Presentation

You might also like

Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 8

ज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण

प्रसार
शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे

श्री तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युके शन तुळजापूर


नाव- शिंदे अपर्णा ज्ञानदेव
डी.एल.एड. प्रथम वर्ष
विषय - अभ्यासक्रम,अध्ययन अध्यापन शास्त्र व मूल्यमापन
घटक - अभ्यासक्रम विकसन.
उपघटक- अभ्यासक्रमाचा अर्थ व स्वरूप
१) अभ्यासक्रमाचा अर्थ, स्वरूप, अभ्यासक्रम विकसनाची व्याख्या, मूलभूत तत्वे आणि व्याप्ती

‘अभ्यासक्रम’ ही संकल्पना सर्वप्रथम सन १८२० मध्ये स्कॉटलंड येथे उदयास आली. त्यानंतर अमेरिके त ही संकल्पना आधुनिक स्वरूपात वापरली गेली. अभ्यासक्रमाला इंग्रजी
भाषेमध्ये ‘CURRICULUM’ म्हणतात. ‘CURRICULUM’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘CURRERE’ या शब्दापासून बनला आहे. या शब्दाचा अर्थ इंग्रजी भाषेत ‘TO RUN’ असा
होतो. मराठीमध्ये या संकल्पनेला ‘धावण्याचा पथ’ असे म्हणता येईल. पारंपरिक अर्थाने अभ्यासक्रम म्हणजे एखादी निर्मिती अथवा शैक्षणिक उद्देश साध्य करण्यासाठी एखाद्या शिक्षणक्रमाचा
(COURSE)
अथवा प्रशिक्षणाचा (TRAINING) करावयाचा अभ्यास होय. प्रचलित अर्थाने शिक्षणक्रमाची संपूर्ण माहिती देणाऱ्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकाला अभ्यासक्रम संबोधले जाते.
अभ्यासक्रमाच्या विविध व्याख्यांवर एक दृष्टिक्षेप टाकला असता, आपणास अभ्यासक्रमाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती लक्षात येते. कालानुक्रमे अभ्यासक्रम संकल्पनेचा विचार कसा बदलत गेला हेही आपल्या लक्षात
येते
.येथे अभ्यासक्रमाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. बॉबीट BOBBIT (१९१८) अभ्यासक्रम ही अशा गोष्टींची मालिका आहे की, ज्यात बालकांनी व तरुणांनी त्या गोष्टी प्रत्यक्ष करून त्यातून अनुभव घ्यावेत आणि तसेच प्रौढ आयुष्य समृद्ध करण्यासाठी
लागणाऱ्या सर्व पात्रता बालकांमध्ये व तरुणांमध्ये निर्माण करणारी ही शैक्षणिक प्रक्रिया आहे.
२. रॉबर्ट हचिंस ROBERT HUTCHINS (१९३६) ज्यामध्ये व्याकरणाचे नियम, वाचन, लेखन, तर्क , साहित्य व गणित (प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी) पाश्चिमात्य जगातील महान ग्रंथांची ओळख
माध्यमिक शिक्षणाच्या सुरुवातीलाच करून दिली जाते. अशा सर्व बाबींचा समावेश असणाऱ्या प्रक्रियेला अभ्यासक्रम असे म्हणतात.
२. रॉबर्ट हचिंस ROBERT HUTCHINS (१९३६) ज्यामध्ये व्याकरणाचे नियम, वाचन, लेखन, तर्क , साहित्य
व गणित (प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी) पाश्चिमात्य जगातील महान ग्रंथांची ओळख माध्यमिक शिक्षणाच्या
सुरुवातीलाच करून दिली जाते. बाबींचा समावेश असणाऱ्या प्रक्रियेला अभ्यासक्रम असे म्हणतात.
३. क्रग KRUG (१९५७), यांच्यामते ज्यामध्ये अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये
अध्ययन अनुभवांची संधी मिळण्याच्या हेतूने दिल्या जाणाऱ्या अनुदेशनाचा समावेश ज्यात असतो त्याला अभ्यासक्रम
म्हणतात.
४. राल्फ टेलर RALF TYLER (१९५६) शाळेची निर्देशित के लेली ध्येये प्राप्त करण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांच्या
अध्ययनाचे के लेले सर्व प्रकारचे नियोजन म्हणजे अभ्यासक्रम होय.
५. हिल्डा टाबा HILDA TABA (१९६२), अभ्यासक्रमाचा आराखडा काय आहे यापेक्षा त्या अभ्यासक्रमात कोणते
घटक अंतर्भूत आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमात ध्येये व विशिष्ट उद्दिष्टांची विधाने समाविष्ट
असतात. ही ध्येये व उद्दिष्टे आशयाची निवड व त्यांचे संघटन सूचित करतात. उद्दिष्टांची मांडणी अशी के लेली असते की,
ज्यातून गाभाभूत अध्ययन-अध्यापनाचा आदर्श नमुनाच प्रकट होतो, जणू ती उद्दिष्टांची मागणीच ठरावी किं वा त्या
आशयाच्या संघटनांचीच जणू ती गरज भासावी इतकी समरस होऊन ध्येये आणि उद्दिष्टांची विधाने अभ्यासक्रमात समाविष्ट
असतात. शेवटी तीच उद्दिष्टे अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेत अंतर्भूत के ली जातात.
६. रोनाल्ड सी डॉल RONALD C. DOLL (१९८८) औपचारिक व अनौपचारिक आशय आणि प्रक्रिया यांच्याद्वारे अध्ययनाधीन ज्ञान,
आकलन, कौशल्ये विकसन, अभिवृत्ती, गुण, अवगुणांचे परीक्षण, आणि मूल्ये इ. शाळेच्या छत्रछायेत प्राप्त करणे म्हणजे अभ्यासक्रम होय.
७. जॉन विल्स आणि जोसेफ बॉन्दी JON WILES & JOSEPH BONDI (१९८९) अभ्यासक्रम हा ध्येय व मूल्यांचा असा संच आहे
की, जो विकास प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या पराकाष्ठेने वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभूतीसाठी क्रियाशील होतो. ध्येयांचे प्रतिनिधित्व
करणाऱ्या अध्ययन-अनुभूतींची उच्चतम परिणामकारकता हीच अभ्यासक्रम विकसनाच्या प्रयत्नांचा उत्कर्ष बिंदू असतो
८. डेव्हीड जी. आर्मस्ट्राँग DAVID G. ARMSTRONG (१९८९) अध्ययनार्थीच्या वर्तनात आणि आंतरिक मर्मदृष्टीत बदल घडवून
आणण्याच्या हेतूने आयोजित करावयाच्या अध्ययन- अनुभूतींचे संघटन आणि आशयाच्या निवडीचे प्रभावी असे खास नियोजन म्हणजे अभ्यासक्रम.

वरील व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की, अभ्यासक्रम हे ध्येय साध्य करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. शाळेने ठरविलेली ध्येये, धोरणे,
विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारी अध्ययन-अनुभूती, आशय, ते अवगत करण्यासाठीच्या विविध अध्ययन- अध्यापन
पद्धती, प्रतिमाने, साधने, तंत्रे आणि अवगत के लेले ज्ञान, आकलन, कौशल्ये, अभिवृत्ती, मूल्ये नीती, आशय इ. चा स्तर तपासण्यासाठी शिक्षण,
अभ्यासेतर उपक्रम इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमात के लेला असतो. एका अर्थाने परिपूर्ण माणूस बनविण्यासाठी अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्त्वे
पुरविते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासक्रमात अनेक तरतुदी असतात.
अभ्यासक्रमात के वळ विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी काय काय करावे याचाच अंतर्भाव नसतो, तर अंतिमतः अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांनी काय आणि कसे शिकावे याचे
मार्गदर्शन करणारा दस्ताऐवज असतो, शालेय छत्रछायेत विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्याच्या हेतूने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पत्तीसाठी द्यावयाचे नियोजित
आणि मार्गदर्शित पुनर्रचित ज्ञान व अनुभव निरंतरपणे पुरविणारा आराखडा म्हणजे अभ्यासक्रम.
* अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि व्याप्ती:
राल्फ टेलर यांनी आहे. या तर्काचा प्रभाव अभ्यासक्रम अभ्यासक्रमनिर्मिती प्रक्रियेमागील तार्कि कता (RATIONAL) स्पष्ट के ली अभ्यासक्रमाचे विश्लेषण व
अर्थनिर्वाचन यावरही दिसतो. या तर्कामुळे निर्मितीची प्रक्रिया तर उकलली, त्याच बरोबर अभ्यासक्रमाचे स्वरूप आणिव्याप्तीही स्पष्ट झाली. टेलर यांच्या तर्कामध्ये
सामान्यतः चार घटक महत्त्वाचे दिसतात. या चार घटकांना अनुसरूनच त्यांनी मूलभूत प्रश्न उपस्थित के ले आहेत. या चार घटकांनाअनुसरून आपण अभ्यासक्रमाचे
स्वरूप व व्याप्ती समजून घेऊ शकतो.
ते चार घटक पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१) शिक्षणाचा हेतू
२) अध्ययन अनुभव
३) परिणामकारक अनुदेशनासाठी अध्ययन अनुभवाची संघटन.
४) परिणामकारक अध्ययन अनुभव -अनुभूतीचे मूल्यमापन

You might also like