Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

भृगु हे नाव भृगु भृज्जति (भाजणें) या धातूपासून निघाला असें यास्कानें म्हटलें आहे.

भगवद्गीतेत भगवान श्रीकृ ष्ण म्हणतात की ऋषींमध्ये ते भृगु आहेत, म्हणजेच भृगु हे एक श्रेष्ठ ऋषी
आहेत.

महाभारतांत भृगु ऋषींची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाच्या हृदयातून झाली असल्याचे सांगितले आहे तर
भागवतपुराणांत भृगु हा त्याच्या अंगापासून निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. वेदांमध्ये भृगु ऋषींच्या नावे
अनेक सुक्त आहेत आणि अथर्ववेदात यांचा चार वेळा उल्लेख येतो तो भृगु वारूणि म्हणून, म्हणजे
यावरून एवढे स्पष्ट होते की भृगु हे वरूणाचे पुत्र ! तैत्तिरीय आरण्यकांत, महाभारतांत एके ठिकाणीं
वरूणानें भृगूला पुत्र मानल्याची कथा आहे. पौराणिक कथांमधील परस्पर विरोध बघता त्यांच्या
विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि त्यामुळेच जर वैदिक वाङ्मय प्रमाण मानले तर नक्कीच
भृगु हे वरूणाचे पुत्र असावेत.

ह्या भृगु ऋषींना दोन पत्नी होत्या, पहिली पत्नी ख्याती ही प्रजापती दक्षाची कन्या होती जिच्यापासून
त्यांना च्यवन (च्यवन - आप्नवान/और्व - ऋचिक - जमदग्नी - वसू, विश्वावसु, रुक्मवान, सुषेण, परशुराम),
धाता, विधाता हे मुलं आणि लक्ष्मी (विष्णूंची पत्नी) ही कन्या झाली. दुसरी पत्नी ही हिरण्यकश्यपची कन्या
दिव्या होती जिचा पुत्र म्हणजे दैत्यगुरू शुक्र. भृगुंंच्या वंशजांना भार्गव असे म्हणतात.

भृगु ऋषी हे दक्ष प्रजापतीच्या सैन्याचे सेनापती होते. महादेवांनी जेव्हा आपली पत्नी भगवती सतीच्या
आत्मदहनानंतर दक्षयज्ञाचा विध्वंस के ला तेव्हा यांनाही महादेवांच्या गणांनी हरवले होते.

भृगु ऋषींचा उल्लेख दाशराज्ञ युद्धात येतो पण तो अनेकवचनी असल्याने तो बहुधा त्यांचा नसून त्यांचे
नाव गोत्र म्हणून लावणाऱ्या त्यांच्या शिष्य (क्षत्रिय शिष्य ज्यांचे ते पुरोहित असावे) अथवा वंशजांचा
असावा.
भृगु ऋषींना अग्निस पृथ्वीवर आणण्याचे श्रेय दिले गेले आहे तसेच त्यांनीच भृगुसंहिता रचली होती. यांना
ज्योतिषशास्त्राचे प्रणेते म्हटले जाते. हे भृगु ऋषी १० ब्रम्हर्षींपैकी तथा २१ प्रजापतींपैकी एक मानले जात
आणि त्यामुळेच ऋषींमध्ये त्यांचे स्थान श्रेष्ठ लोकांमध्ये येते.

यांनी जेथे यज्ञ करविला त्या ठिकाणास भृगुकच्छ हे नाव पडले (भृगुकच्छ - भरूकच्छ - भरुच - भडोच).

एकदा शुक्रचार्यांच्या शिष्यांना अर्थात असुरांना भृगु ऋषींच्या माघारी त्यांची पत्नी ख्यातीने देवांविरुद्ध
आश्रय दिला तेव्हा श्रीविष्णूंनी ख्यातीदेवीचा शिरच्छे द करून असुरांना कं ठस्नान घातले, तेव्हा भृगु ऋषींनेच
विष्णूंना शाप दिला की एक जन्म तुम्हास पत्नी विना राहावे लागेल (प्रभू श्रीरामचंद्र).

भृगु ऋषी एकदा त्रिदेवांपैकी श्रेष्ठ कोण हे शोधण्याचा चंग बांधून त्यांची परीक्षा घ्यायला निघाले. सर्वप्रथम
ते गेले आपले पिता ब्रह्मदेवाकडे पण ब्रह्मदेव सरस्वती देवीच्या विणावादनात दंग असल्याने त्यांनी भृगु
ऋषींकडे दुर्लक्ष के ले, भृगु ऋषी खवळले व तुम्ही अपूजनियच राहाल असा शाप देत निघून गेले. ते नंतर
आले कै लासावर पण बघतात काय की शिव-पार्वती दोघेही नृत्यविलासात रममाण होते आणि त्यांच्याकडे
बघतही नव्हते, शेवटी खुद्द देवाधिदेव महादेवांना त्यांनी शाप दिला की कोणतीही स्त्री कधीही तुमच्या
पिंडीचे पूजन करू शकणार नाही. क्रोधायमान भृगु शेवटी गेले वैकुं ठास व संतप्त होऊन आल्या क्षणी
त्यांनी आपले जावई शेषशायी नारायण यांच्या छातीवर लाथ मारली. भगवान विष्णू उठले व त्यांनी मोठ्या
नम्रतेने ऋषींची क्षमा मागत त्यांना काही लागले का हे विचारले. तेव्हा त्रिदेवांमध्ये आद्यपूजेचा मान भृगु
ऋषींनी विष्णूंना दिला.

भृगु ऋषींनेच आपली नातसून ऋचिकपत्नी सत्यवती आणि तिच्या आईला (कान्यकु ब्जच्या राजा गाधी
याची पत्नी) पुत्रप्राप्तीसाठी एके क रोप दिले होते ज्याने सत्यवतीस सत्शील असा ब्राह्मण तर तिच्या
आईस शूरवीर क्षत्रिय पुत्र निपजेल असे सांगितले पण चुकू न ती रोपं बदलली ज्याने सत्यवतीच्या आईला
विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय व कर्माने ब्राह्मण मूल झाले पण सत्यवतीने पुन्हा भृगुऋषींना विनंती
के ल्याने तिला तर जमदग्नी हे ब्राह्मण सुकु मार झाले पण नातू भार्गवराम (परशुराम) मात्र कर्माने क्षत्रिय
झाले.
https://mr.quora.com/%E0%A4%AD%E0%A5%83%E0%A4%97%E0%A5%81-%E0%A4%8B
%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%8B
%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF
%E0%A5%80/answers/189705537?
ch=10&oid=189705537&share=724ce9c8&srid=uIHXe1&target_type=answer

महर्षि भृगु यांचा जन्म ब्रह्मलोक-सुशा नगर (सध्याचा इराण) येथे 38 दशलक्ष बीसी झाला. त्यांच्या
आजोबांचे नाव महर्षि मारिचि होते. आजोबांचे नाव कश्यप ऋषी होते, आजीचे नाव आदिती होते.
ब्रह्मलोकाचा राजा झाल्यानंतर प्रजापिता ब्रह्मा झाले त्याचे वडील प्रचेता-विधाता. त्याचे पालक अदिती-
कश्यप यांचा मोठा मुलगा होता. महर्षि भृगुजीच्या आईचे नाव वीरानी देवी होते. ते त्यांच्या आई
वडिलांकडू न दोन भाऊ होते. तुझ्या मोठ्या भावाचे नाव अंगिरा ऋषी होते. कोणाचा मुलगा बृहस्पती होता
जो देवांची याजक-देवी म्हणून ओळखला जातो. महर्षि भृगु यांनी रचलेल्या भृगु संहिता आणि गंगा सरयू
नद्यांच्या संगमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जीवन शिदोरी आणि बलिदान परंपरेने शिष्य दरदार यांच्या
सन्मानार्थ दादरी मेळावा सुरू के ला.

आर्ष ग्रंथात महर्षि भृगुच्या दोन बायकाचा उल्लेख आढळतो. त्यांची पहिली पत्नी दिव्या होती, ती
दुरात्म्यांचा राजा, हिरण्यकश्यपची मुलगी. ज्यांचेकडू न तुमचे दोन पुत्र अनुक्रमे काव्य-शुक्र आणि त्वष्ट-
विश्वकर्मा यांचा जन्म झाला. सुशानगर (ब्रह्मलोका) येथे जन्मलेल्या महर्षि भृगुचे दोन्ही पुत्र विलक्षण
प्रतिभेचे श्रीमंत होते. ज्येष्ठ पुत्र काव्य-शुक्र हे ज्योतिषी, ज्योतिष शास्त्रात मास्टर, यज्ञ विधी होते.
आपल्याला मातृकु ल मध्ये आचार्य पदवी मिळाली. ते शुक्राचार्य म्हणून जगात प्रसिद्ध झाले. दुसरा मुलगा
त्वाष्ट-विश्वकर्मा वास्तुचा एक कु शल वास्तुविशारद होता. मातृसत्ताक राक्षसात तुला 'माया' म्हणून
ओळखले जात असे. ते कु शल कारागिरात प्रसिध्द होते.

महर्षि भृगु यांची दुसरी पत्नी पौलमी होती, ती पुलोम ऋषी यांची कन्या होती. त्यांना च्यवन आणि रिचिक
ही दोन मुले झाली. थोरला मुलगा च्यवनचा विवाह मुनिवर याने गुजरात भवंचातील (खंभातची आखाती)
राजा शर्यतीची मुलगी सुकन्याशी के ला होता. भार्गव च्यवन आणि सुकन्या यांच्या लग्नामुळे भार्गवने
हिमालयात दक्षिणात प्रवेश के ला. च्यवन ऋषी खंभातच्या आखातीचा राजा झाला आणि हा प्रदेश भृगुच्छ-
भृगु क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही भरुचमधील नर्मदाच्या काठावर भृगु मंदिर बांधले गेले
आहे.
माहिती स्रोत : गूगल

https://mr.quora.com/%E0%A4%AD%E0%A5%83%E0%A4%97%E0%A5%81-%E0%A4%8B
%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%8B
%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF
%E0%A5%80/answers/189442299?
ch=10&oid=189442299&share=4a88136d&srid=uIHXe1&target_type=answer

You might also like