Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

तक्रारदारः- संगीता योगेश दय्या,

राहणार - बी १, फ्लॅ ट नंबर ९, भुजबळ टाउनशिप,


कोथरूड, पुणे - ४११०३८.

दि. - २०/०५/२०२४.
प्रति,

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो.,


कोथरूड पोलीस स्टेशन,
पुणे शहर, वारजे, पुणे.

...यांसी
फिर्यादी जबाब
मी सौ. संगीता योगेश दय्या, वय - ३७ वर्ष, राहणार - बी १, फ्लॅ ट नंबर ९, भुजबळ टाउनशिप, कोथरूड,
पुणे - ४११०३८, आज रोजी शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब लिहून देते की,
मी वरील नमूद पत्त्यावर माझी मुलगी नामे कनिष्का, वय १६ वर्षे आणि मुलगा नामे रेयांश, वय १० वर्षे व
पती सोबत कायमस्वरूपी राहण्यास आहे. माझे लग्न दोन्ही कु टुंबाच्या परवानगीने योगेश दय्या, वय - ३८ वर्षे यांच्या
सोबत दिनांक १९/०४/२००७ रोजी झाले आहे. माझे पती हे मला मागील चार वर्षापासून सतत मारहाण शिवीगाळ
करत आहे. माझ्या मुलांचे भवितव्य खराब होऊ नये, म्हणून मी माझ्या पतीने सातत्याने करत आलेला अत्याचार,
मारहाण आणि शिवीगाळ निमूटपणे सहन के लेला आहे. त्यामुळे मी कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर आणि
न्यायालयीन कारवाई माझ्या पती विरुद्ध आजतागायत के ली नव्हती. माझे पती हे सतत मला घटस्फोट मागत असून
मी नकार दिल्यास नंतर मला सतत मारहाण करत आहे.
मागील दोन महिन्यापासून माझे पती यांनी मला घटस्फोटाची मागणी के ली असता, मी त्यांना साफ नकार
दिला. त्यावेळी त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर निघून गेले. माझे पती हे घरात आमच्यासोबत राहण्यास नसून
बाहेर कु ठेतरी राहून दुकान चालवत आहे. माझा व माझ्या दोन्ही मुलांचा संपूर्ण खाण्यापिण्याचा खर्च हा माझ्या
पतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. असे असताना, जाणून-बुजून माझे पती यांनी मागील दोन महिन्यापासून घरामध्ये
रेशनिंग चे सामान तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे पैसे देखील संपूर्णपणे बंद के ले आहे.
नाईलाजास्तव मला सतत त्यांच्या मेडिकल स्टोर येथे जाऊन घर-खर्चासाठी पैशांची भीक मागावी लागते.
घरखर्चासाठी पैसे मागितल्यानंतर माझे पती मला म्हणतात की, “तु घटस्फोट दिला तरच, मी तुला आणि दोन्ही
मुलांना घर खर्चासाठी पैसे देईल अन्यथा तुझा आणि मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी नाही.” मी घटस्फोट
देण्यास नकार देत आले असून, माझे पती यांनी मला दुकानासमोर वारंवार शिवीगाळ आणि अपमानित करून
हाकलून दिले आहे.
काल दिनांक १९/०५/२०२४ रोजी, मी घरात काहीही खाण्यापिण्यास नसताना माझे पती योगेश यांच्या
मेडिकल स्टोर येथे रात्री १०.०० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास, घर-खर्चासाठी पैसे मागण्यासाठी गेले असता
पुन्हा माझे पती यांनी मला घटस्फोटाची मागणी के ली. मी नकार दिला, त्यावेळी योगेश यांनी मला गलिच्छ भाषेत
शिवीगाळ करण्यास सुरुवात के ली. मी घरातील परिस्थिती योगेश यांना तळमळीने सांगत असताना योगेश यांना
त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी दुकानाबाहेर येऊन मला रस्त्यावर मारहाण करण्यास सुरुवात के ली. योगेश मला
थोबाडीत हाताने मारत असताना, मी योगेशला प्रतिकार करण्याचा प्रयत्न के ला. त्यावेळेस योगेश म्हणाले की, “खूप
झाले तुझं नाटक. आज सोक्षमोक्ष करून टाकतो. तुला कायमचे संपवून टाकतो.” असे म्हणून योगेशने मला ढकलून
रस्त्यावर पाडले आणि योगेश माझ्या छातीवर बसून दोन्ही हाताने माझा गळा दाबायला लागले. माझा गळा दाबताना,
“आज तुला मी सोडणार नाही.” असे म्हणून आणखी जोर लावून गळा दाबायला लागले. त्यावेळेस मी माझा जीव
वाचविण्याच्या प्रयत्नात, माझ्या सर्व शक्तीने त्याला ढकलून देऊन माझा जीव वाचविला आणि उठू न उभी राहिले.
त्यानंतरही योगेश याने मला हाताने मारहाण करणे चालूच ठेवले. शेवटी जमलेल्या लोकांनी मध्यस्थी करून, माझा
जीव वाचविला. त्यानंतर शास्त्रीनगर पोलिस चौकी येथे मी आले असता सदर प्रकार पोलिसांना सांगितला असता
पोलिसांनी मला ससून हॉस्पिटल, पुणे येथे यादी देऊन मेडिकल करण्यासाठी पाठवले. काल रात्री उशिरा ससून
हॉस्पिटल, पुणे येथे माझी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेथे मी डॉक्टरांना माझे पती योगेश यांनी माझा गळा
दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न के ला असल्याची हकीगत सांगितली आहे. त्यानंतर मेडिकलचे पेपर आणि प्रथमोपचार
घेऊन, पुन्हा पोलीस चौकी येथे आले. त्यावेळी रात्र खूप झाली असल्याने पोलिसांनी मला सकाळी तक्रार देणेकामी
येण्यास सांगितले. त्यानंतर मी माझ्या भावासोबत माझ्या राहत्या घरी आले. सबब आज दिनांक २०/०५/२०२४
रोजी, मी शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे माझे पती योगेश यांनी काल रात्री गळा आवळून माझा खून करण्याचा प्रयत्न
के ल्याची तक्रार देणेकामी हजर राहिली आहे.
तरी काल दिनांक १९/०५/२०२४ रोजी रात्री १०.०० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास, भुसार कॉलनी
येथील माझ्या पतीचे मालकीचे “श्याम मेडिकल अँड सर्जिकल स्टोअर्स” येथे माझे पती श्री. योगेश माणिकचंद
दय्या, यांनी काल दिनांक १९/०५/२०२४ रोजी घर खर्चासाठी पैसे मागितले आणि घटस्फोट देत नसल्याचा राग
अनावर होऊन, मला हाताने मारहाण के ली आणि “खूप झाले तुझं नाटक. आज सोक्षमोक्ष करून टाकतो. तुला
कायमचे संपवून टाकतो.” असे म्हणून योगेशने मला ढकलून देऊन रस्त्यावर खाली पाडले आणि माझ्या छातीवर
बसून दोन्ही हाताने माझा गळा आवळून, “आज तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणून माझा खून करण्याचा
प्रयत्न के ला. मी योगेशला ढकलून देऊन, माझा जीव वाचविला असता पुन्हा त्याने मला हाताने थोबाडीत आणि
लाथाबुक्क्यांनी पाठीत आणि पोटावर मारहाण करून मला दुखापत के ली. म्हणून माझी त्यांचे विरुद्ध कायदेशीर
फिर्याद आहे.
माझा वरील संगणकावर घेतलेला फिर्यादी जबाब प्रिंट काढल्यानंतर मी वाचून पाहिला असता तो माझ्या
सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.

फिर्यादी
सौ. संगीता योगेश दय्या.

You might also like