Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

ओरोस येथील मे.

दिवाणी न्यायाधीश ( व, स्तर ) साहेब यांचे न्यायालयात

डॉ. मूदुला महेश्वर महाबळ | --.------- वावी

वि.

निलोफरगनीबेग wee प्रतिवादी

वादीतर्फे प्रतिवादीच्या नि. १२ कडील अर्जावर म्हणणे देण्यात येते असे की,

१. वादीचा सदरचा अर्ज पूर्णपणे खोटा, खोडसाळ व कायद्यातील तरतुदींना धरून नसल्याने
प्रथमदर्शनी फेटाळण्यास पात्र आहे.

२. प्रतिवादीने सदर अर्जात परिच्छेद क्र. २ मध्ये नमूद केलेला सर्व मजकूर धादांत खोटा व
स्थोडसाळ असून, केवळ वादीचे पैसे द्यावे लागू नये, यासाठी प्रतिवादीने सदरची कथने अर्जात नमूद
केली आहेत.

३. वस्तुतः एखाद्याला भाड्याने जागा द्यावयाची झाल्यास, ती भाडेकरूला कशासाठी पाहिजे त्या
आवश्यकतेनुसार सोय करून द्यावयाची असते. वादीस सदर जागा वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक
असल्याने, त्यानुसार जागेत बदल करावे लागतील, असे बादींनी व्यवहार ठरवतेवळी स्पष्टपणे
प्रतिवादीस सांगितले होते, त्यानुसार प्रतिवादीने अनामत रक्‍कम व भाड्याची रक्‍कम देखील मोठी
ठरवून घेतलेली आहे,

४. अशा परिस्थितील वादीच्या व्यवसायासाठी लागणारी दुरूस्ती अथवा बदल प्रतिवादीने करणे,
हे नियमानुसार अपरिहार्यच होते, त्यानुसार प्रतिवादीने काही प्रमाणात दुरूस्ती केलेली आहे. परंतु बरेच
रंगकाम, लाईट फिटींग, लिफ्टचे बांधकाम हे वादीने स्वखर्चान केलेले असून, प्रतिवादीने त्यासाठी
कोणताही खर्च केलेला नाही. उलट वादीचे भरमसाठ पैस प्रतिवादीकडे अडकलेले आहेत.

( Scanned with OKEN Scanner


५. अशाप्रकारे सत्यपरिस्थिती असताना, आजरोजी भाडेकरारातील नमूद जागेत प्रतिवादीने
स्वतच्या फायद्यासाठी बरेच बदल केलेले आहेत. तसेच प्रतिवादीने सदर जागा इतरांना

भाड्यानेदेखील दिलेली आहे. अशा परिस्थितीत प्रतिवादी स्वतःसाठी केलेल्या बदलाचा खर्च
वादीच्या माथी मारून, मे. कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.

६. अशाप्रकारे सत्यपरिस्थिती असून, मुळात दावा हा रकमेच्या वसुलीसाठी असल्याने कोर्ट


कमिशनची त्यांस आवश्यकता नाही. सबब सदरचा अर्ज नामंजूर करण्यात यावा.

येणेप्रमाणे म्हणणे आहे.


ओरोस
दिनांक— ०९/०७/२०२४ he
( अँड. वेदिका विरेश राऊळ )
- वादीतर्फे वकील
वादी

( Scanned with OKEN Scanner

You might also like