Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 48

सावित्रीबाई फु ले विद्यापीठ, पुणे

विद्यापीठाच्या (एम.फिल.) पदवीसाठी सादर के लेला संशोधनाचा सारांश


“इयत्ता पाचवीतील विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रकल्प पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास“

मार्गदर्शक
डॉ. के . एस. चव्हाण
सहयोगी प्राध्यापक
म. वि. प्र. स.चे
अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक

संशोधक
अमोल तुकाराम झोले
(एम.फिल. 2016 -18 )
अभ्यासकें द्र
म. वि. प्र. स.चे
अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक

सन : 2018 -19
१ .१ संशोधन विषयाची ओळख

प्रस्तावना
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सक्षम असायला पाहीजे, त्यासाठी विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी असली पाहिजे.
परिपूर्ण व अद्ययावत असे ज्ञान विद्यार्थ्याला आत्मसात असावे.
स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे.
थोडक्यात सर्वगुणसंपन्न विद्यार्थी आजच्या युगात अपेक्षीत आहे.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, विकास होणे. गरजेचं आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्याची तयारी असली पाहिजे.
बौद्धिक विषयातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता इतर कौशल्यांच्या विकास झाला पाहिजे. या कौशल्यांचा विकास शालेय अभ्यासक्रमांतून होत असतो.
विद्यार्थ्यांच्या अंगी विविध क्षमता असतात, त्या सर्व क्षमतांचा विकास के ला पाहीजे विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे.
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा, व सर्जनशीलता या गुणांना चालना मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांना कृ तियुक्त संधी मिळाली पाहिजे.
१.२ संशोधनाची गरज :

आपल्या शिक्षण पद्धतीचा विचार के ला तर शिक्षणामध्ये भाषा, गणित, इंग्रजी या बौद्धिक विषयांवर अधिक भर दिला जातो. वाचन लेखन गणन या क्षमतांचा
विकास झाला पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न के ले जातात.
बौद्धिक विषयावर लक्ष कें द्रित के ल्यामुळे परिसर विज्ञान यासारख्या विषयाकडे दुर्लक्ष होते. व त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास खुंटतो.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास अडथळा निर्माण होतो.
विज्ञान विषयातील सर्वच भाग, पाठ्यांश विद्यार्थ्यांना समजत नाही. विज्ञानातील संकल्पना संज्ञा स्पष्ट होत नाही. यामुळे त्याविषयी त्यांचे ज्ञान अपूर्ण
राहते.
संशोधकाने प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना समजतील. संज्ञा, संबोध, स्पष्ट होतील व पाठ्याशांची माहीती
विद्यार्थ्यांना अधिक सखोल मिळेल.
प्रकल्पाच्या माध्यमांतून मिळालेले ज्ञान चिरंतन राहील.
प्रकल्प पद्धतीचा वापर के ल्यास विद्यार्थ्यास तो भाग अधिक परिणाम कारक समजेल. त्यांच्या अंगी असलेल्या विविध क्षमता विकसित होईल. व त्यामध्ये
काम करण्यास विद्यार्थ्यांची अभिरुची निर्माण होईल.
प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल.
समाजात, समूहात वावरण्याची क्षमता विकसित होईल. एकमेकांविषयी आपुलकी जिव्हाळा निर्माण होईल.
विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यांचा विकास होईल
1.3 संशोधनाचे महत्व :
संशोधकाने प्रकल्प पद्धतीचा स्वीकार या संशोधनात के ला आहे. प्रकल्प पूर्ण के ल्यामुळे विद्यार्थ्यांमधील स्वयंअध्ययन प्रवृत्ती, कल्पकता, सृजनशिलता,
संग्रहवृत्ती, सहकार्य, भावना, निटनिटके पणा, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी इ. महत्त्वपूर्ण गुणांचा विकास व जीवनावश्यक कौशल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये
होण्यास चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील फायदे होतील.
•विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागेल.
•प्रकल्प पद्धतींमधील विद्यार्थ्यांना स्वत:च्या कु वतीनुसार व गतीनुसार अध्ययनाची संधी मिळेल.
•विद्यार्थ्यांमधील निरीक्षण, निवेदन, संकलन इ. कौशल्यांचा विकास होईल.
•विद्यार्थ्यांस तर्क संगत विचार करण्याची सवय लागेल.
•विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तृ त्व इ. गुणांचा विकास होईल.
•विद्यार्थ्यांमधील वक्तशिरपणा, निटनेटके पणा, प्रसंगावधान, सहकार्य, संघभावना, शिष्टाचार पालन इ. जीवनावश्यक कौशल्यांचा विकास होईल.
•विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यात वाढ होईल.
•प्रकल्प सादरीकरणाच्या वेळी सुस्पष्ट रीतीने योग्य व ओघवत्या शब्दात माहीती सांगता येईल.
(प्रकल्पविषयक मार्गदर्शक पुस्तिका भाग -2 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-30)
संशोधनाचे शीर्षक:

“ इयत्ता पाचवीतील विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रकल्प पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास ”


1.4 संशोधनाचे समस्या विधान :
“नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी येथील इयत्ता पाचवीतील विज्ञान विषयाच्या अध्यापनात प्रकल्प
पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास करणे.”

1.5 संशोधन समस्येचे स्पष्टीकरण :


सदर संशोधनात प्रकल्प पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्प कसे करावे? प्रकल्पाची वाटणी कशी
करावी ? प्रकल्पाची मांडणी कशी करावी ? या सर्वांची माहीती व मार्गदर्शन के ले जाणार आहे.
प्रकल्प करत असतांना विद्यार्थ्यांना स्वत: प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विषयाच्या निवडीनुसार, विद्यार्थी
त्यासाठी लागणारी आवश्यक माहीती गोळा करणार आहे. तसेच यातून त्यांच्या अंगी असणारी जिज्ञासूवृत्ती, संग्रहवृत्ती, चिकित्सकपणा या गुणाचा विकास
होणार आहे.
यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष कृ ती करणार आहे. स्वत: माहिती मिळवणार आहे. मिळालेली माहिती संकलित करून संग्रहीत करणार आहे.
1.6 संशोधनातील पारिभाषिक संज्ञाच्या व्याख्या :
संकल्पनात्मक व्याख्या :
१) प्रकल्प : उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी हेतुपूर्वक के लेला उपक्रम किं वा कृ ती म्हणजे प्रकल्प होय.
(संदर्भ : विज्ञानाचे आशययुक्त अध्यापन - डॉ . प्रभाकर हकिम)
२) विद्यार्थी : वर्गामध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेला बालक.
(संदर्भ : अध्ययन अध्यापनाचे मानसशास्र सुविचार प्रकाशन मंडळ. पुणे, पान क्र. 139 )
३) अध्यापन : अध्यापन म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान, कौशल्य व कला, संपादनास मदत करणारी प्रक्रिया होय.
( संदर्भ : अध्ययन व अध्यापन - डॉ. ह.ना. जगताप)
४) विज्ञान पाठ्यपुस्तक : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे 411000 यांनी तयार के लेली विज्ञान विषयाची क्रमिक
पुस्तिका.
( संदर्भ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1988)
५) प्राथमिक स्तर : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (5+3+2+2+3) या आकृ तिबंधातील 5 चा स्तर
( संदर्भ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1988)
1.7 कार्यात्मक व्याख्या
१) प्राथमिक स्तर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी येथे असणारा इयत्ता 1 ते 5 चा वर्ग म्हणजे प्राथमिक स्तर होय.
२) विद्यार्थी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी, ता. निफाड जि. नाशिक येथे सन 2017-18 मध्ये शिक्षण घेणारी बालके .
३) प्रकल्प : इयत्ता पाचवी विज्ञान विषयासाठी निश्चित के लेल्या आशयानुरूप निर्मित के लेले प्रकल्प.
४) अध्ययन : विज्ञान विषयातील निवडलेल्या आशयाचे प्रकल्प पद्धती नुसार के लेले अध्यापन होय.
५) पाठ्यपुस्तक : प्रचलित इयत्ता पाचवीचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित विज्ञान विषयाचे क्रमिक पुस्तक.

1.8 संशोधन प्रश्न :


•इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील प्रकल्प पारंपारिक पद्धतीने शिकविल्यास का समजत नाही ?
•तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञान विषयातील प्रकल्प शिकविले तर विद्यार्थ्यांना समजतील का ?
•प्रकल्प पद्धतीने विज्ञान विषय शिकविला तर विद्यार्थ्यांना समजेल का ?
•विज्ञान विषयातील प्रकल्प विद्यार्थ्यांना समजण्यासाठी कोणते उपक्रम, कोणत्या कृ ती, कोणती पद्धत यांचा अवलंब करावा लागेल ?
1.9 संशोधनाचे चले
1) प्रकल्प पद्धतीने अध्यापन - स्वाश्रयी चल

2) विज्ञान विषयाचे प्रभावी अध्यापन - आश्रयी चल

1.10 संशोधनाची उद्दिष्टे :


1) इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प पद्धतीच्या आशयाची निश्चिती करणे.
2) विज्ञान आशयाच्या अध्यापनासाठी निश्चित के लेल्या प्रकल्पांची निर्मिती करणे.
3) प्रकल्प पद्धतीची परिणामकारकता तपासणे/ अभ्यासणे.

1.11 संशोधनाची गृहीतके :


1) प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होते.
2) प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची अभिरुची निर्माण होते.
3) विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषय संपादनात वाढ होते.
(संदर्भ : प्रचलित मूल्यमापन पद्धतीमधील प्रकल्प विषयक मार्गदर्शन पुस्तिका,
म.रा.शै.व.सं.व.प्र.परिषद पुणे, मार्च 2006 )
1.12 परिकल्पना
1) संशोधन परिकल्पना : इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास संपादनात लक्षणीय वाढ होते.
2) शून्य परिकल्पना : इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना पारंपारिक व प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास विद्यार्थांच्या संपादनात सार्थ फरक
आढळून येत नाही.

1.13 संशोधनाची व्याप्ती, मर्यादा, परिमर्यादा


•संशोधनाची व्याप्ती :
1) प्रस्तुत संशोधन नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधित
आहे.
2) प्रस्तुत संशोधन इयत्ता पाचवीच्या विज्ञान विषयाशी संबंधित आहे.
3) प्रस्तुत संशोधन इयत्ता पाचवीच्या विज्ञान विषयाचे प्रकल्प पद्धतीने अध्यापनाशी संबंधित आहे.

1.14 मर्यादा
1) प्रस्तुत संशोधन हे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवीच्या वर्गापुरते मर्यादित आहे.
2) प्रस्तुत संशोधन हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी या शाळेतील पाचवीच्या वर्गापुरते मर्यादित आहे.
3) प्रस्तुत संशोधन हे इयत्ता पाचवीच्या विज्ञान विषयापुरते मर्यादित आहे.
1.15 परिमर्यादा
1) प्रस्तुत संशोधन हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी या शाळेतील इयत्ता पाचवीच्या
वर्गातील विद्यार्थ्यांवर करण्यात आले आहे.
2) सदर संशोधन हे विज्ञान विषयापुरते मर्यादित राहील.
3) सदर संशोधन 2017-18 या शैक्षणिक वर्षापुरते मर्यादित असेल.

1.16 अहवाल रचना


पुढीलप्रमाणे संशोधनाचा अहवाल सदर के ला आहे.

1) प्रकरण पहीले प्रास्ताविक /प्रस्तावना


2) प्रकरण दुसरे संबंधित साहीत्य व संशोधनाचा आढावा.
3) प्रकरण तिसरे संशोधनाची कार्यपद्धती
4) प्रकरण चौथे साहीत्याचे वर्गीकरण, विश्लेषण व अर्थनिर्वचन
5) प्रकरण पाचवे सारांश, निष्कर्ष व शिफारशी
1.17 संदर्भग्रंथ सूची

• मुळे, रा. शं. आणि उमाठे वि. तु. (1987) शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे, नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
• भिंताडे, वि. रा. (1994) शैक्षणिक संशोधन पद्धती पुणे : नूतन प्रकाशन.
• बापट, भा. गो. (1988) शैक्षणिक संशोधन : पुणे नूतन प्रकाशन.
• बन्सी, बी. पंडित (1995) शैक्षणिक कृ ती संशोधन : पुणे नूतन प्रकाशन.
• इयत्ता पाचवीचे विज्ञान पाठ्यपुस्तक (2015) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे.
 
2.1 संदर्भ साहित्याच्या आढाव्याचे स्वरूप
संशोधकाने प्रस्तुत संशोधन साहित्याच्या आढाव्यात पुढील गोष्टींचा समावेश के लेला आहे.

1) संशोधनाशी संबंधित साहीत्य ( पुस्तके /ग्रंथ )


अ) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका (महाराष्ट्र शासन)
आ) प्रचलित मूल्यमापन पद्धतीमधील प्रकल्प विषयक मार्गदर्शन पुस्तिका भाग 1 व 2
इ) दिशा नवोपक्रम (सिद्धाराम राजगोंडा, मासिके . सोलापूर)
ई) दिशा नवोपक्रमाची (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे. 30)
उ) उपक्रमशिलतेकडू न कृ तीसंशोधानाकडे (सिद्धाराम मासाळे, जानेवारी 2011)

2) संशोधनासंबंधी यापूर्वी झालेली संशोधने


अ) एम. एड. स्तरावरील संशोधने (7)
आ) एम.फील. स्तरावरील संशोधने (6)
इ) पीएच.डी स्तरावरील संशोधने (5)
2.2 प्रस्तुत संशोधनाचे वेगळेपण
 प्रस्तुत संशोधनात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार के लेला आहे.
 प्रस्तुत संशोधनात विद्यार्थ्यांच्या कारक कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आलाआहे.
 विद्यार्थ्यांना त्यांची आवड, वयोगट यानुरूप प्रकल्प करण्याची संधी दिलेली आहे.
 प्रस्तुत संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृ ती, प्रत्यक्ष अनुभव देण्यात आलेले आहे.
 विद्यार्थ्यांची नवनिर्मिती, जिज्ञासा, शोधनवृत्ती यांचा विकास के लेला आहे.
 प्रस्तुत संशोधनात विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास करण्याचा प्रयत्न के लेला आहे.
 
 
 
2.3 संदर्भग्रंथ सूची
संदर्भग्रंथ सूची
• मुळे, रा. शं. आणि उमाठे वि. तु. (1987) शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे, नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
• भिंताडे, वि. रा. (1994) शैक्षणिक संशोधन पद्धती पुणे. नूतन प्रकाशन.
• पारसनिस, हेमलता (2007) शैक्षणिक संशोधन माहिती संकलन तंत्रे व साधने, पुणे नित्यनूतन प्रकाशन.
• फाटक, माणिक (2008) शिक्षणातील संशोधणाची मुलतत्वे, नूतन प्रकाशन.
• https//:www.vidnyanbook.com
 
 
3.1 प्रस्तुत संशोधनाची पद्धती :
प्रस्तुत संशोधनासाठी प्रायोगिक संशोधन पद्धतीची निवड के लेली आहे.
3.2 अभिकल्प
गटांची निवड

प्रायोगिक गट नियंत्रित गट

पूर्व चाचणी

प्रत्यक्ष प्रयोग प्रयोगाचा प्रभाव

उत्तर चाचणी
प्रस्तुत संशोधनात संशोधकाने समानगट अभिकल्पाची निवड के लेली आहे. यामध्ये जि. प. प्राथ. शाळा दिक्षी येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील
विद्यार्थ्यांचे दोन समतुल्य गट तयार के ले. यामध्ये एका गटावर पारंपारिक पद्धतीने अध्यापन के ले. व दुसऱ्या एका गटावर प्रकल्प पद्धतीने अध्यापन
के ले. म्हणजेच त्या प्रायोगिक गटावर प्रयोगाचा अवलंब के ला. त्यानंतर दोन्ही गटांची उत्तर चाचणी घेतली. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांच्या उत्तर
चाचणीतील प्राप्तांकाच्या मध्यमानाची तुलना करून उपचार मात्रेची परिणामकारकता ठरविली.
गटांची निवड

नियंत्रित व प्रायोगिक गट

पूर्वचाचणी ( दोन्ही गट )

प्रकल्पाची कार्यवाही ( फक्त प्रायोगिक गट )

उत्तरचाचणी ( दोन्ही गट )

निष्कर्ष
प्रकल्पांची निवड

प्रकल्पासंबंधी माहिती संकलन

प्रकल्प राबविण्याचे नियोजन / वेळापत्रक

प्रकल्प कार्यवाही

पथदर्शी अभ्यास

प्रत्याभरण सुधारणा

प्रत्यक्ष प्रकल्प कार्यवाही

जनसंख्या

3.5 संशोधनाची कार्यवाही नमुना

समानगट अभिकल्प (प्रायोगिक गट व नियंत्रित गट)

पूर्वतयारी

कार्यक्रम अंमलबजावणी ( प्रायोगिक गट )

उत्तर चाचणी निष्कर्ष

माहिती वर्गीकरण, विश्लेषण व अर्थनिर्वचन

निष्कर्ष

शिफारशी
3.6 पथदर्शक अभ्यास

पथदर्शक अभ्यासामुळे मुख्य संशोधन कार्यवाही सुरु करण्यापूर्वीच्या आपल्या चुका, त्रुटी, उणीवा दूर करण्याची संधी मिळते. पथदर्शक अभ्यास
करण्यासाठी शास्त्रीय व पद्धतशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते. संशोधनातील निरनिराळ्या बाबींबद्द्लच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संशोधकाला
पथदर्शक अभ्यास करणे गरजेचे वाटले.
3.7 पथदर्शक अभ्यासाचे हेतू
1) संशोधनासाठी तयार के लेल्या प्रकल्पांच्या उपक्रमांची सप्रमाणता पडताळणे.
2) प्रत्यक्ष संशोधनासाठी प्रकल्पाच्या कार्यवाहीतील घटकांचे निश्चीतीकरण करणे.
3.8 जनसंख्या व नमुना
प्रस्तुत संशोधनात जनसंख्या खालीलप्रमाणे आहे.

तालुका जि. प. प्राथ. शाळा एकू ण विद्यार्थी संख्या इयत्ता पाचवी विद्यार्थी संख्या

निफाड 355 26372 1898

3.9 नमुना :
प्रस्तुत संशोधनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी येथील इ. पाचवीच्या वर्गातील 60 विद्यार्थ्यांची नमुना म्हणून निवड के लेली आहे.
3.10 प्रस्तुत संशोधनात निवडलेली न्यादर्श पद्धती
प्रस्तुत संशोधनात निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिक्षी येथील इ. पाचवीच्या वर्गातील 60 विद्यार्थ्यांची नमुना म्हणून निवड
करण्यात आली आहे.
सदर नमुना निवड सहेतुक पद्धतीने करण्यात आली आहे.
3.11 चले ( variables )
शैक्षणिक प्रक्रियेच्या व्यवस्थापनावर व निरीक्षणावर परिणाम करणारा एखादा घटक म्हणजे चल होय.
प्रस्तुत संशोधनात :
•प्रकल्प पद्धतीने अध्यापन – स्वाश्रयी चल आहे.
•विज्ञान विषयाचे प्रभावी अध्यापन – आश्रयी चल आहे.
3.12 प्रस्तुत संशोधनाची निवडलेली साधने :
प्रस्तुत संशोधनात आपल्या संशोधन कार्यासाठी संशोधकाने पुढील साधने निवडलेली आहे.
1) निरीक्षण नोंदी
2) चाचणी
3) मुलाखत तंत्र
3.13 माहीती विश्लेषण व अर्थनिर्वाचनासाठी वापरलेली तंत्रे
प्रस्तुत संशोधनात वापरलेली माहीती विश्लेषणाची तंत्रे :
1) सारणीकरण / कोष्टकीकरण
2) वर्गीकरण
3) आलेख
4) शेकडेवारी
5) संख्याशास्त्रीय परिमाणे
a) मध्यमान
b) प्रमाणविचलन
c) ‘t’ मुल्यांक
3.14 संदर्भग्रंथ सूची
संदर्भग्रंथ सूची
• मुळे, रा. शं. आणि उमाठे वि. तु. (1987) शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे, नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
• भिंताडे, वि. रा. (1994) शैक्षणिक संशोधन पद्धती पुणे. नूतन प्रकाशन.
• कायंदे, पाटील ग. (2008) शैक्षणिक संशोधनाची ओळख आवृत्ती पहीली, नाशिक : इनसाईट पब्लीके शन
• बापट, भा. गो. (1988) शैक्षणिक संशोधन : पुणे नूतन प्रकाशन.
• बन्सी, बी. पंडित (1995) शैक्षणिक कृ ती संशोधन : पुणे नूतन प्रकाशन.
 
 
4.1. पूर्वचाचणी व उत्तर चाचणी यांची तुलना करून कोष्टकीकरण के ले आहे. प्रायोगिक गट व नियंत्रित
गट यांच्या संपादनात दिसून आलेला फरक

अभ्यास गट नमुना पूर्व प्रशिक्षण ‘t’ मूल्य उत्तर प्रशिक्षण ‘t’ मूल्य
संख्या माध्यमान प्रमाण विचलन माध्यमान प्रमाण विचलन

प्रायोगिक गट 30 9.73 1.79 18.26 3.34


1.70 21.15
नियंत्रित गट 30 9.2 1.70 9.8 1.80

N1 = 30 N1 = 30

M1 = 9.73 N1 = 30
4.2 अर्थनिर्वचन
प्रायोगिक व नियंत्रित गटांच्या पूर्व परिक्षणाच्या मध्यमानातील फरक 0.53 (9.73 - 9.2) असून त्यांचे ‘t’ गुणोत्तर 1.70 आहे.
प्राप्त ‘t’ मूल्य हे 0.05 सार्थकता स्तरावर मात्रा df (58) करिता असलेल्या सारणीतील निर्धारित ‘t’ मूल्यापेक्षा जास्त आहे.
दोन्ही गटाच्या उत्तर परिक्षणाच्या मध्यमानातील फरक 8.46 गुणांचा असून प्राप्त ‘t’ मूल्य 21.15 आहे. प्राप्त ‘t’ मूल्य 21.15 हे 0.05
स्तरावर स्वाधीनतामात्रा 58 करिता असलेल्या निर्धारित ‘t’ मूल्यापेक्षा (2.003) जास्त असल्याने सार्थक आहे.
याचा अर्थ असा की, विज्ञान विषयात प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास खरोखर परिणामकारक होते. संशोधन परीकल्पनेचा स्वीकार के लेला
आहे.
4.3.मुलाखतीस प्रतिसाद देणाऱ्या तज्ञांचे कोष्टक

कोष्टक क्रमांक - 2

मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक पर्यवेक्षीय अधिकारी एकू ण


1 2 2 1 6
4.4 तज्ज्ञांच्या मुलाखतीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन
मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक विज्ञान शिक्षक, विस्ताराधिकारी शिक्षण, माध्यमिक विद्यालय विज्ञान शिक्षक, यांच्या मुलाखतीद्वारे
मिळालेल्या माहीतीचे अर्थनिर्वचन
1) विज्ञान विषय हा प्रात्यक्षिक कार्याचा विषय आहे.
2) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे.
3) विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमतांना संधी देण्यासाठी विज्ञान विषयाचा प्रामुख्याने उपयोग के ला पाहिजे.
4) सत्यता पडताळून पाहण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण के ली पाहिजे.
5) विज्ञान विषयातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न के ले पाहिजे.
6) पारंपरिक पद्धतीने विज्ञान शिकवण्यापेक्षा प्रकल्प पद्धतीने विज्ञान विषय शिकवलाच पाहिजे. असे एकं दरीत तज्ज्ञांच्या मुलाखतीवरून जाणवले.
7) विज्ञान विषयात प्रकल्प पद्धतीचा अवलंब के ल्याने विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या समस्या किं वा पाठ्यघटक कायमस्वरूपी लक्षात राहतो.
8) प्रकल्प पद्धतीमुळे संधी मिळते, संशोधन वृत्ती, जिज्ञासा, चिकित्सकपणा यांचा विकास होतो.
9) विद्यार्थ्यांना मी काहीतरी करू शकतो ही भावना निर्माण होते.
10) समूहात काम के ल्याने परस्पर सहकार्य वृत्तीचा विकास होतो
4.5 अवलोकने / प्रकल्पाच्या वेळचे निरीक्षणे
संशोधकाला प्रस्तुत संशोधनात आढळून आलेली अवलोकने खालीलप्रमाणे मांडलेले आहेत.
1) विज्ञान विषयात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीचा वापर होतो असल्याचे लक्षात आले.
2) विज्ञान विषयक प्रकल्प, उपक्रम, कृ ती, यासारख्या नवनवीन पद्धतींचा उपयोग करून अध्यापन के ले तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळतो. कठीण
वाटणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजतात. प्रकल्प उपक्रम, कृ ती यामध्ये विद्यार्थी स्वतःहून सहभागी होतात.
3) विज्ञान विषयाचे अध्यापन करताना प्रकल्प पद्धतीचा अवलंब के ला तर अध्यापन परिणामकारक व प्रभावी होते.
4) विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या जिज्ञासा, सर्जनाशील, चिकित्सक वृत्ती यांचा विकास होतो.
5) वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.
4.6 परिकल्पनेचे परिक्षण (स्वीकार/त्याग)
‘t’ सारणीत 58 स्वाधीनमात्राच्या ओळीत (40 व 60 मध्ये) 0.05 सार्थकता स्तंभात 2.660 आहे. संशोधकाने के लेल्या
तुलनात्मक अभ्यासाचे ‘t’ गुणोत्तर 0.01 सार्थकता स्तरापेक्षा जास्त आहे. याठिकाणी धन परिकल्पनेचा स्वीकार करावा लागेल, व शुन्य
परिकल्पनेचा त्याग करावा लागेल.

4.7 निष्कर्ष
1) संशोधनासाठी प्रकल्प कार्यपुस्तिका तयार करण्यात आली होती, ती निश्चितपणे फायदेशीर ठरली.
2) संशोधनासाठी घेण्यात आलेल्या पूर्वचाचणी मधील गुणांपेक्षा उत्तर चाचणीतील गुण वाढल्याचे आढळते.
3) पूर्व परिक्षणातील संशोधकांने के लेल्या संशोधनात तुलनात्मक अभ्यासाचे ‘t’ गुणोत्तर 0.01 सार्थकता स्तरापेक्षा आहे.
4) उत्तर परीक्षणातील प्राप्त ‘t’ मूल्य 21.15 असून ते कोष्टक मूल्य 1.70 पेक्षा अधिक असल्याने ते 0.01 या पातळीवर लक्षणीय आहे. तसेच
पूर्वचाचणी मध्यमान व उत्तर चाचणीमध्ये यातील लक्षणीय फरक असे दर्शवतो की, प्रयोगाचा /प्रकल्पाचा परिणाम दिसून आलेला आहे.
4.8 परिकल्पनांची पडताळणी

विज्ञान विषयात प्रकल्प पद्धतीने अध्यापन संपादनात लक्षणीय वाढ होते. सदर परिकल्पना स्वीकारण्यात आली. संशोधनासाठी द्विगट अभिकल्प
निवडण्यात आला होता. त्यामध्ये दोन्ही गटांची पूर्वचाचणी घेतली, त्यानंतर नियंत्रित गटाला पारंपरिक व प्रायोगिक गटाला प्रकल्प पद्धतीने अध्यापन
के ले. पुन्हा त्यांची उत्तर चाचणी घेण्यात आली. नियंत्रित गटापेक्षा प्रायोगिक गटाला उत्तर चाचणीत अधिक गुण मिळाले. यावरून विज्ञान विषयात
प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास अध्यापनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

4.9 तज्ज्ञांच्या मुलाखतीचे निष्कर्ष


•विज्ञान विषयात प्रामुख्याने प्रकल्प पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.
•प्रयोग, उपक्रम, कृ ती, हा भाग प्रात्यक्षिक कार्याचा असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला पाहिजे.
•विज्ञान विषय पारंपरिक पद्धतीने शिकविण्यापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करावे.
•अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर अधिक करावा.
4.10 संदर्भ ग्रंथ सूची
संदर्भ ग्रंथ सूची
• चव्हाण, संजीवनी महाले, व पाटील सु. (2003), माहीती संप्रेषण तंत्रज्ञान आणि शैक्षणिक मूल्यमापन, नाशिक : इनसाईट प्रकाशन
• मुळे, रा. शं. आणि उमाठे वि. तु. (1987) शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे, नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
• डॉ. अनंत जोशी, कर्डिले, वर्तक, डॉ. संजीवनी महाले (2010) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.
• महाले, (2003) संशोधनात सांख्यिकी तंत्राचे उपयोजन : प्रात्यक्षिक कार्यपुस्तिका, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.
• दांडेकर वा.ना. (1997) शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र, पुणे : श्री विद्या प्रसाद प्रकाशन.
 
5.1 उद्दिष्टे निहाय निष्कर्ष :
उद्दिष्टे क्रमांक – 1
इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प पद्धतीच्या आशयाची निश्चिती करणे.
निष्कर्ष :
१) विद्यार्थ्यांना प्रकल्प पद्धतीने अध्यापन करण्यासाठी कठीण वाटणारे पाठ्यांश तज्ज्ञांच्या प्रतिसादावरून निश्चित करण्यात आले हे आशय पुढील
प्रमाणे आहेत.
• मानवी पचन संस्था
• भारतीय अंतराळवीर
• विषारी सापांची माहिती
• मानवी मेंदूची रचना
• मानवी श्वसन संस्था
• औषधी वनस्पती
• मानवाची आंतरइंद्रिये
• भारतातील शास्त्रज्ञ
• हवा प्रदूषण
• अन्न पदार्थांची माहिती
२) प्रकल्प पद्धतीने अध्यापन करण्यासाठी आशय निश्चिती करतांना तज्ज्ञांच्या प्रतिसादावरून पुढील निकष लावण्यात आले.
पारंपारिक पद्धतीने अध्यापन के ल्यास आशयाचे अध्यापन दर्जेदार किं वा परिणामकारक होत नाही.
पारंपारिक पद्धतीने अध्यापन के ल्यास विद्यार्थी प्रतिसाद देत नाही
पारंपारिक अध्यापन पद्धतीमुळे अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया एकमार्गी होते. असे अनुभवाने जाणवले. त्यानुसार आशयाची निश्चिती के ली.
उद्दिष्टे क्रमांक – 2
विज्ञान आशयाचा अध्यापनाची निश्चिती के लेल्या प्रकल्पाची निर्मिती करणे.
निष्कर्ष :
प्रत्यक्ष अध्यापनासाठी SCERT च्या प्रकल्प विषयक शिक्षक हस्तपुस्तिका वा तज्ज्ञांच्या प्रतिसादावरून प्रकल्पाचा आशय निश्चित करण्यात
आला.
प्रकल्प निर्मिती करतांना साधारणपणे पुढील मुद्दे विचारात घेतले.
• उद्देश
• साहित्य
• कृ ती
• निष्कर्ष
3) प्रकल्प निर्मितीच्या पूर्वतयारीत पुढील कृ तींचे नियोजन के ले.

•विद्यार्थी व शिक्षक प्रकल्प करण्या संबंधी नियोजन करतात. उदा. साहित्याची जमवाजमव/ जुळवणी, संदर्भस्त्रोत – यामध्ये इंटरनेट , संदर्भ
पुस्तके , इ.
•प्रकल्पातील जो पाठ्यांश निवडला आहे त्याची व्यापकता लक्षात घेऊन कामकाज करतात.
•प्रकल्प निर्मिती करत असतांना त्यांचा इतर विषयांशी किं वा इतर घटकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात.
•दर्जेदार प्रकल्प करण्यासाठी सखोल माहिती व मार्गदर्शन मिळवितात.
4) प्रकल्प पद्धतीने अध्यापन करण्यासाठी व प्रत्यक्ष प्रकल्प कार्यवाहीसाठी प्रकल्पाच्या पायऱ्या यांचा अवलंब के ला. त्या प्रकल्पाच्या पायऱ्या
पुढील प्रमाणे.
•प्रकल्पाचे शीर्षक
•हेतू
•उद्देश
•साहित्य
•व्याप्ती
•प्रत्यक्ष कृ ती
•निष्कर्ष
•यशस्विता
उद्दिष्टे क्रमांक – 3
प्रकल्प पद्धतीची परिणामकारकता तपासणे/अभ्यासणे.
निष्कर्ष :
• प्रायोगिक व नियंत्रित गटांच्या पूर्व परिक्षणाच्या मध्यमानातील फरक 0.53 (9.73 - 9.2) असून त्यांचे ‘t’ गुणोत्तर 1.70 आहे.
• प्राप्त ‘t’ मूल्य हे 0.05 सार्थकता स्तरावर मात्रा df (58) करिता असलेल्या सारणीतील निर्धारित ‘t’ मूल्यापेक्षा जास्त आहे.
• दोन्ही गटाच्या उत्तर परिक्षणाच्या मध्यमानातील फरक 8.46 गुणांचा असून प्राप्त ‘t’ मूल्य 21.15 आहे. प्राप्त ‘t’ मूल्य 21.15 हे
0.05 स्तरावर स्वाधीनतामात्रा 58 करिता असलेल्या निर्धारित ‘t’ मूल्यापेक्षा (2.003) जास्त असल्याने सार्थक आहे.
• याचा अर्थ असा की, विज्ञान विषयात प्रकल्प पद्धतीने अध्यापन के ल्यास खरोखर परिणामकारक होते. संशोधन परीकल्पनेचा स्वीकार के लेला
आहे. हे आपणास खालील आलेखावरून समजते.
 
5.2 शिक्षक / मुख्याध्यापक शिफारशी
1) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक साहीत्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.
2) विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रयोग, उपक्रम यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा असाव्यात.
3) स्वतंत्र विज्ञान विषयाचे प्रशिक्षित शिक्षक असावे.
4) दर्जेदार साहीत्यांनी युक्त विज्ञान प्रयोगशाळा असाव्यात.
5) विज्ञान प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी जावे, स्वतः प्रयोग करावेत, साहीत्याची मांडणी करावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी
प्रोत्साहन द्यावे.
6) विज्ञान प्रयोगशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर के लेला असावा.
7) विद्यार्थी व शिक्षक यांच्यात नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याची आवड निर्माण करावी.
8) विज्ञान विषयात अधिक प्रमाणात संगणकाचा वापर होईल याकडे अधिक लक्ष द्यावे.
5.3 पुढील संशोधनासाठी विषय

1) इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना भूगोल विषयाच्या अध्यापनासाठी संगणक साहीत्याचा वापर करून त्यांची परिणामकारता अभ्यासणे.
2) राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, सविधान यांसारख्या राष्ट्र भक्तीवर घटनांमधून राष्ट्र मूल्य विकास होईल यासाठी विविध उपक्रमांची निर्मिती करून त्यांची
परिणामकारकता अभ्यासणे.
3) गणित विषयातील विविध संज्ञा व सूत्रे यांच्या विकासासाठी उपक्रमांची निर्मिती करून त्यांची परिणामकारकता अभ्यासणे.
4) सुदृढ आरोग्य संवर्धन यासाठी मुले व मुली यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे चर्चासत्र, मार्गदर्शन व शिबिरे यांची उपयुक्तता तपासणे.
5) लिंग समभाव हा दृष्टिकोन विकसित करून त्यांची उपयुक्तता तपासणे
5.4 इंग्रजी संदर्भग्रंथ सूची
1) Agrwal, J.C. (1974), Educational Research: An Introduction New Delhi: Arya
Book Depot Second Edition.
2) Best, John W. and Kahn James V. (2000), Research in Education (7th Edition) New
Dehli: Prentice Hall of India Pvt. Ltd.
3) Best, John W. and Kahn James V. (2008), Research in Education (10th Edition)
New Dehli: Prentice Hall of India Pvt. Ltd.
4) Buch, M.B. (Ed.) (1974), a Survey of Research in Education, Baroda: Centre of
Advance Study in Education.
5) Buch, M.B. (Ed.) (2000), Fifth Survey of Research in Education, New Delhi:
Natinal Council of Education Research and training.
6) Goyal J.C. and Duggal Janak (1990), Research Process in Class room Report of
Experiment and Project (Vol.3), New Delhi : Secretary
7) Hans Raj (2002), Theory and Pratice in Social Research, New Delhi, Surjeet
Publications.
5.5 मराठी संदर्भग्रंथ सूची
1) कदम, बोंदार्डे (फे ब्रुवारी 1998), शास्त्र आशययुक्त अध्यापन पद्धती, पुणे: नूतन प्रकाशन.
2) कायंदे पाटील ग. (2009), शैक्षणिक संशोधन पद्धती, नाशिक : चैतन्य प्रकाशन.
3) चव्हाण किशोर, महाले संजीवनी, व पाटील सु. (2003), माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि शैक्षणिक मूल्यमापन, नाशिक : इनसाईट प्रकाशन.
4) चव्हाण, किशोर (2008), माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, नाशिक : इनसाईट प्रकाशन.
5) चव्हाण, दिपक व मुळे, सं. (2010), शैक्षणिक संशोधन आराखडा, नाशिक : इनसाईट प्रकाशन.
6) चव्हाण, किशोर व चव्हाण, दिपक (सप्टेंबर 2008), विज्ञान शिक्षण, नाशिक : इनसाईट पब्लिके शन्स.
7) चित्ते, हेमंत (नोव्हेंबर 2015), संशोधन मांडणी व दिशा, नाशिक : सात्विक प्रकाशन.
8) दांडेकर, वा. ना. (1997), शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र, पुणे: श्री विद्या प्रकाशन.
9) बापट, भा.गो. (1988), शैक्षणिक संशोधन, पुणे नूतन प्रकाशन.
10) बोरसे, चंद्रकांत (जुलै 2004), विज्ञान आशययुक्त अध्यापन पद्धती आणि अध्यापनशास्त्रीय विश्लेषण, नाशिक : नेहा प्रकाशन.
11) भिंताडे, वि.रा. (1994), शैक्षणिक संशोधन पद्धती, पुणे नूतन प्रकाश.
12) महाले, संजीवनी (2003), संशोधनात सांख्यिकी तंत्राचे उपायोजन : प्रात्यक्षिक कार्य पुस्तिका, नाशिक : यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रकाशन.
13) मुळे, रा. शं.,व उमाठे (1987), संशोधनाची मूलतत्वे, नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ.
14) मुळे, संदीप (2011), शैक्षणिक संशोधनाची ओळख, नाशिक : इनसाईट पब्लिके शन्स.
15) मासाळे, सिद्धाराम (जानेवारी 2011), उपक्रमशिलतेकडू न कृ तीसंशोधनाकडे, सोलापूर : अभिषेक प्रकाशन.
16) रायगोंडा, सिद्धाराम व मासाळे (2010), शैक्षणिक नवोपक्रम, सोलापुर :अभिषेक प्रकाशन.
17) विहारी पं. ब. (1995), शैक्षणिक कृ ती संशोधन, पुणे : नूतन प्रकाशन.
18) हकिम, पद्माकर (ऑगस्ट 2007), विज्ञानाचे आशयनुरूप अध्यापन, पुणे : नित्य नूतन प्रकाशन.
हस्तपुस्तिका / मार्गदर्शिका
1) इयत्ता पाचवीचे विज्ञान क्रमिक पाठ्यपुस्तक (2015), महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे.
2) दिशा नवोपक्रमाची, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.
3) प्रचलित मूल्यमापन पद्धतीमधील प्रकल्प विषय मार्गदर्शक पुस्तिका- भाग 1 व 2, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.
4) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.

वेबसाईट
5) www.vidnyan.net/science-books/64-general-science

6) https://mr.wikipedia.org/wiki/विज्ञान

7) https://www.mpscworld.combooks/fifth-standard-books-marathi/

You might also like