Consumer-Complaint- Marathi-Jangave

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 6

मे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर

ग्रा.त क्र.__/२०२१

१. संगमेश विजयकु मार जनगावे.

वय २८ वर्ष, धंदा- नोकरी,

२. विजयकु मार मन्मथअप्पा जनगावे

वय- ६३, धंदा- मजूरी.

दोघे रा. इंदिरा नगर, अहमदपुर

ता. अहमदपुर, जि. लातूर. .....तक्ररदार.

//विरुद्ध//

व्यवस्थापक, स्टेट बैंक ऑफ इंडिया.

शाखा- अहमदपुर,

ता. अहमदपुर, जि. लातूर. .....गैरअर्जदार.

सेवेत सविनय सादर

वरील तक्रारदार सदरची तक्रार खालील प्रमाने में. न्यायालयात सादर करीत
आहेत.

१. हे की, अर्जदार क्र. २ हे अर्जदार क्र. १ चे वडिल आहेत व् ते अहमदपुर चे


रहिवाशी आहेत. तसेच गैरअर्जदार ही एक ग्राहकांना/नागरिकांना कर्ज
पूरविनारी रास्ट्रीयकृ त बैंक असून संपूर्ण देशभरात त्यांच्या शाखा आहेत व्
गैरअर्जदार ही त्याच पैकी स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ची एक शाखा आहे तेसेच
गैरअर्जदार हे विविध प्रकारचे कर्ज देण्याचा व् ठे वी स्वीकारन्याचा व्यवसाय
करते.

२. हे की, सन २०१३ मध्ये अर्जदार क्र.१ यांनी त्यांच्या पुढील शिक्षनासाठी


आर्थिक सहाय्य म्हणून गैरअर्जदार यांच्या कडू न शैक्षणिक कर्ज रक्कम
रु.३,२१,९८९/- म्हणून घेतले होते व् सदर कर्जासाठी अर्जदार क्र. २ हे अर्जदार
क्र. १ चे वडिल असल्याने सह्कर्जदार होते तसेच सदर शैक्षणिक कर्जासाठीचा
व्याज दर हा सरळ व्यज १२.५५% होते. तसेच सदर शैक्षणिक कर्जाची परतफे ड
ही अर्जदार क्र.१ यांचे शिक्षण पूर्ण होउन नोकरी सुरु के ल्याचा दिनांका पासून
मासिक हप्तेद्वारे होती.

३. हे की, अर्जदार क्र.१ यांनी त्यांचे बी. ई. मेकनिकल चे शिक्षण पुणे येथील
महाविद्यालयातुन शैक्षणिक वर्ष सन २०१५-२०१६ मध्ये पूर्ण के ले व त्या
नंतर प्रथमः अर्जदार क्र.१ यांनी नौकिर मीळविन्या साठी अथाट प्रयत्न के ले
परंतु अर्जदार क्र. १ याना त्यांच्या झालेल्या शिक्षनाच्या अधारे जुल्ये २०१८
मध्ये डेल्हीवरी प्रा. ली. सिन्नर, जिल्हा नाशिक येथे नौकरी मिळाली व् त्यातून
त्याना मासिक पगार निगमन होउन रक्कम रु.१८,३८१/- मीळत होता.
त्यानंतर अर्जदार क्र.१ यांनी सदर त्यांनी गैरअर्जदार यांचे कडू न घेतलेल्या
शैक्षणिक कर्जाची परतफे ड मासिक हप्त्याद्वारे करण्यास सुरुवात के लि.

४. अर्जदार क्र.१ कथन करतात की, प्रथम काही शैक्षणिक कर्जाचे मासिक हप्ते
गैरार्जदार यांना भरल्या नंतर अर्जदार क्र.१ यांनी गैरअर्जदार यांच्या कडे
कर्जाच्या खात्याचे व्याज व् एकू न रक्कमेची चौकशी के लि असता अर्जदार
क्र.१ यांना समजले की भारत सरकारच्या शैक्षणिक कर्जाच्या योजने नुसार
कर्जाच्या टक्के वारीत वार्षिक १% असलेली सवलत ही गैरअर्जदार यांनी
अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्जास लागु/मंजूर के लि नाही तसेच भारत
सरकारच्या शैक्षणिक कर्जाच्या योजने नुसार दिनांक १/४/२००९ रोजीच्या
नंतर शेडू ल्ड बँके ने वितरित के लेल्या शैक्षणिक कर्जासाठी शाशनाचे १००%
अनुदान म्हणजेच शिक्षनाच्या कालावधीत कर्जाची परतफे ड सुरु होण्याच्या
आधीच्या व्याजावर अनुदान उपलब्ध आहे ते देखिल गैरअर्जदार यांनी
अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्जास लागु/मंजूर के ले नाही.

५. अर्जदार क्र.१ कथन करतात की, भारत सरकारच्या वरील योजने नुसारचे
शैक्षणिक कर्जा संबधिचे मिळनारे फायदे त्यांना तुम्ही लागू/मंजूर के ले
नसल्याने अर्जदार क्र.१ व् २ यांनी गैरअर्जदार यांच्या शाखेत तसेच
गैरअर्जदार यांच्या लातूर येथील विभागीय कार्यालयाला अनेक वेळा भारत
सरकारच्या वरील योजने नुसार व्याज दरामध्ये वार्षिक 1% सवलत आणि
शैक्षणिक कालावधीतिल व्याजात 100% अनुदान देण्याबाबत आणि सरकारच्या
नियमन कालावधीनुसार अनेक पत्र पाठविले परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार
यांच्या या लेखी पत्राचे उत्तर दिले नाही आणि अर्जदार यांच्या शैक्षणिक
कर्जाच्या व्याजात सवलत आणि अनुदान लागू/मंजूर करण्याऐवजी गैरअर्जदार
यांनी अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्जास चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले आहे
जे की शासनाच्या आर्थिक दृष्टया मागास असेलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य
करण्यासाठीच्या योजनेच्या विरोधी आहे व् सदर गैरअर्जदारा कडू न करण्यात
आलेल्या सेवाभंगामुळे (सेवेतील त्रुटीमुळे) अर्जदार यांचे आर्थिक, मानसिक व्
शारीरिक नुकसान झाले आहे.

६. अर्जदार असे कथन करतात की गैरअर्जदार यांनी सदर शैक्षणिक कर्ज


अर्जदार याना मंजूर/देते वेळेस एसबीआय लाइफ इन्शुरन्स पॉलिसी जिचा
हप्ता/ प्रीमियम रु. ३३०६ होता अशी पॉलिसी मंजूर करुण अर्जदार यांना
शैक्षणिक कर्ज दिले आहे परंतु आजतागायत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना
सदर पॉलिसी दिलेली नाही त्याद्वारे ही गैरअर्जदार यानि सेवेत पुन्हा
कमतरता कमतरता के लेली आहे.

७. अर्जदार पुढे कथन करतात की अर्जदार क्र.१ यांना नोकरी मिळाले पासून
अर्जदार यांनी सदर शैक्षणिक कर्जाची संपूर्ण परतफे ड करण्याच्या हेतूने
मासिक हप्ते भरन्यास सुरुवात के लि होती परंतु गैरअर्जदार यांनी वर नमूद
प्रमाने अर्जदार शासनाच्या संपूर्ण योजनेस पात्र असून सुद्धा अर्जदार यांच्या
शैक्षणिक कर्जाच्या व्याज दरामध्ये वार्षिक 1% सवलत दिली नाही किं वा
मंजूर के लि नाही तसेच शैक्षणिक कालावधीतिल व्याजात 100% अनुदान
देण्याबाबतच्या योजनेस ही अर्जदार पूर्णपने पात्र असून देखिल सदरचे
अनुदान गैरअर्जदाराने अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्जास लागू के ले नाही व्
त्याद्वारे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा पुरवत असताना अकार्यक्षम
अशी सेवा पुरवून सेवेत त्रुटी व् चूका के लेल्या आहेत.

८. हे की, अर्जदार क्र.१ व् अर्जदार क्र.२ यांचे सदरचे शैक्षणिक कर्ज खाते हे
भारत सरकारच्या योजने प्रमाने व् त्यातील दिलेल्या अटी व् शर्तिनुसार त्या
संपूर्ण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे जसे की सन २०१३ पासून ते सदर
शैक्षणिक कर्जाची परतफे ड सुरु होण्या पर्यंत म्हणजेच सन २०१८ पर्यंतच्या
व्यजावर वार्षिक १ % सवलत मीळन्यास तसेच त्या कालावधि मधील एकू न
व्याज रक्कमेवर भारत सरकारच्या योजने प्रमाने १००% अनुदान मिळन्यास
अर्जदार क्र.१ व् अर्जदार क्र.२ यांचे शैक्षणिक कर्ज खाते पात्र आहे. तरी देखिल
भारत सरकारच्या योजने नुसार होणारे सर्व लाभ हे गैरअर्जदार यांनी अर्जदार
यांना देऊ के ले नाहित त्याकारने अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्जाच्या
परतफे डिची रक्कम ही वाढली आहे जे की के वळ गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे
व् त्यांच्या सेवेतील त्रुटीमुळे झाले आहे.

९. हे की, अर्जदाराने या मंचा व्यतिरिक्त त्यांनी गैरअर्जदार यांच्या कडू न


घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या व्यजावर वार्षिक १ % सवलत मीळन्यासाठी
तसेच त्या कालावधि मधील एकू न व्याज रक्कमेवर भारत सरकारच्या योजने
प्रमाने १००% अनुदान मिळन्यासाठीची मागणी इतर कोणत्याही मंचात,
कोर्टात, लावादाकडे तसेच दीवानी अथवा फौजदारी कोर्टाकड़े कोणतेही
कार्यवाही के लि नाही.

१०. हे की अर्जदार यांचे सदर प्रकरण हे जिल्हा ग्राहक मंचाच्या आर्थिक


अधिकार क्षेत्राच्या मधील असल्याने सदरचे प्रकरण हे में. मंचास चलविन्याचे
व् निकाली काढन्याचे संपूर्ण अधिकार आहेत.

११. हे की अर्जदार क्र.१ व् अर्जदार क्र.२ यांचे सदरचे शैक्षणिक कर्ज खाते हे
भारत सरकारच्या योजने प्रमाने व् त्यातील दिलेल्या अटी व् शर्तिनुसार त्या
संपूर्ण योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून देखिल गैरअर्जदार यांनी अर्जदार
यांचे कर्जखात्यास सदरच्या सुविधा लागु के ल्या नसल्याने अर्जदार यांनी
वेळोवेळी गैरअर्जदार यांना लेखी पत्राद्वारे विनंती करुण ही गैरअर्जदार यांनी
अर्जदार यांची विनंतीस लक्ष न देवून सेवेत त्रुटी व् कसूर के ला असल्याने
अर्जदारास सदरचे प्रकरण में. मंचात दखल करण्यास कारणप्राप्त झाले आहे.

१२. हे की, गैरअर्जदार ही एक ग्राहकांना/नागरिकांना कर्ज पूरविनारी


रास्ट्रीयकृ त बैंक आहे गैरअर्जदार हे विविध प्रकारचे कर्ज देण्याचा व् ठे वी
स्वीकारन्याचा व्यवसाय करत असल्याने गैरअर्जदार यांची ही जबाबदारी होती
की अर्जदार यांच्या शैक्षणिक कर्ज खात्यास भारत सरकारच्या सर्व योजनेचे
फायदे किं वा योजना लागू करने जसे की सन २०१३ पासून ते सदर शैक्षणिक
कर्जाची परतफे ड सुरु होण्या पर्यंत म्हणजेच सन २०१८ पर्यंतच्या व्यजावर
वार्षिक १% सवलत देने तसेच त्या कालावधि मधील एकू न व्याज रक्कमेवर
भारत सरकारच्या योजने प्रमाने १००% अनुदान देने.

१३. हे की, अर्जदाराने सदरची तक्रार ही में. मंचात मुदतीत दाखल के लेली आहे.

अर्जदाराने तक्रारी सोबत अर्जदार क्र. __ यांचे शपथपत्र दिले असून ते त्यांचा
तो पूरावा म्हणून वाचण्यात यावा.
तरी विनंती की

१. अर्जदार यांचा तक्रार अर्ज पुर्णतः मंजूर करण्यात यावा.

२. अर्जदार यांना त्यांच्या शैक्षणिक कर्ज खात्यास पात्र


असलेल्या शैक्षणिक कर्ज योजनेचा संपूर्ण लाभ जसे की
सन २०१३ पासून ते सदर शैक्षणिक कर्जाची परतफे ड सुरु
होण्या पर्यंत म्हणजेच सन २०१८ पर्यंतच्या व्यजावर
वार्षिक १% सवलत तसेच त्या कालावधि मधील एकू न
व्याज रक्कमेवर भारत सरकारच्या योजने प्रमाने १००%
अनुदान देण्याचे आदेश करण्यात यावे.

३. तसेच शैक्षणिक कर्ज योजनेचा संपूर्ण लाभ अर्जदारास


न देता २०१८ पासून आजतागायत एकू न रक्कमेवरील
कर्ज माफ़ करण्याचे आदेश देण्यात यावे.

४. तसेच गैरअर्जदार यांनी के लेल्या सेवेतील त्रुटी व्


कसूरीमुळे अर्जदार यांना झालेल्या आर्थिक व् मानसिक
त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.१,००,०००/-
अर्जदार यांना देण्याचा आदेश गैरअर्जदार यांना देण्यात
यावे तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.२०,०००/- देण्याचा
आदेश गैरअर्जदार यांना करण्यात यावा.

५. या व्यतिरिक्त जर अर्जदार इतर काही अनुतोशास पात्र


असतील तर तेहि अनुतोष अर्जदाराच्या हक्कात देण्यात
यावेत.

दिनांक- _/०१/२०२१. अर्जदार क्र. १.

अर्जदार क्र.२.

×Ö¾Öê¤üÖ-
मी, अर्जदार क्र. १. संगमेश विजयकु मार जनगावे, वय २८ वर्ष, धंदा-
नोकरी, इंदिरा नगर, अहमदपुर, ता. अहमदपुर, जि. लातूर, शपथेवर सत्य निवेदन
करतो की, सदर तक्रारी मधील संपूर्ण मजकु र माझ्या वैयक्तिक माहिती
प्रमाने सत्य व बरोबर असून त्यावर मी वाचून समजुन सही के लेली आहे.

दिनांक- ___/१/२०२१. अर्जदार

तर्फे ,

महेश ए. बमानकर
†ò›ü¾ÆüÖêêú™ü, »ÖÖŸÖæ¸ü.

You might also like