Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 9

Maratha Vidya Prasarak Samaj’s

KSKW Arts, Science and Commerce College, CIDCO, Nashik


Department of Political Science

Generic Elective Course


Civic Education
(नागरी शिक्षण )
By
Raviraj Vatne
(Head Department of Political Science)
Generic Elective Course
Civic Education
(नागरी शिक्षण )

• Syllabus
1) Fundamental Rights and Duties
(मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य)
2) Social Justice ( सामाजिक न्याय)
3) Marginal Section within the Indian Society
(भारतीय समाजातील सीमान्त समुदाय)
4) Role of Panchayat Raj
( पंचायत राज ची भूमिका)
Fundamental Rights & Fundamental Duties ( मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य)

मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य (Fundamental rights and Basic


duties) ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

मूलभूत हक्क (Fundamental rights) आपल्याला आपले जीवन


शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून भारतीय संविधानात दिले आहेत.

तर मूलभूत कर्तव्य (Basic duties) हे आपल्याला आपल्या देशाप्रती काय


जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव करून देते.
Fundamental Rights ( मूलभूत हक्क )

• मूलभूत हक्क / अधिकार (Fundamental rights) :-

अमेरिके च्या संविधानातून मुलभूत हक्कांचे (Fundamental rights) तत्व स्वीकारण्यात

आलेले आहे तर जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीच्या काळात मुलभूत हक्कांचे

(Fundamental rights) निलंबन ह्या या बाबी घेण्यात आलेल्या आहेत. भारतीय संविधानात

भाग ३, कलम १२ ते ३५ मध्ये एकू ण ७ मुलभूत हक्क देण्यात आल होते. मुलभूत हक्कात

(Fundamental rights) १९७८ च्या ४४ व्या घटनादुरुस्तीत संपतीचा हक्क मुलभूत हक्काच्या

(Fundamental rights) यादीतून वगळन्यात आल्याने आता त्यांची संख्या फक्त ६ उरली आहे.
Fundamental Rights ( मूलभूत हक्क )

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क (Fundamental rights) दिलेले आहेत.
१ १४ ते १८ समतेचा हक्क Right to Equality
२ १९ ते २२ स्वातंत्र्याचा हक्क Right to Freedom
३ २३ ते २४ शोषणाविरुद्धचा हक्क Right Against Exploitation
४ २५ ते २८ धर्मस्वातंत्र्याचा हक्क Right to Freedom of Religion
५ २९ ते ३० सांस्कृ तिक व शैक्षणिक हक्क Cultural and Educational Rights
६ ३२ घटनात्मक उपाययोजनेचा हक्क Right to Constitutional Remedies
Fundamental Duties ( मूलभूत कर्तव्य )
भारतीय संविधानात सुरवातीला मूलभूत कर्तव्ये नव्हती (Basic duties) परंतु काही
काळानंतर त्याची गरज भासू लागली जसे राष्ट्रहिताच्या दृष्टीने व्यक्तीस काही कर्तव्ये देखील पार
पाडावी लागतात.

१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीत सरदार स्वरणसिंग समितीच्या शिफारसीवरून संविधानात


घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A नुसार १० मुलभूत कर्तव्यांचा (Basic duties) समावेश
करण्यात आला.

२००२ मध्ये ८६ वी घटनादुरुस्ती द्वारे ११ वे शिक्षणविषयक आणखीन एक कर्तव्य डण्यात


आले. त्यामुळे आता एकू ण मुलभूत कर्तव्यांची (Basic duties) संख्या ११ आहे.

३ जानेवारी हा दिवस 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिन' म्हणून पाळला जातो. मूलभूत कर्तव्ये
(Basic duties) चा भंग के ल्यास न्यायालयाच्या शिक्षा होऊ शकते नाही.
Fundamental Duties ( मूलभूत कर्तव्य )
भारतीय राज्यघटनेत नागरिकांना अकरा मूलभूत कर्तव्य ( Basic Duties) दिलेले आहेत.
१ भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान यांचा आदर करणे.
२ स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे पालन करणे.
३ भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे.
४ देशाचे संरक्षणासाठी गरज पडल्यास देशसेवेस वाहून देणे.
५ धार्मिक, भाषिक, प्रादेशिक वर्गारहित व भेदरहित भारत निर्माण करणे, स्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
६ राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृ तिक, गौरवशाली परंपरेचे रक्षण करणे.
७ नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन व रक्षण करणे, सजीव प्राणीमात्रांवर दया करणे.
८ मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानार्जन यांची जोपासना करणे.
९ सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करणे.
१० राष्ट्राच्या उत्तरोतर प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक उत्कर्ष साधने.
११ ६ ते १४ वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देने हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे.
Social Justice ( सामाजिक न्याय )
भारतात ऐतिहासिक काळापासून जात, धर्म, वंश, भाषा इत्यादींवरून होणाऱ्या भेदभावामुळे सामाजिक विषमता मोठ्या
प्रमाणावर होती. ती विषमता नष्ट करणे, आणि विषमतेमुळे मागे पडलेल्या घटकांना काही सवलती देऊन त्यांना मुख्य
प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे, यास सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे म्हणता येईल.

समाजातील कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, किं वा वर्गाच्या व्यक्तीसाठी अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गोष्टी उपलब्ध
करून देणे, त्यास विकासाची योग्य संधी देणे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्यांकडून दुर्बलांचे होणारे
शोषण थांबवणे, आणि आर्थिक सत्तेचे विकें द्रीकरण करणे, ही सूत्रे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत महत्वाची आहेत.

उपेक्षितांना समान संधी देण्यासोबतच सुरक्षा प्रदान करणे हेही गरजेचे असते. तणाव आणि भय यांपासून दुर्बलांना
मुक्तता मिळवून देणे हे मुख्यत: राज्यसंस्थेचे काम असते. राज्यातील विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांच्या
मूलभूत गरजा भागवणे, त्यांना समान संधी देणे, त्यांच्यात उद्भवणारे संघर्ष कमी वा नष्ट करणे,

समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे ही सामाजिक न्यायाची मुख्य उद्दिष्ट्ये होत. भारताच्या संविधानात
समाविष्ट असलेली सामाजिक न्यायाची संकल्पना देखील समाजातील असंतुलन नष्ट करून कल्याणकारी राज्यास
प्राधान्य देणारी आहे.
Social Justice ( सामाजिक न्याय )
भारतीय राज्यघटनेतील समतेचा हक्क सामाजिक न्याय प्रस्तापित करतो.
समानतेचा हक्क ( कलम 14 ते 18 )
कलम १४ = कायद्यासमोर समानता.
कलम १५: धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान इत्यादी कारणांवरून
कोणताही भेदभाव के ला जाणार नाही.
कलम १६ = सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता.
कलम १७ = अस्पृश्यता (अस्पृश्यता) नाहीशी करण्यात आली आहे.
कलम 18 = शीर्षके /पदव्या रद्द करण्यात आली आहेत.

You might also like