Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

आय्शुयाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा अन सुख आनंद

देणारा व्हावा.

आजच्या सेवा पुर्ती सोहल्याची सत्कार मुर्ती सन्मानिय यजमान,आप्तेष्ट ......परिवार व सत्कार मुर्तींच्या
प्रेमापोटी उपस्थित सर्व मित्र परिवार सर्वांना सस्नेह नमस्कार.

आज आपण सर्व आमच्या भावोजींच्या सेवापुर्ती सोहळ्याच्या छोट्याखाणी कार्यक्रमास उपस्थीत आहोत
आज भाओजी एका नोकरीच्या चाकोरीतुन सेवानिवृत्त झाले आहेत खरंतर प्रत्येक संसाररुपी जीव हा
आपल्या परिवाराच्या कर्तव्यपुर्तीसाठी काही ना काही व्यवसाय कींवा नोकरी करत असतो त्याच प्रमाणे
भाओजींनी बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये 28 वर्ष इमाने इतबारे सेवा के ली त्यात त्यांना खुप दगदग, व
खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांनी अनेक वर्ष आग्रा रोड, पाईप लाईन तानसा वैतरणा भायखळा
अशा ठिकाणी सेवा दिली. त्यात जास्तीत जास्त तानसा आणि वैतरणा येथे सेवा के ली.

त्यांनी अनेक हाल आपेष्टा सहन के ल्यामुळे सेवा निवृत्त होण्यापूर्वी त्यांना कामात बढती सुद्धा मिळाली
हीच त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणता येईल. गोधडे भावजी स्वभावाने अतिशय शांत आणि सरळ
व्यक्तिमत्व. महानगर पालिके ची सेवा हि त्यांची जबाबदारी समजून त्याकडे त्यांनी बघितले. त्यासोबत
आपला परिवार आणि नातेवाईक यांना सुद्धा काही कमी के ले नाही. मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार
दिले. परिवार आणि नातेवाईक यांना वेळोवेळी सहकार्य करणे हा त्यांचा स्वभावाच असल्यामुळे त्यांनी
कधीही कोणत्याही नातेवाईकाला कधी नाराज के ले नाही. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते कि
त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ. कधीही कोणी कोणतीही अडचण घेऊन गेल्यास ते त्यांच्या परीने पूर्ण
प्रयत्न करून ती सोडवत असत. आज ते त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीला बहर आणू शकले त्यात सिहाचा
वाटा माझ्या बहिणीचा सुद्धा आहे . आज ते जरी कार्यमुक्त झाले असले तरी ते एका चाकोरीतुन सुटले परंतु
खर्याअर्थाने आता त्यांना एका नविन पर्वाला सुरुवात करायची आहे आपणा सर्वांना प्रश्र्न पडला असेल हे
कोणते दुसरे पर्व

तर ते असेल सामाजिक बांधिलकीचे,आप्तेष्ट,सगेसोयरे ,मित्र परिवार व कु टुंबाची सहानुभुतीचे,आपणा कडु न


आम्ही लहान मेव्हणा म्हणजे लहान भाऊच या नात्याने अपेक्षा करतो की आजपर्यंत आपण आम्हाला
मोठ्या भावाच प्रेम ,आपुलकी जिल्ह्याला दिलात कधी रागावलात तर कधी अधिकाराने समजावलात .
आमच्यावर आपली कृ पादृष्टी अशीच रोहो अशी आपणाजवल विनम्र प्रार्थणा करतो.

आपल्या बद्दल जेव्हडे बोलावे तेव्हडे कमीच पण वेळेची मार्यादा पळून मी माझ्या शिंदे कु टुंबियांकडू न
आपल्याला पुढील आयुष्यासाठी सुभेच्छा देतो. आपल्या पुढील आयुष्याचा प्रवास सुखद निरोगी,
सुखासमाधानाचे आणि आनंददायी जावो अशी प्रार्थना पांडु रंगाच्या चरणी करतो.

मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

You might also like