Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 8

NAME :- DIKE RAJESH RAMKRUSHANA

CLASS : - S. Y. B . Com

DIVISION :-A

ROLL NO . : - 222061

SEMISTER :- III

SUBJECT : - BUSINESS MANAGEMENT


निर्देशन :- अर्थ

व्यवस्थापनात नियोजन, नियंत्रण, निर्देशन व अभिप्रेरणा ही अत्यंत महत्त्वाची कार्ये आहेत. व्यवसायाची
पूर्वनिर्धारित उठे साध्य करण्यासाठी नियोजन के ले जाते. नियोजनानंतर विशिष्ट कामे पूर्ण करण्यासाठी संघटन रचना के ली जाते. संघटनेत योग्य व्यक्तीची
निवड करून निर्णय घ्यावे लागतात. तसेच वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत मार्गदर्शन करावे लागते. तसेच कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या कार्यावर व त्यांच्या
जबाबदारीवर नियंत्रण ठेवावे लागते. म्हणून जे आदेश देऊन मार्गदर्शन व दिग्दर्शन के ले जाते; त्यालाच निर्देशन किं वा संचालन असे म्हणतात.
व्याख्या
“निर्देशन म्हणजे प्रत्यक्ष कृ ती सुरू करणे व कर्मचारीवगांत अभिप्रेरणा व शक्ती (उत्साह) निर्माण करणे होय.
- जॉर्ज टेरी

“दिग्दर्शन हे व्यवस्थापनाचे हृदय आहे. त्यामध्ये वृसी ठरविणे, आवेश व सूचना देणे आणि गतिमान नेतृत्व देणे इत्यादींचा समावेश होतो.”
– मार्शल डिमॉक

 “व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्री व पुरुष कामगारांना मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे व त्यांचे नेतृत्व करणे म्हणजे निर्देशन किं वा
संचालन होय.”. - उर्वीक व ब्रेच

“संघटनेतील कार्ये चांगल्या रीतीने पूर्ण व्हावीत म्हणून ज्या व्यवस्थापकीय प्रयत्नांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा दिली जाते त्याला निर्देशन
असे म्हणतात.” - एस. एस. चॅटर्जी
निर्देशनाचे घटक

 दुतर्फा संदेशवहन प्रक्रिया :- कोणत्याही व्यवसायात दुतर्फा संदेशवहनाची ‘ आवश्यकता असते. एकतर्फी संदेशवहनामुळे व्यवस्थापकाला चांगल्या
मार्गदर्शकाची भूमिका पार पाडता येत नाही. त्यामुळे दुतर्फी संदेशवहन होणे आवश्यक असते.

 समन्वय साधणे : व्यवसायात व्यवस्थापकाला अनेक घटकांमध्ये प्रभावीपणे समन्वय साधावा लागतो. कर्मचारी, यंत्रे, कच्चा माल, पक्का माल,
उत्पादनाच्या प्रक्रिया, हिशेब ठेवणे इत्यादी अनेक प्रकारच्या कार्यात व्यवस्थापकाला समन्वय साधावा लागतो. त्यामुळे कार्यात समन्वय प्रस्थापित
करणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य समजले जाते.
 व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यांवरील कार्य : व्यवस्थापनात एकू ण तीन स्तर असतात. उच्च, मध्यम व कनिष्ठ असे स्तर असतात, उच्च पातळीवरील
अधिकारी हे दुय्यम अधिकाऱ्यांना आवेश देत असतात. आणि कनिष्ठ पातळीवर कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कर्मचाऱ्यांकसून प्रत्यक्षात काम करून
घेतले जाते, निर्देशनाचे आदेश देण्याचे काम सर्वच पातळ्यांवरून होत असते. या कार्यात सातत्य असते. एकदा आदेश देऊन कोणतेही व्यवस्थापन
थांबत नाही. आदेश देण्याची क्रिया निरंतर चालू असते.

 अधिकार प्रदान करणे :- व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकार -प्रदानाची आवश्यकता असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदाऱ्या
योग्य रीतीने पार पाडता याव्यात म्हणून त्याला अधिकार द्यावे लागतात. हे अधिकार कर्मचाऱ्यांची योग्यता व पात्रता पाहून दिले जातात. तसेच
अधिकार व जबाबदाऱ्या समान पातळीत द्याव्या लागतात. कारण कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांचा दुरुपयोग करू नये हेही पाहिले जाते.
 निर्देशन व व्यवस्थापनाचे कार्यामधील सहसंबंध : व्यवस्थापकाला व्यवस्थापनाबाबतची विविध कार्ये करावी लागतात. निर्देशन हे त्यापैकी एक महत्त्वाचे
कार्य आहे. निर्देशनाचा व्यवस्थापनाच्या नियोजन, कर्मचाऱ्यांची नेमणूक, संघटन, अभिप्रेरणा व नियंत्रण या कार्यांशी अत्यंत जवळचा संबंध येतो. तसेच
निर्देशनामध्ये या सर्व बाबी असणे आवश्यक असते.

 दुहेरी उद्दिष्टे :- निर्देशन कार्याबद्दल अनेक वेळा गैरसमज निर्माण होतात. कारण निर्देशनात वर्चस्व गाजविले जाते. तसेच व्यवस्थापक त्यांच्या अहंकारी
प्रवृत्तीने वागतात. हे जरी बरोबर असले तरी त्यांचा मुख्य उद्देश व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करणे हे असते तर दुय्यम उद्दिष्टेदेखील विसरता येत नाहीत.
दुहेरी उद्दिष्टांमध्ये कर्मचाऱ्यांकडू न काम करवून घेणे, व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, व्यवस्थापकाच्या कार्याची परिणामकता वाढविणे,
पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करणे व कर्मचाऱ्यांना कार्यप्रवृत्त करणे ही उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.
 निर्देशन व इतर कार्याची परिणामकता : व्यवस्थापनामध्ये निर्देशन हे महत्त्वाचे कार्य असले तरी ते इतर कार्यांपासून वेगळे होत नाही. त्यांचा
व्यवस्थापनाच्या इतर कार्यांशी अत्यंत जवळचा संबंध असतो. इतर कार्ये प्रभावी असतील तर निर्देशन कार्यात नक्की यश मिळते. तसेच दुसऱ्या बाजूने
निर्देशन कार्याची परिणामकता, संघटन, अभिप्रेरणा व नियंत्रण इत्यादी कार्यांचे यश निश्चित करते.

 साहाय्यकांना मार्गदर्शन व त्याच्यावर नियंत्रण : निर्देशन कार्यात साहाय्यकांना मार्गदर्शन करण्याच्या क्रियेचाही समावेश होतो. व्यवस्थापकाने
कर्मचाऱ्यांना त्यांचे काम समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी दूर के ल्या पाहिजेत व शंकांचे निराकरणही के ले पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना
मार्गदर्शन करण्याची क्रिया ही निरंतर चालणारी असते.
 व्यवस्थापन कार्याचा क्रम ठरविणे : व्यवसायात व्यवस्थापकाला विविध कार्ये करावी लागतात. या कार्याचा निश्चित असा क्रम
व्यवस्थापकाला ठरवावा लागतो: व्यवस्थापकाला नियोजन, नियंत्रण, समन्वय, कर्मचाऱ्यांची नेमणूक, संघटन या कार्यानंतर
संचालनाच्या कार्याचा क्रम ठरवावा लागतो. स्थानंतर या नियंत्रणाचे कार्य करावे लागते, व्यवस्थापक जोपर्यंत संचलनाचे कार्य
करीत नाही तोपर्यंत त्याला प्रभावी नियंत्रण ठेवता येत नाही. संचालनाच्या अर्थावरच नियंत्रण कार्याचा प्रभावीपणा अवलंबून
असतो.

 आदेश देणे :- निर्देशनामध्ये आदेश देने हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. व्यवस्थापकाला त्यांच्या हाताखालील कामगारांना
नेहमी कामासाठी आवेश द्यावे लागतात. . तसेच संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना त्याची कामे समजून सांगावी
लागतात. ‘सायमन यांच्या मते, एका समूहाने घटक असलेल्या व्यक्तीचे व्यवहार किं वा त्याची वागणूक हे संघटनेची उद्दिष्टे
गाठण्यासाठी उपयोगात आणले जाणारे साधन असते. व्यवसायाचे निर्देशन करण्यासाठी व्यवस्थापकाच्या हातात आदेश हे अत्यंत
प्रभावी साधन असते. त्यामुळे कार्य सुरू करता येते व गंदही करता येते. कर्मचान्यांच्या समूहाला कार्यप्रवृत्त के ले जाते.

You might also like