Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 14

MHPU020058442021 दाखल दिनांक :- १२/०७/२०१८.

नोंदणी दिनांक :- १२/०७/२०१८.


निकाल दिनांक :- ०१/०९/२०२३.
कालावधी :- ०५व.०१म.२०दि..

३रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे यांचे न्यायालयात


(पीठासीन अधिकारी: एस. जे. भट्टाचार्य)
स्पे. दिवाणी दावा क्र. ९८१/२०१८.
नि. क्र. ४४.
श्री. आनंदा बबन खेडेकर,
वय – ४२ वर्षे , धंदा - शेती
रा. - रांजणगाव गणपती, ता. शिरुर,
जि. पुणे. . ...... वादी.
विरुध्द
श्री. यशवंत तात्याबा दौंडकर,
वय – ६१ वर्षे , धंदा - शेती,
रा. - करंजावणे, ता. शिरुर, जि. पुणे. ....... प्रतिवादी.

दावा : खरेदीखत करुन मिळण्यासाठी, निरंतर मनाई व रक्कम वसुलीसाठी.

......................................................................................
वादीतर्फे श्री. पी. कि. भंडारी वकील.
प्रतिवादी तर्फे श्री.डी. टी. शितोळे वकील.
...................................................................................…
2

न्यायनिर्णय
(घोषित दिनांक ०१/०९/२०२३)

वादीने प्रतिवादी विरुध्द हा दावा खरेदीखत करुन मिळण्यासाठी,


निरंतर मनाईसाठी व रक्कम वसुलीसाठी दाखल केले ला आहे.

२. वादीचे दाव्यातील म्हणणे थोडक्यात असे की, तुकडी पुणे, पोट तुकडी
ता. शिरुर मे.दय्ु यम निबंधक सो. शिरुर / तळे गांव ढमढेरे यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे
जिल्हा रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे, येथील जमिन मिळकत गट नं.
१६२३/१/अ क्षेत्र ०० हे. ८३ आर, आकार ०१ रु. ९४ पैसे पैकी नगर पुणे
महामार्ग लगतची ०० हे. ४० आर आकार ०० रु. ९३ पैसे क्षेत्र (नगर पुणे महामार्गाचे
लगत १४० पुढे दिले ला आहे). यांसी चतुः सिमा पुर्वेस - गट क्र. १६२३/१/अ
पैकी विठ्ठल शेलार यांचे क्षेत्र, पश्चिमेस - गट क्र. १६२३/२, दक्षिणेस - श्री. शेळके
यांची मिळकत व उत्तरेस - नगर पुणे महामार्ग येणेप्रमाणे सर्व तदंगभुत वस्तुंसहित
वहिवाटीच्या हक्कांसह दरोबस्त मिळकत ही वाद मिळकत असून त्यास यापुढे वाद
मिळकत अथवा दावा मिळकत असे संबोधन्यात येईल.

३. दावा मिळकत हि प्रतिवादी यांचे खरेदी मालकीची मिळकत होती व


आहे. प्रतिवादीचे नावाची नोंद सदर मिळकतीचे ७/१२ च्या उता-यावर व इतर
सरकारी दप्तरी महसूल रेकॉर्डला मालक व कब्जेदार म्हणून झाले ली आहे. दावा
मिळकत हि प्रतिवादीने सन २०१८ मध्ये त्याचे कौटु ंबिक व आर्थिक अडीअडचणीचे
निवारण करणेकरीता विक्रीस काढली होती. वादी व प्रतिवादी एकमेकांचे ओळखीचे
आहेत, तसेच प्रतिवादी हे दावा मिळकत विकत असल्याचे वादीला समजले वरुन
त्यांच्यात चर्चा व वाटाघाटी होवुन दावा मिळकत वादीने विकत घेण्याचे ठरविले . दावा
मिळकतीची किंमत योग्य व वाजवी तसेच इतरांनी मागितले ल्या किमतीपेक्षा वरचढ
3

असल्याने प्रतिवादीने सदर मिळकत वादीस रुपये १,१२,४०,०००/- या किमंतीस


कायमखुष खरेदी देण्याचे मान्य व कबूल केले .

४. वादी व प्रतिवादीमध्ये ठरले ल्या व्यवहाराप्रमाणे ले खी


विसारपावती/करारनामा दस्त करण्याचे दोन साक्षीदारांसमक्ष दिनांक ३/४/२०१८
रोजी नोटरी करण्यात आला. त्या दस्तामध्ये काही अटी व शर्ती ठरल्या. संपूर्ण
व्यवहाराच्या ५०% रक्कम खरेदीखताचे वेळी व उर्वरीत ५०% रक्कम खरेदीखत
झाल्यानंतर दोन महिन्याचे आत वादी यांनी प्रतिवादीस दयायचे ठरले . सदर
खरेदीखताची पुर्त ता करुन ४५ दिवसांत नोंदवून देणेचे ठरले हाेते. दावा मिळकतीचे
खरेदीखताकामी लागणा-या सर्व सहया-समत्यांची पुर्त ता करण्याची जबाबदारी
प्रतिवादीची असून, ती त्यांनी स्वखर्चाने करावयाची ठरले . दावा मिळकतीचे खरेदी
खतावेळेस सर्व हिस्सेदारांच्या, हक्कदारांच्या व वारसांच्या सहया, संमत्या देणे व
सर्वांना हजर करण्याची जबाबदारी प्रतिवादीची राहील तसेच दावा मिळकत क्लिअर
टायटल करुन देणेची ठरले . तसेच खरेदीखताच्या वेळी काही कायदेशीर अडचण
आल्यास त्याचे निवारण झाल्यानंतरच खरेदीखत होईल. दावा मिळकतीची मोजणी,
हद्दी, चतुःसिमा व क्षेत्र निश्चीत करुन देण्याची जबाबदारी प्रतिवादीची राहिल असे
ठरले . तसेच विसारपावती झाल्यानंतर दावा मिळकत डेव्हलप करण्यास प्रतिवादीची
पुर्ण मान्यता व संमती आहे व दावा मिळकतीचा ताबा खरेदीखताच्या वेळी दयावयाचा
ठरला होता.

५. वादी व प्रतिवादीमध्ये ठरल्याप्रमाणे वादीने प्रतिवादीस व्यवहारापोटी


विसार म्हणून ले खी विसारपावती/करारनाम्याच्या वेळी रक्कम रुपये
२,००,०००/-, दिनांक ३/४/२०१८ रोजीचा चेक क्र. ०२७८१६ पीडीसीसी
बॅक, शाखा रांजणगाव नुसार वादीने दिला. विसारपावती/करारनामा झाल्यांनतर
वादीने प्रतिवादीस रुपये ५,००,०००/- देखिल वेळोवेळी अदा केले ली आहे.
4

दिनांक १२/४/२०१८ रोजी २,००,००/- चेक क्र. २८७७१७ व ७६३२२२२


हे पीडीसीसी बॅक, शाखा रांजणगाव व कॅनरा बॅक शाखा रांजणगाव, तसेच दिनांक
२४/४/२०१८ रोजी रुपये १,००,०००/- चेक क्र. ७६३२२३, कॅनरा बॅक,
शाखा रांजणगाव येथील दिला. दिनांक २५/४/२०१८ रोजी २,००,०००/-
रोखीने असे एकुण रक्कम रुपये ५,००,०००/- दिले . वादीने एकूण मोबदला रक्कम
म्हणून प्रतिवादीस रक्कम रुपये ७,००,०००/- अदा केले ली असून प्रतिवादीस
उर्वरीत मोबदला देण्यास देखील वादी हे तयार होते व आहेत.

६. प्रतिवादीकडे वादीने दावा मिळकतीची मोजणी कामी व खरेदीखताचा


दस्त लिहून देणे कामी अनेकवेळा विनंती केली असता सन २०१८ मध्ये वादी हे
प्रतिवादीला प्रत्यक्ष भेटले असता प्रतिवादीने वादीस ठरले ली रक्कम वाढवून देण्याची
अचानक मागणी केली. प्रतिवादीने सदरची मागणी हि वादीस अश्चर्यचकित करण्याची
होती, तसेच ठरले ल्या अटी व शर्तीचे पुर्ण पणे विरुध्द देखील होती. त्यामुळे वादीने
दिनांक १६/०५/२०१८ रोजी वादीचे वकिल गणेश दरेकर यांचे मार्फ त प्रतिवादीस
रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून ठरले ल्या अटी व शर्ती नुसार दावा मिळकतीचे
खरेदीखत करुन देण्याची रितसर मागणी केली. सदर नोटीस प्राप्त होवून देखील
प्रतिवादीने आजतागायत खरेदी व्यवहार पूर्ण करणेकामी कोणतीही कारवाई केले ली
नाही अथवा वादीचे नोटीसला अदयाप उत्तरही दिले ले नाही. वादीने महसुल
खात्यामध्ये चौकशी केली असता समजले की, प्रतिवादीने दावा मिळकतीचे मोजणीची
कोणतीही प्रक्रिया चालु केले ली नाही. प्रतिवादी हे ठरले ल्या अटी व शर्तीनुसार दावा
मळकतीचा व्यवहार पुर्ण करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

७. प्रतिवादी हे दावा मिळकती ति- हाईत इसमांस विकण्याचा प्रयत्न करीत


असून प्रतिवादीचे एं जट ति-हाइत इसमास दाखवीत आहेत. वादीने दिनांक
२२/५/२०१८ रोजी प्रतिवादीस विचारणा केली असता "मोबदला रक्कम वाढवून
5

देत असाल तर जमीन तुम्हांस विकेल अन्यथा जास्त रक्कम देणा-यास मी सदरची
जमीन विकणार आहे. तुम्हांस काय करायचे आहे ते करा" असे वादीस सुनविले
विसारपावती / करारानाम्यानुसार खरेदीचा व्यवहार पूर्ण करणे प्रतिवादीवर
बंधनकारक होते व आहे असे असताना प्रतिवादी हे पैशाच्या हव्यासापोटी खरेदी
व्यवहार पूर्ण करण्यास चालढकल करीत आहेत. प्रतिवादीने विसारपावती/करारनामा
मधील अटी व शर्तींचा जाणुन बुजुन भंग केले ला आहे . वादी हे खरेदी व्यवहार पुर्ण
करण्यास तयार होते व आहेत. म्हणुन वादीने प्रस्तुत दावा दाखल केला आहे.

८. प्रतिवादीने निशाणी १८ अन्वये वादीच्या दाव्यास ले खी उत्तर दाखल


केले . प्रतिवादीने ७,००,०००/- वेळोवेळी वादीकडू न घेतल्याची बाब नाकारली.
प्रतिवादीचा बचाव असा की, दावा मिळकतीची किंमत २,८१,००,०००/- रुपये
एवढी वादी व प्रतिवादीमध्ये ठरली होती. परंतू वादी तेवढी रक्कम दावा मिळकतीच्या
खरेदीपोटी दाखवू शकत नव्हता म्हणून वादीने दावा मिळकतीची कमी किंमत म्हणजेच
१,१२,४०,०००/- दाखवून प्रतिवादीकडू न विसारपावती करारनामा विश्वासाने
लिहून घेतला. उर्वरित रक्कम खरेदीपत्रात न दर्शविता ब्लॅ कने देतो असा विश्वास वादीने
प्रतिवादीला दिला. परंतू विसारपावती/ करारनामा वादीच्या नावे लिहून घेतल्यानंतर
वादीने ठरल्याप्रमाणे प्रतिवादीला दावा मिळकतीची ब्लॅ कची किंमत देण्यास टाळाटाळ
केली, म्हणून वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान दिनांक ०३/०४/२०१८ रोजी लिहून
दिले ली तथाकथित विसारपावती / करारनामा रद्द करण्याचे ठरले . त्यापोटी
प्रतिवादीकडू न वादीने रक्कम रु. ३,००,०००/- पीडीसीसी बँक रांजणगाव शाखेच्या
चेकद्वारे स्वीकारले . रक्कम २,००,०००/- पीडीसीसी बॅक रांजणगाव शाखेचा चेकही
स्वीकारला आहे. सदर चेक वादीने भरले ला नाही. वादी व प्रतिवादीमध्ये झाले ला
व्यवहार रद्द केले ला असून वादीने प्रतिवादीस दिले ली रक्कम ५,००,०००/-
चेकद्वारे परत दिले ली आहे. वादीने जाणुनबुजन
ु दाव्यात ही गोष्ट नमुद न करता
कोर्टाची फसवणुक केले ली आहे. प्रतिवादीने कोणत्याही प्रकारची रोख रक्कम
6

स्वीकारले ली नाही. प्रतिवादीने वादीचा दावा खर्चासह खारिज करण्याची विनंती


केली.

९. प्रस्तुत दाव्याचे न्यायनिर्णय होण्यासाठी माझे पुर्वाधिका-यांनी निशाणी


२३ वर मुद्दे उपस्थित केले , त्यांचे निष्कर्ष मी कारणांसहित खाली नमुद करित आहे.

मुद्दे निष्कर्ष

१ दावा मिळकत ही प्रतिवादींची मालकी होय.


कब्जेवहिवाटीची मिळकत असल्याचे वादी शाबीत
करतात काय?

२ दावा मिळकत वादींना रक्कम १,१२,००,०००/- होय.


रुपये विक्री करण्याचे ठरवुन प्रतिवादींनी दिनांक
३/४/२०१८ रोजी २,००,०००/- रुपये
स्वीकारुन विसार पावती करारनामा लिहुन दिल्याचे
वादी शाबीत करतात काय?

३ वादीने त्याच्या बाजुने कराराची पुर्त ता केली नाही.


असल्याचे वादी शाबीत करतो काय?

४ प्रतिवादी हे त्यांच्या बाजुने कराराची पुर्त ता करुन होय.


देण्यास टाळत असल्याचे वादी शाबीत करतात
काय?

५ प्रतिवादी हे दावा मिळकतीत ति-हाईत इसमांचे हक्क् नाही.


प्रस्थापीत करण्याचे प्रयत्न करत असल्याचे वादी
शाबीत करतात काय?
7

६ वादी मागणी करीत असल्याप्रमाणे दावा मिळकतीचे नाही.


खरेदीखत करुन मिळण्यास तो पात्र आहे काय?

७ वादी मागणी करीत असल्याप्रमाणे प्रतिवादीविरुध्द नाही.


निरंतर मनाई हुकुम मिळण्यास वादी पात्र आहे
काय?

८ काय आदेश ? दावा रक्कम


व्याजासह परत
मिळण्यासाठी अंशतः
मंजुर करण्यात येतो.

कारणमिमांसा

१०. वादीने आपला दावा सिध्द करण्यासाठी स्वतःला निशाणी २८ अन्वये


साक्षीदार म्हणुन तपासले . प्रतिवादीने वादीचा उलट तपास घेतले ला नाही.
प्रतिवादीने आपल्यातर्फे कोणताही साक्षीदार तपासला नाही, त्यामुळे प्रतिवादीचा
पुरावा निशाणी १ वर आदेश करुन बंद करण्यात आला. वादीच्या वकीलांचे तोंडी
युक्तीवाद ऐकले . प्रतिवादींकरीता कोणीही युक्तीवादाकरीता आले नाही.

मुद्दा क्र. १ बाबतः-

११. वादीची तोंडी साक्ष ही वादीच्या दाव्यातील कथनाप्रामाणेच आहे. वादीने


आपल्या दाव्यास आधार देण्यासाठी वाद मिळकतीचा ७/१२ उतारा (निशाणी ३०),
गाव नमुना ८अ (निशाणी ३१) व प्रतिवादीने वाद मिळकत विकत घेतल्याबाबत
खरेदीखताची प्रत (निशाणी ३३) दाखल केले . वादीची तोंडी साक्ष व निशाणी ३० ते
३२ यावरुन वाद मिळकतीचा प्रतिवादी मालक असून वाद मिळकत ही प्रतिवादीच्या
8

ताब्यात असल्याचे निष्पंन्न होते. म्हणुन मी मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी दिले .

मुद्दा क्र. २ बाबत:-

१२. वादीच्या तोंडी साक्षीनुसार वादी व प्रतिवादींमध्ये वाद मिळकतीच्या


विक्रीबाबत, प्रतिवादीने वादीस दिनांक ३/४/२०१८ रोजी करारनाम्याचा दस्त
साक्षीदारासमक्ष लिहुन दिला. वादीने सदर करारनामा (निशाणी ३३) दाखल केला.
करारमाना (निशाणी ३३) मधील मजकुरानुसार वादीने वाद मिळकत प्रतिवादीकडू न
१,१२,४०,०००/- रुपयांस विकत घेण्याचे मान्य केले व प्रतिवादीने देखील सदर
रकमेत वाद मिळकत वादीला विक्री करण्याची बाब मान्य केली. जरी प्रतिवादीने
आपल्या ले खी उत्तरात वाद मिळकत ही २,८१,००,०००/- मध्ये विक्री करण्याचे
नमुद केले ले असले , तरी त्याबाबत प्रतिवादीने कोणताही पुरावा न्यायालयासमक्ष
आणले ला नाही. प्रतिवादीने सदर करारनामा (निशाणी ३३) अमान्य केले ला नाही.
तर प्रतिवादीचे असे म्हणणे आहे की, फसवणूक करून त्यावर वादीने
१,१२,४०,०००/- नमुद केले व उर्वरीत रक्कम ब्लॅ कने देण्याचे ठरले . मात्र
त्याबाबत कोणताही पुरावा प्रतिवादीने आणले ला नाही.

१३. वादीची तोंडी साक्ष, प्रतिवादीने बचावाकरिता कोणताही पुरावा दाव्यात


न देणे व करारनामा (निशाणी ३३) मधील मजकुरानुसार, वाद मिळकत ही
१,१२,४०,०००/- रुपयांस विक्री करण्याचे वादी व प्रतिवादीमध्ये ठरले होते ही
बाब निष्पंन्न होते. करारनामा (निशाणी ३३) मजकुरावरुन सिध्द होते की,
२,००,०००/- विसार म्हणुन वादीने प्रतिवादीस चेकद्वारे दिले. वादीने दाखल
केले ला बॅकेचा खाते उतारा (निशाणी ३४) या वरुन देखील दिनांक ३/४/२०१८
रोजीचा चेक क्र. २८७१६ नुसार वादीने प्रतिवादीस २,००,०००/- रुपये इसार
दिल्याचे निष्पंन्न होते. वरील सर्व बाबींचा विचार करता मुद्दा क्र. २ चे उत्तर होकारार्थी
9

दिले .

मुद्दा क्र. ३ व ४ बाबत:-

१४. वादीच्या तोंडी साक्षीनुसार वादी हे वाद मिळकत विकत घेण्यास सदैव
तयार व इच्छुक होते. करारनामा (निशाणी ३३) नुसार ५०% रक्कम खरेदीखताचे
वेळी व उर्वरीत ५०% रक्कम खरेदीखत झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत वादीने
प्रतिवादीस देण्याचे ठरले होते. खरेदीकामी लागणा-या सर्व सहया व संम्मतीची पुर्त ता
प्रतिवादीने करायची होती. तसेच वाद मिळकतीच्या मालकीबाबत सर्व दस्तांची
जुळवाजुळव प्रतिवादीने करावयाची होती.

१५. वादीची तोंडी साक्ष व दाव्यातील कथनावरुन हे दिसून येते की, वाद
मिळकतीचे मालक हे प्रतिवादी आहेत. वादीने दाखल केले ल्या दस्तऐवजांवरुन सिध्द
झाले की, वाद मिळकतीचे मालक प्रतिवादी आहेत. अशा वेळेस इतर कोणाकडू नही
संम्मती घेणे अथवा इतर कोणत्याही दस्तांची जुळवाजुळव प्रतिवादीने करणे याबाबत
कोणताही प्रश्न उदभवतच नाही. जर करारनामा निशाणी ३३ नुसार वादीला
प्रतिवादीच्या मिळकतीच्या मालकीबाबत दैनिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस व सर्च
रिपोर्ट घेण्यास परवानगी होती परंतु वादीने तसे केले ले नाही. तेंव्हा सहाजीकच
मालकीबाबत वादी व प्रतिवादीमध्ये कोणताही वाद नसल्याचे देखील एकंदरीत वरील
विवेचनावरुन सिध्द होते.

१६. वादीने प्रतिवादीला पाठविले ली नोटीस (निशाणी ३६) नुसार वादीने


प्रतिवादीला एकुण ७,००,०००/- रुपये वेळोवेळी दिल्याचे कळविले व प्रतिवादी
वादीस विक्रीपत्र करुन देत नसल्याचे देखील कळविले. सदर नोटीस प्रतिवादीस
पाठविल्याबाबत पोस्टाची पावती (निशाणी ३७) व ती मिळाल्याबात ट्रॅक रिपोर्ट
(निशाणी ३८) दाखल केले . वादीच्या वकीलांनी आज (निशाणी ४३) हे वादीच्या
10

बॅकेतील खाते उतारा दाखल केला, ज्यावरुन आज वादीच्या खात्यात


६९,८५,६७२/-एवढी रक्कम असल्याचे दिसून येते. परंतु सदर खातेउतारा
(निशाणी ४३) वरुन हे निष्पंन्न होत नाही की, वादीने प्रतिवादीस पाठविले ली नोटीस
(निशाणी ३६) च्या तारखेपासून ते दावा दाखल करेपर्यंत किंवा तदनंतर वादीकडे
१,१२,४०,०००/- चे ५० टक्के म्हणजेच ५६,२०,०००/- ज्या पैकी
७,००,०००/- रुपये वादीच्या तोंडी साक्षीनुसार व दाव्यातील दाखल
दस्तऐवजांनुसार वादीने प्रतिवादीस दिले . म्हणजेच उर्वरीत ४८,८०,०००/- एवढी
मोठी रक्कम वादीकडे सदर नोटीस (निशाणी ३६) देताना किंवा दावा दाखल करताना
होती. यावरून हे सिध्द होते की वादीकडे उर्वरीत ४८,८०,०००/- एवढी मोठी
रक्कम प्रतिवादीला नोटीस देतांना नव्हती. वादी त्याअनुषंगाने या दाव्यात दस्त दाखल
करू शकला असता. परंतु तसे वादीने केले ले नाही. त्यामुळे जरी आज वादीकडे
सदर ५० टक्के रक्कम असल्याचे मानले तरी वादी हा सदर रक्कम प्रतिवादीला देण्यास
तयार होता हे मात्र सिध्द होत नाही.

१७. वादीने आपल्या युक्तीवादास आधार देण्यासाठी (निशाणी४४) सोबत


खालील न्यायनिर्णय दाखल केले .
1... P. Ramasubbamma V/s. V. Vijaylakshmi & ors., 2022(6) Mh. L.
J.626. The honourable Supreme Court held that, “suit for specific
performance - execution of agreement to sell and receipt of
advance sale consideration no further evidence and / or proof was
required thereafter”.
2. Kerba s/o Ambadas Dhengle V/s. Digambar s/o Ishwara
Chavan (deceased) through his L.Rs. Chandrakant s/o Digambar
Chavan & ors.,2019(6) Mh. L. J. 939. The honourable Supreme
Court held that, “suit for specific performance of contract.
Readiness and willingness of plaintiff to perform his part of
contract. Plaintiff had paid substantial part of consideration. Not
necessary to produce evidence to show that he had balance amount
when matter proceeded before trial court. Averment about
11

readiness and willingness and proof thereof by way of oral evidence


is sufficient”.

१८. वरील दोन्ही न्यायनिर्णय व प्रस्तुत दाव्याचे अवलोकन केले असता, हे


सिध्द झाले ले आहे की प्रतिवादीने करारनामा वादीचे नावे करून दिला. परंतु वादीने
प्रतिवादीला दिले ली रक्कम ही केवळ सात लक्ष एवढी आहे व उर्वरित रक्कम ही फार
मोठी आहे. त्यामुळे वादीकडे सदर रक्कम उपलब्ध होती किंवा नाही, हे वादीने
साहजिकच न्यायालयास दाखविणे गरजेचे आहे. त्यामुळे वरील दस
ु रे क्रमांकाचे
न्यायनिर्णय या दाव्यातील मजकूराचे अनुषंगाने नसल्यामुळे वादीस त्याचा उपयोग
होत नसल्याचे मत मी मांडतो.

१९. एकंदरीत साक्षीपुराव्याचे अवलोकन केले असता वादीने विक्रीपत्र


करण्यापुर्वी ४८,८०,०००/- रुपयांची जुळवाजुळव करणे आवश्यक होते. ही रक्कम
छोटी नसुन फार मोठी आहे. त्यामुळे वादी करारपुर्तीस तयार होता हे सिध्द होत
नाही. केवळ प्रतिवादीस नोटीस पाठवुन वादी हे करारपुर्तीस तयार व इच्छुक
असल्याचे सिध्द होवु शकत नाही. करारनामा रद`द झाल्याचे देखील प्रतिवादीने सिध्द
केले ले नाही. प्रतिवादीचे म्हणणे की, सदर करारनामा हा १,१२,००,०००/-
रुपयांचा नुसन २,८१,००,०००/- रुपयांचा होता, परंतु त्याबाबत काेणताही पुरावा
न दाखल करणे हे दर्शविते की, प्रतिवादी हे देखिल करारपुर्त तेस टाळाटाळ करत
होते. म्हणुन मी मुद्दा क्र. ३ चे उत्तर नकारार्थी व मुददा क्र. ४ चे उत्तर होकारार्थी
दिले .

मुद्दा क्र. ५ ते ७ बाबत:-

२०. वादीने जरी आपल्या तोंडी साक्षीत दावा मिळकत ति-हाईत इसमांना
विकण्याचे प्रतिवादी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले असले तरी त्याबाबत
12

कोणताही पुरावा अथवा दस्त या दाव्यात नाही. करारनामा (निशाणी ३३) नुसार वाद
मिळकतीवर प्रतिवादीचा ताबा आहे. वादीने हे सिध्द केले ले नाही की, वादीने त्यांच्या
बाजुने करावयाची कराराची संपुर्ण पुर्त ता केले ली आहे. त्यामुळे वादी हे खरेदीखत
करुन मिळण्यास, तसेच निरंतर मनाई हुकुम मिळण्यास पात्र नाही असे मत मी
मांडतो. म्हणुन मी मुद्दा क्र. ५ ते ७ चे उत्तर नकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र. ८ बाबत:-

२१. प्रतिवादीने वादीचे उलटतपासणी न घेतल्यामुळे वादीने दाखल केले ले


दस्त व तोंडी साक्षीनुसार, वादीने प्रतिवादीस एकुण ७,००,०००/- रुपये इसार
म्हणुन दिले ले आहे. वादी हा करारपुर्तीस तयार होता हे वादीने सिध्द केले ले नाही.
त्यामुळे वादी विक्रीपत्र करुन मिळण्यास पात्र नाही.

२२. वादीने दावा प्रलं बित असताना आपल्या प्रर्थनेमध्ये कराराकरीता


विसारापोटी दिले ली रक्कम व्याजासह विकल्पेकरुन परत मिळण्याची मागणी केले ली
आहे. वादीने दाखल केले ले आपल्या बॅंक खात्याचे उतारे निशाणी क्रमांक ३४ व ३५
नुसार पाच लक्ष रूपये प्रतिवादीस दिले हे सिध्द होते . अशा वेळेला दोन लक्ष रूपये
नगदी दिल्याबाबत वादीचे तोंडी साक्षीवर विश्वास न ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
प्रतिवादीने वादीस कोणतीही रक्कम परत केल्याबाबत कोणताही पुरावा दाव्यात नाही.
त्यामुळे वादीने प्रतिवादीस ७,००,०००/- रुपये विसारापोटी एकुण दिले ले आहे
असे मत मी मांडतो.

२३. सन २०१८ पासून प्रतिवादी सदर ७,००,०००/- रकमेचा वापर


करीत आहे. त्यामुळे सहाजीकच जर सदर रक्कम वादीकडे असती तर वादीने त्या
रकमेवर नफा कमविला असता अथवा व्याज कमविले असते. म्हणुन आजच्या
13

राष्ट्रीयकृत बॅकेच्या व्याजदराचा विचार करता वादी हे प्रतिवादीकडू न इसार म्हणुन


दिले ले रुपये ७,००,०००/- व त्यावर ७% दराने सरळ व्याज दावा दाखल
तारखेपासून ते संपुर्ण रक्कम वसुल करून मिळण्यास पात्र ठरतात असे मत मी मांडतो.
प्रतिवादीमुळे वादीस दावा दाखल करावा लागला. त्यामुळे दाव्याचा खर्च देखील
प्रतिवादीकडू न वसुल करुन मिळण्यास वादी पात्र असल्याचे मत मी मांडतो. म्हणुन मी
मुद्दा क्रमांक ८ चे उत्तर तश्या आशयाचे नोंदवून खालिल आदेश पारीत करित आहे .

आदेश

१... दावा अंशतः मंजुर करण्यात येत आहे.

२.. प्रतिवादीने वादीस इसारा दाखल घेतले ले ७,००,०००/- रुपये


हुकुमनाम्यापासून दाेन महिन्याच्या आत परत करावेत.

३.. वादी वरील रकमेवर दावा दाखल तारखेपासून ते संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यंत
७ % दराने सरळ व्याज प्रतिवादीकडू न वसुल करण्यास देखील पात्र आहे.

४.. प्रतिवादीने वादीच्या दाव्याचा खर्च सोसावा.

५.. येणेप्रमाणे हुकुमनामा तयार करण्यात यावा.


Digitally signed by SANJAY
SANJAY JIVAN JIVAN BHATTACHARYA
BHATTACHARYA Date: 2023.09.02 14:06:11
+0530

दि. ०१/०९/२०२३. (एस. जे. भटटाचार्य)


पुणे. ३ रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, पुणे.
14

CERTIFICATE

I affirm that the contents of this P.D.F. file Judgment are same,
word to word, as per original Judgment.

Name of the Stenographer :Sau. V.R. Rupnar


Court : Shri. S.J.Bhattacharya
3rd Jt. Civil Judge Sr.Div., Pune
Date : 1/09/2023
Judgment signed by the
presiding officer on : 2/09/2023

Judgment uploaded on : 2/09/2023

You might also like