली इतर मंडळाची परीक्षा असल्यास आपणास वेळ व दिनांक बदल करून
मिळेल, तशी कल्पना परीक्षे पूर्वी ७ दिवस द्यावी.
८.आपली फीस पूर्ण जमा के ल्याशिवाय प्रवेश पत्र मिळणार नाही.याची दक्षता घ्यावी.
०९. दि. १८ नोव्हेंबर २०२३ नंतर प्रवेश पत्र ( Hall Ticket ) मिळणार नाही.
१०.परीक्षा संपली कि सरळ घरी जावे, परीक्षा लय भारी आहे असे म्हणून दुसऱ्या विध्यार्थांना भयभीत करू नये.
११. परीक्षेचे निकाल पाहणे हे आपली जबाबदारी राहील, कें द्रावरून फोन येणार, याची अपेक्षा करू नये. www.mscepune.in \
successmnr.blogspot.com वरती आपले निकाल उपलब्ध राहतील.
१२. निकाल लागल्यानंतर एका महिन्याचे आत आपले प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे, उशिरा झाल्यास कें द्र प्रमाणपत्राचा जबाबदार राहणार नाही, तसेच
एका वर्षाचे आत प्रमाणपत्र न नेल्यास प्रति माह १५/-रु इतके HANDLING CHARGES आकारण्यात येते, याची गांभीर्याने दखल घ्यावी.या बॅच पासून
प्रमाणपत्र स्पीड पोस्ट करण्याची व्यवस्था करत आहोत, विद्यार्थ्यांनी envelop व ५० रु इतके पोस्टल चार्ज प्रवेश पत्र नेट अस्तानि जमा करून घ्यावे.
१३. अंतिम परीक्षा सुरु अस्तांनी शेख सरांना फोन करू नये, परीक्षे दरम्यान येणारी सर्व गैरतांत्रिक अडचणी संदीप यरवाळ सर,आणि परीक्षेचे तांत्रिक अडचणी
बद्दल कु निशात निखत यांचे कडून निराकरण करावे. शक्यतो आपले सर्व अडचणी व प्रश्न परीक्षेपूर्वच निराकरण करावे, परीक्षा कें द्रावर कोणत्याही कर्मचारी
अथवा अधिकारी सोबत वाद विवाद करून नये.
१४. कोणत्याही कारणास्तव परीक्षा कें द्रावर Hall Ticket मिळणार नाही याची काळजी घ्यावी.
१५. परीक्षा कें द्रावर अधिकाऱ्यांची गाडी तपासणी करिता आल्यास अर्थात तपासणी सुरु अस्तांनी आपला मन आणि आपण सुद्धा शांत राहावा. कोणत्याही
परिस्थितीत कें द्राबाहेर पडू नये.
१६. परीक्षेकें द्रावर Biometric व तसेच online कॅ मेरा रेकॉर्डिंग सुरु असल्याची खात्री करून आपली biometric पद्धतीने हजेरी लावणे बंधनकारक आहे.
१७. आपली परीक्षेचे दिनांक व तसेच आपले परीक्षेचे वेळ खात्री पूर्वक तपासावे.
१८. परीक्षे दरम्यान आपले नावासमोरच आपली स्वाक्षरी करावी, त्याशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु करू न्ये, आपण स्वाक्षरी न के ल्यास आपली गैरहजेरी मांडली
जातो, व आपले निकाल थांबविले जातो.
१९. स्पीड PASSAGE सुरु करण्यापूर्वी IT TEACHER ला कल्पना द्या, व तुम्ही सुद्धा सर्वांचे परीक्षा संपल्याशिवाय उठू नये.
२०. आपले संपूर्ण परीक्षा संपल्यानंतर आपण परीक्षा HALL मधून IT शिक्षकांची परवानगी शिवाय बाहेर पडू नये, कदाचित परीक्षेचे BACKUP घेणे बाकी
असू शकतो, व तो IT TEACHER विसरल्यास आपले निकाल येणार नाही.
२१ विद्यार्थ्यांनी दररोज आपली स्पीड मध्ये १/२ ओडी वाढविण्याचा प्रयत्न करावा.
२२.परीक्षा दुसऱ्या कारंजा तालुक्यात इनानि महाविद्यालय येथे असल्यामुळे वेळेचे अचूक नियोजन करावे, कोणत्याही कारणास्तव उशीर झाल्यास जसे गाडीचे
टायर पंचर इत्या. तरी किमान एक CALL शेख सरांनी किं वा वर्ग शिक्षिकांना करून घ्यावे.
२३. फीस भरण्याविष्यी खालील विधानाचा अभ्यास करूनच office मध्ये प्रवेश करावा.

फीस विषयी खालील शब्दाचा व विधानाचा वापर करू नये.


१.सर परीक्षा झाल्यावर फीस जमा करतो.
२.सर पडून चाललो काय,
३.आज प्रवेश पत्र द्या, फीस उद्या किवा परवा देतो.
४.सर शेतात पिक बरोबर झालाच नाही थोड थांबा.
५.सर अर्धे आता घ्या अर्धे फीस पास झाल्यावर देतो.
६.सर आमच्यावर विश्वास नाही का.मग द्या परवेश पत्र.
७.सर तीन पेपर पैकी एकाचेच फीस घ्या आणि एकाच प्रवेश पत्र द्या.
८.सर परीक्षा हाल चे बाहेर फीस देतो.
९.सर सराव अर्धाच के ला. मग फीस अर्धीच देतो.
१०.सर फीस जमा नाही झाली तर त्या शिवाय प्रमाणपत्र देऊच नका ना हो.प्रमाणपत्र तुमच्याचकडे राहू द्या
११.बस घरी गेलो का फीस आणून देतो , HALL TICKET द्या .
१२.सर HALL TICKET द्या नाही तर परीक्षाच देत नाही.
१३.सर बहिणीचा लग्न होता, खूब खर्च झाला.
१४.सर शिक्षिकांनी शिकवलाच नाही.फी भरत नाही.
१५.काय सर पैशे,पैशे करत राहता,दिऊ.
१६. सर नोटाच नाही. मग कोठून पैशे देऊ.
१७. सर हिंदी संगणक टायपिंग तुमच्याच कडे करतो Hall Ticket द्या.
१८.सर तुमच्या सारखे लोकं खूब कमी असतात, तुम्ही खूब दयाळू आहे, प्रवेश पत्र द्या सर.
१९.सर या वर्षी पावसाने सोयाबीन पूर्ण खराब के लय, भाव पण लागला नाही, तूर विकली कि देतो.
२०. सर TALLY करणार त्यावेळेस सोबत फीस देतो.
२१. सर किती पैशे कमवता तुम्ही तरी पैशे पैशे करता हो.
२२. सर स्पीड आली नाही, तुम्ही मारून द्या फी जमा करतो मग.
२३. सर दोनच त महीने झाले इतक्या लवकर परीक्षा आणि फी मी देत नाही.

BEST OF LUCK

You might also like