Kati Basti

You might also like

Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 11

कटिबस्ति

सौमित्र अभिजित जोशी 


चतुर्थ वर्ष आयुर्वेदाचार्य
परिचय 
• कटिभागी (Lumbo-sacral region)
तैलाच्या सहाय्याने स्वेद देण्याची क्रिया कटिबस्ति
होय.
• पंचकर्मातील अतिशय लोकप्रिय स्वेदनाची क्रिया. 
•  वसती वासन म्हणजे काही काळ 'वास'
(Retain) करणे या अर्थाने 'बस्ति' हा शब्द
प्रयोग के ला गेला असावा.
• हा स्निग्ध प्रकाराचा स्वेद आहे.
कटिबस्ति साठी योग्य व्याधी

A. कटिगतवात - Painful condition in lumbar region


1. Lumber spondylitis
2. Ankylosing spondylosis
3. Sacroiliitis
4. Spondylolisthesis
5. Disc bulging or prolapsed
6. Lumbosacral muscle spasm
7. Lumber canal stenosis

B.     गृध्रसी (Sciatica)


कटिबस्तिसाठी 
उपयुक्त तैलः

1. विषगर्भ तैल - कफानुबंध


2. सहचरादि तैल - कफानुबंध
3. धान्वन्तरम् तैल
4. बला तैल - वातज 
5. प्रसारणी तैल
6. क्षीरबला तैल - Degenerative disease
(1) द्रोणी -1 
(2) उडीद पीठ - 500 gm
(3) आवश्यक तैल - 200 - 300 ml
संभार संग्रह (4) पातेले
(5) चमचा
• पूर्वकर्म :
(1) पाळी तयार करणे - 
I. सर्व प्रथम उडीदाचे पीठ चाळणीने गाळून आवश्यकतेनुसार त्यात पाणी  घालावे व मळून घ्यावे. 
II. त्यानंतर थोडं उडीदाच्या पीठाची पिष्टी बाजूला ठेवून उरलेल्या सर्व पीठाची गोलाकार रिंगण / पाळी (Rim) तयार करावी.
III.  याचा आकार रुग्णांच्या कटिवर सुखकर बसेल असा असावा. 
(2) रुग्ण सिध्दता –
IV. रुग्णास मल-मूत्र विसर्जनानंतर नितंबभागापर्यंत निर्वस्त्र करून द्रोणीमध्ये पालथे झोपण्यास सांगावे. 
V. वरील तयार के लेली पाळी रुग्णाच्या कटिभागावर ठेवून त्यास उरलेल्या उडीदाच्या पिष्टीने त्वचा व पाळी यातील पोकळी बंद करून घ्यावी
ज्यामुळे पाळीतील तैल बाहेर पडणार नाही. 
(3) तैल कोष्ण करणे –
एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यावे, त्यामध्ये एका लहान पात्रात तैल घेवून कोष्ण करण्यास ठेवावे. तैलाचे सामान्यता तापमान 45 ते
50° C एवढे असावे.
• प्रधानकर्म :
1. सहाय्यकाने पाळीमध्ये आपले बोट घालून त्यावर चमच्याने कोष्ण तैल हळूहळू सोडावे. रुग्णास सहन होईल असे तैलाचे
तापमान असावे याची काळजी घ्यावी.
2. दरम्यानच्या काळात सहाय्यकाने तैलामध्ये अंगठा हळुहळू फिरवावा व रुग्णाच्या कटिभागी अल्पदाबाने मर्दन करावे.
यामुळे तैलाचे तापमान एक सारखे राहील व स्थानिक मर्दनाने रूजा शांत होईल.
3. ही क्रिया होत असतांना तैलाचे तापमान कमी झाल्यास चमच्याच्या सहाय्याने तैल बाहेर काढावे व पुन्हा नवीन कोष्ण
तैल पाळीमध्ये घालावे. हा क्रम चालू ठेवावा. तैल बदलण्याच्या काळात वेळ जाऊ देऊ नये. सुमारे अर्ध्या तासानंतर
तैल बाहेर काढू न पाळी देखील काढू न घ्यावी.
4. दर 3 दिवसानंतर नवीन तैल घ्यावे पिझिचिल प्रमाणे 7 व्या दिवशी तिसऱ्या दिवसाचा व सहाव्या दिवसाचे उरलेले तैल
घ्यावे.
• सामान्य तापमान 45 ते 50° C
• कालावधी - 30 - 45 मिनिटे, 7 ते 14 दिवस
• पश्चातकर्म :
1. अभ्यंग - पाळी काढू न घेतल्यानंतर कटिभागी लागलेल्या तैलाच्या सहाय्याने हलक्या दाबाने अभ्यंग करावे.
2. स्वेदन - अभ्यंगानंतर टॉवेल गरम पाण्यातून पिळून त्याद्वारे कटिप्रदेशी स्वेद करावे.
3. स्नान - स्वेदनानंतर 15 मिनिटे रुग्णास उताणा (supine ) अवस्थेत झोपण्यास सांगावे व नंतर - हरभरा
डाळीचे पीठ कटिप्रदेशी लावून कोष्ण जलाने स्नान करण्यास सांगावे.
• घ्यावयाची काळजी -
1.  क्रिया करतांना रुग्णास पालथ्या स्थितीमुळे शूल वाढल्यास
तात्काळ क्रिया थांबवावी.
2.  तैल बदलण्याचा काळ अधिक नसावा.
3.  तैलाचे तापमान रुग्णास सुखकर असावे.

• उपद्रव व चिकित्सा -
दग्ध - घृतकु मारी, शतधौत घृत - स्थानिक
धन्यवाद !!! ....

You might also like