Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 14

जपानी व्यवस्थापन पद्धती

PRESENTED BY:
GAUSPAK ISMAIL KARJALKAR
ROLL NO.:-9873 DIV:- T
CLASS:- B.COM.3
जपानी व्यवस्थापन पद्धती

जपान व्यवस्थापन पद्धतीचा इतिहास हा २० व्या शतकातील आहे. जपानी


व्यवस्थापन तंत्र १९०५ पासून उत्क्रांत झालेले आढळून येते. १९३० पर्यंत औद्योगिक उत्पादन दुपटीने
वाढवून त्या तंत्राचे यश सिध्द के ले. दुसऱ्या महायुद्धानंतर या जपानी व्यवस्थापन पद्धतीची खरी कसोटी
लागली. युध्दोत्तर परिस्थितीचे आव्हान स्वीकारून जपानी व्यवस्थापन पद्धतीने आपले यश निविर्वादपणे
सिध्द के ले. एके काळी दुसऱ्या महायुद्धामुळे उद्वध्वस्त व पूर्णपणे रसातळास गेलेली जपानी अर्थव्यवस्था
जगातील सर्व प्र‌गत देशाच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू न पहिल्या क्रमांकाला पोहोचली आहे. आज जपान
हा देश आर्थिक महासत्ता म्हणून समजला जातो. याचे सर्व श्रेय जपानच्या व्यवस्थापन तंत्रास व पद्धतीस
दिले जाते.
जपानी व्यवस्थापन: महत्त्वाच्या पद्धती / तंत्रे

जपानी व्यवस्थापन पद्धतीमध्ये अनेक व्यवहार पद्धतीचा व तंत्रांचा अवलंब के ला जातो.त्यातील पुढील
पद्धतीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये के ला आहे.
१)फाईव्ह-एस पद्धती (5-S System)
२)कायझेन पद्धती (Kaizen System)
३)पोका-योके पद्धती (Poka-Yoke System)
४)शून्यदोष पद्धती (Zero Defects)
५)अपव्यय कपात पद्धती (Waste Reduction)
या पद्धतींबाबत अधिक तपशीलवार विवेचन पुढीलप्रमाणे.
फाईव्ह-एस पद्धती

संकल्पना:-
जपानी व्यवस्थापन पद्धतीमध्ये नव्या तंत्रांचा वापर संज्ञांचा शोध घेतला जातो. वस्तुतः कायदेशीर
तंत्रामध्येच या फाईव्ह-एस तंत्राचा अंतर्भाव के ला जातो. फाईव्ह-एस पद्धती ही सर्वप्र‌थम जपानमध्ये विकसित झाली.
ताकाशी ओसाड व हिरोयाकी हीरानो या विचारवंतांनी ही पद्धती अधिक विकसित करून तिला शास्त्रशुद्ध स्वरूप
दिले.
अर्थ:-
“फाईव्ह-एस पद्धती ही एक पद्धतशीर प्रक्रिया होय. ज्यामध्ये कार्यस्थळांची कार्यक्षमता व परिणामकारकता
वाढविण्यासाठी जपानी पाच शब्दांचा वापर करण्यात येतो.”
फाईव्ह-एसची सूक्ष्मपातळी तंत्रे

 वर्गीकरण (Sort)
 पद्धतशीर मांडणी (Systematic Arrangement)
 स्वच्छता (Shine- cleaning)
 प्र‌माणीकरण (Standardise)
 राखणे (Sustain)
कायझेन पद्धती

प्र‌स्ताविक:-
१९५१ मध्ये वापरात आलेली कायझेन ही १९८५ पर्यंत फारशी प्र‌सिद्ध झाली नाही.पण १९८६
मध्ये मसाकी इमाई या जपानी लेखकाच्या ‘The Key to Japan’s Competitive Success’
या पुस्तकामुळे कायझेन ही व्यवस्थापन पद्धती प्र‌सिद्धीस आली.
अर्थ:-
“कायझेन म्हणजे कं पनीसाठी आर्थिक फलिते साध्य व्हावीत म्हणून लहान- लहान उपायांद्वारे
सातत्याने सुधारणा करण्याची पद्धत होय.”
कायझेनची सूक्ष्म पातळीवरील तंत्रे

 लहान प्रश्न विचारणे (Ask Small Questions)


 लहान विचार (Small Thoughts)
 लहान कृ ती (Tacking Small Actions)
 लहान प्रश्नांची सोडवणूक (Solving Small Problems)
 लहान बक्षिसे (Imparting Small Rewards)
 लहान घटना (Small Movements)
पोका-योके (चुका-उच्चाटन) पद्धती

प्र‌स्ताविक:-
उत्पादन प्रक्रियेतील संभाव्य चुका अथवा दोष शोधून त्या घडण्यापूर्वी त्यांचे उच्चाटन करणे, ही
जपानी व्यवस्थापनाची नवी संकल्पना १९६१ च्या सुमारास मांडण्यात आली. शिगेओ शिंगो या टोयाटो
मोटार कं पनीतील औद्योगिक इंजिनिअरने सर्वप्रथम ही चुका-उच्चाटन संकल्पना मांडली.
अर्थ:-
“पोका-योके ही सुधार कार्यपद्धती असून उत्पादन प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या संभाव्य चुका अथवा दोष
टाळण्याच्या अथवा उच्चाटनाच्या हेतूने अनुसरली जाते.”
पोका-योके ची सूक्ष्म पातळीवरील तंत्रे

अ) प्रतिबंधात्मक तंत्रे (Preventive Techniques)


१) नियंत्रण पद्धती (Control Method)
२) सूचना पद्धती (Warning Method)
ब) शोधात्मक पद्धती (Detection-based Methods)
१) संपर्क पद्धती (Contact Method)
२) स्थिर मूल्य पद्धती (Fixed Value Method)
३) हालचाल टप्पा पद्धती (Motion Step Method)
शून्यदोष पद्धती

प्रस्ताविक:-
शून्यदोष पद्धती ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिके त मांडण्यात आली व नंतर तिचा विकास व
अवलंब हा जपानमध्ये व्यापक प्रमाणात झाला आहे. अमेरिके त गुणवत्ता तज्ज्ञ फिलीप क्रासबी यांनी
१९६४ मध्ये ही संकल्पना मांडली.
अर्थ:-
“उत्पादन प्रक्रियेतील दोष व चुका दूर करणे व कमीतकमी ठेवणे या उद्देशाने अनुसरली जाणारी
एक व्यवसाय पद्धती म्हणजे शून्यदोष पद्धती होय.”
शून्यदोषाची सूक्ष्म पातळीवरील तंत्रे

 सांख्यिकी गुण नियंत्रण (Statistical Quality Control)


 तपासणी तंत्र (Inspection Techniques)
 स्व- तपासणी (Self-Check Technique)
 कच्चा मालाचे गुण नियंत्रण
 फाईव्ह-एस तंत्रे
 दोष उच्चाटन तंत्रे
अपव्यय कपात पद्धती

प्रस्ताविक:-
अपव्यय कपात पद्धती हे लीन व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे तंत्र होय. बेंजामिन फ्रॅ कलिन यांनी
सर्वप्रथम अपव्यय कपातीची संकल्पना मांडली होती. या पद्धतीचे फलिते व यश पाहता ती जपानी
व्यवस्थापनाची एक महत्त्वपूर्ण पद्धती म्हणून संबोधण्यात आली.
अर्थ:-
“उत्पादन प्रक्रियेतील अपव्ययाचे उच्चाटन करणारी एक पद्धतशीर पद्धती म्हणजे अपव्यय कपात
पद्धती होय.”
अपव्यय कपातीची तंत्रे

 कानबान (Kanban)
 जस्ट इन टाईम (Just in Time)
 जीडोका (Jidoka)
 प्रक्रिया रेखांकन (Process Mapping)
 हाताळणी यंत्रणा (Handing Mechanism)
 लीन प्र‌शिक्षण (Lean Training)

You might also like