तूर्तातूर्त ताकीद अर्ज affi

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

अॅफिडेव्हिट

तूर्तातूर्त ताकीद अर्ज....


रे.मु.नं. /२०२४
पंढरपूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश साहेब यांचे
न्यायालयात..
अनंत वासुदेव सलगर -------- वादी
विरुद्ध
रंगनाथ वासुदेव सलगर, वगैरे.... -------- प्रतिवादी

यात मी वादी अनंत वासुदेव सलगर, वय-६० वर्षे, धंदा-व्यवसाय, रा.२१/ड, डोंबे
गल्ली, पंढरपूर, जि.सोलापूर सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की, खालील अर्जातील सर्व
मजकू र हा माझे उत्तम माहिती व समजुतीनुसार खरा व बरोबर आहे.
मिळकतीचे वर्णन – डि.सोलापूर सब डि व ता.पंढरपूर पैकी शहर पंढरपूर येथील डोंबे
गल्ली या भागातील घरजागा मिळकत –
सिटी क्षेत्र आकार चतुःसीमा
सर्व्हे नं. (चौ.मी) (रु.पैसे) पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर
२१/ड १०५ १४८० सि.स.नं. रस्ता सि.स.नं. सि.स.नं.
२१/इ/१ २१/क २२/१/ब
आतील सर्व तदंगभूत वस्तू व हक्कांसह यात वादीची राहती घरजागा दगड विटाचे
बांधकाम पत्र्याचे छतासह, लाईट व नळ कनेक्शन, इ.
वर दावा कलम १ मध्ये नमूद के लेली मिळकत ही वादी व प्रतिवादी यांची
वाडवडिलार्जित हिंदू एकत्र कु टुंबाची मिळकत असून यातील वादी यास प्रतिवादी नं.१
तसेच मयत गणेश असे भाऊ असून ३ बहिणी आहेत.सर्वांचे लग्न झाले असून ते त्यांच्या
पतीच्या घरी राहतात.यातील वादीचा भाऊ गणेश हा मयत असून त्याचे मयताचे पश्चात
त्याचे कु टुंबीय हे माहेरी वडिलांकडे सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी पासून राहत आहे तसेच
प्रतिवादी नं.१ याने देखील एकत्र कु टुंबात स्वतःचे नावे व पत्नीच्या नावावर पंढरपूर
उपनगरात जागा घेऊन त्यावर RCC बांधकाम करून ते देखील वेगळे राहत आहेत.
वादी हा के वळ अडाणी, अशिक्षित असल्याने व सुतारकाम करीत असल्याने वर
नमूद कलम १ मधील जागेत कु टुंबियांसह राहत आहे.वादीचे चौघा जणांचे कु टुंब असून
वादीचे आईवडील देखील वादी जवळच मयत झाले आहेत.त्यांची देखभाल, सेवासुश्रुषा
वादी यांनीच के ली आहे.वरील घरजागा ही सुमारे १०० ते १५० वर्षांची पडीक अशी
जीर्ण झाली होती त्यामध्ये मोठी मोठी झाडे उगवली होती व शेजारील लगतचे मालक हे
आर्थिक दृष्ट्‍या सक्षम असल्याने ते सदर जागा पडीक झाल्यामुळे त्यामध्ये हक्क सांगू
लागले म्हणून वादीने तशी कल्पना मोठा भाऊ म्हणून प्रतिवादी नं.१ यास सुमारे १५
वर्षापासून सांगत आला तसेच मयत गणेश याचे वारसांना देखील याची माहिती दिली
परंतु त्यांनी “सदर जागेमध्ये आम्ही राहत नाही, तुमचे तुम्ही बघा” असे सांगितले.शेवटी
वादीने मेहनतीने जमवलेले पैसे व इतर पतसंस्था यांचेकडून कर्ज काढून सदर जागा ही
फारच पडावयास झाली, जीर्ण झाली व तेथे राहणे अयोग्य असल्याची नोटीस पंढरपूर
नगरपरिषदेकडून आलेवर उतरवून घेतली व फक्त चारी बाजूने भिंती बांधून वरून पत्र्याचे
आच्छादन टाकू न वादी तेथे राहू लागला.ही वस्तुस्थिती प्रतिवादींना माहित आहे.
परंतु प्रतिवादी नं.१ व मयत गणेश यांचे वारसांनी वादीने जागा १०० ते १५० वर्षांची
जुनी जीर्ण झाली व रहावयास अयोग्य अशी नोटीस आलेने व त्यास राहणेस दुसरीकडे
जागा नसलेने त्यांनी जागेची वाटणी करून घेऊ म्हणजे मला बांधून राहता येईल असे
सुमारे १० ते १५ वर्षापासून सांगत आहे.परंतु प्रतिवादींनी आम्हाला सदर जागेमध्ये
राहावयाचे नाही, तुला वाटून देणार नाही असे म्हटल्यावर वादीने वाटपाचा दावा
कोर्टामध्ये दाखल के ला रे.मु.नं.५१/२०१४ प्रमाणे त्यामध्ये प्रतिवादी हजर झाले त्यांनी
पुढे दाव्यात स्वारस्य दाखवले नाही.दावा दि.१६/०२/२०२१ रोजी निकाली होऊन मंजूर
झाला दि.१६/०२/२०२१ पासून देखील प्रतिवादी कधीही चौकशीस आले
नाहीत.मागील १ महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिल २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात सदर
जागेमध्ये राहावयाचे नाही असे सांगितल्यावर वादीने तो राहत असलेला धोकादायक,
जुना व जीर्ण भाग हा उतरवून घेतला व त्यावर पत्रा टाकू न राहू लागला कारण तो भाग
अत्यंत जुना व जीर्ण झालेला असल्याने व तो पडू लागल्याने एखादी मोठी दुर्घटना होऊ
नये व त्याच ठिकाणी संडास व नळ, बाथरूम असल्याने अंगावर इमला पडण्याची व
गंभीर धोका होण्याची शक्यता असल्याने वादीने सदर जागा उतरवून घेतली व दुरुस्ती
करू लागला त्यावेळी प्रतिवादी नं.१ व मयत गणेश यांचे वारसांनी गुंड प्रवृत्तीचे लोक
आणून वादीस राहते घरातून बाहेर हो, तू इथे राहावयाचे नाही, तू इथे राहतोच कसे ते
पाहतो, तू पाडकाम, बांधकाम कोणाला विचारून के ले, आम्हाला कोर्ट वगैरे काही
माहित नाही असे म्हणून दमदाटी करू लागले.वादीने त्यांना समजावून सांगितले की
जागा पडीक झालेमुळे व अंगावर पडून गंभीर धोका होण्याची शक्यता असल्याने
उतरवली आहे असे म्हणाले असता ते वादीस तुला खलास करून टाकतो, बघू कोण
येतोय ते असे धमकीची भाषा वापरली त्यामुळे वादीने ताबडतोब पोलीस स्टेशनला
तक्रार दिली.प्रतिवादी नं.१ व २ यांचे वरील गैरहक्की, अनधिकाराचे व बेकायदेशीर
कृ त्यामुळे वादीचे दावा मिळकतीतील शांततापूर्ण कब्जे वहिवाटीस गंभीर धोका उत्पन्न
झाला आहे.प्रतिवादी हा दांडगेश्वर असल्याने तो वादीला जुमानत नाही.त्यामुळे दावा
मिळकतीतील वादींच्या न्याय व कायदेशीर वहिवाटीस प्रतिवादी नं.१ व २ यांनी स्वतः
अगर इतरांमार्फ त अगर नातेवाईकांमार्फ त के व्हाही व कसलीही हरकत करू नये म्हणून
वादीस प्रस्तुतचा दावा निरंतर ताकीद मागणेसाठी दाखल करणे भाग पडले आहे.
प्रस्तुत दाव्याचा निकाल होणेस बराच कालावधी लागणार आहे.त्यामुळे प्रतिवादी
नं.१ व २ यांनी स्वतः अगर इतरांमार्फ त अगर नातेवाईकांमार्फ त वादीच्या शांततापूर्ण
कब्जे वहिवाटीस के व्हाही व कसलीही हरकत करू नये म्हणून जरूर ती ताकीद देणे
गरजेचे व आवश्यक आहे.सुकृ तदर्शनी वादीस के स असून दाव्याचा समतोल हा वादीचे
बाजूने आहे.वरील प्रमाणे वादीने तूर्तातूर्त ताकीदीचा अर्ज दिलेला असून सदर अर्ज
नामंजूर झालेस वादीचे अपरिमित असे कशानेही न भरून येणारे असे नुकसान होणार
आहे.तरी वादीचा प्रस्तुतचा अर्ज मंजूर व्हावा ही विनंती.
वादीची विनंती की,
1. वादीचा प्रस्तुतचा तूर्तातूर्त ताकीद अर्ज मंजूर व्हावा.
भ. वादीच्या दावा मिळकतीतील राहते घराचे कब्जे वहिवाटीस तसेच संडास व
बाथरूमचे पडलेल्या क्षेत्राचे किरकोळ बांधकाम करणेस प्रतिवादी नं.१ व २ यांनी
स्वतः अगर इतरांमार्फ त कोणत्याही इसमाने के व्हाही व कसलाही हरकत अडथळा
करू नये याबद्दल प्रतिवादी नं.१ व २ विरुद्ध निरंतरची ताकीद देण्यात यावी.
क. या अर्जाचा संपूर्ण खर्च वादीस प्रतिवादी नं.१ व २ यांचे कडून देववावा.
ड. जरूर तर अर्ज दुरुस्तीस परवानगी असावी.
3. अर्जाचे अनुषंगाने इतरही न्यायाचे हुकु म व्हावेत.
ब. इतर योग्य ते न्यायाचे हुकु म व्हावेत.
येणेप्रमाणे तूर्तातूर्त ताकीद अर्ज असे ता. / /२०२४

________________________ ________________________
वादी तर्फे वकील वादी
-४-
प्रतिज्ञालेख
यात मी वादी अनंत वासुदेव सलगर, वय-६० वर्षे, धंदा-व्यवसाय, रा.२१/ड, डोंबे
गल्ली, पंढरपूर, जि.सोलापूर सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की, वरील अर्जातील सर्व
मजकू र हा माझे उत्तम माहिती व समजुतीनुसार खरा व बरोबर असून त्याखाली मी
माझी सही तारीख मजकु री के ली असे.
________________________

You might also like