माननीय मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांचे करिता प्रश्न

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

‭माननीय मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांचे करिता प्रश्न‬

‭प्रश्न‬ ‭क्रमांक‬ ‭1‬‭-‬ ‭महाराष्ट्र ‬ ‭राज्यातील‬ ‭विशेषता‬ ‭ग्रामीण‬ ‭क्षेत्रातील‬ ‭बालकांच्या‬ ‭सर्वांगीण‬ ‭विकासाकरिता‬

‭शासनाचे काय योजना आहे?‬

‭उत्तर-‬ ‭महाराष्ट्र ‬ ‭राज्यात‬ ‭एकात्मिक‬ ‭बाल‬‭विकास‬‭सेवा‬‭योजने‬‭अंतर्गत‬‭06‬‭महिने‬‭ते‬‭3‬‭वर्ष‬‭वयोगटातील‬

‭29‬ ‭लाख‬ ‭77‬ ‭हजार‬ ‭व‬ ‭3‬ ‭ते‬ ‭6‬ ‭वर्ष‬ ‭वयोगटातील‬ ‭26‬ ‭लाख‬ ‭15‬ ‭हजार‬ ‭इतकी‬ ‭बालके ‬‭योजनेचे‬‭लाभार्थी‬

‭आहेत.‬‭यापैकी‬‭,‬‭ग्रामीण‬‭क्षेत्रामधील‬‭06‬‭महिने‬‭ते‬‭3‬‭वर्षे‬‭वयोगटातील‬‭17‬‭लाख‬‭90‬‭हजार‬‭इतकी‬‭बालके ‬

‭व‬‭3‬‭ते‬‭6‬‭वर्ष‬‭वयोगटातील‬‭१९‬‭लाख‬‭इतके ‬‭लाभार्थी‬‭आहेत.‬‭या‬‭बालकांना‬‭एकात्मिक‬‭बाल‬‭विकास‬‭सेवा‬

‭योजनेअंतर्गत खालील प्रमाणे सेवा देण्यात येतात.‬

‭1.पूरक पोषण आहार‬

‭2. लसीकरण‬

‭3. आरोग्य तपासणी‬

‭4. पूर्व शालेय शिक्षण‬

‭5. आहार व आरोग्य शिक्षण‬

‭6. संदर्भात सेवा, इत्यादी.‬

‭तीन‬‭ते‬‭सहा‬‭वर्षे‬‭वयोगटातील‬‭अंगणवाडीमध्ये‬‭दाखल‬‭होणाऱ्या‬‭बालकांसाठी‬‭शिक्षण‬‭विभाग‬‭,‬‭युनिसेफ‬

‭आणि‬‭शिक्षण‬‭क्षेत्रातील‬‭तज्ञ‬‭व्यक्ती‬‭यां च्या‬‭मदतीने‬‭सण‬‭2016‬‭साली‬‭"आकार‬‭"‬‭बाल‬‭शिक्षणक्रम‬‭तयार‬

‭करण्यात‬‭आलेला‬‭आहे.‬‭या‬‭बाल‬‭शिक्षणक्रमाचे‬‭शिक्षण‬‭दे ण्याकरिता‬‭राज्यातील‬‭सर्व‬‭अंगणवाडी‬‭सेविका‬

‭यां ना‬‭प्रशिक्षण‬‭दे ण्यात‬‭आलेले‬‭आहे.‬‭तसेच,‬‭त्यां चे‬‭उजळणी‬‭प्रशिक्षण‬‭ही‬‭घेण्यात‬‭आलेले‬‭आहे.‬‭बालकांचे‬

‭बौद्धिक,‬ ‭भावनिक,‬ ‭सामाजिक,‬ ‭मानसिक‬ ‭आणि‬ ‭शारीरिक‬ ‭विकास‬ ‭होण्याच्या‬ ‭दृष्टीने‬ ‭या‬ ‭बालकांना‬

‭दरवर्षी‬ ‭अंगणवाडी‬ ‭कें द्रात‬ ‭पूर्व‬ ‭शालेय‬ ‭शिक्षण‬ ‭संच‬ ‭खेळणी‬‭यां चा‬‭पुरवठा‬‭करण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭शून्य‬‭ते‬

‭तीन‬ ‭वर्ष‬ ‭वयोगटातील‬ ‭बालकांचे‬ ‭उद्दीपनाद्वारे ‬ ‭सर्वांगीण‬ ‭विकास‬ ‭घडवून‬ ‭आणण्याकरिता‬ ‭पालकांना‬

‭विशेष‬ ‭शिक्षण‬ ‭व‬ ‭प्रशिक्षण‬ ‭दे ण्याच्या‬ ‭दृष्टीने‬ ‭सन‬ ‭2019‬ ‭पासून‬ ‭"आरं भ"‬ ‭या‬ ‭कार्यक्रमाची‬ ‭सुरुवात‬

‭करण्यात‬‭आलेली‬‭आहे.‬‭पालकांना‬‭याद्वारे ‬‭प्रशिक्षण‬‭दे ण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭आरं भ‬‭प्रकल्प‬‭युनिसेफ‬‭व‬‭महात्मा‬

‭गां धी‬ ‭आयुर्वेद‬ ‭विज्ञान‬ ‭संस्था‬ ‭यां च्या‬ ‭सहकार्याने‬ ‭महाराष्ट्रातील‬ ‭सर्व‬ ‭जिल्ह्यांमध्ये‬ ‭राबविण्यात‬ ‭येत‬ ‭आहे.‬
‭सदर‬‭शिक्षणामध्ये‬‭गृहभेट,‬‭पालक‬‭सभा‬‭व‬‭पालक‬‭मेळावा‬‭या‬‭माध्यमाने‬‭पालकांना‬‭संदेश‬‭दे ण्यात‬‭येऊन‬

‭त्यां ची क्षमता बांधणी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचे मार्फ त करण्यात येते.‬

‭प्रश्न‬‭क्रमांक‬‭२‬‭-‬‭विद्यार्थ्यांच्या‬‭शैक्षणिक‬‭घटकात‬‭आईचा‬‭महत्त्वाचा‬‭सहभाग‬‭आहे,‬‭कु टुंबात‬‭विद्यार्थ्यांच्या‬

‭पाल्यांना‬ ‭चां गले‬ ‭शिक्षण‬ ‭मिळावे,‬ ‭याकरिता‬ ‭आईची‬ ‭भूमिका‬ ‭महत्त्वाची‬ ‭असते‬ ‭शासनाच्या‬ ‭अग्रक्रम‬

‭कार्यक्रमात या बाबींचा समावेश करण्यात करिता काही योजना आहे काय?‬

‭उत्तर‬‭-‬ ‭पोषणासोबतच‬ ‭बालकांच्या‬ ‭शिक्षण‬ ‭विषयक‬ ‭घटकात‬ ‭बालकांच्या‬ ‭आईची‬ ‭भूमिका‬ ‭अत्यंत‬

‭महत्त्वाची‬ ‭आहे,‬ ‭त्यामुळे ‬ ‭बालविकास‬ ‭सेवा‬ ‭योजने‬ ‭अंतर्गत‬ ‭राबविण्यात‬ ‭येणाऱ्या‬ ‭पोषण‬ ‭अभियान‬ ‭या‬

‭कार्यक्रमांमध्ये‬ ‭मागील‬ ‭वर्षीपासून‬ ‭"पोषण‬ ‭भी‬ ‭पढाई‬ ‭भी"‬ ‭या‬ ‭विषयांतर्गत‬ ‭बालकांच्या‬ ‭आईला‬ ‭पोषण‬

‭आणि‬‭शिक्षणाविषयी‬‭अंगणवाडी‬‭सेविका‬‭आणि‬‭पर्यवेक्षिका‬‭यां चे‬‭कडू न‬‭मार्गदर्शन‬‭व‬‭प्रात्यक्षिक‬‭प्रशिक्षण‬

‭दे ण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭बालकांच्या‬‭शाळा‬‭पूर्व‬‭तयारीचे‬‭संपूर्ण‬‭प्रशिक्षण‬‭बालकांच्या‬‭आईला‬‭दे ण्यात‬‭येत‬‭आहे.‬

‭अंगणवाडी‬ ‭कें द्रातील‬ ‭तीन‬ ‭ते‬‭सहा‬‭वर्ष‬‭वयोगटातील‬‭बालके ‬‭सहा‬‭वर्षानंतर‬‭इयत्ता‬‭पहिली‬‭वर्गात‬‭शालेय‬

‭प्रवेश‬ ‭करतात‬ ‭सर्वच‬ ‭बालकांनी‬ ‭अंगणवाडीतून‬ ‭इयत्ता‬ ‭पहिलीच्या‬ ‭वर्गात‬ ‭शालेय‬‭प्रवेश‬‭घ्यावा‬‭याकरिता‬

‭मातांचे‬ ‭सेविकांमार्फ त‬‭समुपदेशन‬‭करण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭तसेच,‬‭बालकांची‬‭शालेय‬‭गळती‬‭होऊ‬‭नये‬‭यां चे‬

‭सनियंत्रण करण्यात येत आहे.‬

‭प्रश्न‬ ‭क्रमांक‬ ‭३-‬ ‭किशोरवयीन‬ ‭मुली‬ ‭आणि‬ ‭तिचे‬ ‭आरोग्य‬ ‭हा‬ ‭अत्यंत‬ ‭महत्त्वाचा‬ ‭विषय‬ ‭असून‬ ‭शासन‬

‭किशोरवयीन‬ ‭मुलींच्या‬ ‭पोषणाविषयी‬ ‭तसेच‬ ‭शिक्षण‬ ‭विषयक‬ ‭काळजी‬ ‭घेण्याकरिता‬ ‭काय‬ ‭उपाययोजना‬

‭करणार‬ ‭आहे‬ ‭?‬ ‭पोषण‬‭आणि‬‭शिक्षण‬‭या‬‭दोन्ही‬‭बाबी‬‭एकत्रितपणे‬‭करता‬‭येतील‬‭काय?‬‭आणि‬‭करावया‬

‭ची पद्धत ?‬

‭उत्तर‬ ‭-‬ ‭राज्यातील‬ ‭चार‬ ‭महत्त्वाकांक्षी‬ ‭जिल्हे‬ ‭१)‬ ‭धाराशिव‬ ‭२)नंदुरबार,‬ ‭३)‬ ‭वाशिम,४)‬ ‭गडचिरोली‬ ‭या‬

‭जिल्ह्यातील‬ ‭किशोरवयीन‬ ‭मुलींना‬ ‭एकात्मिक‬ ‭बाल‬ ‭विकास‬ ‭सेवा‬ ‭योजनेअंतर्गत‬ ‭पूरक‬ ‭पोषण‬ ‭आहार‬

‭दे ण्यात‬ ‭येतो.‬ ‭या‬ ‭योजनेअंतर्गत‬ ‭किशोरवयीन‬ ‭मुलींची‬ ‭आरोग्य‬ ‭तपासणी‬ ‭करून‬ ‭घेण्यात‬ ‭येत‬ ‭आहे.‬

‭किशोरवयीन‬ ‭मुलींमधील‬ ‭ॲनिमियाचे‬ ‭प्रमाण‬ ‭कमी‬ ‭करण्याकरिता,‬ ‭अंगणवाडी‬ ‭कें द्रांच्या‬ ‭माध्यमातून‬

‭आरोग्य‬‭विभागामार्फ त‬‭किशोरवयीन‬‭मुलींना‬‭रक्त‬‭वाढीच्या‬‭(हिमोग्लोबिन‬‭वाढीच्या)‬‭गोळ्या‬‭दे ण्यात‬‭येत‬

‭आहेत.‬ ‭शाळा‬ ‭सोडलेल्या‬ ‭किशोरवयीन‬ ‭मुलींनी‬ ‭परत‬ ‭शाळे त‬ ‭जावे,‬ ‭याकरिता‬ ‭अंगणवाडी‬ ‭सेविका‬ ‭व‬

‭पर्यवेक्षिका‬‭यां चेकडू न‬‭पालकांचे‬‭समुपदेशन‬‭करण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭दिनांक‬‭०१‬‭ऑगस्ट‬‭2017‬‭रोजी‬‭"माजी‬


‭कन्या‬ ‭भाग्यश्री"‬ ‭ही‬ ‭सुधारित‬ ‭योजना‬‭सुरू‬‭करण्यात‬‭आलेली‬‭होती.‬‭या‬‭योजने‬‭अंतर्गत‬‭मुलींचे‬‭शिक्षण‬‭व‬

‭सक्षमीकरण‬ ‭करण्याकरिता,‬ ‭मुलीच्या‬ ‭जन्माचे‬ ‭स्वागत‬ ‭तसेच‬ ‭तिच्या‬ ‭शैक्षणिक‬ ‭टप्प्यानुसार‬ ‭तिच्या‬ ‭नावे‬

‭बँक‬ ‭खात्यात‬ ‭शासनाद्वारे ‬ ‭जमा‬ ‭के लेली‬‭रक्कम‬‭काढण्याची‬‭सुविधा‬‭होती.‬‭आता,‬‭सदर‬‭योजना‬‭सुधारित‬

‭करून‬ ‭"लेक‬ ‭लाडकी"‬ ‭ही‬ ‭नवीन‬ ‭योजना‬ ‭दिनांक‬ ‭30‬ ‭ऑक्टोबर‬ ‭2023‬ ‭पासून‬ ‭शासनामार्फ त‬ ‭राज्यात‬

‭सुरू‬ ‭करण्यात‬ ‭आलेली‬ ‭आहे.‬ ‭या‬ ‭योजनेचा‬ ‭मूळ‬‭उद्देश‬‭हा‬‭मुलीचे‬‭योग्य‬‭पोषण‬‭व‬‭शिक्षण‬‭तसेच‬‭मुलीचे‬

‭सक्षमीकरण करणे हा आहे.‬

‭प्रश्न‬‭क्रमांक‬‭४-‬‭शालेय‬‭शिक्षणामध्ये‬‭मुलगा‬‭आणि‬‭मुलगी‬‭भेद‬‭हा‬‭विषय‬‭राज्याचा‬‭महिला‬‭व‬‭बाल‬‭विकास‬

‭विभाग कशा पद्धतीने हाताळणार आहे?‬

‭उत्तर-‬ ‭मुळातच‬ ‭मुलगा‬ ‭व‬ ‭मुलगी‬ ‭हा‬ ‭भेद‬ ‭नष्ट‬ ‭व्हावा‬ ‭याकरिता‬ ‭"बेटी‬ ‭बचाओ‬ ‭बेटी‬ ‭पढावो"‬ ‭ही‬ ‭योजना‬

‭अत्यंत‬‭प्रभावीपणे‬‭राबविण्यात‬‭येत‬‭आहे.‬‭मुला‬‭इतके च‬‭किं बहुना‬‭त्यापेक्षाही‬‭जास्त‬‭महत्त्व‬‭मुलींना‬‭मिळावे‬

‭याकरिता,‬ ‭शासनाच्या‬ ‭सर्व‬ ‭यंत्रणा‬ ‭विविध‬ ‭योजनांच्या‬ ‭माध्यमाद्वारे ‬ ‭प्रयत्न‬ ‭करण्यात‬ ‭येत‬ ‭आहेत.‬ ‭त्याचे‬

‭फलनिष्पत्ती‬‭म्हणून‬‭राज्यातील‬‭इयत्ता‬‭दहावी,‬‭इयत्ता‬‭बारावी,‬‭वैद्यकीय‬‭व‬‭अभियांत्रिकी‬‭तसेच‬‭यूपीएससी‬

‭व‬ ‭एमपीएससी‬ ‭या‬ ‭सर्वच‬ ‭परीक्षांच्या‬ ‭निकालामध्ये‬ ‭मुली‬ ‭अग्रेसर‬ ‭असल्याचे‬ ‭दिसून‬ ‭येत‬ ‭आहे.‬ ‭मुलगा‬ ‭व‬

‭मुलगी‬ ‭यां चा‬ ‭शालेय‬ ‭शिक्षणातील‬ ‭भेद‬ ‭कमी‬ ‭व्हावा‬ ‭याकरिता‬ ‭शासकीय‬ ‭शाळांमध्ये‬ ‭मुलींना‬ ‭पहिली‬ ‭ते‬

‭बारावी‬ ‭पर्यंत‬ ‭शिक्षण‬ ‭मोफत‬ ‭करण्यात‬ ‭आलेले‬ ‭आहे.‬ ‭मुलींच्या‬ ‭सक्षमीकरणाकरिता‬ ‭शासनाने‬ ‭३०‬

‭ऑक्टोबर‬ ‭2023‬ ‭रोजी‬ ‭"लेक‬ ‭लाडकी"‬ ‭या‬ ‭योजनेची‬ ‭सुरुवात‬ ‭के लेली‬ ‭आहे.‬ ‭पिवळ्या‬ ‭व‬ ‭के शरी‬ ‭रे शन‬

‭कार्ड‬‭धारक‬‭कु टुंबात‬‭मुलींच्या‬‭जन्मानंतर‬‭टप्प्याटप्प्याने‬‭अनुदान‬‭दे ण्यात‬‭येऊन‬‭लाभार्थी‬‭मुलीचे‬‭वय‬‭18‬

‭वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित मुलीस रुपये 75 हजार इतकी रक्कम रोख स्वरूपात देण्यात येईल.‬

‭प्रश्न‬‭क्रमांक‬‭५-‬‭नागरि‬‭क्षेत्रांमध्ये‬‭बाल‬‭मजुरी‬‭आणि‬‭बालकांच्या‬‭शिक्षण‬‭विषयी‬‭जागृतीचा‬‭अभाव,‬‭हा‬‭प्रश्न‬

‭आपण कशा पद्धतीने मांडाल?‬

‭उत्तर-‬ ‭बालमजुरी‬ ‭हा‬ ‭कामगार‬ ‭विभागाशी‬ ‭निगडित‬ ‭प्रश्न‬ ‭आहे.‬ ‭बालमजुरीचे‬ ‭प्रमाण‬ ‭व‬ ‭प्रथा‬ ‭नष्ट‬

‭करण्यासाठी‬ ‭संबंधित‬ ‭विभागाच्या‬ ‭समन्वयाने‬‭कार्यवाही‬‭करण्यात‬‭येईल.‬‭कु टुंबातील‬‭आर्थिक‬‭विवंचनेत‬

‭मुली,‬‭लहान‬‭बालके ‬‭रोजगाराची‬‭कामे‬‭करतात‬‭त्यां ची‬‭सर्वच‬‭बाबतीत‬‭याद्वारे ‬‭पिळवणूक‬‭होत‬‭आहे.‬‭अशा‬

‭बालकांच्या‬ ‭शिक्षण‬ ‭व‬ ‭आरोग्याची‬ ‭संबंधित‬ ‭समस्या‬ ‭मोठ्या‬ ‭प्रमाणात‬ ‭आहेत.‬ ‭या‬ ‭समस्या‬

‭सोडविण्याकरिता कामगार विभागाशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येतील.‬

You might also like